(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • देह समजा सोय

    जेव्हां मी म्हणतो माझे,

    सोय माझी असते त्यांत,

    देह जगविण्या कामीं,

    प्रयत्न हे सारे होतात ।।१।।

    देह वाटते साधन,

    प्रभूकडे त्या जाण्याचे,

    त्यासी ठेवतां चांगले,

    होते चिंतन तयाचे ।।२।।

    भजन करा प्रभूचे,

    सुख देवूनी देहाला

    परि केवल सुखासाठीं,

    विसरूं नका हो त्याला ।।३।।

    देह चांगला म्हणजे,

    ऐष आरामीं नसावे,

    ती एक सोय असूनी,

    त्यांने प्रभू मिळवावे ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      April 1, 2020


  • कन्येस निराश बघून

    कशास घेतला जन्म मुली तूं, आमचे पोटीं
    समजत नाहीं काय गे लिहीले, तुझ्या ललाटीं

    झेप तुझी दिसून आली, जन्मापासूनी
    चतूरपणें तूं मान उंचावली, स्व-गुणांनी

    तोकडे पडतो सदैव आम्ही, देण्या तुज संधी
    खंत वाटते मनांस ह्याची, कधी कधी

    उपजत गुण हे जोपासावे, कळते सारे कांहीं
    झेप तुझी आणि झेप आमची, विसंगत राही

    असे उमलणारे फूल उद्याचे, तूं एक कळी
    धन संपत्ती परकिया करतां, आम्हा जवळी

    होऊं शकते उणीव त्यांत, कधीं असता आपले
    हेच मग दुजाचे समजतां, मन चरकले

    प्रयत्न होतील सुखी ठेवण्या, राहून अर्धपोटीं
    आशिर्वाद तरी निश्चित असतील, सदैव तव पाठीं

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      April 20, 2017


  • कधी असेही घडावे

    कधी असेही घडावे,
    सुखाला परिमाण नसावे,
    भरभरून ओंजळीत त्यांस,
    घेऊन छान मिरवावे,--!!!

    कधी असेही घडावे,
    आपुले सगळे आपुलेच राहावे,
    परकेपणा सोडून देत,
    जिवां-शिवांचे नाते जपावे,--!!!

    ‌कधी असेही घडावे,
    सुंदरतेला सुगंध यावे,
    त्यांना एकदा कडेखांदी,
    दिमाखात घेऊन हिंडावे,--!!!

    कधी असेही घडावे,
    अपेक्षांचे ओझे नसावे,
    मुक्त स्वैर आनंदाने,
    खुशीचे विशाल पंख ल्यावे,--!!!

    कधी असेही घडावे,
    ताण-तणावांना निरोप द्यावे,
    आपुल्या मस्त जीवनातून,
    कायमचे त्यांना घालवावे,--!!!

    कधी असेही घडावे,
    सगळे विश्र्वच कुटुंब बनावे,
    जिकडे जावे तिकडे केवळ,
    प्रेममय वातावरण असावे,--!!!

    कधी असेही घडावे,
    मित्रत्त्वाला जिवापांड जपावे,
    स्वार्थी, संकुचित वृत्ती
    सोडून जिवांचे मैत्र करावे,--!!!

    कधी असेही घडावे,
    दु:खांना धरुन बडवावे,
    क्षणार्धात संपवून त्यांना,
    विजयी होऊन परतावे,!!!

    हिमगौरी कर्वे

      March 6, 2019


  • गीता – जीवनाची एक उकल

    रणभूमीवर समर प्रसंगी मृत्यु असता सामोरी
    जीवनांची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी //धृ//

    अर्जुन असूनी महारथी द्विधा झाली मनःस्थिती
    सगे सोयरे तेथे बघूनी खालती बसला निराशूनी
    कसे मारुं मी माझेच सारे भगवंताला प्रश्न विचारी //१//
    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    कुणीही नाही कुणाचे येथे नाते गोते क्षणिक भासते
    सत्ता येथे चालते प्रभुची खेळणी सारी ठरते त्याची
    तूं आहेस अर्जुना सोंगटी प्रभू ईच्छे फिरे पटावरी //२//

    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    कर तूं, नसे तुझे ते कर्म हा आहे केवळ प्रभूधर्म
    सोडून द्यावीस फलआशा न येई केव्हां तुज निराशा
    तत्वे सांगुनी आर्जुनासी संशय त्याचा दूर करी //३//
    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    विचार कर तूं आहेस कोण जाणार कोठे, येई कोठून
    चक्रे फिरती अनेक तूं आहेस त्यातील एक
    स्वतंत्र असूनी कांही अंशी अवलंबून तूं दुजावरी //४//
    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    गीता सांगे अपूर्व ज्ञान जीवनाची करी उकलन
    प्रश्न त्यांचे सारे सुटती आत्मचिंतन जेव्हां करिती
    केवळ समजतां गीतेला खरें समाधान लाभे उरीं //५//
    जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 21, 2016


  • मन आभाळ

    अंतरी रूप पाझरते
    स्मरण नेत्री ओघळते...
    सांग ! कसे विसरावे
    मनआभाळ ते दाटते...

    श्रावण, प्रीतबरसला
    लाघव ते रिमझिमते...
    मृदगंधलेली, सुगंधा
    गगना भारूनी जाते...

    व्योमात कृष्णसावळा
    ब्रह्मात, पावरी घुमते...
    लडिवाळ नाद मधुरम
    मनी भक्तीप्रीत प्रसवते...

    हेच भाग्य साक्षात्कारी
    जन्मोजन्मी, सुखावते...
    ती राधा अन ती मीरा
    आत्माच समर्पूनी जाते...

    –वि.ग.सातपुते.( भावकवी )

    9766544908

    रचना क्र.१९१

    ८/८/२०२२

      September 9, 2022


  • सहज एकदा फेरफटका मारताना

    सहज एकदा फेरफटका मारताना
    वाटेत "राग" भेटला
    मला पाहून म्हणाला...
    काय राव, आठवण काढत नाही हल्ली ?

    मी म्हणालो अरे नुकताच
    "संयम" पाळलाय घरात
    आणि "माया" पण माहेरपणाला
    आली आहे..

    तसं तोंड फिरवून तो निघूनच गेला..!!

    पुढे बाजारात "चिडचिड"
    उभी दिसली गर्दीत, खरं तर
    ही माझी बालमैत्रीण पण पुढे
    कॉलेजात "अक्कल" नावाचा
    मित्र मिळाला आणि हिच्याशी
    संपर्क तुटला..!!

    आज मला पाहून म्हणाली अरे
    "कटकट" आणि "वैताग"
    ची काय खबरबात ?

    मी म्हटलं, काही कल्पना नाही बुवा..
    हल्ली मी "भक्ती" बरोबर
    सख्य केलय त्यामुळे
    "आनंदा"त आहे अगदी..!!

    पुढे जवळच्याच बागेत
    "कंटाळा" झोपा काढताना दिसला
    माझं अन त्याच हाडवैर....
    अगदी 36 चा आकडा म्हणाना....
    त्यामुळे मला साधी ओळख
    दाखवायचाही त्याने चक्क "आळस" केला..!!
    मीही मग मुद्दाम "गडबडी" कडे
    लिफ्ट मागितली आणि
    तिथून सटकलो..!!

    पुढे एका वळणावर "दुःख"
    भेटलं, मला पाहताच म्हणालं
    "अरे ये, तुझीच वाट पहात होतो"

    मी म्हणालो, "अरे वाट पहात
    होतास कि वाट लावायच्या
    तयारीत होतास? आणि माझ्या
    बायकोपेक्षा तूच जास्त वाट
    बघतोस कि रे माझी
    "तसं "लाजून" ते म्हणालं,
    "अरे मी पाचवीलाच पडलो
    (पाचवीला पुजलो) तुझ्या वर्गात.
    कस काय सर्व ? घरचे मजेत ना?"

    मी म्हणालो, "छान" चाललय सगळं...
    "श्रद्धा" आणि "विश्वास"
    असे दोन भाडेकरू ठेवलेत घरात
    त्यांच्या मदतीने मस्त चाललंय.
    तू नको "काळजी" करूस.
    हे ऐकल्यावर "ओशाळलं"
    आणि निघून गेलं..!!

    थोडं पुढे गेलो तोच
    "सुख" लांब उभं दिसलं
    तिथूनच मला खुणावत होतं,
    धावत ये नाहीतर मी चाललो
    मला उशीर होतोय..

    मी म्हणालो, "अरे कळायला
    लागल्यापासून तुझ्याच तर मागे
    धावतोय उर फुटे पर्यंत,
    आणि त्यामुळेच आयुष्याची फरपट
    झालीय... एकदा दोनदा भेटलास
    पण 'दुःख' आणि 'तू' साटलोट
    करून मला एकटं पाडलत..
    दर वेळी. आता तूच काय तुझी
    "अपेक्षा" पण नकोय मला.
    मी शोधलीय माझी "शांती"
    आणि घराच्यानीं माझ नावच
    "समाधान" ठेवलंय..!!

      July 16, 2017


  • मद्यपान नको मद्यगान करु ! भाग 2

    (काहीं मुक्तक)

    या ‘गटारी’च्या सुमुहूर्तीं, चला रे पीत बसूं
    दाखवून चुस्तीफुर्ती, चला रे पीत वसूं ।।

    मंजूरच साऱ्या शर्ती, चला रे पीत बसूं
    श्रेष्ठ फक्त इच्छापूर्ती, चला रे पीत बसूं ।।

    ही मदिरा चिंताहर्ती, चला रे पीत बसूं
    ती जीवन-रक्षणकर्ती, चला रे पीत बसूं ।।

    ती चिरहर्षाची मूर्ती, चला रे पीत बसूं

    ती नित्य देतसे स्फूर्ती , चला रे पीत बसूं ।।

    ती जगाचीच उद्धर्ती, चला रे पीत बसूं
    ती सार्‍यांची संस्कर्ती, चला रे पीत बसूं ।।

    अमुच्या भाराची धर्ती, चला रे पीत बसूं
    ती राज्ञी चक्रवर्ती, चला रे पीत बसूं ।।

    शकात होउन भर्ती, चला रे पीत बसूं
    नच पर्वा, ‘को जागर्ती’, चला रे पीत बसूं ।।

    पोचूं स्वर्गीं वा गर्तीं, चला रे पीत बसूं
    वाढेलच अंतीं कीर्ती, चला रे पीत बसूं ।।

    गटारी: ‘गटारी अमावस्येचा सण
    चुस्ती: चापल्य, चपळपणा
    फुर्ती: शीध्रता, घाई
    शर्ती: अटी

    उद्धर्ती: उद्धार करणारी

    संस्कर्ती : संस्कार करणारी
    भाराची धर्ती: भार उचलणारी / वाहणारी
    राज्ञी: राणी
    प्राशक: पिणारे
    भर्ती: प्रविष्ट, सामील
    को जागर्ति’: ‘कोण जागें आहे ?
    गर्तीं : खड्ड्यात , पाताळात

    -- सुभाष स. नाईक.

      December 28, 2024


  • श्री कृष्णाची भक्ताला मदत

    घटना घडली एके दिवशी प्रभू बसले जेवण्या

    रुख्मिणी त्यांचे जवळी होती वाढण्या ।।१।।

    चट्कन उठूनी ताटावरुनी धावत गेले दारीं

    क्षणिक थांबूनी तेथे येऊनी बसले पाटावरी ।।२।।

    प्रश्न पडला रुखमिणीस काय गडबड झाली

    श्रीकृष्णाची धावपळ तिजला नाही कळली ।।३।।

    चौकशी करतां कृष्ण बदले कहानी एका भक्ताची

    हरिनाम मुखी नाचत होता काळजी नव्हती लोकांची ।।४।।

    वेडा समजोनी त्यासी दगड होते मारीत

    हरिनाम नाही सोडले वाहात असूनी रक्त ।।५।।

    धावलो होतो त्याचेसाठीं करण्या त्याला मदत

    परि लहू बघूनी अंगावरती दगड घेतला हातात ।।६।।

    समर्थ झाला आता तो रक्षण करण्या स्वतःचे

    हरिनाम सोडता मुखातून कारण नव्हते मदतीचे ।।७।।

    ही झाला छोटी कहाणी सांगे जीवनाची तत्वे

    सर्वस्व अर्पिता प्रभूसी विश्वास ठेवा त्याते ।।८।।

    डॉ भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      February 28, 2021


  • अंतरंगात उभा विठ्ठल

    बघ उघडूनी दार अंतरी, उभा कटीवर हात,
    माझ्या श्वासांच्या तालावर, विठ्ठल धरितो नाद।
    ना पंढरीची वाट इथे, ना चंद्रभागेचा घाट,
    हृदयाच्या त्या वाळवंटी, उमलतो भक्तीचा थाट॥१॥

    डोळे मिटता सावळा तो, तेजोमय भासे,
    अश्रूंच्या त्या ओवाळीने, चरणी मन हे वसे।
    नाही मागणे काही आता, नाही इच्छा ठायी,
    तुझ्या नामाच्या गजरात, देहभान हरपून जाई॥२॥

    अहंकाराची वीट काढुनी, रचिले अंत:करण,
    त्या भक्तीच्या रांगोळीत, उमटले तुझे चरण।
    लोभ-मोहाची धूळ झटकुनी, स्वच्छ केले द्वार,
    ये रे माझ्या अंतरी आता, पांडुरंगा आधार॥३॥

    वादळ येवो दुःखांचे, काळोख दाटो भोवती,
    नाम तुझे दीप बनूनी, उजळे माझी प्रीती।
    तूच दाता, तूच माता, तूच जीवाचा श्वास,
    तुझ्या कृपेच्या सावलीत, संपतो जन्मांचा त्रास॥४॥

    बघ उघडूनी दार अंतरी, पंढरपूर हेच झाले,
    भक्त आणि भगवंतामध्ये, अंतर काहीच न राहिले।
    कटीवर हात ठेवुनी म्हणे, “भिऊ नको रे जिवा”,
    मीच तुझ्यात, तूच माझ्यात हा अनुभव चिरंतन नवा॥५॥

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      June 12, 2026


  • Dance रे मोरा, Mango च्या वनात

    सेमी ईंग्लिश मिडियम च्या आईने आपल्या मुलाला शिकविलेलि कविता...!

    Dance रे मोरा, Mangoच्या वनात
    Dance रे मोरा Dance...

    ढगांशी wind झुंजला रे..
    काळा काळा cotton पिंजला रे..
    आता your पाळी, तुला give टाळी..y
    फुलव पिसाराss Dance..

    Dance रे मोरा, Mangoच्या वनात
    Dance रे मोरा Dance..

    झरझर edge झरली रे..
    झाडांची leaves भिजली रे.. Rainमध्ये न्हाउ, Something गाऊ
    करुन पुकारा Dance,

    Dance रे मोरा, Mangoच्या वनात
    Dance रे मोरा Dance...

    थेंब थेंब तळ्यात dancing रे
    टप टप पानांत sounding रे..
    Rainच्या रेघांत, Play खेळु दोघांत Blue सवंगड्या Dance,

    Dance रे मोरा, Mangoच्या वनात
    Dance रे मोरा Dance...

    Rainची रिमझिम stopली रे
    तुझी माझी pair जमलीरे
    Skyमध्ये छान छान Seven रंगी कमान
    कमानीखाली त्या Dance,

    Dance रे मोरा, Mangoच्या वनात
    Dance रे मोरा Dance

    ?☺???

      February 22, 2017