(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • यशोशिखरांकडे नेणारी प्रेरणेची पायवाट

    कुणाची तरी प्रेरणा कुणाच्या तरी कामाला येते. जीवन जगत असतांना प्रेरणा कुणाकडूनही मिळते. प्रत्येकाचे प्रेरणा स्तोत्र ठरलेले असतात. कधी निसर्गातून कधी दुःखातून तर कधी माणसाकडून प्रेरणा मिळत असते. काही काही माणसांचे जीवन हाच संदेश असतो, जगण्यासाठी.

      March 3, 2025


  • अन्यथा असतो दंभी मेलो!

    कुठलाही संघर्ष किंवा कुठलेही भांडण घ्या, थोडे खोलात गेले तर लक्षात येते की ही केवळ अहंकाराची, श्रेष्ठत्वाची लढाई आहे. अगदी ताजे उदाहरण घ्यायचे तर शिवसेना आणि मनसेतील संघर्षाचे घ्यावे लागेल. या संघर्षाकडे पाहणारा कोणताही त्रयस्थ माणूस हेच म्हणेल की ही सगळी मारामारी राज आणि उद्धव यांच्यातील अहंकाराची आहे.

      May 31, 2009


  • सतर्कता अभ्यास हवाच

    आंतरराष्ट्रीय असो देशांतर्गत असो तुम्हाला अटकळ अंदाज निर्णय घेण्यापूर्वी बांधावेच लागतात .अर्थात ह्यासाठी सल्लागारांचे ताफे मदतीला असतात. पण एखाद्याचा अभ्यास व्यवस्थित नसेल तर अंदाज चुकू शकतात व ते उलटूही शकतात. युद्धावेळी तर रशियेला युक्रेन अशी कडवी झुंज देईल असे वाटले नव्हते. ह्याचाच अर्थ इथे अंदाज पार चुकला होता. असो .

      April 28, 2023


  • स्लो पॉयझनिंग

    तकऱ्यांच्या आत्महत्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होते आणि ती व्हायलाही हवी, कारण मुळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारच्या धोरणात्मक नीतीचा परिणाम आहे. सरकार अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. हा सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा आहे.

      April 20, 2008


  • देश आणि सरकार रामभरोसे !

    इथला शेतकरी मरणासन्न अवस्थेत पोहचला आहे, इथला उद्योजक समाधानी नाही आणि इथली सामान्य जनतादेखील सुरक्षित नाही. खुशहाल आहेत ते केवळ सरकार आणि प्रशासनातील लोक, कारण ते या बहुराष्ट्रीय कंपन्यांची दलाली करीत आहेत. त्याचा भरपूर मोबदला त्यांना मिळत आहे. या अशा देशामध्ये राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे रोज बॉम्बस्फोट घडले तरी आश्चर्य वाटायला नको, कारण हा देश म्हणजे केवळ माणसांची गर्दी झालेला आहे. या देशाच्या सरकारमध्येच राष्ट्रीयत्वाची भावना नसेल तर इतरांकडून काय अपेक्षा करणार?

      July 17, 2011


  • शिव छत्रपतींचे दुर्गविज्ञान

    महाराष्ट्रात दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर याच किल्ल्यांच्या साक्षीने मराठी आणि मावळी मन लढले! आज किल्ल्यांची दुरवस्था झाली असली तरी निखळलेला प्रत्येक चिरा स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या पराक्रमी पूर्वजांची कहाणी सांगतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य दुर्गविज्ञानाची दृष्टी पाहून म्हणावेसे वाटते.

      September 1, 2010


  • अल्कोहोलऐवजी इथेनॉल!

    उसाच्या इथेनॉलचा इंधनात वापर न करून आपण किती मोठी चूक केली, हे सहज लक्षात येऊ शकते. वस्तुस्थिती ही आहे, की स्वातंत्र्यानंतर साखर निर्मिती कारखान्यांमध्ये तयार होणाऱ्या इथेनॉलचा संपूर्णपणे इंधन म्हणून वापर केला असता, तर आज भारतावर एका पैशाचेही कर्ज राहिले नसते. किमान आतातरी सरकारने उसापासून इथेनॉल आणि धान्यापासून मद्य निर्मितीचे धोरण स्वीकारून विनाकारण खर्च होणाऱ्या विदेशी चलनाची बचत करावी!

      January 10, 2010


  • जाताना जरा लक्षात असू द्या

    खांदेकरी ‌ शिव्या देणार नाहीत तिरडी उचलताना , इतपत वजन मर्यादित ठेवावे , सरणावर ठेवताच जळायला मदत व्हावी म्हणून थोडी चरबीही असायला हरकत नाही अंगात . पूर्णपणे जळून झाल्यावर उरणारी दोन - अडीच किलो वजनाची हाडे काही काळाने पंचमहाभूतांत विलीन होऊन जाणार आहेत , त्यामुळे मेल्यावर आपले काही मागे राहील , या भ्रमात राहण्याचा मूर्खपणा करू नये . दातात भरलेली चांदी मात्र तशीच राहील ; त्याचे श्रेय दंतवैद्याला द्यायला हरकत नाही , बिचारा कायम विनोदाचा विषय झालेला !

    दफन झाले तर कीड्यामुंग्यांना मेजवानी आणि झाडांना दर्जेदार खत मिळणार आहे , शिवाय शरीरातला काही भाग सल्फर आणि कार्बनच्या स्वरूपात पंचमहाभूतात विलीन होणार आहे , ही माहितीसुद्धा हाताशी असू द्यावी . बँकेत एवढाच बॅलन्स असू द्यावा की ज्यामुळे वारसांमध्ये भांडणे लागणार नाहीत , मुले एकमेकांच्या जीवावर उठणार नाहीत , सेवाभावी संस्था मागे लागणार नाहीत ८० - जी चे प्रमाणपत्र घेऊन ! आणि असलीच थोडी प्रॉपर्टी तर मृत्युपत्र करताना मुलाच्या नावे करण्याऐवजी नातवाच्या नावे करावी , म्हणजे नातू सज्ञान होईपर्यंत आपला नालायक मुलगा आपल्याला शिव्या देत , शेवटच्या क्षणी पाणी पाजल्याचा पश्चात्ताप करीत रोज आपली आठवण काढत राहील .

    एरवी सर्वत्र पुढे असणाऱ्या पण शेवटी मागे राहणाऱ्या बायकोची काळजी करू नये . बायका वयाने नवऱ्यापेक्षा मोठ्या असण्याची पद्धत आपल्यात नसल्याने बायकांना विधवा करण्याची संधी नवऱ्यांना आयतीच मिळते , त्याला कोण काय करणार ? आणि दररोज लाल टिकली चिकटवून घेणाऱ्या कपाळालाही थोडा चेंज मिळावा यात गैर ते काय ?

    अंत्ययात्रेच्या वेळी हसू नये जीवनाची कॉमेडी आठवून आणि बऱ्या - वाईट आठवणींच्या क्षणांची नोंदवही जाता जाता हळूच परमेश्वराच्या रद्दीच्या दुकानात टाकून पुढे सटकावे . जन्माला का आलो आणि का मेलो , यासारखे प्रश्न ' राम बोलो ' च्या डस्टरने पुसून टाकावे मनाच्या पाटीवरून .

    गल्लोगल्ली श्रद्धांजलीचे फलक लावण्यासाठी आणि वृत्तपत्रात जाहिराती देण्यासाठी मित्रांना भुर्दंड पडेल , इतकी कीर्ती मिळवू नये . पुतळ्याचेही स्वप्न बाळगू नये . कारण कार्यकर्ते करतील त्याही निधीत भ्रष्टाचार आणि कावळ्यांना मिळेल सार्वजनिक कमोड ! मरताना डोळे मिटलेले असावे , स्वतःच्या निधनाच्या चुकीच्या बातम्या वाचायला मिळू नयेत म्हणून आणि तोंड उघडे असू द्यावे सांगायचे बरेच काही राहून गेले पण ऐकून घेण्यासाठी कुणाकडेच वेळ नव्हता म्हणून .

    महागुंगीच्या धुक्यात शिरताना समोर स्टेशनमास्तर भेटावा . त्याच्याकडे चौकशी करावी ' पुष्पक विमान ' कोणत्या प्लॅटफॉर्मला लागते याची आणि वैकुंठाचे तिकीट काढून वाट पाहत बसावे तुकारामाचे आयटेम साँग म्हणतः आम्ही जातो अमुच्या गावा , अमुचा राम राम घ्यावा !

    -- अविनाश

      December 30, 2016


  • गुन्हेगार, दारूडे

    काही वृत्तपत्रात ज्या बातम्या झळकल्या आहेत त्या धक्कादायक आहेत. तसेही आजकाल वृत्तवाहिन्यांची अमाप पीक आल्यापासून धक्कादायक बातम्यांमध्ये जाण राहीली नाही.

      September 5, 2010


  • अंधेरी नगरी…!

    भारनियमनाचा परिणाम दैनंदिन जीवनावर तर झालाच आहे , पण शेती आणि उद्योगाचीही पार वाट लागली आहे. राज्यातील उद्योगांना या अतिरेकी भारनियमनामुळे रोज कोट्यवधीचा फटका बसतो आहे.
    सध्या संपूर्ण राज्याला सूर्याच्या काहिलीसोबत भारनियमनाच्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

      May 1, 2005