घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी ।।धृ।।
वास्तुकला सुंदर रंग त्याचे बहारदार
आकर्षक वाटणार परी निवड करा जपुनी,
घ्याहो निरखूनी ।।१।।
ही घरे भावनांची त्यांत छटा विचारांची
भर पडतां श्रद्धेची जीवन जाईल तसेंच होऊनी,
घ्याहो निरखूनी ।।२।।
राग लोभ अहंकार मद मत्सर हे विकार
ह्यांची ती घरे असणार शोधा विचार करुनी,
घ्याहो निरखूनी ।।३।।
दया क्षमा शांति प्रेम आनंद उल्हासती
आदर भावांची वसती विवेक बुद्धीने शोधा जाणूनी,
घ्याहो निरखूनी ।।४।।
प्रत्येक शोधतो आपले घर तसेच करी जीवन साकार
सुख दुःखाची फळे घेणार हीच जीवनाची खरी कहाणी,
घ्याहो निरखूनी ।।५।।
घरें बांधली निरनीराळी घ्याहो निरखूनी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
November 30, 2018
युगानू युगें उभा राही, एका विटेवरी
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी ।।धृ।।
आई वडिलांची सेवा
पुंडलीक भक्तीचा ठेवा
भक्तित होई तल्लीन
जगास गेला विसरुन
उभा करुनी तुजला, गेला निघूनी चंद्रभागेतीरी ।।१।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
विषाचा तो पेला
मीरेनें प्राशन केला
भजनांत गेली दंग होऊनी
पचविलेस विष तूं घेऊनी
दुधामधले विष शोषूनी, दाह त्याचा सहन करी ।।२।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
भक्तीत गुंगली राधा
तुमचा होता ध्यास सदा
कष्ट पडता संसारी
विसरुन गेली ती सारी
झेललेस तूंच ते वार पडले तिच्या पाठीवरीं ।।३।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
राहीला नाथाघरीं
आनंदाने पाणी भरी
श्रीखंड्या समजे तुजला
कुणी न जाणी भक्तीला
सुगंधी चंदन घासूनी, सेवा नाथाची करी ।।४।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
सखूसाठीं धावला
देह तो झिझविला
निवडणे केले, कांडणे केले
राशीभर धान्य दळले
उभा राहूनी पाठीं, सखूचे कामी मदत करी ।।५।।
कष्ट भोगतो भक्तांसाठी पांडुरंग श्रीहरी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
November 30, 2018
ध्यानाने काय साधले
ऐका सगळे लक्ष्य देऊनी
हेच साधले ध्यान लावूनी ।।धृ।।
संसारांत रमलो मोहांत गुंतलो
सुख दुःखात अडकलो
उकलोनी जीवन कोडे समर्पित झालो प्रभू चरणीं ।।१।।
हेच साधले ध्यान लावूनी
जाई पैशाच्या पाठीं देह सुखासाठीं
समाधानापोटीं
धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।।
हेच साधले ध्यान लावूनी
धानाची समज उपदेशिला मज
ऐक मनाचा आवाज
तोड सर्व विचार चित्त एकाग्र करुनी ।।३।।
हेच साधले ध्यान लावूनी
एकाग्रतेची स्थिति ही ध्यानाची शक्ति
समाधान मिळविती
शांत करी मन देई चंचला घालवुनी ।।४।।
हेच साधले ध्यान लावूनी
सुख दुःखाची जाण तीव्रता कमी करुन
देऊनी तर्क ज्ञान
करी मनाची समज वाढवूनी ।।५।।
हेच साधले ध्यान लावूनी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
September 5, 2015
तू जग तुझी स्वप्ने
मी जगतो माझ्या स्वप्नात
तू फक्त आंनद मिळव
मी जगतो माझ्या आनंदात
तू मिळव सारी सुखे
मी जगतो माझ्या सुखात
तू जग तुझ्या विश्वात
मी रमतो माझ्या जगात
तू मिळव तुझे प्रेम
मी जगतो तुझ्या प्रेमात
तू जग फक्त तुझ्यासाठी
मी जगतो तुझ्या जगण्यात
तू फक्त माझी नाहीस
मी नाही आता माझ्यात
© निलेश बामणे
May 31, 2017
बागेतील तारका
व्याकूळ झाला जीव
प्रभू तुझ्या दर्शना
अर्पितो मी भाव
तुझीया चरणा ।।१।।
तेजांत लपले
तुझे दिव्य स्वरुप
नयना न जमले
टिपण्या ते रुप ।।२।।
निनादाच्या स्वरी तुच आहेस संगीत
कर्ण अवलोकन न करी ऐकण्या तुझे गीत ।।३।।
पुष्पातील सुवास तुंच आहेस सुगंध
न येई घ्राणेद्रियास ओळखता तो आनंद ।।४।।
मधुर रसाची फळे सर्वात तु बसलास
जिव्हेला मात्र न कळे तुझा सहवास ।।५।।
स्पर्शांत आहेस तूं माझ्या अवती भवती
समज न येई परंतु तुझी अस्तित्व शक्ति ।।६।।
इंद्रिये असमर्थ असूनी न शोधती तुला
ये मानव रुप घेऊन दर्शन देई मजला ।।७।।
अथवा दे मजलागी अपूर्व दिव्य शक्ति
समरस व्हावे तुझ्यांत हिच माझी विनंती ।।८।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
September 25, 2018
अधरंमधुरं घुमवित वेणू..
त्रैलोकी ब्रह्मरूप आगळे..
ब्रह्मानंदी..! मंत्रमुग्धता..
गगन ईश्वरी , निळेसावळे..।।..१
अस्ताचली रवी केशरी..
नभांगण ! ते सप्तरंगले..
सोज्वळ ती तिन्हीसांजा..
दिव्यत्वाचे , दिव्य सोहळे..।।..२
लोचनी , श्रीरंग सावळा..
सावळबाधा ती ब्रह्मांडी..
सखा , कृपावंत आगळा..
कन्हयाचे , रंगरूप सावळे..।।..३
कृष्ण,कृष्ण तो मनप्रांगणी..
गंध भृकुटी , बुक्का भाळी..
सुवर्णकांती भर्जरी पितांबर..
मयूरपिसी ते स्पर्श आगळे..।।..४
ब्रह्म ! सारेच निलकांती..
कृष्ण दंगल्या मीरा राधा..
चराचरी , वृंदावन गोकुळ..
श्रद्धाभक्तीचे रूप आगळे..।।..५
©️वि.ग.सातपुते.(भावकवी.)
( मुक्तरचना )
June 12, 2021
ललाटी ज्यांच्या जे जे लिहीले
संत जाणती दिव्य दृष्टीने
नियतीच्या ह्या हलचालीना
दिली जाती आवाहने
जाणून घेता भविष्यवाणी
जीवन मार्ग हे ज्याना कळती
तपशक्तीने संत महात्मे
योग्य मार्ग ते दाखवूनी देती
कर्माने जरी भाग्य ठरते
सुख दुखःच्या गुंत्या भोवती
त्या गुंत्यातील धागा शोधुनी
सुसाह्य त्याचे जीवन करीती
कृपा होता संत जनाची
चुकला-मुकला जाई ठिकाणी
घनदाट त्या जंगलामधली
पाऊलवाट ते देई दाखवुनी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
February 20, 2013
ती दिसती दूर अंधुक छायेसी मूर्ती
अतिरम्य पण मज ती दिव्य प्रतिमा गमती
ते गंभीर"स्थित"वितरीतसे कृष्णकांती
मनोहर दृश्य ते निम चांदण्या राती
न नाव कुठले,गाव,नाही माहित कुठली जाती
न दिसते त्या जाणिवांच भाव म्हणुनी राहती
तिजपाहुनी असे वाटते आहेत गतजन्माची नाती
मज भेटाया आलेली ती भूतकुळातील व्यक्ती
असेल वा तो कोणी परलोकीचा देवदूत
जो घेऊनि आला नक्षत्रांची शिदोरी निजबाहुत
जो आहेस कोण तू, अंधकार हा उजळून दे
ये मानव्याच्या लेकरा मज "माणुसपणाचे" गुण दे
-महेश सुर्यवंशी(कागल)
August 22, 2018
गेले सारे आयुष्य परि न कळला ईश
इच्छा राहिली अंतर्मनीं प्रभू भेटावा एके दिनीं ।।१
बालपणाचा काळ करुनी अभ्यास नि खेळ
मनाची एकाग्रता केली शरीरा करिता ।।२
तरुणपणाची उमेद जिंकू वा मरु ही जिद्द
करुन प्रयत्नांची पराकाष्टा बनवी जीवन मार्ग निष्ठा ।।३
संसारातील पदार्पण इतरासाठी समर्पण
वाढविता आपसातील भाव जाणले इतर मनाचे ठाव ।।४
काळ येता वृद्धत्वाचा दाखवी मार्ग अनुभवाचा
भजन पुजेत जाई वेळ ज्ञान गोष्टी सांगे सकळ ।।५
आता झालो देह दुर्बल प्रभू चिंतनात जाई वेळ
वाट बघतो निरोपाची ओढ फक्त जगदंबेची ।।६
आयुष्य संपता सारे खंत येऊन मन विचारे
कां न प्रभू भेटला ह्याची रुखरुख मनाला ।।७
आत्म चिंतन करिता जाणवे मी भगवंता
ईश्वर निर्गुण निराकार कर्म करी त्यास साकार ।।८
दया क्षमा शांती ह्याच ईश्वराच्या शक्ती
आयुष्यातील आनंदी क्षण हीच ईश्वराची खूण ।।९
जीवनांतील समाधान ईश्वर प्राप्तीचे लक्षण
नसावी मनी खंत आनंदी भाव हाच भगवंत ।।१०
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 5, 2020
धागा धागा मिळून,बांधले,खास घरटे,
फांदीचा आधार घेऊन,
उभ्या झाडास लटकवले,
एक चोंच करी किमया,
केवढी मोठी कारागिरी,
पिल्लांस सुरक्षित करण्यां,
माय बापाची चाले हेरगिरी,
घर मोठे प्रशस्त हवेशीर,
वारा चारी बाजूंनी वाहे,
निसर्ग सान्निध्यातले,
वाटते मोठे आरामशीर,
अंडी घालून ती उबवती,
वाट जन्माची पाहती,
कारागीरच ते नव्या उमेदी,
दार घरट्याचे असे बांधले,
सहजी कोणी उतरू नये,
पण साप नागांचा दहशतीने,
रक्षणास तत्पर दोन पाखरे,
चहूबाजूंनी घरट्याला चौकोनी,
असे जाळीदार नक्षी,
आखीवरेखीव जाळ्याला ,
केले कसे त्रिशंकूकृती ,
दुनिया सारी घरातच वसे,
संसार मांडला आगळा,
समर्थ नर मादी दोघे,
परंतु नशिबाचा खेळ वेगळा,--!
हिमगौरी कर्वे.©
April 15, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti