तेवत होती ज्योत दिव्याची,
प्रकाश देऊनी सर्व जनां,
आनंदी करण्या आनंद वाटे,
तगमग दिसे तिच्या मना ।।१।।
शांत जळते केंव्हां तरी,
भडकून उठते कधी कधी,
फडफड करीत मंदावते,
इच्छा दाखवी घेण्या समाधी ।।२।।
जगदंबेच्या प्रतिमेवरती,
प्रकाश टाकुनी हास्य टिपते,
हास्य बघूनी त्या देवीचे,
चरण स्पर्शण्या झेपावते ।।३।।
अजाणपणाच्या खेळामधली,
स्वप्न तरंगे दिसती,
दिव्यामधले तेल संपता,
काजळी धरती वाती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Author
Post Views: 11