(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जे. कृष्णमुर्ती

    काही माणसे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची पायवाट अदृश्य स्वरूपात असतेच. १२ मे १८९५ रोजी जे. कृष्णमुर्ती यांचा जन्म झाला. जे. कृष्णमूर्ती या थोर भारतीय तत्वज्ञाचा आपणास आता विसर पडलेला आहे. कृष्णमूर्तींचे विचार त्यांचे तत्वज्ञान हे नेहमीच समकालीन राहणार आहे. जे. कृष्णामूर्तींचे विचार मानव जातीला तारक ठरू शकतील असेच आहेत.भौतिक सुखाचा अतिरेकी हव्यास, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा, चंगळवाद, भोगलोलुप्ता, जीवनशैली या गोष्टी मानव जातीला विनाशाकडे घेऊन जात आहेत. कृष्णमूर्तींनी आपले स्वतंत्र आणि स्वयंभू तत्वज्ञान जगाला दिले आणि एक सत्यदर्शी तत्वज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली.

  • विवाह हा विषय व्यक्तिगत असला तरीही

    त्यामुळे विवाह हा विषय व्यक्तिगत असला तरी त्याला सामाजिक रूप आहे. डोळेझाक करून चालणारा नाही.

  • सोप्या शब्दांत चाणक्य तत्त्वज्ञान

    तत्त्व पटवून देताना तत्त्वज्ञाने तर्क लढवले नाहीत, तर ते तत्त्वज्ञान रटाळ होतं. तत्त्वज्ञान अंगिकारण्यास लोक तयार होत नाहीत.

  • खंबीरपणा (उभा विरूध्द आडवा)

    कोंबडीचे अंडे आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी विट यांच्यात एका बाबतीत साम्य आहे ते कोणत्या बाबतीत आहे ? जरा ओळखुन दाखव!” मित्राने माझ्यापुढे कोडे टाकले.

    मला विचारचक्रात अडकवुन स्वतः पसार झाला.

    मी विचार करु लागलो, “बांधकामाची विट आणि कोंबडीचे अंडे यात काय साम्य असणार?” खुप विचार करुनही उत्तर न सापडल्यामुळे शेवटी शेजारी सुरु असलेल्या बांधकामावरुन दोन विटा आणि बाजारातुन अर्धा डझन अंडी घेउन घरी आलो. खूप निरीक्षण केले पण उत्तर सापडले नाही.

    दुसर्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला, “काय सापडले काय उत्तर?”

    मी नकारार्थी मान हलविली आणि “आता तुच काय ते साम्य दाखवं!” असे म्हणुन ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे ठेवल्या.

    मित्राने हातात अंडे घेतले. ते उभे ठेवले आणि दाबले, पण ते फ़ुटले नाही . मग त्याने अंड्याला आडवे केले आणि दाबले, ते चटकन फुटले. मग त्याने दोन फ़ुटावरुन हातात उभी धरलेली विट खाली सोडली, विटेला काहीच झाले नाही. नंतर तेवढ्याच अंतरावरुन त्याने आडवी धरुन विट खाली सोडली, आता मात्र विट फुटली.

    मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला “विट आणि अंडे उभे असेपर्यंत फ़ुटत नाही, आडवे होताच फ़ुटते. हे त्या दोघांमधील साम्य. माणुस त्या विट किंवा अंड्यासारखाच -तो जोपर्यंत खंबीरपणे उभा आहे, सजग आहे, तो पर्यंत कोणीच त्याचे भवितव्य बिघडवू शकत नाही. पण जर का तो सुस्तावला, जरा आडवा झाला, की त्याचे भवितव्य फ़ुटण्याची शक्यता बळावते."

    खंबिरपणे उभे राहा.कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेन बघा त्याचा खंबीरपणे सामना करा...कोन्हीही तुमचे काहीही करू शकनार नाही.. यश तुमचेच....

    नाहीतर....

    जग तुम्हाला आडवे करेल..

    विचार करा

  • निष्क्रियतेचे उदात्तीकरण

    प्रकाशन दिनांक :- 16/01/2005
    पश्चिम महाराष्ट्राने विकास साधला म्हणण्यापेक्षा या भागाने विकासाची गंगा खेचून नेली, असेच म्हणावे लागेल. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या भगिरथ प्रयत्नात त्या भागातील सामान्य शेतकरी तर सामील झालाच होता, सोबतच तिकडच्या लोकप्रतिनिधींनीसुद्धा वेळप्रसंगी पक्षीय अभिनिवेश बाजूला सारून आपल्या मतदारांचे हित जोपासणे सर्वोतोपरी मानले.
    विदर्भाचा अनुशेष,विदर्भ-मराठवाड्याचे मागासलेपण याबद्दल नेहमीच ओरड होत असते.

  • पंतप्रधान आले अन् गेले!

    हा लेख तुमच्या हातात पडेपर्यंत पंतप्रधानांचा विदर्भ दौरा आटोपला असेल, या दौऱ्याची फलश्रुती तुमच्या समोर असेल; परंतु हा लेख लिहीत असताना पंतप्रधानांचा दौरा सुरू झालेला नव्हता. त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्याने विदर्भाला काय मिळेल, ते कितपत परिणामकारक ठरेल याचा इथे केवळ अंदाज करणे शक्य आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या पंतप्रधानांना कुठेतरी अस्वस्थ करून गेल्या आणि म्हणूनच त्यांनी इथल्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा, इथल्या लोकांच्या समस्या थेट त्यांच्याकडूनच समजून घेण्याचा निर्णय घेतला यात शंका नाही.

  • वन्यजीवांचा उपद्रव सरकार रोखणार का ?

    वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याकरिता  सरकारने शेतकर्‍यांच्या शेतीला सामूहिक कुंपण घालून द्यावे आणि त्याला मध्ये-मध्ये शेतकर्‍यांच्या सोयीनुसार फाटक लावून द्यावे. प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले असेल, तर संभाव्य उत्पन्नाइतकी नुकसान भरपाई तातडीने शेतकर्‍यांना देण्याची एक सूत्रबद्ध योजना तरी सरकारने राबवावी. हा दुसरा उपाय करणे सरकार आणि नोकरशाहीला पैशा अभावी राबविणे शक्य नाही, याची मला खात्री आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनाच या प्राण्यांना पाळण्याची परवानगी देणे आणि त्यातून सरकारने महसूल मिळविणे हा पहिला उपाय स्वीकारल्याशिवाय सरकार समोर पर्याय नाही याची मला खात्री आहे.

  • लोकशाही जिवंत आहे का?

    गेल्या सात दशकापासून लोकशाहीचा हा प्रयोग अव्याहतपणे सुरू असतांना राजकीय पक्षांनी तदवतच ज्यांच्यावर घटनेच्या मूल्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे, त्यांनी घटनेशी खरंच इमान राखले आहे का? यावर स्वतःला लोकशाहीवादी म्हणविणाऱ्या प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची वेळ आज आली आहे.

  • महागाई केवळ शेतमालाचीच का दिसते ?

    प्राध्यापकांचे आजचे वेतन 60 ते 80 हजारांवर गेले आहे. निखळ उत्पादक मूल्याचा विचार केला तर शिक्षक किवा प्राध्यापकांच्या तुलनेत शेतकरी कैकपटीने सरस ठरतो. परंतु मिळकतीच्या संदर्भात मात्र हाच शेतकरी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत भिकारडा ठरतो. हा अन्याय आहे, असे कुणालाच वाटत नाही. आपल्या पोळीवर तुप ओढून घेताना आपलाच अन्नदाता उपाशी मरत आहे, याचा विचार कुणी करत नाही आणि आज कृषीमालाच्या किमतीत थोडी वाढ झाली तर काय थयथयाट मांडल्या जात आहे.

  • विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी नांदूर येथील शिक्षिका रोहिणी लोखंडे यांची धडपड

    रोहिणी लोखंडे यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या उपक्रमांची डोंगराएवढी यादी बघूनच थक्क व्हायला होते; त्याचबरोबर, त्यांची विद्यार्थीहिताची तळमळ लक्षात येते. हे उपक्रम बघा हं-रंजक अध्यापन, संगीत कवायत, शाळेला रंगरंगोटी, शिक्षण महोत्सव, We learn English हा परिपाठ, वैदिक गणिताचे अध्यापन, स्पेलिंग बँक, इंग्रजी अंताक्षरी, ‘आम्ही वाचतो’ (मुले पुस्तके वाचून वहीत लिहीत असत), सामान्यज्ञान व प्रश्नमंजुषा, प्रश्नकुंभ, भाषा अभिव्यक्ती, मुलाखत, ग्लोबल क्लासरूम (केरळच्या संतोष तळपट्टी या शिक्षकांची घेतलेली मुलाखत), दिनांकांचा पाढा, लेझिम पथक, स्नेहसंमेलनातून निधीसंकलन (सात लाख रुपये), खाऊगल्लीची लज्जत (सहा हजार रुपयांची कमाई ), शाळेची कंपाउंड वॉल.. लोखंडेबाईंनी असे विविध उपक्रम शाळांमध्ये राबवले. त्यामुळे मुलांमध्ये शाळेविषयी गोडी निर्माण झाली. शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या वाढली.