(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दया प्रेम भाव

    दया प्रेम हे भाव मनी, जागृत कर तू भगवंता
    तुला जाणण्या कामी येईल, हृदयामधली आद्रता

    शुश्क मन हे कुणा न जाणे, धगधगणारे राही सदा
    शोधत असता ओलावा हा, निराश होई अनेकदा

    पाझर फुटण्या प्रेमाचा तो, भाव लागती एक वटूनी
    उचंबळणारे ह्रदय तेथे, चटकन येईल मग दाटूनी

    दया प्रेम या भावांमध्ये, दडला आहे ईश्वर तो
    मनांत येता हेच भाव ते, दर्शन त्याचे घडवूनी जातो

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      August 9, 2019


  • रेणूके जगदंबे आई

    रेणुके जगदंबे आई दर्शन दे मजला

    तुझ्या मंदिरी आलो पावन हो तू भक्तिला ।।धृ।।

    तुझे अजाण बालक करितो खोड्या अनेक

    न होई चित्त एक

    तूंच समजोनी घेई मम चंचल मनाला ।।१।।

    रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला

    जमदग्नीची कांता परशूरामाची तूं माता

    मनीं तुजला भजतां

    आशिर्वाद तूं देई आनंदानें सर्वांला ।।२।।

    रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला

    गेले माझे जीवन तुझे नाम घेऊन

    कंठ आले दाटून

    चुका आमच्या होई क्षमा कर अज्ञानाला ।।३।।

    रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला

    सारे अर्पिले प्रेमांत आळविले भक्तित,

    परि न कळली रित

    अत:करण गाणे गाई आवाज नसे ओठाला ।।४।।

    रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला

    नको मजला धन विटले आतां मन

    सोडव मोहमायेतून

    चरणांवरी लोळण घेई हात पसरुं कुणाला ।।५।।

    रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला

    डॉ. भगवान नागापूरकर

    संपर्क - ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      October 23, 2016


  • एकापेक्षा एक

    झी' ने एक अनाऊन्समेंट केली,
    ऐकून मनाची चलबिचल झाली,
    भाग घ्यायची मी तयारीच केली,
    कारण स्पर्धा होती .... एकापेक्षा एक "आजी" आली |

    हे आणि मुल म्हणे,
    अग वयाच सोड, तुझ वजन तरी बघ,
    'महागुरुंच्या' डोळ्यात मावेल कां हा 'ढग' ?
    पण नातवंडांचा मला मिळाला सपोर्ट,
    म्हणून ऑडिशनचा केला दिव्य खटाटोप |

    काय नशिब पहा, चक्क मी झाले 'सिलेक्ट'
    आणि कोरीओग्राफरकडे शिकले, डान्स परफेक्ट |
    पडले, गडबडले तरी नाही बाळगली तमा,
    स्पर्धेसाठी शरीराचा, उतरवला होता न विमा |

    बुधवार गुरुवार माझा 'सेफ' झोन प्रत्येक,
    महागुरुंकडून मिळवले, रुपये 'शंभर' कित्येक |
    एकेक करुन गाठली 'महाअंतीम' फेरी
    घरच्यांनी घेतली होती SMS ची जबाबदारी |
    बघता बघता निकालाचा 'क्षण' येऊन ठेपला
    म्हटल दोन लाखांचा चेक नक्कीच 'आपला' |

    हातातला कागद आता महागुरुंनी वाचला,
    आणि विजेती आजी आहे.... आजी आहे.....
    ऐकून, सार स्टेज गरागरा फिरल,
    पडता पडता मला, कुणी तरी धरलं |

    डोळ्यावर सपकन पाणी मारलं,
    झाली वाटतं जागी, कानानी हेरलं
    बाजूलाच उभे होत 'महागुरु' घरचे,
    स्वप्नच कां शेवटी, "बिच्चारा आजीचे" |

    -- सौ. अलका वढावकर

      July 26, 2016


  • हिंदोळा

    सुमनांजली या काव्यसंग्रहातून….. 

      May 30, 2012


  • व्यथा

    गरिबाची लुट
    श्रीमंताला सुट
    अन्यायाची धामधुम खुप झाली .
    आता माझी सटकली....

    धान गेला; कापुस गेला
    सोयाबिननेही दगा दिला
    कवडीमोल मदतीचा
    माञ झाला गलबला.

    वागण्याची रित ही खुप झाली.
    आता माझी सटकली...........
    निर्यातीला नाही वाव
    देशी मालाचे पाडले भाव

    कर्जाच्या डोंगराखाली
    दाबला सारा गाव.
    दुजाभावाची रित ही जुनी झाली.
    आता माझी सटकली .............

    "निती" ला उभं करून
    विचाराचं मंथन झालं
    ग्रहणालाही लाजवेल
    असं "अधिग्रहण " झालं

    आता पून्हा काही राहिलं का बाकी
    कुठं नेऊन ठेवली माझ्या महाराष्ट्राची झाकी.

    * कवी प्रभाकर कुबडे ११/४/१५ नागपुर

      April 14, 2015


  • एकदा तुझी नी माझी भेट व्हावी

    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    व्यक्त भावनांची वेल सजावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    डोळ्यांतल्या अश्रूंची मोट तुला कळावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    निःशब्द साथ हळुवार वीण उलगडावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    मनातल्या खुणांची एकजूट व्हावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    अलगद मोहर तुझी अंतरी फुलावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    स्पर्श मधुर तुझा मी मोहक मोहरावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    आरक्त अंतरात तुझी आस बहरावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    व्याकुळ लोचनात तुझी सय साठावी
    एकदा तुझी नी माझी भेट व्हावी
    अलवार तुझ्या मिठीत मी धुंद व्हावी
    -- स्वाती ठोंबरे.

      November 10, 2021


  • कविता…

    मी प्रेमात पडलो
    की फक्त कविता लिहतो
    पप्रेमाच्या नशेत...
    नशा उतरल्यावर
    तिच्या प्रेमाची
    त्या एकदा वाचून बघतो...
    तेव्हा मला कळत
    मी नशेतही
    बराच शुद्धीत असतो...
    माझा प्रेमभंग
    झाल्यावरही
    मी फक्त कविताच लिहतो...
    पण तेव्हा मी
    पूर्ण शुद्धीत असतो...
    माझ्या कविता
    सतत वाचणाऱ्यानां
    माझं प्रेमात पडणं
    कधीच कळत नाही
    पण माझा प्रेमभंग
    मात्र लगेच कळतो...
    माझ्या कविता
    तिला कळतात
    पण वळत नाहीत
    म्हणून मी लिहतो...
    ती कवितेत
    भिजत राहते
    मी कवितांचा पाऊस
    पाडत राहतो...

    कवी - निलेश बामणे ( बी डी एन )

      June 10, 2017


  • उलघाल अशाश्वताची

    आज माणुस शोधून सापडत नाही
    सापडला तरी मानवता दिसत नाही

    सारं काही कृत्रिमतेनं नटलेले आहे
    निर्मल प्रेमभाव कुठे जाणवत नाही

    नाती, सुंदर हलक्या फुग्यासारखी
    कधी फुटतील त्याची शाश्वती नाही

    संस्कार ! फक्त स्वार्थासाठी जगावे
    भौतिक जगात नातेच राहिले नाही

    कलियुगी हात ओला तर मैतर भला
    दातृत्वी भावनां कुठेच उरली नाही

    संवाद केवळ आता फक्त व्यवहारी
    आत्मीयता, प्रेमभाव नाहीच नाही

    जगणे केवळ उलघाल अशाश्वताची
    लकेर, तृप्तिची कुठेच दिसत नाही

    उर फूटे तो पर्यंत, अहोरात्र धावावे
    तरी या युगी कुठेच मन:शांती नाही..

    --वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २१६

    २५/८/२०२२

      September 24, 2022


  • आस्तित्व

    समोर ये तूं केंव्हा तरी,
    बघण्याची मज ओढ लागली,
    फुलूनी गेली बाग कशी ही,
    बीजे जयांची तूच पेरीली ।।१।।

    कल्पकता ही अंगी असूनी,
    दूरद्दष्टीचा लाभ वसे,
    अंधारातील दुःखी जनांची,
    चाहूल तुज झाली असे ।।२।।

    शीतल करुनी दुःख तयांचे,
    जगण्याचा तो मार्ग दाखविला,
    सोडूनी सारे वाटेवरी,
    आकस्मित तू निघूनी गेला ।।३।।

    आस्तित्वाची चाहूल येते,
    आज इथे केंव्हातरी,
    तव आशीर्वादे जगतो सारे,
    हीच पावती त्याची खरी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      April 30, 2021


  • मुक्तीसाठीं

    रुजला पाहीजे विचार मनांत

    सारेच प्रभुचे असे ह्या जगांत

    जो वरी आहे मी माझे येथे असे

    त्या क्षणापर्यंत स्वार्थ मनीं वसे

    स्वार्थयुक्त मन मुक्त होत नसे

    मुक्ती येई पर्यंत पुनर्जन्म असे

    बिंबता मनांत माझे नाहीं कांहीं

    प्रभूचे समजता आत्मा मुक्त होई

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      August 1, 2013