आजवरचा अनुभव तर हेच सांगतो, की शेतकर्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या नावाखाली जितक्या काही योजना सरकार आखत असते त्यांची अंमलबजावणी केवळ प्रशासनातील अधिकारी, योजनेतील ठेकेदार, जे बहुतेक सत्ताधारी पक्षाचे समर्थक किंवा कार्यकर्ते असतात अशांच्या पोटापाण्याची सोय करण्यासाठीच केली जाते. सध्याची शालेय पोषण आहार योजना त्याला अपवाद नाही. विद्यार्थ्यांना आहार किंवा आहाराच्या नावाखाली बेचव खिचडी आणि इतरांचे पोषण असेच या योजनेचे सध्याचे स्वरूप आहे. ते बदलले, तरच उद्याचा भारत सक्षमपणे उभा करू शकणारी सुदृढ पिढी निर्माण होईल!
June 5, 2012


सध्याची युवा पिढी भरकटली आहे, हे सगळेच मान्य करतात. या पिढीच्या भरकटण्यामागे अनेक कारणेदेखील सांगितली जातात आणि त्यातील सर्वाधिक महत्त्वाचे कारण असते ते या युवा पिढीसमोर कोणताही आदर्श नसणे. अर्थात हे कारण महत्त्वाचे आहे यात वादच नाही, परंतु याचा अर्थ समाजातील आदर्श संपलीच आहेत असाही होत नाही.
March 16, 2003
प्रकाशन दिनांक :- 05/09/2004
आयुष्य डोळसपणे जगताना मानवी स्वभावाचे अनेकविध कंगोरे पदोपदी अनुभवास येतात. अनेक वेळा एखादी व्यक्ती अशी का वागली, या प्रश्नाचे उत्तर प्रयत्न करूनही सापडत नाही. जर आपण सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय असलो तर असे अनुभव ही नित्याचीच बाब बनते.
September 5, 2004
एका विज्ञानकथेत कथालेखकाने अशी कल्पना मांडली होती की, एक दिवस वाढत्या प्रदूषणामुळे मानवाचे पृथ्वीवर म्हणजेच जमिनीवर राहणे अशक्य होईल आणि संपूर्ण मानवी वस्ती पृथ्वीच्या पोटात स्थलांतरित होईल. पृथ्वीच्या पोटात 10 ते 20 फूट खाली जाऊन वस्ती करून राहणे माणसाला भाग पडेल. वातावरणात संरक्षक आवरण म्हणून काम करणाऱ्या ओझोन वायूचा स्तर फाटल्यामुळे सूर्याची अतिनील (अल्ट्राॅ व्हायोलेट) किरणे सरळ पृथ्वीवर येतील, या किरणांचा सामना करणे तसेच वाढत्या तापमानाशी जुळवून घेणे शक्य न झाल्यानेच मानवाला पृथ्वीच्या पोटात आसरा घ्यावा लागेल.
July 24, 2005
“पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा.. अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात..” फुलं साठवणं सोपं असतं, पण त्याचा सुगंध आपल्याला मनातच साठवावे लागतात. तसचं सुखाचे क्षण हे क्षणिक असतात. त्याना टिकवून ठेवता येत नाही. पण मनात साठवून ठेवल्यावर तेही चिरतरूण राहतात आणि आपणही…
August 15, 2019
आमच्या देशातून नेलेल्या लुटीवर तुमची श्रीमंती, तुमचा माज पोसला जात आहे आणि तुम्ही आम्हालाच कोहिनूर आमचा आहे, भवानी तलवार आमची आहे, असे सुनावणार आणि आम्ही ते षंढपणे ऐकून घेणार! कुठल्याच नेत्याने, कुठल्याच वर्तमानपत्राने किंवा अन्य मीडियाने कॅमरून यांच्या या मुजोरपणाचा निषेध केलेला नाही. खरे तर जालियनवाला बागप्रकरणी माफी मागण्यास कॅमरून यांनी नकार देताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळायला हवी होती; परंतु आमचे दुर्दैव असे, की कुठे संतापून उठावे आणि कुठे संयम दाखवावा, हेच आम्हाला कळत नाही.
March 2, 2013
‘जसे कराल तसे भराल ’ हा कर्माचा अटळ सिद्धांत आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय-नीती-धर्माने वागत असतो, त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. उलट अधर्म अनीतीने वागणारे, काळाबाजार आणि तस्करी करणारे, जीवनात मौज-मजा करत असतात. गाडी, बंगला इत्यादी सर्व तऱ्हेच्या सुखसोयी यांची त्यांच्या जीवनात रेलचेल असते.
November 11, 2021
पाचव्या वेतन आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या भरपेट भोजनाची ढेकर अजून विरत नाही तोच केंद्र सरकारने सहाव्या वेतन आयोगाचे गठन करून आपल्या लाडक्या लेकरावरचे प्रेम जगजाहीर केले आहे. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताची जितकी काळजी घेते त्या तुलनेत इतर 95 टक्के जनतेची केवळ एक टक्काही काळजी सरकारने घेतली असती तर कुणाची काहीच तक्रार राहिली नसती; परंतु दुर्दैवाने परिस्थिती तशी नाही. आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार करताना सरकार जीवनमानाच्या ज्या कल्पना निर्धारित करते इतरांच्या संदर्भात मात्र सरकार त्या कल्पनांच्या जवळपासही फिरकत नाही ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे.
August 6, 2006
दिल्लीच्या गादीवर कोण बसणार, याचे औत्सुक्य पराकोटीला पोहोचले आहे. पंतप्रधान कुणाचा असेल हा प्रश्न काही दिवसांपूर्वी द्विपर्यायी होता. रालोआचा असेल की संपुआचा, हे दोनच पर्याय उत्तरासाठी होते.
March 14, 2011
हेल्मेट वापरण्याचा मुख्य उद्देश म्हणजे यात सामान्य नागरिकांच्या जीवनाचे धोक्याचे प्रमाण कमी होते. पण त्यासाठी सरकारानेच ‘प्रबोधन’ करायला पाहिजे असे म्हणणे हि मोठी शोकांतिका आहे. पुणेसारख्या शहरांमध्ये धर्माच्या नावाखाली हेल्मेट सक्तीला विरोध दर्शविण्यात आले. त्यांना एवढंच म्हणावे लागेल, “सर सलामत तो पगडी पचास”.
March 27, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti