(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गरम पाण्यातील बेडूक

    एका बेडकाला कोमट पाण्यात ठेवण्यात आले. अपेक्षा होती की बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल. पण तसे काही झाले नाही. मग हळू हळू ते पाणी गरम करण्यात येऊ लागले. जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले, आतातरी बेडूक टुणकन उडी मारून बाहेर येईल असे वाटू लागले. पण तसे काही घडेना. शेवटी पाणी उकळू लागले तरी पण बेडूक बाहेर येईना. शेवटी त्या बेडकाला जेव्हा उकळत्या पाण्यातून बाहेर काढले तेव्हा तो बेडूक मेलेला आढळला.

    तुम्हाला वाटेल की बेडूक उकळत्या पाण्यामूळे भाजून मेला. पण तसे नव्हते. पाण्याच्या तापमानाप्रमाणे आपल्या शरीराचे तापमान ऍडजेस्ट करायची एक खास देणगी बेडकाला मिळाली आहे. कारण बेडूक ज्या पाण्यात रहातो त्याचे तापमान नेहमीच कमी जास्त होत असते. बेडकाला कोमट पाण्यात टाकल्यावर बेडकाने आपल्या शरीराचे तापमान पाण्याच्या तापमानाप्रमाणे ऍडजेस्ट करायला सुरवात केली. पुढे जस जसे पाण्याचे तापमान वाढू लागले बेडकाने तोच प्रयोग चालु ठेवला. पण यामध्ये बेडकाची बरीच ताकद खर्च झाली. ज्यावेळी पाणी उकळू लागले व बेडकावर टुणकन उडी मारून पाण्याबाहेर पडण्याची वेळ आली तेव्हा उडी मारायला बेडकाकडे ताकदच शिल्लक राहीली नाही. त्यामूळे बेडकावर मरण ओढवले. जर ज्या वेळी ताकद होती त्यावेळी बेडूक उडी मारून बाहेर पडला असता तर नक्कीच वाचला असता.

    आपले पण असेच असते. आपण अनेकवेळा संकटे, अडथळे, अडचणी, दुःख, उदासीनता, स्वप्नभंग, निराशा यामूळे वेढले गेलेलो असतो. तसेच आपल्याला पुष्कळवेळा आपल्याला कमी लेखणारी, आपला अपमान करणारी, आपले शारिरीक, मानसीक, भावनीक व आर्थिक शोषण करणारी माणसे भेटत असतात. अशा परिस्थितीला व माणसांना तोंड देण्यासाठी देवाने आपल्याला एक आगळी वेगळी शक्ती बहाल केली आहे. ती म्हणजे सोशीकता, सहन करण्याची ताकद किंवा सहिष्णुता. आपण नेहमीच आलेल्या परिस्थितीला ऍडजेस्ट व्हायचा प्रयत्न करत असतो. उगीच कशाला वाकड्यात शिरायचे म्हणून आपल्याला जी वेडी वाकडी माणसे भेटत असतात त्यांच्याशी पण आपण ऍडजेस्ट करायचा प्रयत्न करत असतो. खरे म्हणजे यातून लवकर सुटका कशी करून घेता येईल याचे मार्ग आपल्याला दिसत असतात व समजत पण असतात. पण सहिष्णुतेच्या नावाखाली आपण याकडे दुर्लक्ष करत असतो. पण यामध्ये आपली बरीच ताकद खर्च होत असते हे आपल्याला कळत नसते. पण जेव्हा डोक्यावरून पाणी वाहू लागते व यातून आपली सुटका करून घेण्याची वेळ येते तेव्हा सुटका करून घेण्यासाठी लागणारी ‘एनर्जी’ च आपल्याकडे शिल्लक रहात नाही. आपण मग त्यात कायमचे अडकून पडतो व दैवाला दोष देण्यापलीकडे फारसे काही करू शकत नाही.

    सहनशिलता किंवा सहिष्णुता हा चांगला गुण आहे पण त्याचा अतीरेक झाला तर तो दुर्गुणच ठरतो. गुणांचे सद्गुण व दर्गुण असे दोन प्रकार आहेत. पण अनेक वेळा दुर्गुण हे सद्गुण ठरत असतात तर सद्गुण हे दुर्गुण ठरत असतात.

    तुम्ही कोणालाही तुमचे शारिरीक, मानसीक, भावनीक व आर्थिक शोषण करू देऊ नका.

    पाणी गरम होत असताना जोपर्यंत आपल्याकडे उडी मारून बाहेर पडण्याची ताकद आहे तोपर्यंत उडी मारून बाहेर पडणे शहाणपणाचे ठरते.

    तुमच्याकडे असलेल्या सहनशीलतेचा किंवा सहिष्णुतेचा उपयोग कसा करायचा हे तुमचे तुम्हीच ठरवायचे नाही का?

    --उल्हास हरी जोशी, मोः-9226846631
    (सौजन्य- व्हॉट्सअपवर आलेला एक मेसेज)

      February 24, 2016


  • मग्न असलेले जग

    मलाच वाटे - -

    जग मजलाच हांसते

    विचार करिता कळले -- जगास फुरसत नसते ।। धृ ।।

    वेगांत चालते जग, क्षुल्लक तुमचा सहभाग

    ह्या अथांग जनसागरीं, कुणी न पुसती तुम्हांपरी

    आपल्यातच जग जगते

    विचार करिता कळले -- जगास फुरसत नसते ।। १।।

    प्रत्येकांचे प्रश्न निराळे, गर्क आहेत सोडविण्या सगळे

    उगाच होई भास मजला, मनाचा हा खेळ जहाला

    बघण्या तुमचेकडे, वेळ नाही कुणाते

    विचार करिता कळले -- जगास फुरसत नसते ।।२।।

    श्रीमंतीची कुठे झलक, गरीबीत उघडी अनेक

    गाण्याच्या तालावरी नाचती, दुःखीता समोर कांही रडती

    कोण जाणतो, शेजारीच काय घडते

    विचार करिता कळले -- जगास फुरसत नसते ।।३।।

    संकल्पित कार्ये प्रचंड पुढती, धांवतो प्रत्येक पूर्ण करण्या ती

    कोठून मिळेल अवधी त्यास, करण्या दुजांची विचारपूस

    वाहून जातो, जीवनाच्या प्रवाहाते

    विचार करिता कळले -- जगास फुरसत नसते ।।४।।

    एक इच्छा राही मनीं, तुलना करावी यशाची कुणी

    डोकावतो किंचित् इतर जीवनीं, परत वाचतो आपलीच कहाणी

    बघतो "परंतु क्षणिक" इतराते

    विचार करिता कळले -- जगास फुरसत नसते ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      January 8, 2020


  • परीराणी आणि बेडूक

    परीराणी एकदा उतरली तळ्यात
    घसरून पाय पडली त्यात
    हसू लागला कावळा
    सोबत होता बगळा
    बेडूक म्हणे! परीताई परीताई
    "कसली गं एवढी घाई
    कुठे जायचंय तुला
    घेऊन चल ना मला
    मी जातेच मावशी कडे
    ती राहते नदी पलिकडे
    यायचंय तर.... चल
    पण आवाज करायचा नाही
    मला त्रास द्यायचा नाही
    दिलास तर परत आणायची नाही
    म्हणून 'बेडकाने मारली उडी
    हो डुबूक डुबूक
    नदी पलिकडे गेले
    परीताई आणि बेडूक
    मावशीकडे गेल्यावर बेडूक झाला पसार
    पावसात भिजून त्याने नदी केली पार
    झाडावरून झाडावर
    मारल्या उड्या भराभरा
    झोपाळ्यावर बसून
    केला त्याने कहर
    कसा त्याचा खेळ न्यारा
    सारा दिनभर
    भानावर आला थोडा
    अंधार पडल्यावर
    परीताई माझी वाट पहात असेल
    मला सोडून ती गेली तर नसेल ?
    परत आला मावशीकडे
    शोधू लागला परीला
    परीताई कधीच निघून
    गेली आपल्या गावाला
    परीताईची वाट बघत
    बेडूक अजून बसलाय
    तिला हाका मारून मारून
    आवाज त्याचा बसलाय
    म्हणून तर पावसामध्ये
    बेडूक अजून रडतो
    परीताईला जोरजोरात
    हाका मारतो..
    डरॅव-डरॅव-डरॅव

    -सौरभ दिघे

      May 11, 2024


  • चिमण्यांनो शिकवा.

    चिव् चिव् करित बोलतां तुम्ही सारी भाषा

    दोन स्वरातून विचारांना देत असता दिशा

    शब्द आमचे सप्तसुरांतून येती बाहेरी

    व्यक्त करिती भाव सारे असती जे अंतरी

    दोन अक्षरी किमया सारी तुमच्या भाषेची

    त्याच चिव चिवे समजुन घेता धडधड ह्रद्धयाची

    भाव मनीचे टिपून घेण्या शब्द लागती थोडे

    चेहऱ्यावरल्या हलचालीनी प्रश्न उकलूनी पडे.

    समज तुमची आपसांतली कौतूक करणारी

    शब्द मोजके असून देखील भाव दाखविणारी

    चिमण्यानो तुम्ही शिकवा सारे मानव जातीला

    व्यर्थ बडबड करुन सारी वाहूनी तो गेला

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      November 1, 2016


  • किती चाले गडबड ही

    किती चाले गडबड ही,कोण वरे कोणाला,
    वारा वाहे दाही दिशा,
    आभाळ पाहे धरणीला,--!!!

    झुळुक झुरे वाऱ्यासाठी,
    वारा वरतो हवेला,
    थंडी तडफडे उन्हाकरता ,
    उन मात्र सावलीसाठी,--!!!

    रोप तरसते मातीला,
    माती जीवनासाठी तरसे ,
    जीवन तडफडे ढगांसाठी,
    ढग आकर्षित विजेने,--!!!

    वीज आभाळा शोधे,
    आभाळ डोळे क्षितिजा लावे,
    क्षितिज उत्कंठित पहाटेसाठी,
    पहाट तळमळे सूर्यामात्रे,--!!!

    सूर्य पाहे वाकून वाट,
    श्यामल संध्याकाळची,
    संध्या तरसे "तमासाठी",
    तम उत्सुक येता रात,--!!!

    रात्र तरसे दिवसासाठी,
    दिवस म्हणे यामिनीला,
    तुझ्या विना जगणे फोल,
    केव्हा तू टाकशील कांत,--!!!

    यामिनीची ओढ प्रकाशा,
    प्रकाश कळवळे उषेसाठी,
    उषा आतुर रंगांकरता,
    रंग सारे अवकाशा,--!!!!

    हिमगौरी कर्वे.©

      May 17, 2019


  • प्रेम

    कुणीतरी आवडणे हे प्रेम नाही,
    त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणे हेच खरं प्रेम आहे.

    नुसत्या नजरा भिडल्या म्हणून प्रेम होत नाही,
    मनाने मनाला अलगद स्पर्श केला की प्रेम फुलतं.

    रोज हजारो चेहरे समोरून जातात,
    पण एकच चेहरा डोळ्यांत कायमचा विसावतो.

    असंख्य आवाज कानावर येतात,
    पण एकाच हाकेने हृदय धडधडू लागतं.

    अंतर कितीही वाढलं तरी,
    आठवणींचा धागा कधी तुटत नाही.
    वेळ कितीही बदलली तरी,
    मनातील ओढ कधी कमी होत नाही.

    रागातही काळजी असते,
    अबोलपणातही प्रेम दडलं असतं.
    स्वार्थाच्या पलीकडे जपणं,
    प्रत्येक दुःखात खंबीरपणे सोबत उभं राहणं,
    आणि प्रत्येक श्वासात तिची चाहूल लागणं,
    यालाच खरं प्रेम म्हणतात.

    कारण...

    प्रेम म्हणजे फक्त "मी तुझ्यावर प्रेम करतो" एवढंच नसतं,
    प्रेम म्हणजे "तू आनंदी असावीस" ही मनापासूनची प्रार्थना असते.

    म्हणूनच...

    कुणीतरी आवडणे हे प्रेम नाही,
    त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणे हेच खरं प्रेम आहे.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

      July 16, 2026


  • पिंडीतील ब्रह्मांड

    विज्ञानाने शोधली, अणुतील प्रचंड शक्ति
    प्रथमच जगाला कळली, अणूंतील उर्जा शक्ती

    सुक्ष्म असूनी अणु आकार, सुप्त शक्ति अंगीं
    प्रचंड उर्जा करी साकार, फोडतां अणु मध्यभागीं

    विचार मनीं येई , कोठून शक्ति ही आली
    निर्जीवातील अणूरेणूला, कशी उर्जा लाभली

    समजोनी घ्या एक, निसर्गाची श्रेष्ठता
    लहान असून देखील, प्रचंड त्याची योग्यता

    जीव देहाचे पिंड, जीवंततेतील सुक्ष्मता
    बाळगी ते ब्रह्मांड, हीच त्याची महानता

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      December 19, 2016


  • माझा भारत

    दिव्यत्वाचा ध्यास जेव्हा मनास माझ्या घेरुन टाकतो
    वेड्यासारखा मी पुटपुटतो
    माझा भारत, माझा भारत ॥ १ ॥

    तुझ्यावर जगणारी पाहून
    टोपीखालची बांडगूळं
    मी उगा विव्हळतो
    माझा भारत, माझा भारत ॥ २ ॥

    तुझ्या वेदनेची कळ
    माझ्या काळजात उठते
    माझ्या जीवनाचा मंत्र तेव्हा
    माझा भारत, माझा भारत ॥ ३ ॥

    तूच माझा जिव्हाळ्याचा
    एकमेव अर्थ जगण्याचा
    सत्ताधांना मग का न कळावा
    माझा भारत, माझा भारत ॥ ४ ॥

    अर्थ दुबळेपणाचा नसतो
    तुझ्या सोशिक शांततेला
    जिथे ज्योतीतही सामर्थ्य वणव्याचे
    तो माझा भारत, माझा भारत ॥ ५ ॥

    इथे असते गार सावली
    -भव्य हिमालयाच्या छातीची
    इथे सौंदर्याला येतो-
    -गंध मोहक पावित्र्याचा

    इथे निष्पापतेला जोड असते
    --समर्थ अशा निर्भयतेची
    इथे शांतिपूजक तुम्हां कवटाळतो
    --माझा भारत, माझा भारत ॥ ६॥

    परकी-संस्कार छायेतल्यांना
    उमगत नाही भारताचा गाभा
    अखंड इथे पाझरवतो वात्सल्यझरा
    माझा भारत, माझा भारत ॥ ७।।

    गुलामगिरीच्या निशाण्या अन्
    बाळगिती, म्हणती निर्लज्जतेने
    ज्ञानकक्षा की हो रुंदावल्या
    हजारो अनामिक हुतात्म्यांचा
    अपमान पाहून व्यथित होतो
    माझा भारत, माझा भारत ॥ ८॥

    गलिच्छ डाग पारतंत्र्याचा
    पुसला अपुल्या रक्ताने
    त्यांच्याशी कायम कृतज्ञ
    माझा भारत, माझा भारत ।। ९ ।।

    झगमगाटाहून दूर एकांती
    स्मरतो भक्तीभावाने लोकमान्यांना
    'मोडेल पण वाकणार नाही'
    माझा भारत, माझा भारत ॥ १० ॥

    माझ्या काळजाचा तुकडा
    विसावा जेव्हा त्याच्या जखमेला
    तेवढ्यानेही तो गद्गद्तो
    माझा भारत, माझा भारत ॥ ११ ॥

    शत्रूलाही 'सांभाळणाऱ्या खुर्चीचे
    का न कळे, न जुळे आपल्याच मातीशी
    पुकारतो दोन्ही हाती त्यांना
    माझा भारत, माझा भारत ॥ १२ ॥

    वैयक्तिक स्वार्थ जेव्हा तुडवतो
    हजारो निष्पाप आशाआकांक्षा
    अन्यायाने पेटून उठतो
    माझा भारत, माझा भारत ॥ १३ ॥

    माझ्या भारताला पोहोचतो
    टाहो त्याच्या, कणाकणाचा
    भरल्या नयनी तो तळमळतो
    माझा भारत, माझा भारत ॥ १४॥

    माझ्या भारताला आज-
    गरज समर्थ हातांची
    या शक्तींनो देऊ शाश्वती--
    उज्वल उद्याच्या भवितव्याची
    हाक तुम्हाला, तुमच्यासाठी-
    आसुसलेल्या देशाची
    माझा भारत, माझा भारत ॥ १५ ॥

    सुवर्णधूर निघो हजार वाटा
    हजार हातांनो अविरत झटा
    समर्थतेच्या कळसास नेऊ या
    माझा भारत, माझा भारत ॥ १६ ॥

    कृष्णाची करांगुली कुणी मला द्या
    ज्याने नेईन मी हा गोवर्धन
    पुन्हा वैभवशिखरी विराजमान
    माझा भारत, माझा भारत ॥ १७॥

    -- यतीन सामंत

      October 27, 2022


  • नाम घेण्याची वृत्ती दे

    सतत नाम घेण्यासाठीं, बुद्धी दे रे मजला
    आठवण तुझी ठेवण्याची, वृत्ती दे रे मनाला ......।।धृ।।

    श्वासात प्राण म्हणूनी, अस्तित्व तुझेच जाणी
    श्वास घेण्याची शक्ती, तुझ्याचमुळे असती

    जीवनातील चैतन्य, तुजमुळेच मिळते सर्वांना.....१
    सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला

    अन्नामधले जीवन सत्व, तूच ते महान तत्व
    सुंदर अशी सृष्टी, बघण्या ते दिली दृष्टी

    आस्वाद घेण्या जगताचा, जागृत ठेवी भावनेला...२
    सतत नाम घेण्यासाठी, बुद्धी दे रे मजला

    निनादाच्या लहरी, तन्मयतेने श्रवण करी
    आभार मान्यता मति, परि शब्दही कमी पडती

    जगणेच कठीण वाटते, क्षणभर तुजविण कुणाला...३
    सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला

    जाणून तव उपकार, मानावे सदैव आभार
    ही भावना येते मनी, जावे तुझ्यात समावूनी

    रोम रोमातूनी माझ्या, नामाच्या दे गतिला....४
    सतत नाम घेण्यासाठी बुद्धी दे रे मजला

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      June 21, 2017


  • सरीता

    ओळ लिहिताना मला
    तुझा चेहरा दिसतो..
    स्तब्ध लेखणीत माझ्या
    भाव तुझाच असतो..

    शब्दातून व्यक्त व्हावे
    माझ्या मनातले कोडे..
    तूच जाणून घ्यावेस
    शब्दातील भाव थोडे..

    तुला पाहिलं दुरून
    ओढ लागली मनाला..
    शब्द वेडे झुरतात
    रोज क्षणा क्षणाला..

    एकदाच मला हवी
    भेट एकांतात तुझी
    कवितेत वाचशील
    व्यथा प्रेमळ मनाची..

    नको अंतर कसले
    पुर्ण करेन कविता..
    सागरास मिळताच
    पूर्ण होईल सरीता

      July 28, 2026