पाणी – कपात

 



मुंबईत आहे

पाणी कपात

इतरत्र असावे

निदान बशीत

मुंबईत पाणी

विषय चर्चेचा

हाणामारी अन

जिव्हाळ्याचा

मुंबईत पाणी

शिक्षक आहे

लोकांस तो शिक्षा

करीत आहे

मुंबईत शिस्त

पाणी आहे

वेळापत्रक तिचे

ठरवत आहे

मुंबई सारीच

हतबल आहे

पावसापुढे ती

झुकली आहे

कवी – निलेश बामणे

— निलेश बामणे

Author