चूक सरकारच्या धोरणामध्ये आहे. दुर्दैवाची बाब ही आहे, की हे चुकीचे धोरण बदलून नवे धोरण कसे असावे हे सांगण्याऐवजी अण्णा हजारे सारखे लोक केवळ भ्रष्टाचार आणि काळा पैशाच्या नावे बोंब ठोकत साप सोडून भुई थोपटत आहेत. नवीन धोरण लागू करण्याची हिंमत कोणतेही सरकार दाखवू शकत नाही. सरकारने ही हिंमत दाखविली, तर आज खुरडत चालणारा हा देश उद्या भरधाव वेगाने पळू लागेल; परंतु असे सरकार या देशाला लाभेल का हाच खरा प्रश्न आहे!
June 11, 2012
कुटुंबाचे हे वास्तव आजकाल दिसून येते. आपल्याला गरज आहे ती आपल्या परिवारतील सदस्यांना समजून घेण्याची त्यांना मोठ्यांकडून मिळत असलेल्या मार्गदर्शनाची, प्रेमाची आणि एकत्र राहण्याची.
May 1, 2024
ग्रामीण भागातील शेतकरीदेखील या देशाचा सन्मान्य नागरिक आहे, त्याचे हित जपणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारला हे शक्य नसेल किंवा हे शक्य नाहीच, तर किमान सरकारने बियाणे आणि खताच्या पुरवठ्यातून जन्माला येणार्या काळ्या बाजाराला मूठमाती देण्यासाठी हा प्रकारच बंद करावा. सरकारने या संपूर्ण व्यवहारातून आपले लक्ष काढून घ्यावे. कोणतीही गोष्ट सुचारूपणे चालायची असेल तर त्यात पहिली अट हीच असते, की सरकारची त्या गोष्टीत कोणतीही दखलअंदाजी नको, जिथे सरकारी हस्तक्षेप आहे तिथे सगळ्याचा सत्यानाश आहे, हे आतापर्यंत वारंवार सिद्ध झाले आहे.
June 14, 2011
इंधनाच्या बाबतीतले परावलंबित्व ही देशाच्या विकासासमोरची एक मोठी समस्या आहे आणि त्यापेक्षा मोठी समस्या दूरदृष्टी नसलेल्या नेतृत्वाची आहे. सुदैवाने आज राजकारणात युवा शक्ती मोठ्या प्रमाणात सक्रिय होताना दिसत आहे. या युवकांनी एकत्र येऊन या देशाला महासत्ता बनविण्याचा निर्धार केला, तर परिस्थिती निश्चितच बदलू शकते. नाविन्यपूर्ण विचार, ते अंमलात आणण्याची धमक, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी या सगळ्या गुणांनी युक्त असलेले नेतृत्व ही आज देशासाठी काळाची गरज बनली आहे.
May 5, 2012
आपल्या ऊर्जेचा आणि वेळेचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्यात बदल घडवण्यात म्हणजे स्वतःला आधी पेक्षा चांगले बनवण्यात करायला हवा म्हणून झालेले गेलेले सगळे विसरुन जा आणि आयुष्याच्या वाटेवर पुढे सकारात्मक वाटचाल करा.
May 26, 2019
सरकारच्या संवेदनाहिन निर्ढावलेपणाचा वारंवार अनुभव घेऊनदेखील या ज्ञात-अज्ञात समाजसेवकांचा लढा सुरूच राहतो, कधीतरी पहाट होईल या आशेवर ते अंधाराची पायवाट तुडवित राहतात. त्यांच्या या सोशिकतेला, या संयमाला आणि या निष्काम कर्मभावनेला सलाम ठोकावाच लागेल. कदाचित पद्म पुरस्काराच्या परिघात त्यांचा हा निष्काम कर्मयोग येत नसेल, येणारच नाही कारण त्यासाठी प्रसारमाध्यमांचा प्रकाशझोत आपल्याकडे वळवून घेण्याचे एकप्रकारचे कसब लागते, ते त्यांच्यात नसते आणि म्हणूनच पद्म पुरस्काराच्या भल्या मोठ्या यादीत त्यांना स्थान मिळत नसेल; मात्र त्यांच्या या सोशीकतेची सरकारने कधीतरी दखल घ्यावी, एखादा पद्म पुरस्कार त्यांच्या सोशीकतेलाही द्यावा!
January 28, 2012
सद्या चार्लस् डार्विन आणि त्याचा माकड सगळीकडे धुमाकुळ घालतोय…. अनेकजण जणु काय डार्विनला आपण कोळून प्यालोय, अशा आविर्भावात बोलतायत…(जसं क्रिकेटबद्दल बोलताना प्रत्येकजण एक्सपर्ट कॉमेन्टेटर असल्यासारखा बोलतो, तसं..) खरंतर यापैकी कितीजणांना डार्विन, त्याचं ते जगप्रसिद्ध पुस्तक आणि क्रांतिकारक सिद्धांत याच्याबद्दल किती माहिती आहे, हे त्यांचं त्यांनाच माहित.
January 24, 2018
गेल्या काही दिवसांत आरक्षणावरून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. धनगर समाजाने अनुसूचित जमातीत आरक्षण मागितले आहे. त्याला आदिवासींनी विरोध केला आहे. वंजारी समाजानेही आरक्षणात तब्बल आठ टक्के वाढ मागितली आहे. म्हणजे सध्याचे दोन मिळवता दहा टक्के आरक्षण त्यांना हवे आहे. नाभिक समाजानेही जळगावात सर्वसमावेश प्रमुख समिती स्थापून अनुसूचित जाती- जमातीत आरक्षण मागितले आहे. या समाजांची आरक्षणाची मागणी वरवर बघता योग्यही आहे.
August 4, 2014
भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातील चिप्सचे रिकामे पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली...
आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली...
माझ्याकडे रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची...!
त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबलं...
आणि त्याच्याच मागून भिकाऱ्यासारखं हात जोडून मला विनंती करीत आलेल्या कफल्लक म्हाताऱ्याला वयाचा दाखला आणायला मी बळेच पिटाळून लावलं...
त्याच्या डोळ्यातला तो अश्रूचा थेंब पहिला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या अधाशी हावरट पोटाची...!
रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या नवऱ्याला इस्पितळात न्यायची तिने विनंती करताच माझी नवी कोरी चमचमीत आलिशान कार रक्ताने माखेल की काय या भीतीने मी दुसऱ्या मार्गे जात असल्याच सांगून हळूच टांग मारली...
तिच्या नजरेतली भीक मी स्पष्टपणे पहिली
तरीही मला लाज नाही वाटली ....
लाज माझ्या दिखावेबाज श्रीमंतीची...!
बलात्काराच्या केसमधून त्याला निर्दोष सिध्द करताना मी माझ्या वकिलीची सीमापार गाठली...
बलात्काराच्या बळीची आब्रू पुन्हा वेशीवर टांगली. तिच्या डोळ्यातला राग पहिला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या कायदाप्रिय बुद्धिमत्तेची...!
एअरकंडीशनर मॉल मधून महागडे कपडे अन शूज खरेदी करून मी अभिमानाने कार्ड स्वाईप केलं...
फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेजवानीनंतर वेटरच्या हातावर १०० रुपयांची टीप सुध्दा टेकवली...
मात्र बाजारातून भाजी खरेदी करताना १० रुपयासाठी अपार घासाघिस केली...
त्या गरीब शेतकऱ्याच्या आर्त विनवणीचा सूर कानात घुमत राहिला.
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या काटकसरी व्यवहारांची...!
समुद्रात लाखो करोडो रुपयांची रक्कम ओतून शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याच्या मी खूप गप्पा मारल्या...
पण जिथे माझा राजानं अखेर प्राण सोडला त्या खऱ्याखुऱ्या स्मारकरूपी रायगडाची मात्र दयनीय अवस्था केली...
शिवछत्रपतींची तलवार तोडली गेल्याची बातमी टीव्हीवरती पसरली...
प्रेमी युगुलांची नावं लिहलेल्या गडाच्या बुरुजांचा आक्रोश कानठळ्या फोडू लागला
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या नादान शिवभक्तीची...!
गगनभेदी बिल्डींग, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, ३ जी- ४ जी अन बुलेटट्रेनच्या जमान्यात कुणी आरक्षणासाठी तर कुणी आरक्षणाच्या विरुध्द भांडला...
आदिवासी पाड्यावरचा रुग्ण वाहतूकसुविधे अभावी अजूनही झोळीत टाकून आणलेला पहिला...
डॉक्टर म्हणे तो तर रस्त्यामध्येच मेला.
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या विकासाच्या राजकारणाची...!
२६/११ ला मी मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली...
पाकिस्तानशी युद्धाच्या पोकळ गप्पा मारून देशाखातर मरण्याच्या सिंहगर्जना केल्या...
त्याच पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट मी चवीने पहिले...
माझ्याच पैशात मी कित्त्येक कसाब पोसले
तरीही मला लाज नाही वाटली....
लाज माझ्या फुटक्या देशभक्तीची.!
आणि अजूनही मला लाज नाही वाटत....
माझ्या निर्लज्जपणाची...!!!
February 27, 2017
आपल्या देशात एक पद्धत आहे – जयंती किंवा पुण्यतिथीच्या दिवशीं आपण त्या थोर व्यक्तीच्या नांवाचा घोष करतो, समारंभ, भाषणें वगैरे करतो, पुतळ्याला हार घालतो. आणि दुसर्या दिवसापासून पुन्हां ‘जैसे थे’ ! पण, नुसतीच व्यक्तिपूजा नको, तर त्यांच्या विचारांचें मनन, व पालन करणें हेंच खरें तर आवश्यक आहे
May 27, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti