मानव जीवन तुम्हां लाभले, महत् भाग्य ते समजावे
कर्म दिधले पाठी तुमच्या, सद्उपयोगी यांसी करावे....१,
जीवन रेखा मर्यादेतच, ठेवली असती तुमचे हातीं
जाणीव त्याची मनीं असावी, कर्म कार्ये जेव्हां करिती...२,
हाती घेतल्या कार्यामध्ये, एकचित्त तो प्रयत्न व्हावा
काळ केवढा तुमचे जवळी, याचा विचार सतत यावा...३,
कार्ये राहता अपूर्ण अशी, वेळ न उरे तुमचे हाती
अभाव असता योजनेचा, अपयश ते पदरी पडती....४
कार्य व्याप्तीची दिशा असावी, शक्ती साधन काळ बघूनी
जीवन यशाचा आनंद खरा, लुटाल तुम्ही हे ध्या जाणूनी.....५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 18, 2017
"नरेंद्रजीं"चे धरून बोट
"देवेंद्रजी" पळत आहेत
"घड्याळ्या"च्या काट्यांना
ते अधूनमधून लोंबकळत आहेत
विझली "गांधी" नामाची आँधी
उरली थोडी ज"रा हूल" आहे
अखिलत्व गमावलेल्या पक्षास
"अखिलेशी" यशाची भूल आहे
सन्मान बहु पडला पदरात
बारा मती ची ही करामत आहे
कोणत्याही सत्ता-ऋतूत
"शरद" ऋतु ऐन भरात आहे
मज तुजसवे घेऊन टाक रे
अन् मतदारां पुढे उभा "ठाक रे"
धाकट्याची ही टाळी टाळून
मोठा म्हणे तू असाच वाक रे
मंत्रीपदाच्या खुर्चीत
कवी-राम रममाण आहे
कमळाच्या कर्जात आता
सा"री पब्लीक" गहाण आहे
मतमतांच्या या गलबल्यात
जनतेस हे कळले आहे
आळीपाळीने या साऱ्यांनी
लोकशाहीस छळले आहे
------ कवी कोण आहे माहिती नाही
February 25, 2017
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला
तुझ्या मंदिरी आलो पावन हो तू भक्तिला ।।धृ।।
तुझे अजाण बालक करितो खोड्या अनेक
न होई चित्त एक
तूच समजोनी घेई मम चंचल मनाला ।।१।।
रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला
जमदग्नीची कांता परशूरामाची तू माता
मनी तूजला भजता
आशशिर्वाद तू देई आनंदाने सर्वाला ।।२।।
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला
गेले माझे जीवन तूझे नाम घेऊन
कंठ आले दाटून
चुका आमच्या होई क्षमा कर अज्ञानाला ।।३।।
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला
सारे अर्पिले प्रेमांत आळविले भक्तित,
परि न कळली रित
अत:करण गाणे गाई आवाज नसे ओठाला ।।४।।
रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला
नको मजला धन विटले आतां मन
सोडव मोहमायेतून
चरणांवरी लोळण घेई हात पसरुं कुणाला ।।५।।
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com
October 5, 2018
हवाच मजला तोच चंद्रमा
तेच नभी चांदणें
गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें ।।धृ।।
आजीसंगे गच्चीवरती
फुलराण्यांच्या कथा ऐकती
बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें ।।१।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
फुलले होते यौवन सारे
अंगी झोंबे शितल वारे
पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे ।।२।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
सगे सोयरे मित्रमंडळी
परसदारी तुळशीजवळी
गप्पा टप्पा विनोंद बौधिके, रात्र घालवी करुनी भजने ।।३।।
गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
July 25, 2016
ज्याचा त्याचा विठ्ठल, अंतरीचा ध्यास,
नजरेआड तो असे, श्वासामध्ये वास.
विटेवरी उभा तो, म्हणती लोक सारे,
मला भेटे एकांतात, अश्रूंच्या किनारे.
नाही मला गजर, नाही मोठी वारी,
शांततेच्या वाटेवर, चालतो मी भारी.
हरपलो जेव्हा मी, सापडला तो तेव्हा,
“मी”पण गळून गेलं, उरलो फक्त देवा.
ज्याचा त्याचा विठ्ठल, वेगळी त्याची प्रीत,
कोणी गातो नाम,कोणी हरवतो अंतरीत.
दर्शनाची आस नाही, नाही काही मागणं,
तो आहे इतकंच, झालं जीवन जागणं.
आतल्या त्या पोकळीत, उजेड जसा लपलेला,
तसाच माझा विठ्ठल, नि:शब्द सामावलेला.
ज्याचा त्याचा विठ्ठल…
शोधू नको दूर,
डोळे मिटले की दिसतो
अंतरीचा तो नूर.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 4, 2026
सारे जीवन जाते,
आपले अन्न शोधण्याकडे,
काय उरते आमच्या हाती,
विचार करा थोडे ।।१।।
जीवनाची मर्यादा ठरली,
आयुष्य रेखेमुळे,
आज वा उद्या संपवू यात्रा,
हेच आम्हांस कळे ।।२।।
धडपड करी आम्ही,
सारी देह सुखासाठी,
विचार ही मनांत नसतो,
इतरांच्या करिता ।।३।।
वेळ काढावा जीवनातुनी,
इतरांसाठी थोडा,
सार्थकी लावा आयुष्य तुम्ही,
जीवन शिकवी धडा ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
April 20, 2017
मी आजही अलवार
जीवापाड कुरवाळतो
काहुर अव्यक्त वेदनांचे
मनोमनी शांत सुखावतो..
जे लाभले भाग्य ललाटी
ते निमुटपणे मी भोगतो
घेवुनीया व्रत सत्कर्माचे
मी जगती विवेके जगतो..
जन्म गतजन्मांचेच कर्म
ओंजळीत घेवुनी जगतो
हिशेब साराच पापपुण्णी
चित्रगुप्त तो चोख ठेवतो..
कावडीच सुखदुःखांच्या
सोबती घेवुनी मी चालतो
सरतातही क्षण जीवनाचे
नकळे मज कोण सावरतो..
सारेसारेच अगम्य अतर्क्य
केवळ दयाघना आठवितो
तो एक अदृश्य अनामिक
सर्वत्र अणुरेणुतुनी दिसतो..
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. १८५
२/८/२०२२
September 2, 2022
मुरलीधरा वाजीव रे मुरली
जीवसृष्टी सारी आसुसलेली...
सुर वेणुचे दशदिशा उजळती
खगगण, मंजुळ स्वरे गाती...
गोकुळीची जित्राबे गोधूली
तुझ्याच ओढ़ी हंबरत येती...
झुळझुळती मोदे वृक्षवल्ली
मीरा, राधा भक्तिगीत गाती...
स्वर तव मुरलीचे मनोहारी
प्रेमस्पर्शे जीवास जगविती
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. २८०
२/११/२०२२
November 9, 2022
राहू केतुनो सोडून द्या तुम्ही, मगरमिठीतून चंद्राला
बघा बघा ह्या प्रथ्वीवरती, काय तो हा: हा: कार मजला
प्रेमिजानांचा प्रेमबिंदू तो, सौंदर्याचा मुकुटमणी
झाकळला सारा नभात हा, म्हणती त्यास गिळला कुणी
आत्मा जाता सोडून देहा, उरे न कांही मागे
चंद्र चांदणे नभात नसता, सौंदर्याची मिटतील अंगे
सौंदर्यातची बघतो सारे, जगण्यासाठी सौंदर्य हवे
विश्वचक्र हे फिरत रहाण्या चंद्राचे आस्तित्व सतत हवे
नष्ट होतील जीवजीवाणू, आनंद त्यांचा जाईल विरुनी
बलिदानाच्या पुण्याईने परि सुटेल चंद्र मगरमिठीतून
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 14, 2020
कळप
सतत फिरे चक्र निसर्गाचे
सुख दु:खाचे...१,
एका मागूनी दुसरा असती
पाठोपाठ येती...२,
प्रत्येक वस्तूची छाया असते
पाठलाग करिते....३,
सुखाचे जाता काही क्षण आनंदी
समाधानाची होई गर्दी....४
लगेच अनूभव येतो दु:खाचा
काळ जाई निराशेचा...५,
पूनरपी येता सारे सुख
विसरूनी जातो दु:ख....६,
जे होत असते ते बऱ्यासाठी
म्हणती समाधाना पोटी...७,
समाधान शोधणे हेही सुख
त्यातच जगती अनेक...८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
December 14, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti