(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्थिर, स्थितप्रज्ञ!

    ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधुनी पाहे’, असा प्रश्न उपस्थित करीत जगात कुणीच सुखी नसल्याचा उपदेश संतांनी केला होता. संतांना सुखाची नेमकी कोणती व्याख्या अपेक्षित होती, हे ठाऊक नाही; परंतु आज प्रचलित असलेल्या सुखाच्या सरधोपट व्याख्येचा विचार केला तर शेकडो वर्षांपूर्वीचा संतांचा हा प्रश्न अगदी गैरलागू ठरतो. शेकडो वर्षांत सामाजिक, आर्थिक संरचना भरपूर बदलली आहे.

  • पकडा पंढरीचा चोर

    आषाढी आली. वारकरी पंढरपूरला निघाले. पण हा पंढरीचा चोर फक्त पंढरीत राहत नाही, सगळीकडे फिरत असतो. बस त्याला पकडणारी नजर हवी. आजपर्यंत ह्या पंढरीच्या चोराला कोणी, कसे पकडले सांगत आहेत निरेन आपटे.

  • दिवाळीत जपू या सामाजिक भान

    दिवाळी म्हणजे अक्षय्य आनंदाचा सण. असा सण जगातील इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये आढळत नाही. कालपरत्वे हा सण साजरा करण्यात काही बदल होणे गरजेचे आहे. तसे प्रयत्न सुरू झाल्याने दिवाळीचा सण हळूहळू का होईना नवे रूप धारण करत आहे. फटाके फोडणे कमी करून, खरेदीप्रसंगी गरजूंना मदत करून आणि खाद्यपदार्थांऐवजी दिवाळी अंकांची देवाणघेवाण करून आपण नव्या प्रथांना जन्म दिला पाहिजे.

  • एकेकाळी माणसात माणुसकी होती…

    एकेकाळी माणसात माणुसकी होती...
    पण आता आजकाळ तो जनावर झालाय...

    एकेकाळी माणुस शिकुन सुशिक्षित व्हायचा...
    पण आजकाळ तो शिकुन स्वार्थीच होतोय...

    एकेकाळी सणावारांना घरात नातेवाईकांची सुग्रास जेवणाच्या पगंती ऊठायच्या...
    पण आजकाळ सणावांराना पचंतारांकीत हॉटेलच्या रांगेत ऊभा रहायला अभिमानास्पद वाटतय...

    एकेकाळी राजकारणमध्ये समाजऊपयोगी कामे व्हायची...
    पण आजकाळ राजकारणमध्ये जातीय राजकारण होतय...

    एकेकाळी व्यायाम शाळेत जायची स्पर्धा असायची...
    पण आजकाळ अतीऊच्च मदीरालयात जायची स्पर्धा जाणवतेय...

    एकेकाळी छोट्याशा घरामध्ये नातेवाईकांची लगबग असायची...
    पण आजकाळ मोठ्या फ्लॅटमध्ये फर्निचरची दाटी झालीय....

    एकेकाळी अभिजात सुंदरतेसोबत लाजाळुपणा व शिष्टाचार असायचा....
    पण आजकाळ ब्युटी पार्लरच्या ग्लोसोबत निर्लज्जपणा व बेशिस्तता वाढतेय...

    एकेकाळी आजी-आजोबा घराचे आधारस्तंभ असायचे...
    पण आजकाळ हेच आजी-आजोबा घराची अडगळ वाटतीय...

    एकेकाळी स्वच्छ व निस्वार्थी राजकाराणी नेते असायची...
    पण आजकाळ भ्रष्ट व निर्लज्ज राजकारणी नेते आपण पाहतोय...

    एकेकाळी शाळाकॉलेजात विद्यार्थी पदवी घ्यायला जात असायची ...
    पण आजकाळ शाळाकॉलेजात विद्यार्थी देशद्रोह करायला जातात....

    एकेकाळी पोलिस बेधडक व कायद्यात राहुन गुन्हेगारांवर वचक निर्माण करायची...
    पण आजकाळ तेच पोलिस राजकीय छायाछत्राखाली राहुन व हफ्ते घेऊन गुन्हेगारांना सहकार्य करतात..

    एकेकाळी राजकीय मंडळी निस्वार्थपणे देशासाठी प्रार्णापण करायची...
    पण आजकाळ राजकीय मंडळी स्वार्थासाठी देशालाही विकत आहेत....

    जय हिंद.... वंदे मातऱम

    -- विवेक जोशी

  • LGBTQI’ जनांसाठी नवी आशा

    समाजातल्या मेजॉरिटीपेक्षा भिन्न असलेल्यांना बरेच कांहीं सोसावें लागतें, कारण समाजातील प्रथा, परंपरा या, केवळ मेजॉरिटीला ध्यानात घेऊन बनवलेल्या असतात. मात्र, अशा परंपरा भूभागसापेक्ष, संस्कृति-सापेक्ष व कालसापेक्ष असतात. काळाबरोबर जसजसा समाज बदलतो, तसतसे मान्यताप्राप्तीचे निकषही बदलतात.

    ‘LGBTQI’ कम्युनिटीला गेली अनेकानेक शतकें-सहस्त्रकें समाजरोष पत्करावा लागला आहे,  अन्याय्य  असा एक  ‘डाग’ बाळगत जगावें लागलें आहे. जें कांहीं Natural ( पण मेजॉरिटीपेक्षा भिन्न) आहे, ते समाजानें, सरकारनें आणि न्यायपालिकेनें आजवर शिक्षापात्र गुन्हा मानलें होतें. मात्र, आतां सुप्रीम कोर्टानें या विषयावर पुनर्विचार करण्याचें ठरवलें आहे. त्यातून या कम्युनिटीला योग्य तो न्याय मिळेल, अशी आशा करायला हरकत नाहीं.

  • जाताना जरा लक्षात असू द्या

    खांदेकरी ‌ शिव्या देणार नाहीत तिरडी उचलताना , इतपत वजन मर्यादित ठेवावे , सरणावर ठेवताच जळायला मदत व्हावी म्हणून थोडी चरबीही असायला हरकत नाही अंगात . पूर्णपणे जळून झाल्यावर उरणारी दोन - अडीच किलो वजनाची हाडे काही काळाने पंचमहाभूतांत विलीन होऊन जाणार आहेत , त्यामुळे मेल्यावर आपले काही मागे राहील , या भ्रमात राहण्याचा मूर्खपणा करू नये . दातात भरलेली चांदी मात्र तशीच राहील ; त्याचे श्रेय दंतवैद्याला द्यायला हरकत नाही , बिचारा कायम विनोदाचा विषय झालेला !

    दफन झाले तर कीड्यामुंग्यांना मेजवानी आणि झाडांना दर्जेदार खत मिळणार आहे , शिवाय शरीरातला काही भाग सल्फर आणि कार्बनच्या स्वरूपात पंचमहाभूतात विलीन होणार आहे , ही माहितीसुद्धा हाताशी असू द्यावी . बँकेत एवढाच बॅलन्स असू द्यावा की ज्यामुळे वारसांमध्ये भांडणे लागणार नाहीत , मुले एकमेकांच्या जीवावर उठणार नाहीत , सेवाभावी संस्था मागे लागणार नाहीत ८० - जी चे प्रमाणपत्र घेऊन ! आणि असलीच थोडी प्रॉपर्टी तर मृत्युपत्र करताना मुलाच्या नावे करण्याऐवजी नातवाच्या नावे करावी , म्हणजे नातू सज्ञान होईपर्यंत आपला नालायक मुलगा आपल्याला शिव्या देत , शेवटच्या क्षणी पाणी पाजल्याचा पश्चात्ताप करीत रोज आपली आठवण काढत राहील .

    एरवी सर्वत्र पुढे असणाऱ्या पण शेवटी मागे राहणाऱ्या बायकोची काळजी करू नये . बायका वयाने नवऱ्यापेक्षा मोठ्या असण्याची पद्धत आपल्यात नसल्याने बायकांना विधवा करण्याची संधी नवऱ्यांना आयतीच मिळते , त्याला कोण काय करणार ? आणि दररोज लाल टिकली चिकटवून घेणाऱ्या कपाळालाही थोडा चेंज मिळावा यात गैर ते काय ?

    अंत्ययात्रेच्या वेळी हसू नये जीवनाची कॉमेडी आठवून आणि बऱ्या - वाईट आठवणींच्या क्षणांची नोंदवही जाता जाता हळूच परमेश्वराच्या रद्दीच्या दुकानात टाकून पुढे सटकावे . जन्माला का आलो आणि का मेलो , यासारखे प्रश्न ' राम बोलो ' च्या डस्टरने पुसून टाकावे मनाच्या पाटीवरून .

    गल्लोगल्ली श्रद्धांजलीचे फलक लावण्यासाठी आणि वृत्तपत्रात जाहिराती देण्यासाठी मित्रांना भुर्दंड पडेल , इतकी कीर्ती मिळवू नये . पुतळ्याचेही स्वप्न बाळगू नये . कारण कार्यकर्ते करतील त्याही निधीत भ्रष्टाचार आणि कावळ्यांना मिळेल सार्वजनिक कमोड ! मरताना डोळे मिटलेले असावे , स्वतःच्या निधनाच्या चुकीच्या बातम्या वाचायला मिळू नयेत म्हणून आणि तोंड उघडे असू द्यावे सांगायचे बरेच काही राहून गेले पण ऐकून घेण्यासाठी कुणाकडेच वेळ नव्हता म्हणून .

    महागुंगीच्या धुक्यात शिरताना समोर स्टेशनमास्तर भेटावा . त्याच्याकडे चौकशी करावी ' पुष्पक विमान ' कोणत्या प्लॅटफॉर्मला लागते याची आणि वैकुंठाचे तिकीट काढून वाट पाहत बसावे तुकारामाचे आयटेम साँग म्हणतः आम्ही जातो अमुच्या गावा , अमुचा राम राम घ्यावा !

    -- अविनाश

  • भ्रामक लोकशाही!

    पूर्वीच्या काळी ताब्यात असलेल्या गडकोटावरून एखाद्या राज्याची, राजाची श्रीमंती ठरत असे. जितके जास्त किल्ले, दुर्ग वर्चस्वाखाली तितका तो राजा प्रभावी समजला जायचा. एखादा किल्ला ताब्यात असला की, आजुबाजूच्या मोठ्या परिसरावर सहज नियंत्रण ठेवता यायचे. सैन्य, त्यांच्यासाठी लागणारी रसद आणि अर्थातच सुरक्षितता आदी कारणांमुळे गडदुर्गांना खूप महत्त्व असायचे. काळ बदलला. गडदुर्ग केवळ पर्यटनापुरते उरले. अर्थात गडदुर्गाचे महत्त्व संपुष्टात आले असे नाही, ते आजही कायम आहे. फक्त त्यांचे स्वरूप बदलले एवढेच. केवळ स्वरूपच नव्हे तर उपयोगितादेखील बदलली.

  • एका पूलाचे आत्मवृत्त

    संगमनेरच्या पूलाची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे. या पूलाचे आत्मवृत्त!

  • आम्ही कंगाल का?

    प्रकाशन दिनांक :- 04/01/2004

    सध्या संपूर्ण जग समस्यांचे माहेरघर बनले आहे, यावर कुणाचे दुमत होण्याचे कारण नाही. आपल्या देशाच्या संदर्भात तर हे विधान कायम सिद्ध आहे. खरं तर मानवाच्या विकासाला या समस्याच कारणीभूत ठरल्या आहेत.

  • शेतकरी तेवढा अप्रामाणिक !

    ग्रामीण भागातील शेतकरीदेखील या देशाचा सन्मान्य नागरिक आहे, त्याचे हित जपणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारला हे शक्य नसेल किंवा हे शक्य नाहीच, तर किमान सरकारने बियाणे आणि खताच्या पुरवठ्यातून जन्माला येणार्‍या काळ्या बाजाराला मूठमाती देण्यासाठी हा प्रकारच बंद करावा. सरकारने या संपूर्ण व्यवहारातून आपले लक्ष काढून घ्यावे. कोणतीही गोष्ट सुचारूपणे चालायची असेल तर त्यात पहिली अट हीच असते, की सरकारची त्या गोष्टीत कोणतीही दखलअंदाजी नको, जिथे सरकारी हस्तक्षेप आहे तिथे सगळ्याचा सत्यानाश आहे, हे आतापर्यंत वारंवार सिद्ध झाले आहे.