(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • व्यसनासक्ति विषयी !

    दारु, बिडी-सिगार, अफू,
    गांजा, त्यांचा राजा गर्द !
    लत लागतां, कित्येक संसार,
    त्याने केले सारे बरबाद ।।१।।

    अजगराच्या विळख्याहूनी,
    महाभयंकर सत्य
    एक नव्हे, अनेक सारे,
    नष्ट होतील त्यांत ।।२।।

    होत आहे उध्वस्त आमची,
    तरुण ही मंडळी
    नशेच्या ह्या चक्रामध्ये,
    गुंतली जी सगळी ।।३।।

    जाणूनी घ्या त्या शत्रुला,
    छुपा रुस्तूम तो
    प्रवेश एकदा शरिरीं मिळतां,
    कायमचा तो राहतो ।।४।।

    सहज काढून टाकीन त्याला,
    नका करुं वल्गना
    घेऊन जाईल प्राण तुमचे,
    हीच त्याची गर्जना ।।५।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      June 2, 2016


  • प्रेम झरा

    नाही गेली अटूनी माया,
    आजही वाहते झऱ्यासारखी,
    उगांच कां तू खंत करशी,
    न होशील मज पारखी ।।१।।

    वाहत असता फुटले फाटे,
    जीवनातील वळणावरी,
    जो तो घेई उचलूनी वाटा,
    नशीबी असेल त्याच्या परि ।।२।।

    कसा राहील 'साठा' आता,
    मनसोक्त ते जाण्या वाहूनी,
    तृप्त करील परी तृष्णा तुझी,
    ओंझळभर घेता पिऊनी ।।३।।

    कुणीतरी आहे पाठीराखा,
    आनंदाने चालत रहा,
    थकूनी जाता देईल पाणी,
    आखंडीत प्रेम झरा ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      March 20, 2014


  • घड्याळ

    घड्याळ होते भिंतीवरती

    टिक टिक करुन चाले

    सतत दिसली चाल काट्यांची

    एकाच दिशेने हाले

    धावत होता एक तुरु तरु

    दुजा हळूच धांवे

    छोटा जाड्या मंद असून

    पळणे ना ठावे

    पळत असती पुढे पुढे

    समज देती काळ-वेळेचा

    किती राहील शिलकीमध्ये

    प्रवास आपुला जीवनाचा

    जीवन चक्रापरि फिरती

    घड्याळ्यामधले सारे काटे

    जाणीव करुन देती सतत

    आपण कोठे अन् जीवन कोठे

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

      February 28, 2020


  • पाऊस आणि मोबाईल

    द्यायला हवा होता एक
    मोबाईल पावसालाही,
    कळलं असतं मग त्याला
    आज कुठे बरसू आणि कुठे नाही |

    Whatsapp वरून त्याला
    रोज कळवले असते Updates
    आणि रोज दिले असते त्याला नवीन Targets |

    फोटोज व्हिडिओज बघून
    त्यालाही कळली असती आपली दैना
    बरसताना त्याने नक्कीच
    विचार केला असता पुन्हा पुन्हा |

    परफेक्ट त्याचा Performance असेल जिथे
    हिरवीगार धरती आणि आनंदी शेतकरी
    दिसतील त्याला तिथे
    हे सर्व कळवण्यासाठी खरंच वाटतं
    द्यावा त्यालाही एक Mobile |

    -- सौ. कल्पना संजय प्रभूघाटे

      August 6, 2019


  • अजून तुझिया आठवणींनी

    मित्र मैत्रिणींनो शुभ संध्या !!

    दाटून आलेली सुरेख संध्या, आणि त्याच वेळी तिचं असं नदीकाठी उभं राहणं, हे तिच्या मनात भावभावनांचा कल्लोळ घेऊन येतं आणि मग "त्याची" तीव्र आठवण येऊन ती म्हणते ......….

    अजून तुझिया आठवणींनी
    शहारते रे शरीर मनही
    अजून होतो भास तुझा, अन्
    बावरले मन तुलाच पाही !!

    किती लोटला काळ आता रे
    भेट तुझी ती झाली नाही
    या नयनांची मिटली पाखरे
    सतत तुला रे शोधत राही !!

    आज अचानक या वाऱ्यावर
    गंध तुझा मनमोहक आला
    आठवणींच्या गंधकोषीचा
    रंगीत शेला गंधित झाला !!

    काव्यरचना ©✍?
    प्रमोद मनोहर जोशी, जळगाव
    9422775554, 8830117926
    कविता कॉपी राईट अंतर्गत आहे

      May 5, 2021


  • आशिर्वाद

    धक्के देऊन आली धरणीकंप करुन
    भावना मनीं चमकली बनेल ही महान ।।१।।

    बालपणाची मुर्ति गोंडस तुझें भाव
    तेज चेहऱ्यावरती घेती मनाचे ठाव ।।२।।

    शाळेतील जीवन दाखवी मार्ग विजयाचे
    सर्वामध्यें चमकून प्रमाण मिळे यशाचे ।।३।।

    एकाग्रचित्त करुनी मिळवलेस तूं यश
    प्रतिष्ठा टिकवूनी असेच जा सावकाश ।।४।।

    विजे सारखी चमकूनी झेप घे नभांत
    प्रकाशमान होऊनी यशस्वी हो जीवनांत ।।५।।

    एका गोष्टीची जाण असावी तुझ्या मनीं
    मिळण्यास हा मान पाठीराखे आहेत इतर कुणी ।।६।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

      October 27, 2018


  • खोटे नाणे

    कसे आले कुणास ठाऊक खोटे नाणे हाती

    गर्दीमधल्या कुण्या प्रसंगी खोटा शिक्का येती

    प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी कुणी घेईना त्यातें

    कसा आला नशिबी निराशा मनी येते

    अंध व्यक्तीचे स्टॉल बघूनी तिकीट एक घेतले

    लॉटरीसाठी घातला रुपया अंधाचे हाती दिले

    मनी चरकलो शब्द ऐकूनी त्या अंध व्यक्तीचे

    नशीब तुमचे थोर असूनी यश येईल तिकीटाचे

    केवळ त्याने स्पर्श करुनी जाणले माझे नशिब

    भाग्यवान ठरवूनी सांगे मिळेल धनलाभ

    खोटा शिक्का घेऊन देखील शब्द बोलला प्रेमाने

    नीच मनाचा असून मी पचविले ते हसण्याने

    लिहीला नंबर टिकीटाचा एका कागदावरी

    कोटाच्या खिशांत ठेवले तिकीट जपून भारी

    निकाल वाचूनी नाचू लागतो आनंदाने पुरता

    लाखाचे ते बक्षिस लागूनी लाखोपती बनता

    धावत गेलो ऑफिसातूनी तिकीट घेण्या घरी

    कोट नव्हता दिसत तेथे रोजच्या जागेवरी

    इतर कपड्यामध्ये टाकला धूण्या परीटाकडे

    धावत सुटलो नदीवरती शोधण्या तो तिकडे

    सुकवलेल्या कपड्यातूनी कोट काढला

    तुकडे बघूनी त्या तिकीटाचे मुर्च्छा आली मला

    खऱ्या नाण्यासम चालले नशिबही वेगाने

    खोटेपणाची जाण येता थांबून गेले त्वरेने

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

      February 9, 2018


  • प्रेमाची कविता /शब्दांविना जगते प्रेमाची कविता.

    डोळ्यांची भाषा
    स्पर्श भावनांचा
    जगते शब्दांविना
    प्रेमाची कविता.

    डोळ्यांत सजते
    ह्रुदयात फुलते
    मौनात बोलते
    प्रेमाची कविता.

    -- विवेक पटाईत

      February 13, 2011


  • गुरूजींची बदली

    जून महिना. शाळा सुरू झाली. नवा वर्ग.नवा मित्र. नवा संवाद. नवा खेळ. नवा अभ्यास. पावसाळी ढगाळ वातावरण. हिरवे झालेले डोंगर.

      November 29, 2018


  • कालचक्र

    तुझ्या विरहात जगताना
    वाटते सर्वस्व हरवुनी गेले
    खंत उरिची उदास करिते
    तुझ्याशी बोलणे राहुनी गेले...

    उमजुनही अव्यक्त राहिलो
    मन गुंतुनीही व्याकुळ झाले
    तुझ्याच लडिवाळ लोचनात
    विरघळणेच राहुनीया गेले...

    स्मरणात निर्मळी भावस्पर्श
    क्षण तो विसरणे राहुनी गेले
    क्षण कधीच नाही थांबले
    कालचक्रात ते वाहुनी गेले...

    कल्लोळ, सांजभावनांचा
    शब्दात सांगणे राहुनी गेले
    आळवुनही प्रीतभावनांना
    तुझ्याशी बोलणे राहुनी गेले...

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.२५८

    १४/१०/२०२२

      October 20, 2022