दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, परंतु स्वत:च्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही, अशा स्वरूपाचा एक वाक्प्रचार आपल्याकडे प्रचलित आहे. आपल्या सरकारला, राजकारण्यांना हा वाक्प्रचार चपखलपणे लागू पडतो. स्वत:च्या बुडाखाली काय जळत आहे याची त्यांना अजिबात कल्पना नाही.
October 29, 2006
काही पुस्तके वाचायला हवीत. पुस्तके प्रेरणा देतात. संघर्षात जगायला शिकवतात. संघर्ष माणसाला घडवतं. अपयशाच्या रस्त्यामधूनच एक दिवस यशाचा रस्ता सापडतो. नैराश्याचे ढगसुद्धा काही काळ अवकाश व्यापून राहातात; पण तेसुद्धा कधीतरी बरसतातच आणि बरसल्यावर अंकुर सोबत घेऊनच आसमंत उजळून टाकतात. पुस्तक आदर्शाचा आरसा असतो. आरशात पाहून स्वत:चं मूल्यमापन करायचं असतं. स्वतःची प्रतिमा सुधारायची असते. आरसा केवळ अस्तित्वच दाखवत नाही, तर व्यक्तित्वही दाखवतो. सामान्य व्यक्तीच्या वर्तनातही असामान्य जीवन असतं. आयुष्य निरनिराळे पदर आपल्याला उलगडून दाखवते व आपण घडतो. प्रतिकूल परिस्थितीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी ३००० स्त्रियांचे जटानिर्मूलन केले. त्या देवदासी म्हणून वेश्या व्यवसाय करायच्या. त्या आपण देवाला वाहिलेल्या आहोत म्हणून जटा काढतच नसत. दोनदा अपयश आल्यानंतरही सुधा मूर्ती मागे हटल्या नाहीत. तिसऱ्यांदा त्यांना समजावण्यात यश आले व हळूहळू देवदासींच्या प्रथेवरील देवदासींचा विश्वास उडून सत्य त्यांना कळू लागले.
June 3, 2026
माणसाची खरी परीक्षा संकटाच्या काळात होत असते. त्याचा खरा कस तेव्हाच लागत असतो. खरे तर माणसाची खरी परीक्षा म्हणण्यापेक्षा त्याची खरी ओळख म्हणणे अधिक संयुत्ति*क ठरेल.
May 6, 2007
इस्राएल आणि भारत – एक तुलना !!! खूप खूप शिकण्यासारखे आहे आपल्याला त्यांच्याकडून…..
July 16, 2017
राळेगणसिद्धीचे समाजसेवक अण्णा हजारे आतां सगळ्या देशाचे गांधीवादी युगपुरुष झाले आहेत . ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत आणि त्यांचा लढा आता सगळ्या देशाचा झालाआहे.
August 19, 2011
समाजात वावरताना आपल्याला बरेचदा असे आढळून येते की, काही लोकांमध्ये प्रचंड क्षमता असूनही ते आपल्या क्षमतेला योग्य न्याय देऊ न शकल्याने गरिबीत किंवा अडचणीत दिवस काढत असतात, तर काही लोकांच्या वकुबाला बऱ्याच मर्यादा असूनही ते आपल्या क्षमतांचा योग्य उपयोग करून यशस्वी जीवन जगत असतात. विचारसरणीतील किंवा दृठिकोनातील फरकामुळेच हा भेद निर्माण झालेला असतो. ‘ग्लास अर्धा भरला आहे’ आणि ‘ग्लास अर्धा रिकामा आहे’ या दोन वैचारिक दृठिकोनांत सर्वसामान्य लोकांची विभागणी करता येईल.
March 26, 2006
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुम्हाला ते जगता यायला हवं. केवळ जगणं महत्त्वाचं नाही तर जगताना आस्वाद घेता यायला हवा. जगायला जनावरं सुद्धा जगतात पण आपल्या जगण्यात एखादी गोष्ट नीट समजून घेतली तर आनंदामध्ये कित्येक पटीने वाढ होते. केवळ गुणांची टक्केवारी करिअर, मोबाईल टास्क असल्या गोष्टीमुळे सगळ्यांचे गुंतणं वाढलं आहे इतकं की स्वतःचे भान त्यांना राहत नाही. होण्यासाठी व आनंद घेण्यासाठी स्वतःचे भान हवंच. स्वतःचं आयुष्य संपवण्या इतपत भान हरवलं तर आयुष्य आनंदी व सुंदर कसं लागेल..
June 9, 2026
प्रकाशन दिनांक :- 02/05/2004 ‘
निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांनी ‘दृष्टीपत्र’ (व्हिजन डॉक्युमेंट) प्रकाशित केले. या दृष्टीपत्राच्या माध्यमातून देशाच्या विकासाचे आकर्षक चित्र या पक्षांनी चितारले असले तरी या चित्रात रंग भरण्याची क्षमता आपल्याकडे आहे की नाही, हा चिंतनाचा प्रश्न ठरतो. राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणुकीच्या काळात बऱ्याच घोषणा करीत असतात.
May 2, 2004

नुकतीच अकोल्यात शिवधर्म परिषद पार पडली. हिंदूधर्माच्या पाखंडी जोखडातून मुक्त होऊन बहुजनांना स्वातंत्र्यांच्या अवकाशात विहरण्याची संधी मिळावी यासाठी शिवधर्म स्थापन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. शिवधर्माच्या स्थापनेचा मुहूर्त थोडा लांब असला तरी त्यादृष्टीने समाजाची वैचारिक आणि मानसिक तयारी अशा धर्मपरिषदांद्वारे करण्याचा प्रयत्न मराठा सेवा संघाकडून सुरु झाला आहे. जाचक रुढी-परंपरांच्या माध्यमातून हिंदू धर्म केवळ मुठभरांच्या हातातले बाहुले बनला असून, मोठ्या संख्येने असलेल्या बहुजनांना विकासाचा वावच या मुठभरांनी मिळू दिला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
— प्रकाश पोहरे
October 20, 2002
हिंदू राष्ट्राच्या वैभवशाली ध्वजा तुला विनम्र अभिवादन! कारण तू आमच्या अनेक शब्दातील भावनांची स्फुर्ती आहेस. तू आमच्या अनेक अव्यक्त कल्पनांची मुर्ती आहेस. आमच्या सहस्त्रावधी अस्फुट आकांक्षांची प्रतिकृती म्हणजे तुझे स्वरुप होय. या स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिनी तुझ्यासमोर नतमस्तक होताना आमच्या हृदयात अनेक भावनांचे तरंग गर्दी करुन सोडीत आहेत.
August 15, 2006
Copyright © 2025 | Marathisrushti