(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जगणें अटळ असतां

    वाट कुणाची बघतो आम्हीं, ठावूक असते ते सर्वांना
    मृत्यू हा तर अटळ असूनी, केव्हांही येई अवचित क्षणा....१,

    आगमनाचा काळ तयाचा, कल्पनेनें ठरविला जातो
    अचूक जरी ते शक्य नसले, विचार त्यावरी करिता येतो...२,

    जीवन म्हणती त्या काळाला, जगणे आले मृत्यू येई तो
    जगण्यापुढे पर्याय नसतां, सुसह्य करण्या प्रयत्न होतो...३,

    तन मनाला सुख देवूनी, जीवन काल वाढविती कांहीं
    सद्उपयोग तो केला जावा, हीच इच्छा सदैव राही...४

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      August 12, 2019


  • रवि – उदयाचे स्वागत

    उठा उठा हो सकळजन

    स्वागत करु या रविउदयाचे

    फूलून जाते जीवन ज्याने

    त्या सूर्य आगमनाचे //धृ//

    उषाराणीची चाहूल येता

    चंद्रतारका ढळल्या आतां

    चराचराना जागे करण्या

    चाळवी निद्रा हलके हाता

    वंदन करु या लिन होऊनी

    चरण स्पर्शुनी उषाराणीचे //१//

    स्वागत करुया रविउदयाचे

    रंगबेरंगी सुमने फुलली

    वाऱ्यासंगे डोलू लागली

    दरवळूनी तो सुगंध सारा

    वातावरणी धुंदी आणली

    मकरंदापरि चंचल होऊनी

    स्वाद घेवूया त्याच फुलांचे //२//

    स्वागत करुया रविउदयाचे

    पक्षी येती किलबील करिती

    उठा उठा ते सांगुन जाती

    कुजबुज करिती राघू मैना

    ताना मारित कोकीळ गाती

    कुक्कुटाची ती बांग तुतारी

    आरंभ करिती पक्षीगीतांचे //३//

    स्वागत करुया रविउदयाचे

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      July 10, 2017


  • पंढरीचा राणा – ७ : उघडें मंदिर आहे

    सर्व थरांतिल नारि-नरांना उघडें मंदिर आहे
    विठुरायाच्या वारकर्‍यांना उघडें मंदिर आहे ।।

    विठुराया ज्यांचा सांगाती
    नाहीं त्यांना ज़ातीपाती
    उच्च-नीच नाहीं, सार्‍यांना उघडें मंदिर आहे ।।

    उभे पुजारी-सेवक-बडवे
    कुणि न विठूच्या भक्तां अडवे
    अष्टप्रहर, साती वारांना उघडें मंदिर आहे ।।

    प्रपंच विसरुन केलिस वारी
    अजुन थबकसी कां बाहेरी ?
    कड्याकुलुप नाहीं दारांना, उघडें मंदिर आहे ।।

    हातांमध्ये टाळ नसेना !
    गळ्यात तुळशीमाळ नसेना !
    ज्यांच्या हृदयीं विठू, तयांना उघडें मंदिर आहे ।।

    अधिकारी, तैसे चपरासी
    समान विठुच्या पायांपाशी
    भाव मनींचा सच्चा, त्यांना उघडें मंदिर आहे ।।

    दंभ,अहंकारा पळवाया,
    सत्-चित्-आनंदा मिळवाया,
    उघडा ज्ञानाच्या नयनांना, उघडें मंदिर आहे ।।
    - - -
    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
    Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

      July 10, 2016


  • देशासाठी वीरमरण ते

    देशासाठी वीरमरण ते,
    भाग्यवान" किती तुम्ही,
    कितीदा मागावे मरण असे, मिळत नाही "जन्मोजन्मी," --!!!

    भारत मातेची सेवा" करता,
    देह तुम्ही हो ठेवला, --
    देशसेवा करता करता,
    पाईकांनी कसा बळी दिला,--!!!

    अगदी पुण्यकर्म हे ठरे,
    असा मृत्यू तुमच्या नशिबी,
    नेताना तुम्हाला तोही घाबरे,
    पडलात ना देशाकारणी,--!!!

    ज्या मातीत खेळलो,वाढलो,
    तिचे केले रक्षण तुम्ही,--
    आईला पूजताना शेवट,
    कुडी झाली निव्वळ माती,--!!!

    घरदार-- आईबाप,
    पडतील उघड्यावरी,
    विचाराने नाही छळले,--
    इतकी तुमची होती तयारी,--!!!

    शूरवीर देशाचे सैनिक,
    खरेच तुम्ही धाडसी, --!!!
    निधड्या छातीने सिंहागत,
    शत्रूला झेलता अंगावरी,--!!!

    हिमगौरी कर्वे

      February 13, 2019


  • मौन जिव्हारी

    मला अजूनही कळले नाही
    तुझ्यात, मीच गुंतलो कसा
    मनास ध्यास हा नित्य तुझा
    नकळे तुझ्यात गुंतलो कसा

    जगी सारी नाती ऋणानुबंधी
    सत्यसाक्षी, हे अनादिकाली
    कां? हीच ओढ गतजन्मांची
    मीच तुझ्यात गुंतलो हा असा

    वास्तव! आज तसे दुरत्वाचे
    दुर्भाग्य! भाळी हे प्राक्तनाचे
    दग्धता ही नां कधी शमणारी
    तरी तव स्मरणी जगतो असा

    उरी आर्त ओढ प्रीतभावनांची
    घनमेघ, आठवांचे ते दाटलेले
    लोचनी रूप तुझेच तरळलेले
    सावरूनी मी जगतो हा असा

    मी भाव तुझे ओळखून आहे
    प्रीतासक्त! तूं, तरीही अबोल
    छळते, मौन हे तुझे जिव्हारी
    तरीही मी प्रतीक्षेत उभा असा

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ५५.

    २२ - २ - २०२२.

      March 9, 2022


  • चिकूपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

    चिकूच्या झाडास वर्षभर फळे येतात. चिकूमध्ये पिष्टमय पदार्थाचे तसेच पोटाच्या विकारांसाठी उपयुक्त असलेल्या तंतुमय पदार्थाचे प्रमाण चांगले असते. फळ झाडावरून काढल्यानंतर पिकत असल्याने त्यांच्यात जैवरासायनिक क्रिया अतिशय जलद घडून येतात व फळ लगेच पक्व होऊन अल्पायुषी बनते. चिकूच्या पिकलेल्या फळापासून उत्तम प्रकारची पेये व पदार्थ तयार करता येतात.

      November 9, 2016


  • देह

    देह - बाळपणीचा सुखावणारा
    मातापित्यांना
    घरच्यांना दारच्यांनाही
    मऊ, रेशिमस्पर्शी
    पहाटेच्या कोवळ्या दवबिंदूसारखा..
    देह - यौवनातला ...सुखवणारा
    इतरांना....स्वत:लाही
    रेशिमस्पर्शी सुख देणारा
    भोगणारा
    भर्जरी वस्त्रालंकारांनी मिरवणारा
    गर्वोन्नत - टपोऱ्या गुलाबपुष्पासारखा...
    देह - मावळतीचा काहीच न सोसणारा
    दुःखच नव्हे तर सुखही...
    जर्जर.. सायंकालीन सूर्यफुलासारखा..
    मान्य आहे, तसा कुठल्याच संबंधांना
    देहावाचून अर्थ नाही
    तरीही तुझ्या-माझ्यात असावं
    देहापलिकडचं काही
    हातात घेतलेले हात नि आलिंगन
    ही असावी फक्त लिपी
    पण भाषा असावी आत्म्याची..
    तरच...
    रिझू विझू डोळ्यांनी
    एकमेकांकडे पाहताना

    कडवट औषधांच्या गंधात
    नि जीव वाचवणाऱ्या शस्त्रांच्या सोबतीत
    जाणीव होईल
    संगमरवरी सौंदर्याच्या आड
    दडलेल्या रक्त-मांस-अस्थिच्याच फक्त अस्तित्वाची
    तेव्हाही आपण गाऊ वसंतातली प्रीतीगीतं
    त्याच उत्कटतेनं
    जशी गाईली होती.
    देहाला वसंताची पहिली पालवी फुटताना…..

    -सौ. राजलक्ष्मी देशपांडे

      May 10, 2023


  • जगरहाटी

    आता शब्दमनभावनांना आवरावे
    टाळावीत मुक्त, मोकळी वक्तव्ये....

    दुखावतात मने सहज बोलताना
    नित्य शब्दमनभावनांना सावरावे....

    कुणी कसेही बेमुर्वत इथे वागावे
    आपण फक्त मौन गिळूनी रहावे....

    प्रेम जिव्हाळ्याची नाती रुक्ष आता
    सहृदयी भावनाच संपली समजावे....

    मानमर्यादा, ज्येष्ठत्वही इथे संपले
    बोलणाऱ्याने आता हवे ते बोलावे....

    हीच कलियुगाची सत्य जगरहाटी
    आपणच समजून उमजून चालावे....

    रचना क्र. 13

    5/5/2023

    -वि ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

      July 15, 2023


  • दुर्बल मन नको

    सारेच आहेत दुबळे
    कुणाते नसे शक्ति
    वेळ येतां दुर्बल ठरे
    जे सबळ समजती ।।१।।

    विचार मनी येतां
    दुसरा शक्तिशाली
    समजोनी जावे तेव्हां
    हार तुमची झाली ।।२।।

    मनाची सबलता
    हेच शक्तीचे मापन
    काय कामाचा देह
    दुर्बल असतां मन ।।३।।

    सुदृढ देह व मन
    यांची मिळून जोडी
    जीवनातील यश
    तुमच्या पदरीं पाडी ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

      May 2, 2021


  • अनामिक

    मी आजही अलवार
    जीवापाड कुरवाळतो
    काहुर अव्यक्त वेदनांचे
    मनोमनी शांत सुखावतो..

    जे लाभले भाग्य ललाटी
    ते निमुटपणे मी भोगतो
    घेवुनीया व्रत सत्कर्माचे
    मी जगती विवेके जगतो..

    जन्म गतजन्मांचेच कर्म
    ओंजळीत घेवुनी जगतो
    हिशेब साराच पापपुण्णी
    चित्रगुप्त तो चोख ठेवतो..

    कावडीच सुखदुःखांच्या
    सोबती घेवुनी मी चालतो
    सरतातही क्षण जीवनाचे
    नकळे मज कोण सावरतो..

    सारेसारेच अगम्य अतर्क्य
    केवळ दयाघना आठवितो
    तो एक अदृश्य अनामिक
    सर्वत्र अणुरेणुतुनी दिसतो..

    –वि.ग.सातपुते.( भावकवी )

    9766544908

    रचना क्र. १८५

    २/८/२०२२

      September 2, 2022