अजून तुझिया आठवणींनी

मित्र मैत्रिणींनो शुभ संध्या !!

दाटून आलेली सुरेख संध्या, आणि त्याच वेळी तिचं असं नदीकाठी उभं राहणं, हे तिच्या मनात भावभावनांचा कल्लोळ घेऊन येतं आणि मग "त्याची" तीव्र आठवण येऊन ती म्हणते ......….

अजून तुझिया आठवणींनी
शहारते रे शरीर मनही
अजून होतो भास तुझा, अन्
बावरले मन तुलाच पाही !!

किती लोटला काळ आता रे
भेट तुझी ती झाली नाही
या नयनांची मिटली पाखरे
सतत तुला रे शोधत राही !!

आज अचानक या वाऱ्यावर
गंध तुझा मनमोहक आला
आठवणींच्या गंधकोषीचा
रंगीत शेला गंधित झाला !!

काव्यरचना ©✍?
प्रमोद मनोहर जोशी, जळगाव
9422775554, 8830117926
कविता कॉपी राईट अंतर्गत आहे



मित्र मैत्रिणींनो शुभ संध्या !!

दाटून आलेली सुरेख संध्या, आणि त्याच वेळी तिचं असं नदीकाठी उभं राहणं, हे तिच्या मनात भावभावनांचा कल्लोळ घेऊन येतं आणि मग “त्याची” तीव्र आठवण येऊन ती म्हणते ……….

अजून तुझिया आठवणींनी
शहारते रे शरीर मनही
अजून होतो भास तुझा, अन्
बावरले मन तुलाच पाही !!

किती लोटला काळ आता रे
भेट तुझी ती झाली नाही
या नयनांची मिटली पाखरे
सतत तुला रे शोधत राही !!

आज अचानक या वाऱ्यावर
गंध तुझा मनमोहक आला
आठवणींच्या गंधकोषीचा
रंगीत शेला गंधित झाला !!

काव्यरचना ©✍?
प्रमोद मनोहर जोशी, जळगाव
9422775554, 8830117926
कविता कॉपी राईट अंतर्गत आहे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →