(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • हीन वैचारिक पातळी

    काँग्रेस पक्ष हा या देशातील सर्वात जुना पक्ष आहे, त्याला राजकीय परिपक्वतेची खुप मोठी पार्श्वभूमि आहे परंतू या पक्षाला काही कालावधीचा अपवाद वगळला तर सक्षम प्रतिस्पर्धी कोणीही भेटला नाही. त्यामुळे या पक्षाची वैचारीक पातळी सातत्याने हेलकावत राहिली व म्हणूनच हा पक्ष नेहमीच टिकेचे लक्ष्य तर बनलाच परंतू त्यातील वैचारिक दिवाळखोरीही चव्हाट्यावर येवू लागली परिणामी लोकांच्या विश्वासाला नेहमीच तडा गेला हे कटू सत्य.

    -- अतुल तांदळीकर

      December 11, 2010


  • नवे वर्ष,नवी परीक्षा

    सुधारक'कार आगरकरांचे 'शिष्य’ 'तुतारी'कार केशवसुत आपल्या ‘तुतारी’या कवितेत सांगतात-

    "जुने जाऊ द्या मरणालागुनि
    जाळूनी किंवा पुरुनी टाका
    सडत न एका ठायी ठाका
    सावध ऐका पुढल्या हाका
    खांद्यास चला खांदा भिडवूनी"

    असा एल्गार करणारा संदेश त्यांनी नव्या पिढीला दिला.जुन्या गोष्टींना कवटाळून न बसता काळाचे भान ठेवून तरुणांनी नवे विचार आत्मसात करावेत,असे त्यांनी सांगितले.

    क्रांतीकारी कवी ज्ञानपीठ विजेते सर्वांचे आवडते कुसुमाग्रज आपल्या 'प्रेम' या कवितेत म्हणतात-
    "उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
    जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
    नंतर तुला लगिनचिठ्ठी
    आल्याशिवाय राहील काय?
    म्हणून म्हणतो जागा हो
    जाण्यापूर्वी वेळ..."

    तर मित्रांनो,आजचा जमाना हा सतत अपडेट राहण्याचा आहे.जसे आपले स्मार्टफोन तुम्ही सतत अपडेट करत असतात.तसेच तुम्हांला पण अपडेट रहावे लागणार आहे.'लोक काय म्हणतील'? हे आता जुने झाले आहे.ते आता अपडेट करुन 'दिल जो कह रहा हे सुनो' हे नवीन अपडेट तुम्हांला तुमच्या सिस्टीम मध्ये इंस्टॉल करुन घ्यावे लागणार आहे.नाहीतर तुम्ही सतत हँग होणार हे नक्की.

    मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे.समाजाने लागू केलेले नियम आपण पाळत असतो.भलेही ते आपल्या हिताचे नसो.'लोक काय म्हणतील' ही भावना आपला पिच्छा सोडत नाही.मी असं केलं तर लोक काय म्हणतील यातून कोणीही सुटत नाही.(अगदी प्रेमविवाह करायचा पण लोक काय म्हणतील?)

    थोडे स्वार्थी व्हा.सवयींचे गुलाम बनू नका.शेवटी एक तंत्र सांगतो,माणसाला गुलामगिरी सहन होत नाही.किंवा कोणी बोललेलं ही सहन होत नाही.कोणी जर म्हटलं हे तुला जमणार नाही तर आपण पेटून उठतो व ती गोष्ट करुन दाखवितो.

    मी माझ्या मनाला नेहमी म्हणतो,'हे तुला जमणार नाही'.मग माझे संपूर्ण शरीर सर्व शक्ती एकवटून बंड करुन उठते(१८५७ सारखे) व ती गोष्ट प्राप्त केल्याशिवाय शांत बसत नाही.

    -- दीपक गायकवाड

      January 5, 2017


  • आंदोलन नव्हे, प्रतियोगिता परीक्षांची तैयारी करा

    जन्मापासून दिल्लीत रहात असलो तरी महाराष्ट्रात जावेच लागतेच. एकदा नागपूरला गेलो असताना सहज नाक्यावर उभ्या काही तरुणांशी चर्चा केली.  बहुतेक मराठी तरुण सरकारी परीक्षांची तैयारी करतच नाही. काही तरुण  कालेजचे शिक्षण पूर्ण झाल्यावर, सरकारी नौकरीचा विचार करतात. फार्म भरल्यानंतर ३-४  महिन्यांच्या अर्धवट तैयारीवर, परीक्षा पास करण्याचे स्वप्न बघतात, जे संभव नाही. मग सुमार बुद्धीचे इतर भाषिक परीक्षा पास होतात आणि हुशार मराठी तरुण, पूर्ण व नियमित तैयारी नसल्यामुळे, असफल होतात.

      August 25, 2018


  • बळीराजाच्या नावानं चांगभलं!

    ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांना विचारले तर ते हेच सांगतील की एखाद्या व्यत्त*ीच्या जीवनातील सर्वाधिक खडतर काळाची लांबी साडेसात वर्षापेक्षा अधिक असू शकत नाही आणि अशा दोन कालखंडातील अंतर किमान बावीस वर्षे असते. शनि या सर्वाधिक पिडादायक ठाहाच्या भ्रमंतीचा आणि मुक्कामाचा हा कालखंड आहे. एका राशीला शनि एका कालखंडात अधिकाधिक साडेसात वर्षे त्रास देऊ शकतो आणि त्या राशीची शनिशी पुन्हा भेट नंतर साडे बाविस वर्षांनीच होते.

      July 16, 2006


  • सोपे उपाय

    आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. म्हणजेच देशाचा कोणताही अधिकृत धर्म नाही. धर्मच नाही म्हटल्यावर ईश्वर किंवा ईश्वरी अवतार या कल्पनाही आपोआपच बाद होतात; परंतु देशाचा एकूण कारभार पाहिला की ईश्वराला नाकारणे खूप कठीण जाते.

      October 1, 2006


  • कुटुंब नियोजन,सरकारी स्टाईल!

    शारीरिक स्वास्थ्याचा थेट संबंध आहार आणि आरोग्यविषयक सवयींशी आहे. आज आमच्या आहारात रासायनिक विषाचे प्रमाण
    इतके वाढले आहे की आजच्या पिढीची एकूणच शारीरिक क्षमता अगदी खालावत गेली आहे. आजारांचे, विकारांचे प्रमाण
    वाढले, रोगप्रतिकारक शत्त*ी कमी झाली आणि त्याचा थेट परिणाम पुरुषांच्या ‘पुरुषत्वावर’ आणि स्त्तियांच्या ‘मातृत्वावर’ झाला.

      June 8, 2008


  • हा जुगार तुम्ही खेळून बघा !

    शेतकरी दरवर्षी जुगार खेळतात. हाती असेल नसेल तितके शेतीत गुंतवतात, पाऊस-पाणी चांगले झाले, पिकांना थोडा बरा भाव मिळाला, तर किमान गुंतविले तितके तरी वापस येण्याची आशा असते, नफा हा प्रकार तर त्यांच्यासाठी बादच आहे आणि निसर्गाने दगा दिला, तर होत्याचे नव्हते होऊन तो भिकेकंगाल होतो. परत पुढच्या वर्षी कर्ज काढून असाच जुगार खेळला जातो, एक दिवस हा जुगार अंगाशी येतो आणि सारे काही सहन होण्यापलीकडे गेले, की तो बिचारा आत्महत्या करतो. एका तरी सरकारी कर्मचाऱ्याने आजपर्यंत पगार कमी मिळतो म्हणून आत्महत्या केली आहे का?

    लोकशाहीत समानता हे एक अत्यंत महत्त्वाचे मूल्य मानले आहे. कोणत्याही आधारावर देशाच्या नागरिकांमध्ये भेदाभेद करता येणार नाही, असे आपले संविधान ठासून सांगते; परंतु समानतेच्या या तत्त्वाला सरकारच अप्रत्यक्षपणे हरताळ फासत आले आहे. दुय्यम नागरिक हे संबोधन देशात अधिकृत नाही, संविधान त्याला मान्यता देत नाही, परंतु अप्रत्यक्षरित्या समाजातील काही घटकांना सरकार आणि व्यवस्थेकडून दुय्यम नागरिकाची वागणूक देण्यात येते आणि त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे शेतकरी. अगदी साधा तर्कसंगत प्रश्न विचारायचा झाल्यास ज्या आधारावर सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, जो की सध्या मूळ वेतनाच्याही दुप्पट झाला आहे, देते त्याच आधारावर अन्य उत्पादक घटकांचा विचार का केला जात नाही? महागाई केवळ कर्मचाऱ्यांसाठीच वाढते का? महागाईचे चटके केवळ कर्मचाऱ्यांनाच बसतात का? साधी तुलना करायची झाल्यास दहा वर्षांपूर्वी कोणत्याही कर्मचाऱ्याचे असलेले एकूण वेतन आणि आजचे एकूण वेतन यातला फरक पाहिला तर वेतनात किमान अडीचपटीने वाढ झाल्याचे दिसते, परंतु दहा वर्षांपूर्वीच्या शेतमालाचा भाव आणि आजचा शेतमालाचा भाव पाहिला तर ही वाढ साधी दीडपटही दिसत नाही. शेतीमालाचा भाव वाढला म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले, असा सोईस्कर समज सगळेच पांढरपेशे लोक करून घेतात, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. एकीकडे शेतमालाचे भाव कासवगतीने वाढत असताना उत्पादनखर्च मात्र सशासारखा उड्या मारत पळत आहे. त्यामुळे शेतमालाच्या भाववाढीचा शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कोणताही लाभ होत नाही, उलट पूर्वीपेक्षा तो अधिक अडचणीत आल्याचे दिसते. ही वस्तुस्थिती स्वीकारून ज्याप्रमाणे आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी सरकार घेते त्याचप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांनाही दिलासा द्यायला हवा. अर्थात दिलासा द्यावा म्हणजे त्याला कर्जमाफी द्यावी, त्याला रोख पैसे द्यावे, असे कुणीही म्हणणार नाही. दिलासा म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला न्याय द्यायला हवा.

    जगातला कोणताही उत्पादक आपला माल उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत विकत नाही, विकूच शकत नाही. त्याला नफा हवा असतो आणि तो मिळविणे त्याचा न्याय्य हक्क आहे. बहुतेक सगळ्या उत्पादनांच्या बाबतीत असे दिसून येते, की प्रत्यक्ष ग्राहकाच्या हाती ते उत्पादन ज्या किमतीत पडते ती किंमत किंवा तो भाव उत्पादन खर्चाच्या किमान दुप्पट तरी असतो. अनेक उत्पादनांच्या बाबतीत तर तो कैकपट अधिक असतो. यावर कुणाचाच आक्षेप असत नाही. साध्या पेट्रोलचा लिटरमागे उत्पादनखर्च फार तर पंधरा रुपये आहे, परंतु ते ग्राहकांना 75 रुपये दराने विकले जाते. ही तफावत पाच पट आहे आणि ती सरकारलाही मान्य आहे, ग्राहकांनाही त्यावर काही आक्षेप नाही. कोणताही व्यवसाय किंवा असा कोणताही व्यवहार जिथे विकणारा आणि घेणारा, उत्पादक आणि ग्राहक असे दोन स्वतंत्र घटक असतात तिथे नफा ही संकल्पना गृहीतच धरलेली असते. उत्पादक माल विकताना त्यातून नफा वसूल करणारच असतो आणि ग्राहकालाही ते माहीत असते, हा बाजाराचा साधा नियम झाला; परंतु जगाच्या पाठीवर या नियमाला अपवाद केवळ भारतातीत शेतकरी आहेत. त्यांचे उत्पादन सरकारच उत्पादनखर्चापेक्षा कमी किमतीत विकत घेते. सरकारकडून टिच्चून महागाई भत्ता वसूल करणारे कर्मचारी, एरवी महागड्या मॉलमध्ये जाऊन उधळपट्टी करणारे धनदांडगे, आपल्या मुला-मुलींना पॉकेटमनी म्हणून दोन-चार हजार महिन्याकाठी देणारे पांढरपेशे हे सगळेच शेतमालाच्या किमती वाढल्या, की लगेच गळा काढून रडू लागतात, `कांद्याने रडविले',`मिरच्यांनी डोळ्यात पाणी आणले' अशा बातम्या येऊ लागतात, महागाई प्रचंड वाढल्याची आवई उठविली जाते, महागाईला राष्ट्रीय संकट संबोधले जाते आणि हा विरोध इतका तीऋा तसेच संघटित असतो, की सरकारला त्यांच्यापुढे झुकावेच लागते. कांद्याचे भाव वाढले आणि सरकार ते नियंत्रणात आणू शकले नाही, या एका कारणामुळे दिल्लीचे सरकार पडल्याची इतिहासात नोंद आहे. कृषी उत्पादने जीवनावश्यक गोष्टींमध्ये मोडतात, त्यामुळे ते सगळ्यांना परवडू शकतील, या दराने विकल्या जावेत, ही सरकारची भूमिका असते, परंतु सरकारचा हा उदारपणा कोल्हापूर लुटून सोलापूरला दान करण्यासारखा आहे. सगळ्यांना परवडणाऱ्या दरात कृषी माल उपलब्ध व्हावा, असे सरकारला वाटत असेल, तर सरकारने तो खर्च उचलावा, त्यासाठी शेतकऱ्यांचा गळा का आवळला जातो? खरे तर परवडणे हा प्रकार खूपच सापेक्ष आहे. सोने, चांदी, पेट्रोल आणि अन्य चैनीच्या वस्तुंची किंमत सातत्याने वाढत असते, परंतु यांच्या किमती वाढल्यामुळे खप कमी झाला, असे कधीच ऐकायला मिळत नाही. लोकांना या गोष्टींची महागाई परवडू शकत असेल, तर थेट पोटाचा ज्यांच्याशी संबंध आहे त्या धान्यांची, भाजीपाला-फळांची महागाई का परवडू शकत नाही? शेवटी लोकांची प्राथमिक गरज काय आहे? सोने, चांदी खाऊन पोट भरणार आहे का? खिशात वीस-पंचवीस हजारांचा महागडा मोबाईल ठेवायचा आणि दुसरीकडे गव्हाचे दर दोन रुपयांनी वाढले, की महागाईच्या नावाने गळे काढायचे, हा कुठला न्याय? ज्या वस्तूंची गरज अधिक त्या वस्तूंसाठी अधिक पैसे मोजावे लागतात किंवा लागायला हवे, हे साधे सूत्र आहे. तुमच्या प्राथमिक गरजा भागवून अधिकचे पैसे उरत असतील, तर त्यातून तुम्ही चैनीच्या वस्तू विकत घेऊ शकता. इथे उलटच होताना दिसते. चैनीच्या वस्तू कितीही महाग असल्या, तरी त्या विनातक्रार खरेदी केल्या जातात आणि जीवनावश्यक वस्तुंची थोडी जरी दरवाढ झाली, की आभाळ कोसळल्यागत आकांत केला जातो.

    शेतकरी शेतात कष्ट करतो आणि देशाचे पोट भरतो, परंतु त्याच्या पोटाचे काय? त्याने उपाशी मरावे आणि इतरांच्या पोटापाण्याची सोय पाहावी, ही अपेक्षा अत्यंत क्रूर तसेच अमानवीय म्हणावी लागेल. शेतकरी दरवर्षी जुगार खेळतात. हाती असेल नसेल तितके शेतीत गुंतवतात, पाऊस-पाणी चांगले झाले, पिकांना थोडा बरा भाव मिळाला, तर किमान गुंतविले तितके तरी वापस येण्याची आशा असते, नफा हा प्रकार तर त्यांच्यासाठी बादच आहे आणि निसर्गाने दगा दिला, तर होत्याचे नव्हते होऊन तो भिकेकंगाल होतो. परत पुढच्या वर्षी कर्ज काढून असाच जुगार खेळला जातो, एक दिवस हा जुगार अंगाशी येतो आणि सारे काही सहन होण्यापलीकडे गेले, की तो बिचारा आत्महत्या करतो. एका तरी सरकारी कर्मचाऱ्याने आजपर्यंत पगार कमी मिळतो म्हणून आत्महत्या केली आहे का? असे एकही उदाहरण नसताना दरवर्षी नियमाने कर्मचाऱ्यांचा पगार वाढविला जातो आणि दर दहा वर्षांनी नवा वेतन आयोग नेमून या नित्याच्या वाढीला अगदी घसघशीत स्वरूप दिले जाते. आयुष्याची कमाई एकदाच डावावर लावण्याचा जुगार शेतकरी दरवर्षी खेळतात, सरकारी कर्मचाऱ्यांनी एकदा तरी ही हिंमत दाखवावी. ही हिंमत नसेल तर कधी काळी चुकून शेतमालाच्या किमती वाढल्या तर ओरड करू नये. खरे तर सरकारने तातडीने ज्या पिकाचा ज्या भागात जितका उत्पादनखर्च आहे त्याच्या दुप्पट त्या पिकाचा हमीभाव निश्चित करावा, ही नफ्याची किमान पातळी आहे. हा भाव निश्चित झाल्यानंतर कुणालाही त्यापेक्षा कमी दरात शेतमाल विकत घेण्याची परवानगी नसावी, तसे झाल्यास तो गंभीर गुन्हा मानल्या जावा आणि शेतकऱ्यांना आपला माल तितक्या किंवा त्यापेक्षा अधिक किमतीत कुणालाही, कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य बहाल करावे. सोबतच सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे या किमान हमीभावात दरवर्षी एका निश्चित दराने वाढ केली जावी आणि ही वाढ कायम त्या वर्षीच्या उत्पादनखर्चापेक्षा अधिक असावी. असे केल्याने काही आभाळ कोसळणार नाही.

    सरकारी कर्मचाऱ्यांचा हक्क त्यांच्या मूळ पगारावर आहे, महागाई भत्ता म्हणून मूळ पगारापेक्षा अधिक पैसा त्यांना दिला जातो तो कशासाठी? महागडे मोबाईल घेण्यासाठी? दुचाकी-चारचाकी गाड्या घेण्यासाठी? मल्टिफ्लेक्समध्ये जाऊन सिनेमे पाहण्यासाठी? हा महागाईभत्ता जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठीच दिला जातो. त्यामुळे उद्या शेतमालाचे भाव दुप्पट वाढले तरी या लोकांनी तक्रार करण्याचे कारण नाही, कारण तेवढा भत्ता सरकार त्यांना देतच आहे. या पद्धतीने शेतीचे अर्थशास्त्र सांभाळले गेले तर त्याचा देशाच्या विकासाला फायदाच होणार आहे. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे आले, की तोदेखील हे अधिकचे पैसे भौतिक सुविधा देणाऱ्या वस्तुंच्या खरेदीसाठी वापरणार, त्यातून कारखानदारी वाढेल, बाजारात तेजी येईल, बेरोजगारीची समस्या बऱ्यापैकी दूर होईल, सरकारकडे महसूल अधिक प्रमाणात जमा होईल, त्यातून अधिक लोकोपयोगी कामे करता येतील आणि सरकारची आर्थिक स्थिती चांगली असेल, तर आपोआपच सरकारी कर्मचाऱ्यांचीही आर्थिक स्थिती चांगली राहील; परंतु त्यासाठी सगळे तूप माझ्या एकट्याच्याच पोळीवर हवे, हा बालिश दुराग्रह या लोकांनी सोडायला हवा. सरकारी कर्मचारी, मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय, श्रीमंत, अतिश्रीमंत या सगळ्यांनी थोडा फार त्याग करण्याची, थोडी झळ सोसण्याची तयारी ठेवायला हवी. त्यातून केवळ शेतकऱ्यांचेच नव्हे, तर सरतेशेवटी या लोकांचेही भले होणार आहे. आपल्यासाठी शेतकरी दरवर्षी जीवघेणा जुगार खेळत असतात, ही हिंमत केवळ तेच दाखवू शकतात, याचे भान इतर सगळ्यांनीच राखायला हवे.

    -- प्रकाश पोहरे
    रविवार, दि. 26 जुलै 2015
    दैनिक देशोन्नती मधील प्रहार या सदरात प्रकाशित
    आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com

      July 26, 2015


  • सावधान श्रीकृष्ण जिवंत आहे

    कृष्ण अंधारात जन्माला. ह्याच प्रवास जसा गूढ आहे, तशी ह्याची शिकवणही गूढ आहे. ती नीट समजून घ्यावी लागते. कृष्णाला समजावून घ्यायचं तर जरा सावध राहायला हवं. त्याला सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत निरेन आपटे!!
    एक बाप मुलाला म्हणाला, ” आज मी तुला जीवनातील फार मोठा धडा शिकवणार आहे. चल, भिंतीवर चढ

      March 5, 2026


  • पाणी प्रदूषण : मी आणि तुम्ही काय करू करतो ?

    आजकाल मी हिरवे निशाण पाहूनच पाण्यासोबत वापरणारे सर्व पदार्थ घेतो. हे छोटे-छोटे उपाय करून आपण किती तरी कोटी पाणी रोज जास्त प्रदूषित होण्यापासून वाचवू शकतो. या शिवाय रोग-राई पासून हि स्वत:ला वाचवू शकतो. याचाच अर्थ एक तीर दोन निशाणे.

      March 19, 2018


  • बिगरशेती कर – जिसके हाथ मे लाठी उसकी भैस!

    ठाण्यामध्ये बिगरशेती कर (Non Agriculture tax) ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत वसूल होतो आहे…हाच कर मुंबई, ठाणे सारख्या मोठ्या शहरात घेतला जाऊ नये या साठी भारतीय जनता पक्ष जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा आघाडी सरकारला धारेवर धरत होता.

      December 15, 2017