ध्या भारतात चर्चा केवळ महागाईची आहे. विरोधी पक्षांना महागाईच्या रूपाने आपल्या तलवारी पाजळण्यासाठी चांगला मुद्दा मिळाला आहे आणि तिकडे सरकारही प्रचंड अस्वस्थ आहे. महागाई सध्या राष्ट्रीय संकट ठरले आहे.
April 13, 2008
लोकशाही शासनपद्धती आपण स्वीकारली आहे. त्यामुळे निवडणुका हा अपरिहार्य आणि तेवढाच महत्त्वाचा घटक झाला आहे. अलीकडील काळात या निवडणुकींना आलेले स्वरूप बघून अनेक सुबुद्ध नागरिक निवडणूक पद्धतीवर पर्यायाने लोकशाहीवरच टीका करीत मतदानापासून दूर राहतात.
April 18, 2004
जसा भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे तसा वर्तमानकाळ नाही. काळ क्षणाने मोजला जात असेल तर तो दुसर्या क्षणी उरत नाही, त्या क्षणाला परत आणता येत नाही. पुढचे क्षण ह्या क्षणी दिसत नाहीत. मग ‘चालू क्षण’ म्हणजेच वर्तमानकाळ का? तसे असेल तर ‘वर्तमानकाळ’ क्षणभंगूर आहे.
June 6, 2021
आज प्रत्येकाला स्पेस हवी असते. मग नवरा असो , बायको असो किंवा प्रियकर आणि प्रेयसी असो. ही स्पेसची काय भानगड आहे असे तर कुणी ६० प्लस किंवा ६५ प्लस ना विचारले तर निश्चित तोड वाकडे होते का कुणास ठाऊक त्यांच्या मीटर मध्ये स्पेस ही कल्पना बसत नाही. तर कुणी ६० प्लस मध्ये असले तरी मान्य करते.
August 5, 2023
“अहम् ब्रम्ह असी”, “अहम् ब्रम्ह असी”, असं प्रत्येकजण म्हणताना आपण ऐकतोय. नव्या गतीने नव्या ईर्शेने जो तो धावताना आपण पाहतोय. कॉस्मोपॉलिटीन शहर असो किंवा आणखी कोणतंही क्षेत्र प्रत्येकजण मीच ब्रम्ह आहे असं म्हणवतोय.
February 4, 2011
मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात येण्यापूर्वी विदर्भ प्रदेश हा तत्कालीन सी.पी. अॅण्ड बेरार (मध्य प्रांत आणि वऱ्हाड) या प्रांताचा एक भाग होता.
December 3, 2006
आज सरकार प्राथमिक शिक्षणावर जवळपास 9 हजार आणि माध्यमिक -उच्च माध्यमिक शिक्षणावर 22 हजार कोटी वर्षाला खर्च करत आहे. यापैकी बहुतांश पैसा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होतो. हा एवढा प्रचंड खर्च करून शेवटी विद्यार्थ्यांच्या नशिबी सुशिक्षित बेरोजगाराचा शिक्का कपाळी मारून घेणेच येत असेल तर संपूर्ण व्यवस्थेचे पुनर्विलोकन आवश्यक ठरते.
May 15, 2005
लहानपणी लाकूड तोड्याची गोष्ट प्रामाणिकपणा चे महत्त्व मनावर ठसवण्यासाठी सांगितली जात असे. आज तशीच घटना परत घडली तर आजचा लाकूडतोड्या कसा वागेल आणि देवाकडे काय मागेल? तुम्हाला काय वाटते?
December 19, 2018
विदर्भ-मराठवाड्याच्या मागासलेपणाबद्दल नेहमीच बोलले, लिहिले जाते. हा प्रदेश अविकसित आहे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही; परंतु हा प्रदेश इतर प्रांताच्या तुलनेत मागासलेला राहण्यामागच्या कारणांबद्दल मात्र प्रचंड मतभिन्नता आहे. विदर्भातील राजकारण्यांचा एक मोठा गट विदर्भाच्या मागासलेपणासाठी सरकारच्या पक्षपाती भूमिकेला दोष देतो.
May 22, 2005
गेल्या काही दिवसापासून मला करोडो रुपयाची संपत्ती मिळण्याचे डोहाळे लागले आहेत, कोरड्या उलट्या सारख्या येतात. कारण?
1. मला राजस्थान वरून सतत फोन येतो, हमारे पास हमारे पूर्वज्योंका सोना मिला है, जो हमे आधे दाम में बेचना है। आप जोधपूर आकर देख लो, और पसंद आये तो डील पक्का करेंगे. राजस्थान मध्ये याला कोणी मिळत नाही का हे विकण्यासाठी, हा प्रश्न मला नेहेमी सतावत रहातो.
2 आजकाल कोणत्यातरी आफ्रिकेतील देशातील बॉब, जॉन, वगैरे माणसाचा sms दर दोन दिवसांनी येतो. 34 ट्रिलियन डॉलर्स माझ्या खात्यात जमा करण्यासाठी आतुर झाला आहे. कारण माहित नाही. माझा फोन नंबर त्याला कसा मिळाला, हे न उलगडणारे कोडे आहे.
3. युरोपियन बँकेतील मॅनेजर मला इमेल पाठवत राहतो, अभिनंदन या वाक्याने सुरुवात होते, कोणत्या तरी अनामिक माणसाचे 100 कोटी त्यांच्या बँकेत पडून आहेत, त्यातील 20 कोटी युरो, मला ते देऊ इच्छित आहेत, तरी लवकरात लवकर दिलेल्या फोन वर संपर्क साधणे.
4. लहानपणी 9 अंकांची कोडी सोडवा लाखोंची बक्षिसे मिळवा, असे पेपरमध्ये लिहून येत असे, पहिले बक्षीस कार, दुसरे 2 इन 1 रेडिओ. पहिले बक्षीस कधीच लागत नसे. नेहेमी 2इन1 रेडिओचे बक्षीस मिळत होते. 15 पैशाचे कार्ड दिल्ली, जालंधर, आग्रा, याच शहरात पाठवावे लगे. चार दिवसात दुसऱ्या नंबर चे बक्षीस मिळाल्याचे पाकीट येत असे. अभिनंदनाने सुरु होणारे पत्र, पोस्टेजसाठी रु 500 पाठवा म्हणून संपत असे. माझ्या जीवनात अभिनंदनाचा वर्षाव या पत्रापासून सुरु झाला तो आजपर्यंत सुरूच आहे.
5. या शिवाय आजकाल गोड आवाजातील मुलींचे फोन वरचेवर येतात, कोणतेच कागदपत्र न मागता, मला रु 10 लाख कर्ज ज्याला पर्सनल लोन म्हणतात, देण्यास त्या उतावीळ असतात.
6. अश्याच मुलींचे फोन आसान किस्तो पे प्लॉट, विकण्यासाठी येतात, रु 600 पर sq feet, भावाचा प्लॉट, हि बया मला रु 200 च्या भावात देण्यासाठी कासावीस झालेली असते. 2 वर्षात डबल, 3 वर्षात चारपट होणार याची खात्री देते. मला सांगा हिचा महिन्याचा पगार मिळण्याची हि खात्री देऊ शकत नाही, ती मला चारपट पैसे मिळण्याची खात्री देते.
माझा देव वरून हे सर्व पहात असतो, आणि मला करोडपती होण्यापासून वंचित ठेवतो. हे चांगले का वाईट हे संजण्याइतके आपण पण सुजाण आहात अशी मी आशा करतो.
धन्यवाद
विजय लिमये
October 22, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti