व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली मंदाकिनी पाटील यांची हि कविता
December 8, 2023
रेणूके जगदंबे आई
रेणुके जगदंबे आई दर्शन दे मजला
तुझ्या मंदिरी आलो पावन हो तू भक्तिला ।।धृ।।
तुझे अजाण बालक करितो खोड्या अनेक
न होई चित्त एक
तूंच समजोनी घेई मम चंचल मनाला ।।१।।
रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला
जमदग्नीची कांता परशूरामाची तूं माता
मनीं तुजला भजतां
आशिर्वाद तूं देई आनंदानें सर्वांला ।।२।।
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला
गेले माझे जीवन तुझे नाम घेऊन
कंठ आले दाटून|
चुका आमच्या होई क्षमा कर अज्ञानाला ।।३।।
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला
सारे अर्पिले प्रेमांत आळविले भक्तित,
परि न कळली रित
अत:करण गाणे गाई आवाज नसे ओठाला ।।४।।
रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला
नको मजला धन विटले आतां मन
सोडव मोहमायेतून
चरणांवरी लोळण घेई हात पसरुं कुणाला ।।५।।
रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
March 24, 2015
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।धृ।।
बालपणाची रम्यता मजा केली खेळ खेळता
निरोप देता बालपणाला नाद गेला खेळण्याचा
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।१।।
तारुण्याचे सुख आगळे मादकतेने शरिर भारले
बहर ओसरु लागला दूर सारतां घट प्रेमाचा
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।२।।
प्रौढत्वाची शानच न्यारी श्रेष्ठतेची ठरे भरारी
येतां दुबळेपणा शरिराला उबग येई संसाराचा
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।३।।
जीवनातील प्रत्येक पायरी मजलागी आनंदी करी
परी त्या क्षणिक सुखाला संबंध होता देहाचा
केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।४।।
आहे सारे प्रभूचे भाव अर्पा मनाचे
समर्पण करा देहाचे त्याग करा सर्वस्वाचा
तेव्हांच मिळेल खरा आनंद जीवनाचा ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 28, 2019
रस्त्यावरती उभी राहूनी, हातवारे ती करित होती
मध्येच हसते केंव्हां रडते, चकरा मारीत बसे खालती...१,
गर्दी जमली खूप बघ्यांची, कुत्सीतपणे न्याहळू लागली,
'शिपाई आणा जावूनी कुणी', ठाण्यात नेण्यास सांगू लागली...२
जीवनातील दु:खी चटका, सहनशक्तीचा अंत पाहतो,
मनावरील तो ताबा सुटूनी, वेडेपणा हा दिसून येतो...३
इतकी गर्दी जमून कुणीही, तिच्या मनीचा ठाव न जाणला
रूख रुख वाटली ती बघोनी, सहानूभुती शून्य समाजाला...४
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
October 7, 2017
आजी वादी माजी वादी
समाजवादी प्रजा समाजवादी
लोकशाहीवादी हुकूमशाहीवादी
मवाळवादी जहालवादी
आस्तिक वादी नास्तिक वादी
धर्मवादी अधर्मवादी
भोगवादी चंगळवादी
राष्ट्रवादी राष्ट्रीयवादी
देशीवादी विदेशीवादी
खादी वादी विलायतीवादी
धर्मवादी धर्मनिरपेक्षवादी
आचार वादी भ्रष्टाचारवादी
जातीयवादी वंशवादी
वर्णवादी वर्णद्वेषवादी
काळेवादी गोरेवादी
अणुवादी अणुयुद्धवादी
वादी वादे जायते आतंकवादी
(प्रसिद्धी लोकप्रभा साप्ताहिक ७ मार्च २००३)
-- विनायक अत्रे.
दिनांक: ११/२/२००३.
११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेचे वर्ल्ड ट्रेड सेंटर आतंकवाद्यांनी विमानात घुसवून जमीनदोस्त केले. त्यामागे ओसामाचा हात आहे असे अमेरिकेने जाहीर केले. आणि त्याला जिवंत किंवा मृत पकडण्याची घोषणा प्रे. बुश यांनी केली. एकविसाव्या शतकातील भयंकर आतंकवादी.
July 9, 2022
निराशेचे बीज पेरतो, आम्हीच आमच्या गुणानें,
विचारांना ताण देवूनी, जगा पाही त्याच दिशेने ।।१।।
जाणूनी ईश्वरी स्वरूप, प्रतिमा ती मनीं बसवी,
धडपड चालते सतत, तशीच प्रतीमा दिसावी ।।२।।
तपसाधना ती बघूनी, कित्येकदा मिळे दर्शन,
परि केवळ अज्ञानाने, न होई त्याचे अवलोकन ।।३।।
सभोवतालच्या वस्तूंमध्यें, जाण तयाची येते,
निसर्ग रम्य सौंदर्यात, भावना तशी उमटते ।।४।।
अस्तित्वाची जाणीव देतो, हर एक घडीचा ठेवा,
ध्यास लागतो आम्ही, परी कल्पिलेल्या रूपी दिसावा ।।५।।
निराशा राहते सदैव, दर्शन न मिळता त्याचे,
पाण्यात राहून देखील, तहानलेला असे याचे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 7, 2016
केली मशागत शेतीची
झाली स्वच्छता वावराची
वाट पाहतो पेरणीची
मेघराजाच्या आगमनाची
मे महीना ही गेला
जुन निम्मा हो झाला
एक थेंब ही नाही पावसाचा
कधी येईल पावसाळा
बरसावे पावसाने
शेतीला चिंब करावे
शिवारात पाणी पाणी व्हावे
शेत पेरणीसाठी सज्ज आहे
मग होईल पेरणी जोमात
बिज अंकुरेल कोंबात
तरारेल पीक शेतामधी
हीरवगार रान होईल
पण आहे प्रतिक्षा
मानसुन आगमनाची
वाट पाहतो बळीराजा
पावसाच्या एका सरीची
उमेश तोडकर
June 26, 2023
कितीही सारी धडपड करशी
लाचार ठरतो अखेरी
जाण माणसा मर्यादा तव
आपल्या जीवनी परी ... ।।
क्षणाक्षणाला अवलंबूनी
जीवन असे तुझे सारे
पतंगा परि उडत राहते
जसे सुटत असे वारे... ।।
निसर्गाच्याच दये वरती
जागत राहतो सदैव
कृतघ्न असूनी मनाचा तूं
विसरून जातो ती ठेव... ।।
निसर्गाच्या मदती वाचूनी
जगणे शक्य नसे तुजला
जीवन कर्में करीत असतां
आठवित जा त्या प्रभूला... ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 28, 2017
तेच दिवाळीचे दिस
तोच आनंद उल्हास
परि बाबा-आई माझे
मज दिसले उदास.....
कसे जुळावे गणित
नव्या खाऊ कपड्यांचे
अन् खुलेल मानस
सान कोवळ्या जीवाचे
इथे वाढती असोशि
तिथे मन कासावीस
तेच दिवाळीचे दिस....
कधी आईचा दागिना
कधी एखादा ऐवज
जाई सावकारा हाती
खुल्या मनाने सहज
अन् सजली दिवाळी
मला हवी तशी खास
तेच दिवाळीचे दिस...
आज काही नाही उणे
तरी उरलेच देणे
आई-बाबांनी दिलेले
सहजची मुकपणे
मग ओलावती डोळे
मनी उरतात भास
तेच दिवाळीचे दिस...
आणि आई- बाबा माझे
होते दिसले उदास...
.....मी मानसी
October 31, 2019
आयुष्याचे कण कण क्षण साठले कुणी कोठल्या पेढीवरती
व्याज राहो मुद्दलही होई झपाट्याने ती केवळ रिती खालती
नसे पासबुक नसे स्टेटमेंट तुमच्या आमच्या शिलकीपोटी
निर्वाणीची निर्वाणनोटीस येते अचानक जेव्हा हाती
तेव्हाच उमगते (काय फायदा?) नव्हती उरली शिल्लक खाती
-यतीन सामंत
July 21, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti