हवाच मजला तोच चंद्रमा
तेच नभी चांदणें
गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें ।।धृ।।
आजीसंगे गच्चीवरती
फुलराण्यांच्या कथा ऐकती
बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें ।।१।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
फुलले होते यौवन सारे
अंगी झोंबे शितल वारे
पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे ।।२।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
सगे सोयरे मित्रमंडळी
परसदारी तुळशीजवळी
गप्पा टप्पा विनोंद बौधिके, रात्र घालवी करुनी भजने ।।३।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 25, 2017
पाटीवरती अंक लिहीले, बागडूं लागला आनंदाने
पित्याचे लक्ष वेधण्या, हनवटी खेची हातानें....१,
प्रथमापासूनी लक्ष पित्याचे, होते अवखळपणाकडे
अजाणपणा दाखवोनी, दुर्लक्ष करी मुलाकडे...२,
शब्दांची गुंफन करूनी, कवितेचा संग्रह केला
तोच संग्रह घेवून चाललो, दाखविण्या माहूरी रेणूकेला...३,
जगदंबा ही आदी शक्ती, सारे तिजला ज्ञात असते
अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते...४,
पाटीवरले अंक बघूनी, हृदय पित्याचे गहीवरले
रेणूका तर जननी विश्वाची, भाव मनीचे आधीच कळले...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
September 16, 2016
आहे ती लहान परि किर्ती महान,
छोटे येऊन शिकले मोठे होऊन गेले ।।१।।
आले घेऊन पाटी अ आ इ ई लिहिण्यासाठी,
लिहून वाचून ज्ञानी बनले देशांत नांव कमविले ।।२।।
शहर चालते, देश चालतो महान बनले लोकांमुळे
बीजांचे वृक्ष झाले त्या केवळ शाळेमुळे ।।३।।
कुणी बनला डॉक्टर काळजी घेई आरोग्याची,
कुणी झाला इन्जिनियर देई बांधून सर्वा घर ।।४।।
शिक्षक झाले कुणी केले सर्वा शहाणे,
ज्ञान मार्ग अनेक शाळाच त्याचा पाया एक ।।५।।
आईसम प्रेम करतो आपल्या शाळेवरी,
जो कोण घडला ह्याची उकल शाळाच करी ।।६।।
जन्म देते आई परी शाळा घडवी जीवन,
कधीही न फिटे ह्या जन्मी तिचे ऋण ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 15, 2017
काढूनी झाडाच्या सालींचा आडोसा घेतला ज्या कुणीं
स्वांतंत्र्याच्या कल्पनेला बंधन पडले त्या क्षणीं ।।१।।
नग्नपणें फिरत होता श्र्वानासारखा चोहींकडे
सुसंस्कृतीची जाण येतां स्वच्छंदाला बाधा पडे ।।२।।
स्वतंत्र असूनी देखील पडते परिघ भोवती
जीवन जगण्या करितां बंधने ती कांहीं लागती ।।३।।
स्वांतत्र्याची तुमची व्याप्ती असावी दुजांना जाणूनी
दिव्य करण्याच्या ईर्षेने संस्कृतीस होइल हानी ।।४।।
ओंगळपणाचे चित्रण करती जे लेखक- कवि
आगळेपणाची भूमिका मनांत त्याच्या असावी ।।५।।
बाध न येतां बंधनाला भव्य असे करुं शकतात
चाकोरी मध्येंच राहूनी आकाशाला भिडूं शकतात ।।६।।।
निर्माण करुन गीतेला हजारों वर्ष ती झाली
तोच विषय पुन्हां घेउनी ज्ञानोबांनी बाजी मारली ।।७।।
सोडा तुम्हीं वेडा विचार स्वचछंदी त्या जगण्याचा
गढूळ होता वातावरण गुदमरेल जीव तुमचा ।।८।।
जेव्हां कुणी स्वातंत्र्य मागे त्याच्याही मर्यादा असती
दुजे त्याच्या पाठीमागचे एक पाऊल पुढे टाकती ।।९।।
दुसऱ्याचे हेच पाऊल पहिल्यास ठरे घातक
दुष्टचक्र स्वच्छंदाचे पोखरुन टाकील कित्येक ।।१०।।
तयार करित आहात बेतालपणाचा भस्मासूर
तुम्हांलाही नष्ट करील हात ठेउनी शिरावर ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 10, 2017
गेले ज्यांचे जीव तडफडून
कशी होईल याची भरपाई
जीव जपला जो जीव लावून
गेला निघून तो ऑक्सिजनपाई
किती होणार अशा दुर्दैवी घटना
कधी थांबणार मृत्यूचे तांडव
कुठे गेली मुले आटवून पाना
तर इथे सर्वत्र गळती आसवं
दुःख झेलण्या मजबूत माती
विसरण्या सारे खुले आकाश
दूर राहिली ती नाती गोती
दिवस व रात्र झाले भकास
वेळ कोणावर नको यायला
आता कंपते सारे शरीर
काळानेच जर घातला घाला
तर मग कुठे मिळेल आधार
रा. ना. जाधव, परळी वैजनाथ
May 8, 2021
अग्ग बाई!!
सास्सु बाई
सदा त्यांना
अस्से घाई
ओsss!अरेच्चा!
पहा पहा
आधुनिक
पोषाख हा
अय्यो गडे!
इश्श गडे!
माझ्झी सासू
पहा गडे!
त्यांना तुम्ही
हसू नका
नाव मुळी
ठेवू नका
अय्यो रामा!
म्हणू नका
अभ्यासू त्या
ज्ञान ऐका
ज्ञानपिठ
पुरस्कार
त्यांना मिळे
मान थोर
छंद त्यांचा
ओssss!बघा ना
पुस्तकांचा
हा खजिना
नम्र अति
त्या आहेत
हो!मी सुन
भाग्यवंत
(कल्पनेत कल्पिलेल्या सास्सूबाई)
-- सौ. माणिक शुरजोशी
November 26, 2019
March 23, 2022
पावन हो तू आई तव चरण शरण येई ।।धृ।।
संसाराचा खेळ मांडला
खेळविसी तूं मजला
थकूनी मी जाई ।।१।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
रात्रंदिनीं ध्यास लागला
जीव माझा तगमगला
झोप तर येतच नाही ।।२।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
आळवितो मी तुजला
विसरुनी देहभानाला
नयनी तव रुप पाही ।।३।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
देह झिजविला
दुर सारुनी सुखाला
कां तप फळा न येई ।।४।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
साद दे हांकेला
पेटलो आहे हट्टाला
नसता परत जन्म घेई ।।५।।
पावन हो तू आई तव चरण शरण येई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
January 17, 2015
तुझ्या माझ्या भावनांतुन
सदैव प्रेमानं आरवावं
नव्या सुंदर कल्पनांनी
घर आपल सारवावं
तुझ्या सुंदर डोळ्यांनी
तू मला भुलवावं
प्रेमाच्या झोक्यावर
मी तुला झुलवावं
कोलमडलो कधी तर
एकमेकांना सावरावं
आपल्या क्रोधाला आपण
संयमाने आवरावं
गैरसमजाच्या खड्यांनी
समंजसपणे बुजावं
छोट्या छोट्या कुरबूरींना
तू दूरवर फेकावं
तुझ्या माझ्या स्नेहाला
दोघांनी साचवावं
नात्याच्या बंधांना
तुटण्यापासून वाचवावं
तू कधी खोटं खोटं
माझ्यासाठी हरावं
मी कधी तुझ्यासाठी
जग सारं जिंकावं
झालेल्या तुझ्या चूकांना
मी अगदी सहज विसरावं
कधी माझ्या कुशीत शिरून
तू दूःखाला ओघळावं
तुझ्या माझ्या प्रेमाला
ह्रुदयात खोलवर रूजवावं
दोघांच्या सहजीवनात
प्रेमाचे सुंदर फुल उजवावं
- डॉ.सुभाष कटकदौंड
November 13, 2018
बदलून गेले जीवन
अर्थ कळल्यानंतर
परिस्थितीची आली जाण
जाग आल्या नंतर ।।१।।
श्रीमंतीच्या नादानें
ऐषआरामी झालो
पैशाच्या गर्वाने
माणुसकी विसरलो ।।२।।
तारुण्यातील उर्मीने
अहंकारी बनविले
शरिरातील गुर्मीने
निर्दयी मज ठरविले ।।३।।
धंद्यामध्ये येता खोट
निराश अति झालो
गरिबीची चालतां वाट
प्रेमळ मी बनलो ।।४।।
देह बनला दुर्बल
विकार तो जडूनी
जर्जर- पिडीतां बद्दल
सहानुभूती आली मनी ।।५।।
अनुभवासारखा
शिक्षक नाहीं कुणी
शहाणा करी अनेका
परिस्थीती समजावूनी ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
February 6, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti