खरेदी केला सुंदर पक्षी, दाम देवूनी योग्य असे ते ।
नक्षीदार पिंजरा घेवूनी, शोभिवान केले घरातें ।।
प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं ।
पक्षानें मान टाकली, पडला होता तळात मरूनी ।।
क्षणभर मनी खंत वाटली, राग आला स्वकृत्याचा ।
अकारण हौस म्हणूनी, खरेदी केला पक्षी याचा ।।
किती बरे निच मन हे निराशा तयाला धन हानीची ।
पक्षानेतर प्राण गमविला, विषण्णता परि दुय्यम याची ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 4, 2016
जगती, नित्य सदविवेके
चालत रहा, चालत रहा
मुलमंत्र, हाच जीवनाचा
सत्कर्म, सदा करीत रहा।।
विधिलिखित सारे जीवन
प्राक्तनाच हा भोग आम्हा
सुखदु:खांच्या सावलीतूनी
स्वानंद,समाधान घेत रहा।।
जन्मी, भाळी जे जे लाभले
त्यात समाधान मानीत रहा
निराशावादी कधी राहु नये
मनी, आशावाद जपत रहा।।
सत्संगे, पापांचे होते क्षालन
उतम सहवासात, सदा रहा
जीवन, खेळ कठपुतळीचा
प्रभुरामाचे रामनाम घेत रहा।।
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०९.
१० - ४ - २०२२
April 26, 2022
सखे तुझं वागणं हे बरं नव्हे,
हे मी आता मनाशीच म्हणतो.
शब्द उरले नाहीत बोलायला,
मौनाचीच आता भाषांतरे.
तू गेलीस तेव्हा रडलो नाही मी,
फक्त श्वास थोडा थांबला होता.
कळलं नाही कोणत्या क्षणी,
आपला संवाद शेवटचा झाला होता.
आठवणींचा आवाज फार मोठा असतो,
तो शांततेतच अधिक बोचतो.
तुझं नाव न उच्चारताही,
रोज तुझ्यासाठी झुरतो.
मी वाट पाहत नाही आता,
फक्त तुझी अनुपस्थिती सवय झाली आहे.
विरह म्हणजे रडणं नव्हे,
तो आत आत विरघळत जाणं आहे.
सखे,
जर कधी माझं अस्तित्व आठवलं,
तर शोधू नकोस मला शब्दांत.
मी त्या शांततेत आहे,
जिथे तू न बोलता निघून गेलीस.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 10, 2026
भावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे,
तर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१,
भावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग,
बरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२
आपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास,
आपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३
इंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी
तर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते केव्हां गोडी...४
काही क्षणाचा काळ जाता, भावना जाई मग निघून
विचार मात्र मिश्कीलतेनें, हसती पश्चाताप बघून...५
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
August 15, 2015

‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांपैकी एक. या कवितेत मानवतेचे निशाण हाती घेऊन नवनवे प्रदेश शोधून काढणाऱ्या कोलंबस या खलाशाचे, त्याच्या ध्येयासक्तीचे चित्रण कुसुमाग्रजांनी केले आहे. ही कविता कुसुमाग्रजांनी १९३६ मध्ये लिहिली. त्या वेळी ते केवळ चोवीस वर्षांचे होते. ऐन तारुण्यात त्यांच्या प्रतिभेने मोठी झेप घेतली आणि काव्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
December 17, 2025
सख्या, तुझ्या आठवात
मी, चालते संथ पाऊली
सांजवर्खी या सांजवेळी
ओघळले, काजळ गाली
सोबती तीच वाट निरंतर
तुझ्याच स्पर्शात नाहलेली
पापण्यातील अस्तिव तुझे
खुलवीते या गालीची खळी
ही नित्याची साक्ष अंतरी
उमलते पाकळी पाकळी
अनवट मोहक वाटेवरचा
तूच नटखट माझ्या भाळी
तुज मी स्मरता वेळोवेळी
लोचनी प्रीत गहिवरलेली
तुझा असा असह्य दुरावा
सर्वत्र तुझी स्मृती रंगलेली
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.२२७
६/९/२०२२
October 6, 2022
बराच काळ चिवचिव करीत एक दिसे चिमणीं
काय बरे तिज लागत असावे विचार आला मनी...१,
तगमग आणि उत्सुक दृष्टीने बघे चोंहिकडे
परि लक्ष वेधी ती हालचालींनीं आपल्याकडे....२,
शिकवतेस कां ? तूझी चिवचिव भाषा मजला
मदत करिन मी शक्तीयुक्तीने दु:ख सारण्याला...३,
बघूनी मजकडे चिमणी ओरडे मोठ्या रागानें
समर्थ आहे मी माझ्या परि ती नको मदत घेणे...४,
मानवप्राणी तूं एक असूनी बुद्धीमान आहे
मधूर बोलूनी इतरावरती छाप पाडीत जाये...५
शिकून घेशील हलके हलके माझी ती भाषा
पक्षावरती वर्चस्व गाजविण्या येईल तुज नशा...६,
जें जें कांहीं तुज नूतन दिसते ह्या जगाते
धडपड करूनी सारे मिळवी प्रयत्न करूनी ते...७
मोठेपण मिळाले तुजला आपल्या बुद्धीने
दुरपयोग केलास त्याचा तूं आखूनी योजने...८,
तुला वाटते यश मिळविले आपल्या परिने
असहाय्य केलेस इतर जीवनां ह्या जगी जगणे...९,
पक्षी भाषा अवगत करणे साह्यासाठी नसे
भांडणे जुंपूनी आमच्यामध्ये गंमत बघत बसे....१०,
फसवे बोलत जवळीं घेवून आम्हा बंदी करी
विश्वासघात हा सहज स्वभाव दिसे तुझ्यापरी...११
कसा टाकूं मी दगड स्वत: माझ्या पायावरी
पक्षी होवूनी जर आलास तूं भाषा शिकवील सारी....१२,
भटकते पिल्लू तिच्या जवळीं दिसले मजला
शांत होवूनी चिमणी उडाली त्याच वेळेला....१३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 13, 2020
गरिब सुदामा बालमित्र तो, आला हरीच्या भेटीला
बालपणातील मित्रत्वाची, ओढ येवूनी मनाला....।।
छोटी पिशवी घेवूनी हाती, पोहे घेतले त्यात
फूल ना फुलाची पाकळी घ्यावी, हीच भावना मनांत....।।
काय दिले वहीनींनी मजला, चौकशी केली कृष्णाने
झडप घालूनी पिशवी घेई, खाई पोहे आवडीने....।।
बालपणातील अतूट होते, मित्रत्वाचे त्यांचे नाते
मूल्यमापन कसे करावे, उमगले नाही कृष्णाते....।।
समोर असता सुदामा, काही न दिले त्याते
द्विधा होऊनी मन:स्थिती, परत पाठवी रिक्त हस्ते...।।
देवूनी ऐश्वर्याच्या राशी, सुदाम्याच्या माघारी
मित्रत्वाच्या प्रेमभावाची, भेट देई श्री हरी....।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
July 10, 2019
सागर किनाऱ्याच्या नात्यामध्ये ,
एकदा झाला मोठा वाद,
सागराचे रौद्र रूप पाहूनी,
किनाऱ्याने दिलीच नाही साद…
फेसाळलेल्या लहरी मधुन,
तो ओकत होता आग,
सूर्य गेला समजवण्यास ,
पण तोही झाला बाद…
खवळलेल्या लाटांनी मग,
मस्तक आपटले किनाऱ्यावर,
हळूच वरती पाहुनी,
शिंपडले पाणी सूर्यावर…
शेवटी चमचमत्या चांदण्यांचं,
आकाश आले भेटीला,
सुंदर शांत संध्या,
होती त्यांच्या जोडीला…
आक्रोश करून सागराने ,
शेवटी स्मित हास्य केलेच,
दूर दृष्टीस गाभाऱ्यातील,
प्रीत मंदिर दिसले,
प्रीत मंदिर दिसले…
– श्र्वेता संकपाळ
August 22, 2018
बघता तुला प्रिया रे ,--
जिवा बेचैनी येते,
कासाविशी होता हृदयी,
आत मोरपीस हलते,--!!!
विलक्षण ओढ तुझी,
काळजाला किती छळते,
मूर्त माझ्या अंतरीची,
अढळ अढळ होतं जाते,--!!!
स्पर्श होता तुझा सख्या,
माझी न मी असते,
बाहूंत तुझ्या विसावण्या,
किती काळ मी तरसते,--!!!
तुझ्यातच सारे विश्व माझे,
जगही तोकडे भासे,
तुझ्याचसाठी राजसा,
मन्मनीचा चकोर तरसे,--!!!
उषा आणि संध्या,
आपले रंग उधळती,
प्रेम रंगाचाच वर्षाव,
भास्करावरती करिती,--!!!
रात्र येते चंदेरी ती ,
जेव्हा जवळ तू असशी,
जिवापाड जाऊन तूही,
प्रीत" माझ्यावर करशी,--!!!
धुंद रात्रीची मदमस्त किमया,
प्रेमात नखशिखांत नहाते,
आभाळीची चटोर चांदणी,
प्रेम--लीलेसाठी धडपडते'--!!!
हिमगौरी कर्वे©
May 28, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti