भीतीपोटी सारे करतां
असेच वाटते....।।धृ।।
विवेकानें विचार करा, तुम्हांस हे पटते
त्रिकाळ चाले पूजा अर्चा
प्रभूविषयी होई चर्चा
बालपणींच पडे संस्कार
सारे देण्या समर्थ ईश्वर
कृपे वाचूनी त्याच्या, तुम्हां सुख दुरावते....१
भीतीपोटी सारे करता, असेच वाटते,
चूक असे हे ठसें मनाचे
कर्म ठरवीं तुम्हींच तुमचे
सहभाग नसे यात प्रभूचा
सारा खेळ असे तो मनाचा
अपयश मिळेल म्हणून टाकी, भार ईश्वरावरते.....२
भीतीपोटी सारे करता असेच वाटते
ऐषआरामाचे आम्ही पाठीं
धडपड चाले सुखासाठी
साशंक सदा मन असते
म्हणून सारे वंचित होते
मिळवण्यासाठीच त्याला भजावे, ही भावना मनी येते....३
भीतीपोटी सारे करता असेच वाटते
वाद नसे ईश्वर शक्तीचा
चालवी सतत गाडा विश्वाचा
खेळ बघे तो दूर राहूनी
सारे देई तुम्हावरती सोपवूनी
परि मन वेड्या आशेने, त्याजकडे धावते...४
भीतीपोटी सारे करता, असेच वाटते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 19, 2019
तुझे नित्य येणे जाणे
हळूच वळूनी पाहणे
नाही कधी विसरलो
तुझे ते लाघवी लाजणे
आठव ते सारे सुखद
निःशब्दी, प्रीतचांदणे
तुझे कटाक्ष सांत्वनी
निर्मली तुझे गंधाळणे
निष्पाप त्या जाणिवा
मनास भुलवुनी जाणे
तूंच हसरी कमलिका
सालस ते तुझे वागणे
अजूनही मी स्मरतो
रुप तुझे गोजीरवाणे
तू स्मरणगंधी सुगंधा
तुझे उमलुनी बहरणे
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. २२५
४/९/ २०२२
October 3, 2022
करा सर्वस्व प्रभूसी अर्पण त्यांतच मिळेल समाधान
जीवन अग्नी पेटत राही उर्जा निघे त्याचे ठायीं
उर्जेचे होते रुपांतरण साधत असे कार्य त्यातून
भावनेचा आविष्कार देई जीवना आकार
व्यक्त करण्या भावना उर्जा लागे त्यांना
एकाग्र करा मना सोडूनी सारी भावना
एकाग्र चित्त हेच ध्यान प्रभू मिळण्याचे साधन
सारी उर्जा ध्यानांत जाई तीच प्रभूसी अर्पण होई
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 3, 2017
June 7, 2022
-- स्वाती ठोंबरे.
December 6, 2021
प्रख्यात अभिनेत्री "स्मिता पाटील", यांचा काल स्मृतिदिन झाला त्यानिमित्त,---!!!
मराठमोळे सौंदर्य तुझे,
टपोरे हसरे डोळे,
चेहऱ्यावरती भाव झरती, आविर्भावही बोलके ,--!!!
चाफेकळी नाक तुझे, सामान्यातील नायिका तू ,
अवघ्याच स्त्रीजातीला, अभिमानास्पद वाटलीस तू ,--!!!
अभिनयातील शिखर गाठले, कर्तृत्वाने आगळे वेगळे,
सामाजिक भान जपले,
ते तर आणखी निराळे,--!!!
स्त्रीत्वाच्या अस्मिता सगळ्या,
नारी तितक्या परि,-साकारल्या ,
असामान्य कलेनेच केवळ,
किती भूमिका जिवंत केल्या,--!
इज्जत, अब्रू ,मानपान सारे,
स्त्रीला किती असती मोठे, वेळोवेळी सिद्ध केलेस,
पुरुषी जुलूम झुगारून ते,--!!!
आई, बहिण पत्नी,प्रेमिका,
आणि चित्रे कितीतरी,
कर्तव्य बजावत स्त्रीचे सगळे, उठून दिसलीस विद्युल्लतेपरि,--!!
अभिनय क्षेत्री जाहल्या किती, तारका पैशाला पासरी,
त्या सर्वात स्थान तुझे,
अढळ अशा ध्रुवपदी,--!!!
*अभिनय असावा कसा,
अंगोपांगी मुरलेला,
तू दाखवलेस जगा,
संयत, नेटका, नेमका*,--!!!
अल्पायुष्यातील कर्तृत्व ते,
आजही आम्हा आठवते,
जीव पुन्हा पुन्हा हळहळे, अचानक तुझ्या जाण्यामुळे,--!!!
© हिमगौरी कर्वे
December 14, 2019
देह चिखलाचा गोळा,
माय बाप रे कुंभार
त्यासी देती ते आकार,
तसा तसा घडे जाय..!!!
लहानपणी माय बाप,
बहीन भाऊ गोतावळा,
मोठा व्हता बायको भार्या,
जिनं व्यापुनं टाकीते...!!!
लेकर बाळ आन संसारं,
दमछाकीचा तो खेळं,
किती धावशीलं पळशीलं,
भावना बाजाराचा मेळं...!!!
देवा बाजार मांडला,
सगळे बाव्हले बाव्हले,
मोह टाकुनिया त्यातं,
जिवं कामालं लावले...!!!
देवा देले दोनं हातं,
किती मावलं रे त्यातं,
येता येळ निरोपाची,
वंजुळ कायमचं रिती...!!!
येता शेवटची वेळं,
नच थांबीतो तो काळं,
आखरीची ओठी ओळं,
तीबी देहासंगं जळं !!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
August 3, 2023
आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
फापट पसारा आवरून सारा ,
आता सुटसुटीत व्हायचं आहे !
याच्या साठी त्याच्या साठी ,
हे हवं , ते हवं
इथे तिथे - जाईन जिथे ,
तिथलं काही नवं नवं
हव्या हव्या चा हव्यास आता
प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे,
बॅग हलकी स्वतः पुरती
आता फक्त ठेवायची आहे !
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
अपेक्षांच्या ओझ्याखाली
आजवर त्रस्त होतो
आयुष्याच्या होल्डॉल मध्ये
काय काय कोंबत होतो !
किती बॅगा किती अडगळ !
साठवून साठवून ठेवत होतो
काय राहिलं, कुठे ठेवलं
आठवून आठवून पाहत होतो
त्या त्या वेळी ठीक होतं
आता गरज सरली आहे,
कुठे काय ठेवलंय ते ते
आता विसरून जायच आहे
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
खूप जणांनी खूप दिलं
सुख दुखाःचं भान दिलं
आपण कमी पडलो याचं
शल्य आता विसरायचं आहे !
मान, अपमान, ‘मी’ , ‘तू’
यातून बाहेर पडायचं आहे !
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
आत बाहेर काही नको
आत फक्त एक कप्पा,
जना - मनात एकच साथी
सृष्टी करता एकच देवबाप्पा !
सुंदर त्याच्या निर्मिती ला
डोळे भरून पाहायचं आहे !
रिक्त -मुक्त होत होत
अलगद उठून जायचं आहे
बॅग कशी भरायची ते
आता मला कळले आहे !
-- आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप
May 15, 2019
-- स्वाती ठोंबरे.
November 30, 2021
साद घालती काजवे
अंधार सभोवताली
व्यापलेला नंभ
चाँदण्याची वेली
-- शरद अर्जुन शहारे
December 7, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti