(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • असावा सुंदर पापलेटचा बंगला

    असावा सुन्दर पापलेटचा बंगला

    चंदेरी रुपेरी सुरमईचा चांगला

    पापलेट्च्या बंगल्याला सारंग्याचे दार

    धारदार डेग्याच्या कुर्ल्या पहरेदार

    दोन कोळंब्याच्या खिड्क्या दोन

    हॅलो हॅलो करायला लॉबस्टरचा फोन

    मांदेल्याचा सोनेरी रंग छानदार

    बांगड्यांना अंगभर खवले फार फार

    बंगल्याच्या छतात कालवा रहातो

    शिंपल्यातल्या तिसर्यांशी लपाछपी खेळतो

    लांब लांब करल्यांचा नाच रंगला

    बोंबिलाचा मासा मस्त चांगला

    किती किती चवीचा पापलेट्चा बंगला

    सोलकढी भातासंगे मस्त हाणला

    (व्हॉटसऍप वरुन)

      May 20, 2016


  • ध्यास पाऊलांना

    चिरंजीवी स्मरण तुझे

      July 8, 2021


  • झाकोळलेले गगन

    झाकोळले सारे गगन आता

      August 2, 2021


  • लोकशाहीच्या नावाने चांगभलं…!!

    मतदान हा लोकशाहीचा उत्सव... चार दिवसांचा... त्या साठी आपले गावातील संबंध खराब करु नयेत, कर्ज काढून खर्च करू नये... हे सांगण्याचा प्रयत्न....

    `आम्ही साहित्यक फेसबुक ग्रुप'चे लेखक श्री रघू देशपांडे, नांदेड, यांची ही रचना


    गावोगावी वेशीवर
    लोकशाहीचा नगारा
    गल्लीच्या कुशीवर
    भाऊबंदकी नजारा...
    जातीपातीची वाटणी
    गोळाबेरीज मांडली
    गावएकीची चटणी
    सत्तेपायी वाटली...
    गोंधळ जागवला
    स्वार्थी कुरघोडीने
    अख्खा गाव नागवला
    रात्री अफाट खर्चाने...
    क्षणांचे राजकारण
    भिंती घातल्या मनात
    भाऊ भाऊ करीती रण
    कोण किती तें पाण्यात..
    बॅलेटचे मतदान
    बुलेटने ठरु लागलें
    गावोगावी अन्नदान
    मदिरापान झडू लागले...
    आली आली लोकशाही
    गाव नशेने झिंगला
    कुणा एका पाटलाने
    आपला मळा विकला...
    अमाप खर्च करून
    लोकप्रतिनिधी जिंकला
    विकासाच्या नावा वरुन
    बेल भंडारा उधळला...
    यासाठी का दिले भावा
    संविधान भिमाने...?
    मतदान घ्यावे भावा
    आप आपल्या सत्कर्माने...!!
    -- रघू देशपांडे
    नांदेड

      January 4, 2021


  • या कातरल्या क्षणांना

    या कातरल्या क्षणांना,सय तुझी येते,--
    उन्हाची तप्त काहिली,
    चटकन् दूर होते,
    वारा धुंद वाही,
    ढग जाती प्रवासी,
    अधूनमधून बिजलीही,
    उगा आपुले दर्शन देई,
    अशा वेळी आठवे मज,
    सोनेरी प्रभेची सांज,
    याच समुद्रकिनारी,
    वाजली मिलनाची गाज,
    नभ सुंदर सोनबावरे,
    होते भेटीस साक्षी,
    कूजन करीत बागडती,
    पक्षी आनंदें वृक्षी,
    किनारा दूरवर तटस्थ,
    उभ्याने राखी सागराला,
    मिलनाची किती उदाहरणे,
    ठेवून समोरी चंद्राला,---!!!
    या मंतरलेल्या क्षणांना,
    आठवे चांदणी उगवती,
    प्रेमाखातर सुधाकराच्या,
    नशेत त्या नाचती -गाती,
    तिच्यावर चढली धुंदी,
    आजही मज नीट स्मरे,
    इकडे धरणीवर खाली,
    कुणी प्रेमवीर गात फिरे,
    अशी चांदणी नाचती-गाती,
    इथेच त्याला ओढत आणी,
    खळाळूंन उत्तेजित होई,
    निळ्याशांर लाटांचे पाणी,--!!!!

    © हिमगौरी कर्वे.

      March 2, 2020


  • चहा सोबत जोडली

    चहा सोबत जोडली
    जातात हळुवार नाती,
    आणि स्वातीच्या मनात
    साहित्यिक वरील मायेचे सोबती
    चहा घ्यावा सुमधुर
    मोजावा कशाला किती,
    चहाचा आग्रह करते सदा
    साऱ्या रसिकांची स्वाती
    किती घ्यावा चहा तो
    मन भरत कधीच नाही,
    रसिकहो माझ्या काव्यांसोबत
    होऊन जाऊदे एक कप चहाची वर्णी
    -- स्वाती ठोंबरे.

      February 3, 2022


  • कवितेचे मूल्यमापन

    काव्य रचनेचा छंद लागूनी, कविता करू लागलो
    भाव तरंगाना आकार देवूनी, शब्दांत गुंफू लागलो....१,

    एका मागूनी दुसरी कविता, रचित मी चाललो
    वही भरता संग्रहाची, आनंदात गुंग झालो...२,

    अचानकपणे खंत वाटूनी, निराश मी झालो
    निरर्थक तो वेळ दवडिला, हेच मनी समजलो....३,

    बोध मिळूनी कुणीतरी सांगे, मूल्यमापन होईल
    वेडेपणा वा शहाणपणा, काळ हाच ठरवील...४,

    करूनी घेतले तुज कडूनी, कोणत्या तरी शक्तीने
    कर्तेपणाचा भाव तुझ्यातील, सोडून दे तू मनाने....५,

    असेल हे जर कृत्य त्याचे, काळजी त्याला यशाची
    सैनिक तू लढत रहावे, आशा सोडून जिंकण्याची....६

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 9, 2018


  • काही म्हणतात प्रेमात पडायचे असते

    काही म्हणतात प्रेमात पडायचे असते
    तर काही म्हणतात प्रेम करायचे असते...
    काहीही असो प्रेम महत्वाचे
    पण काहीना तेही आवडत नाही....
    प्रेमात असताना अनेक जण किवा जणी
    खुप ' डोळस ' प्रेम करतात..
    मग ते खरे प्रेम असते ..
    का तिथे पण ६०-४०% हिशेब असतो....
    असेल बुवा ६०-४० चा नाद अनेकांना
    कदाचित वृतीने टक्केवाले
    अधिकारी-कर्मचारीअसतील...
    टक्क्यावर जगणारे...
    पण प्रेमात असे नसावे
    असे वाटते...
    अर्थात ते हिशेब त्यांना
    चुकते करावे लागतात
    एखाद्या एकाकी
    वळणावर......
    -- सतीश चाफेकर.

      December 13, 2021


  • असामान्य व्यक्ती

    सामान्यांतूनी असामान्य निर्मिती, ध्येय असावे खरे,

    कोळशाच्या खाणीत सांपडती, चमचमणारे हिरे.....१,

    उदार होवूनी निसर्ग देतो, समान संधी सर्वा,

    परि तेच घेती खेचूनी तिजला, सोडूनी जीवन पर्वा......२,

    जीवन म्हणजे अमूल्य देणगी, समज असते काहींना

    व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा......३,

    जीवन कोडे नाहीं उमगले, कुणास आजवरी

    अर्थ आगळे अन् ध्येय निराळे, काढती आपल्या परी....४,

    निर्जीव सजीव सर्वांचि मिळूनी, उभारला संसार

    हर घटकाने सहभागी व्हावे, लावूनी हातभार....५,

    सर्व जगापरी जगत असतां, जगे इतरांसाठी

    सामान्यातील असामान्य ठरेतो, ह्याच विश्वापाठीं......६

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      February 8, 2021


  • मोहरली ही अवनी

    ग्रीष्माच्या काहिलीने
    आसमंत तप्त झाला
    अति उष्णतेने धारित्रीस
    कासावीस करून गेला ।। 1 ।।
    भेगाळलेल्या जमिनी आणि
    बंद पडलेली मोट
    नाही आला पाऊस
    तर कसं भरेल पोट? ।। 2 ।।
    प्रत्येक जण प्रतीक्षेत
    कधी येईल पाऊस
    डोळ्यांतून पाणी येईपर्यंत
    नको वाट बघायला लावूस ।। 3 ।।
    पाण्याविना तडफडत होते
    पशू, पक्षी, मानव
    मग तो प्रासाद असो, इमारत असो,
    शिवार असो वा अंगण ।। 4 ।।
    गोठ्यात, जंगलात, चारा छावणीत
    हंबरत होती गुरं ढोरं
    निढळावर हात ठेवून बळीराजा
    पावसाची करत होता आर्जवं ।। 5 ।।
    इंद्राला रिझवण्यासाठी मोर
    नाचत होते विसरून सारे भान
    कोकीळ, पावश्या हाकारत होते
    मेघांना, गाऊन सुंदर गान ।। 6 ।।
    इंद्रदेवापर्यंत पोहोचल्या
    लाखो मनांच्या आर्त हाका
    वरुण राजाला धाडलं त्यानं
    घेऊन ढगांच्या खूप साऱ्या लड्या।। 7 ।।
    वाऱ्याला सोबत घेवून ढगांचे पुंजके
    बागडू लागले आभाळभर
    कुठं दाट कुठं विरळ
    सैरावैरा धावाधाव माळरानावर ।। 8 ।।
    विद्युल्लता पण सामील झाली
    खेळायला पाठ शिवणीचा डाव
    मग त्यांच्याही आनंदाला
    राहिला नाही ठाव ।। 9 ।।
    ढगुल्यांचा आणि विजुडीचा
    खेळ आला रंगात
    डफ-मृदंगाची जुगलबंदी
    जमली जणू नभांगणात ।। 10 ।।
    तहानलेली धरित्री आणि
    तिची सारी लेकरं
    पाहु लागली आभाळाकडे
    विस्फारून त्यांची नेत्रं ।। 11 ।।
    ढग कुजबुजले एकमेकांशी
    हिरवे डोंगर अन् झाडे
    दिसतील आपल्याला जिथं जिथं
    बरसुया आपण फक्त तिथं तिथं ।। 12 ।।
    बाकीच्या ओसाड प्रदेशाचं काय?
    तिथंही चालू आहे आत्महत्यांचे सत्र
    पाण्याविना
    ते पण झालेत गलितगात्र ।। 13 ।।
    चूक तर माणसांचीच आहे
    वागावे लागेल सक्त
    झाडे तोडून त्यांनीच तर केले
    धरणीला या उजाड आणि रिक्त ।। 14 ।।
    आता पावसाची मागणी करण्याचा
    त्यांना राहिला नाही हक्क
    त्यांच्याच पापाची शिक्षा मिळणार त्यांना
    त्यासाठीच आहेत ते पात्र ।। 15 ।।
    ढग झुकले थोडे खाली
    झाले थोडे दक्ष
    झाडांसाठी मानवांनी खोदलेल्या
    खड्डयांकडे गेले त्यांचे लक्ष ।। 16 ।।
    गावोगावी गावकऱ्यांनी
    खोदले होते असंख्य चर
    स्वच्छ करून ठेवल्या होत्या
    कोरड्या विहिरी आणि हातपंप ।। 17 ।।
    दारोदारी वाढवली होती
    हजारो छोटी छोटी रोपं
    मोठे विलक्षण आणि
    आश्वासक होते ते दृश्य ।। 18 ।।
    लहानथोरांची चालली होती लगबग
    यावर्षी एकच होते सर्वांचे लक्ष्य
    केला होता त्यांनी संकल्प
    लावण्याचा कोटी कोटी वृक्ष ।। 19 ।।
    हे पाहून आनंदाने मग
    ढगांनी केली खूप दाटी
    विजुताईच्या हातावर दिली
    जोरदार टाळी ।। 20 ।।
    आसमंतात वाजू लागला नगारा
    सुटला भन्नाट वारा
    होवू लागला ढगांचा गडगडाट
    अन विजांचा लखलखाट ।। 21 ।।
    बरसू लागल्या मग मेघांच्या
    झिम्माड सरीवर सरी
    थेंबांच्या टिपऱ्या वाजू लागल्या अंगणी
    क्षणात पावसाने भिजली सारी धरित्री ।। 22 ।।
    पावसाचा होताच धुवांधार वर्षाव
    दरवळला तो मृदगंध आसमंतात
    ओढे, नाले, नद्या, चर
    आणि भरले सारे तलाव काठोकाठ ।। 23 ।।
    कळून आली मानवाला
    त्याची मोठ्ठी चूक
    झाडे लावा झाडे जगवा
    पाणी जिरवा, पाणी वाचवा
    मंत्र अंगिकारला अचुक ।। 24 ।।
    मोहरली ही अवनी
    मग आनंदाने पानोपानी
    सज्ज झाली नेसावयाला
    हिरवी पैठणी......हिरवी पैठणी......।। 25 ।।
    -- मी सदाफुली
    @ ✍️ संध्या प्रकाश बापट

      November 13, 2019