कां मजला ही सुंदर वाटते ?
दृष्टी माझी वा सौंदर्य तिचे ?
कोण हे ठरवी निश्चीत,
मजला काही न कळते
असेल जाण सौंदर्याची तर,
दिसेल सर्वच सुंदर नयनी
तिच एक कशी असेल सुंदर,
जग सारेच असतां सुंदर
सौंदर्याची दृष्टी नाहीं,
म्हणून सौंदर्य एखाद्यांत पाही
पूर्वग्रह दुषित असते,
तेच सौंदर्याचे परिणाम ठरते
मला जे भासते सुंदर,
दुजास ना लागे तेच मनोहर
विविधेतच्या आवडी निवडी,
सौंदर्यांत त्या वाटा काढी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 1, 2016
तुझ्या भिंतीवर मारला खिळा
आणि पडला भोक तिला...
त्या भोकातून पाहिले तुला
पण दिसला चंद्र मला...
त्या भोकाला लावला डोळा
तेंव्हा दिसला काळोख मला...
त्या भोकातूनच मग भिडला
तुझ्या डोळ्याला माझा डोळा...
त्या भोकातून पाहिले तुला
तुही मग पाहिले मला...
त्या भोकावर टांगले मला
तुही मग टांगलेस तुला...
त्या भोकातून दिले तुला
तुही दिले प्रेम मला...
त्या भोकाने धोका दिला
एका धक्काने मोकळा झाला...
प्रेमाचा मार्ग भोकात गेला
आपले प्रेम इतिहास झाला...
© कवी – निलेश बामणे (एन.डी.)
June 5, 2017
रस्त्यावरती उभी राहूनी, हातवारे ती करित होती
मध्येच हसते केंव्हां रडते, चकरा मारीत बसे खालती...१,
गर्दी जमली खूप बघ्यांची, कुत्सीतपणे न्याहळू लागली,
'शिपाई आणा जावूनी कुणी', ठाण्यात नेण्यास सांगू लागली...२
जीवनातील दु:खी चटका, सहनशक्तीचा अंत पाहतो,
मनावरील तो ताबा सुटूनी, वेडेपणा हा दिसून येतो...३
इतकी गर्दी जमून कुणीही, तिच्या मनीचा ठाव न जाणला
रूख रुख वाटली ती बघोनी, सहानूभुती शून्य समाजाला...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
August 28, 2019
कसे? समजवावे स्पंदनांना
सदैव ध्यास तुझाच गे त्यांना
क्षण क्षण भिरभिरती लोचने
व्याकुळ जीव तुज शोधताना
सर्वत्र साऱ्या तुझ्याच गं खुणा
सांगना कसे विसरु आठवांना
अजुनही साऊलीत भास तुझे
वाटते तूच सोबती गं चालताना
अंतरी भावप्रीतीच्या उतुंग लाटा
चिंब चिंब भिजतो मी झेलताना
वास्तवता, तुजविण जीवघेणी
सांगनां सावरु कसे मी जगताना
खुणावे जरी सांज सांजाळलेली
तरीही ओढ तुझीच गं पावलांना
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १५७
८ - ७ - २०२२
August 6, 2022
वेळ येता उकलन होते, साऱ्या प्रश्नांची
जाणून घ्या हो थोडे तुम्ही, रीत निसर्गाची...१,
जेंव्हां तुम्हाला यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी,
वेळ नसे योग्य आली, हेच घ्यावे जाणूनी...२,
प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे
कांहीं काळासाठी थांबवा, प्रयत्न सगळे...३,
काळ लोटतां प्रयत्न होती, पुनरपि सारे,
उकलन होवून गुंत्यांची, आख्खे निघती दोरे...४,
कुणी म्हणती ग्रह अनूकुल, ह्या घटनेला
हीच वेळेची किमयासारी, कशी कळे कुणाला....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 15, 2018
चमचमणाऱ्या लाटा भिजवी
वाळूचा शुभ्र किनारा
वाहतो त्या वरून अलगद
धुंद ओला समुद्रवारा
ऊन सोनेरी अलगद टिपती
माड तरु झुलता झुलता
अनाम आनंदी गाणे गाती
समुद्रपक्षी उडता उडता
निरवतेच्या अशा किनारी
बांबूची उबदार बने
त्यातून वाहे वारा घेऊन
सागराची अथांग स्वप्ने...
---आनंद
December 20, 2021
बाप (विडंबन कविता)…. बाप एक नाव असतं….घरातल्या घरात…
June 19, 2010
ना कुठला dance ना कुठली party
पाडवा म्हंटल कि फक्त हिंदू संस्कृती ....
ना कुठला one piece अन two piece, ना कुठला party wear
पाडवा म्हंटल कि फक्त झब्बा-लेंगा-नववारी म्हणजेच traditional wear ...
ना कुठला DJ break ना कुठला rawadi dance ....
पाडवा म्हंटल कि ढोल - तशा - झांज - ध्वज आणि लेझीम नाच
ना कुठल hard drink ना कुठल मद्य
पाडवा म्हंटल कि फक्त फक्त आणि नैवेद्य ....
ना कुठल hotel, ना कुठला beach, ना कुठला कोपरा
पाडवा म्हंटल कि फक्त हिंदू नववर्ष शोभा यात्रा ....
ना कुठली बेशुद्धी, ना कसला hangover
पाडवा म्हंटल कि नवचैतन्याचा कहर ...
ना कुठला दिखावा, ना कुठले आकर्षण न घातक ज्ञान
पाडवा म्हणजे आमच्यासाठी आमच हक्काचा सण
ना राग - द्वेष - पश्चात्ताप, ना दगा फटका
पाडवा म्हणजे आपल पथक आणि त्यांच्यावरची निष्ठा ....
ना दुःख - संताप, ना पोकळ चर्चा
पाडवा म्हणजे जल्लोष नववर्षाचा ....
March 27, 2017
त्याच्या चांगुलपणावर
ती पूर्ण हरते,
स्त्री कमी की पुरुष अधिक
ह्याची व्याख्या तिला न कळते..
तिच्या समजण्याच्या बाहेर
त्याचा चांगुलपणा तिला कळतो,
स्त्री पेक्षा पुरुष जास्त
कणखर नक्कीच असतो..
तिच्या पेक्षा तो
जास्त सरस तिला जाणवतो,
तिच्या अस्तित्वाच मूल्य तेव्हा
तिला नकळत बोचतं..
त्याच्या अव्यकतेत
तिच्या चुका तिला कळतात,
अबोल पणात त्याच्या
तिच्या भावना कोमेजतात..
ती स्त्री आणि तो पुरुष
हाच मोठा फरक असतो,
मन दोघांना असतं पण
फरक दोघांच्या भावनेत असतो..
त्याला समजतांना ती
कमी नक्कीच पडते,
कुठेच कमी नाही तो हीच
का पुरुष असण्याची व्याख्या असते..
अल्लड वागते ती
तो समज दाखवतो,
कळतं असते तिला ते
पण तीच स्त्रीच मन असतं..
निसर्गतः पुरुष कणखर
नक्कीच असतो,
तिला तो समजतो
पण तीच मन कोमल असतं..
स्त्री च्या नाजूक भावनेत
तो जरा अलिप्त असतो,
ती स्त्री आणि तो पुरुष
हाच फरक तो असतो..
स्त्री आणि पुरुष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण..
दोघांच्यात शाररीक, भावनिक, मानसिक
फरक असतो..
दोघांना भावना आणि मन असतं,
पण स्त्री च मन कोमल व्यक्त..
तर पुरुषाच मन अव्यक्त काहीसं असतं..
निसर्गतः बदल दोघांत असतो..
त्याच्या पुरुष पणाच्या व्याख्येत तो
बरोबर असतो..
पुरुषांना पण तरल भावना जाणवतात..
मनाच्या नाजूक तारा कळतात..
मग ह्या कवितेत तिला म्हणजे स्त्रीला
भावलेला, कळलेला पुरुष शब्दबद्ध केला आहे...
© स्वाती ठोंबरे
October 6, 2019
“जीवनात यशस्वी होण्यासाठी वास्तव स्वीकारायला शिकले पाहिजे “, असे धडे गिरवणाऱ्यांपेक्षा, परिस्थितीमुळे थिजलेल्या अश्रू,भावना, इच्छा, आकांक्षा, प्रेम अशा जाणीवांच्या वीटा पायाखाली रचून, त्यावर उभं राहून जग पाहणाऱ्यांना जीवनाचं वास्तव जास्त स्पष्ट दिसत असावं.
June 16, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti