विखुरल्या त्या वाटा साऱ्या,
भावनेचाही झाला अंत,
अंधत्व आले, दिशा हरवल्या,
ना उरली हृदयास मनाची खंत !!
दुःखाने पायघड्या अंथरल्या ,
अश्रूंनी खारे गालिचे पांघरले ,
किर्र किर्र त्या काजव्यांसारखे,
अंधाऱ्या रात्रीत तांडव माजले !!
विटले धागे सुखी नात्याचे,
आकांत करुनी निष्ठुरले मन,
भासत होते मृगजळ ते सुखाचे ,
उरले हाती सुतकी जीवन !!
-- श्र्वेता संकपाळ.
"आकांत"(०८-१२-२०१८)
December 19, 2018
झालो मी अठरा वर्षांचा
म्हणुन मिळे अधिकार नामी.
मत देण्याचा.
या दिवशी मी आहे राजा
ताजा ताजा.
उलथिन मी नेत्यांची तख्तें
बदलिन मी नावांचे तक्ते.
-
तख़्त - सिहासन
-- सुभाष स. नाईक
July 19, 2018
लुळा पांगळा बसूनी एकटा,
गाई सुंदर गाणे ।
आवाजातील मधूरता,
शिकवी त्याला जगणे ।।१।।
जगतो देह कशासाठी,
हातपाय असता पांगळे ।
मरण नसता आपले हाती,
जगणे हे आले ।।२।।
लुळा असला देह जरी,
मन सुदृढ होते ।
जगण्यासाठी सदैव त्याला,
उभारी देत होते ।।३।।
गीत ऐकता जमे भोवती,
रसिक जन सारे ।
नभास भिडता सूर-ताना,
शब्द उमटती “वाह ! वा रे” ।।४।।
असमान्य ते एकचि मिळता,
उणीवतेची खंत कशी ।
दुबळ्या देही कला श्रेष्ठ ती,
वीज चमकते रात्री जशी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 3, 2016
अन्तः पुरीचे जन तै नृपापरी /
कुमार जन्मास अधी निरोपिती /
श्रवोनिया अमृत तुल्य आकक्षरे /
सर्व स्वेद वर्जुनी छत्र चामरे // १६ //
निर्वातशा स्थानिय पंक जापारी /
तटस्थ नेत्रे सुत पाहिल्यावरी /
नृपास प्रेम न समाय अंतरी /
विधू पाहता बहु पूर सागरी // १७ //
April 22, 2011
गर्दीत माणसांच्या लोटून हाय! मजला
स्वप्नात पाहिलेला माझा गुलाब गेला
त्या मखमली सुखाला मी स्पर्शिले न होते
अजुनी; तरीही त्याच्या का पाकळ्या गळाल्या?
शहरात आज साऱ्या ही 'ईद' चाललेली
त्याच्या स्मृतीत माझा सारा सुना मुहल्ला
त्या जायचेच होते निघुनी नवीन देशा
का शुभ्र हा दुपट्टा इष्कात रंगविला?
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
April 10, 2023
कसे मानूं उपकार निसर्गा तूझे मी
उघडोनी जीवन द्वार आलास तूं कामी १
तुझ्या मोरानें दाखविले नृत्य
राघूच्या वाणीनें शिकविले सत्य २
कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी
चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि ३
मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला
कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला ४
घारीची भरारी स्वछंद केले मनां
मैनेच्या उदरीं जाणला प्रेमळपणा ५
विजेची चपळता चंचल बनवी
धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी ६
निसर्गातील विवीधता देई माणसा ज्ञान
करी त्यास मदत आनंदी होण्या जीवन ७
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
January 9, 2021
चालत असता संथ गतीने, एका वाटेवरती
संगे माझ्या, माझी छाया, मागून येत होती
वेगामधली बघुनी तीव्रता, ती ही वाढावी वेग
खंड न पडता साथ देणे, हेच तिचे अंग
तळपत असता रवि आकाशी, जवळ ती आली
समरस होण्या माझ्यामध्ये, पायी घुटमळली
ढळू लागला सूर्य हळू हळू, पश्चिम दिशेला
प्रकाशातील तीव्रपणा तो कमी होऊ लागला
पडू लागले पावूल माझे मंद मंद आता
श्रमलो दमलो बसलो खाली, अंधार तो होता
दूर दूर ती जावू लागली, छाया मजला सोडूनी
काळोखाच्या गर्भामघ्ये, गेली ती विरुनी
एकटाच मी होतो तेथे, अंधाऱ्या रात्री
प्रकाश्यातली साथ लाभली, ती छाया नव्हती
सुखामधली सोबत सुटते, दु:खाच्या वेळी
सगेसोयरे साथ सोडती, पडत्या संकट काळी
पहाट होता बघू लागलो, पुनरपि छायेला
सोडून गेली रात्री, त्याचा निषेध नोदविला
छाया म्हणते:
रविकिरणांच्या संगे गेली, मीही त्यांच्या मागे
आठव देण्या रवि उदयाची, त्याला मी सांगे
तुझे नि माझे अतूट नाते, त्याच्या अस्तित्वाने
पुनरपि आले तव सहवासे, त्याचाच साक्षीने
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 12, 2020
श्री गुरू दत्ताचे अवतार, अवतरले या भूमिवर ।
विविध नामे परि, दुर्बलांची करण्या कामे ।१।
अक्कलकोटचे निवासी, स्वामी समर्थ आले उदयासी ।
दैवी शक्ती अंगी, अंधारी चमकली ठिणगी ।२।
मशाल घेवून हाती, आला धावत पुढती ।
अति वेगाने, सर्वांची उजळीत मने ।३।
कर्म योग आणि भक्ती, ह्या तीन ईश्वरी शक्ती ।
एकत्र जाहल्या, मशालीत त्या समावल्या ।४।
वाहत्या काळाच्या ओघात, ते शरीर झाले शांत ।
जग सोडूनी, परि मशालीत शक्त ठेऊनी ।५।
ही तीच मशाल घेवूनी, पुढती चाले दूजा कुणी ।
वारसा त्यांचा, प्रेषित ज्या शक्ती ।६।
जरी तो नाही जगी आता, तत्त्व कार्य ते मागे उरता ।
मशाल रूपे, जन म्हणूनीच जपे तिजला ।७।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
December 25, 2017
नदिकाठच्या कपारीमध्ये, बेडूक बसला दबा धरूनी
उडणाऱ्या त्या माशी वरते, लक्ष सारे केंद्रीत करूनी...१,
नजीक येवूनी त्या माशीचे, भक्ष त्याने करूनी टाकले
परि दुर्दैव त्याचे बघा कसे, सर्पानेही त्यास पकडले...२,
बेडूक गिळूनी सर्प चालला, हलके हलके वनामधूनी
झेप मारूनी आकाशी नेले, घारीने त्याला चोचित धरूनी...३,
'भक्ष्य बनने' दुजा करिता, मृत्यूची ही चालते श्रृखंला
जनक असता तोच सर्वांचा, गमंत येई त्या खेळाला...४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
March 19, 2021
समर्थ नाहीं कुणी,जाणून घेण्या प्रभूला
थोटके पडतो सारे,घेण्यास त्याच्या दयेला
बरसत असे दया,प्रचंड त्या वेगाने
दुर्दैवी असूनी आम्हीं,झेलतो फाटक्या झोळीने
असीम होते कृपा,पात्र नसूनी कुणी
तो बरसत राही सतत,परि आहे सारे अज्ञानी
दयेच्या तो प्रवाह,वाहात राही नदीसारखा
डूबती कांहीं त्यांत,परि न दिसे अनेकां
नशीब लागते थोर,पेलण्यास दया ती
जलांत असूनी कांहीं,तहानलेली राहून जाती
शिवून तुमची झोळी,प्रथम पात्र व्हा सारे
सदैव उघडी आहेत,कृपेची त्याची द्वारे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 14, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti