(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • महाराष्ट्र फिल्म कंपनी निर्मिति संस्थेची स्थापना

    इंग्लंडमध्ये १९२५ साली भरलेल्या वेम्बले येथील चित्रपट-प्रदर्शनात बाबूराव पेंटर दिग्दर्शित कल्याण खजिना व सती पद्मिनी हे दोन भारताचे प्रातिनिधिक चित्रपट म्हणून दाखविण्यात आले होते आणि त्यांबद्दल त्यांना प्रशस्तिपत्र आणि पदकही मिळाले होते.

      December 1, 2021


  • मॅडम सी.जे. वॉकर – अमेरिकेतील पहिली कृष्णवर्णीय उद्योजिका

    मॅडम सी.जे. वॉकर ही आपल्या कंपनीची एकमेव मालक आणि अध्यक्षही होती. तिच्या उद्योगजगताचे साम्राज्यच तिने वाढवून ठेवलेले होते. या साम्राज्यात कारखाना, वॉकर कॉलेज ऑफ हेअर कल्चर आणि ‘मेल ऑर्डर बिझिनेस’ वा पोस्टातर्फे व्यवसाय यांचा समावेश होता. संपूर्ण अमेरिकेत तिचे एजंटस् सौंदर्यप्रसाधनांचे प्रात्यक्षिक दाखवीत विक्री करीत फिरत होते.

      April 8, 2023


  • चिकू

    चिकू मुख्यत्वे करून महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या प्रदेशात होतो. पूर्व महाराष्ट्रात फक्त ठाणे, रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारपट्टीत लागवड करतात. वास्तविक पाहता चिकूचे झाड अमेरिकेतून आपल्याकडे आलेले आहे. आपल्याकडे झाडाचा उपयोग केवळ फळासाठी करतात पण काही देशात त्यांच्या पांढऱ्या शुभ्र व घट्ट चिकाचा उपयोग च्युईंगमसाठी करतात.

      December 8, 2023


  • अर्थसंकल्पासंदर्भातील अशाच काही गोष्टी

    १९९९ सालापूर्वी संध्याकाळी ५ वाजता अर्थसंकल्प मांडला जायचा. इंग्रजांनी भारतासाठी अर्थसंकल्प मांडण्याची सुरूवात केली, त्यावेळी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ संध्याकाळी ५ वाजताची ठरवण्यात आली होती. मात्र १९९९ मध्ये एनडीए सरकारमधील तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थसंकल्प मांडण्याची वेळ बदलून सकाळी ११ वाजताची केली. १९९२ पासून भारतात अर्थसंकल्प टीव्हीवर प्रक्षेपित करण्यात येऊ लागला.

      February 11, 2018


  • किचन क्लिनीक – तोंडली

    किचन क्लिनीक – तोंडली

    हि भाजी तशी आपल्या सर्वांच्या परिचयाची व ब-याच लोकांना आवडणारी.तोंडलीची चटणी,भाजी,उसळ,लोणचे असे अनेक प्रकार करून हिचा आस्वाद आपण सगळेजण घेत असतो.दिसायला छोटी असली तरी हि भयंकर रुचकर भाजी आहे.

    हि तोंडली वेलीला लागते.अर्थात हे त्या वेलींचे फळ होय.हि कडू व गोड अशा दोन प्रकारामध्ये उपलब्ध असते त्यातील कडू हि औषधात वापरतात तर गोड तोंडली स्वयंपाकामध्ये वापरतात.

    कच्ची तोंडली हि हिरवी असतात तर पिकलेले तोंडली हि आतून लाल असते.जसे ह्याचा वापर आपण स्वयंपाकामध्ये करतो तसाच ह्याचा उपयोग घरगुती उपचारांमध्ये देखील होतो.

    पिकलेले तोंडले हे चवीला आंबट व उष्ण असते व ते वात व कफ कमी करते व पित्त वाढविते.तर कच्चे तोंडले हे चवीला गोड तुरट असते व ते थंड असून शरीरातील कफ व पित्त कमी करते व वात दोष वाढविते.

    आता ह्याचे घरगुती औषधी उपयोग पाहूयात:

    १)तोंड आले असता कच्चे तोंडले चावून खावे.

    २)बाळंतिणीचे दूध वाढायला तिला तोंडली उकडून गरम मसाला न वापरतां भाजी करून द्यावी.

    ३)अम्लपित्तामध्ये तोंडलीची कोवळी भाजी उकडून धणे,बडीशेप व सुंठ घालून खावी.

    ४)खोकला येत असल्यास ४ तोंडली ४ कप पाण्यात उकळावी व ते पाणी १ कप करावे व त्यात १/२ चमचा भाजलेला ओवा,१/२ चमचा हळद व १/४ चमचा काळी मिरी पूड घालून ते पाणी प्यावे.

    ५)तोंडाला चव नसेल व जीभेवर देखील मळ साचला असेल तेव्हा कच्ची तोंडली व मीठ हे मिश्रण चावून रस व चोथा थुंकावा.

    ६)मधुमेह असणा-या व्यक्तिंनी तोंडलीची भाजी हळदींची फोडणी देऊन खावी.

    तोंडली खाण्याचा अतिरेक केल्यास पोटात वात धरतो व संडासला खडे होतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      November 10, 2016


  • ब्रोकोली

    ब्रोकोलीचा जन्म साधारण दोन हजार वर्षापूर्वी इटलीमध्ये झाला. ब्रोकोली ही हिरव्या रंगाची असते व आपल्या फुलकोबीप्रमाणे दिसते. रोम संस्थानिक ब्रोकोली लावत असत. ब्रोकोलीनंतर इटलीमधून युरोपात आली. व नंतर अमेरिकेकडे वळली. अमेरिकेत गेल्यावर डॉ.जे.टी.स्मिथ यांनी ब्रोकोलीचे संपूर्ण पृथ्थकरण केले व ब्रोकोली ही अतिशय उपयुक्त आहे असे जाहीर केले.

      January 3, 2024


  • चार’ची गाथा …

    आज ४ तारिख... चार (४) या आकड्याची आणखी गंमत बघा.....

    थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे !

    चारची खरी बाजू ' चार ' दिशेत
    आहे !

    ' चार ' खांबांशिवाय घर बांधता येत नाही.

    ' चार ' गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही.

    ' चार ' चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर ' चार ' बोटे उमटल्याशिवाय राहत नाहीत.

    ' चार ' शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली ' चार ' आवाज काढण्या सारखेच असते.

    चौघे म्हणजे जणू ' चार ' वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात.

    ' चार 'चा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो.

    "चार"च्या 'वर्गा'स पुन्हा "चार"ने गुणले की जगातल्या सर्वात 'बुद्धि'मान खेळातले चौसष्ट घरांचे 'बळ' मिळते !

    यांची टीका ही ' चौफेर ' असते.
    यांचे फटके म्हणजे ' चौकार ' असतात !

    चारचे सामर्थ्य देवीच्या ' चार ' भुजांसारखे असते अन पावित्र गाईच्या ' चार ' पावलांसारखे असते...

    ज्या विहिरींचे पाणी शेतकरी पिकाला पाजतो ती सुद्धा कमीत कमी ' चार ' परस खोल असावीच लागते.

    ' चार ' वाफे असल्याशिवाय मातीत बांध घालता येत नाहीत.

    ' चार ' पाकळ्या असल्याशिवाय फुलाला शोभा येत नाही !

    जगातल्या ' चौघां 'चेही असेच असते. यांनी ' चार ' शिव्या दिल्या शिवाय जगाला शहाणपण सुचत नाही.

    अन ' चार ' गोष्टी हिताच्या सांगितल्याशिवाय सुख दुःखे उमजत नाहीत.

    ज्या घरात आपण राहतो तेदेखील ' चौसोपी ' असल्याशिवाय त्याला रुबाब येत नाही !

    चौसोपी घराबाहेर ' चारचाकी ' असली की शान अधिक वाढते !

    ' चार 'चौघांना विचारल्याशिवाय खरे सत्य समजत नसते.

    ' चार ' लोकांपासून ' चार ' हात लांब राहिले तर खरे मित्रही कळत नाहीत !

    युगे देखील " चार "झाली आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कलीयुग ; यावरून ' चौघां 'चा महिमा जाणावा.

    स्वर जरी सात असले तरी सामान्यतः बोलताना ' सारेगम ' कळले म्हणजे संगीत आले असं म्हटले जाते !

    आपल्या जीवनाचे आधार देखील ' चार 'च आहेत - दोन हात अन दोन पाय !

    वर्ण देखील ' चार ' आहेत. ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य नि शूद्र.

    लीप वर्ष देखील ' चार ' वर्षानी येते !

    जमीन सुद्धा ' चौरस 'च शुभ समजली जाते.

    माणूस हुशार झाला की त्याला ' चौकस ' बुद्धीचा समजलं जातं ...

    चारोळीत देखील महाकाव्याचा अर्थ लिहिता येतो, चारोळे खाल्ले की तब्येत सुधारते !

    ' चार ' ढांगा चालले की मातीचा अंदाज येतो.

    ' चार ' कडवी वाचली की कवितेची गोडी लागते.

    ' चार ' संवाद ऐकले की नाटके पहावीशी वाटतात.

    ' चार ' घास खाल्ले की पोट भरल्यासारखे वाटते.

    ' चार ' घटका लवंडले की आराम मिळाल्या सारखे वाटते.

    ' चार ' वाती प्रज्वलित केल्या की मनातला अन घरातला अंधार दूर होतो.

    ' चार ' पुस्तके वाचल्याशिवाय ज्ञानाची ओढ लागत नाही.

    मंगलकार्य साजरे करताना सनई बरोबर ' चौ 'घडे वाजल्याशिवाय रंगत कसली ती येत नाही !!

    ' चार ' वाईट जर एकत्र आले तर मात्र ती चांडाळ 'चौकडी' होते.

    ' चार ' चांगले लोक एकत्र आले तर मात्र इतिहास बदलतो.

    इतकेच कशाला चितेवर ' चार ' लाकडे ठेवल्याशिवाय चिता पूर्ण होत नाही.

    ' चौघां 'च्या खांद्यावर गेल्याशिवाय जीवनातला प्रवास पूर्ण होत नाही.

    आयुष्याच्या अंती मातीत चिरनिद्रा घेताना सुद्धा ' चार ' फुट खोल खांदावेच लागते , त्याशिवाय शीणलेल्या जीवाला खरा आराम मिळत नाही !

    सरते शेवटी असं म्हणेन की जीवनात जीवाला जीव लावणारे
    ' चार ' मित्र असल्याशिवाय जीवनाचा अर्थ उमगणार नाही, उमजणार नाही !!

      September 4, 2016


  • आहारसार भाग ४

    या प्रश्नाचे नेमकेपणाने उत्तर देणे कठीण आहे. दूष्यम् देशम् बलम् कालम् या सूत्रानुसार किमान दहा गोष्टींचा विचार, किमान दहा वेळा तरी करावा लागेल, तेव्हा कुठे हे “परम्युटेशन काॅम्बीनेशन ” थोडेफार जुळेल. हे दहा घटक जुळतील, असा ग्रंथोक्त आहार, एका घरात सुद्धा घेणे, असे जेवण रोज बनवणे शक्य होणारे नाही.

      August 22, 2016


  • महाराष्ट्र दिनानिमित्त संकल्प करुया मराठीतूनच इ-मेल पाठवण्याचा मराठीत लिहिण्याचा

    आपल्यापैकी कितीजणांच्या संगणकावर मराठीत काम करण्याची सोय आहे? किती जण मराठीत इ-मेल आणि कागदावरील पत्रव्यवहार करतात? कितीजण फेसबुकवर मराठीत लिहितात? मराठी माणसाने दुसर्‍या मराठी माणसाला इ-मेल फक्त मराठीतच पाठवावे असा संकल्प या महाराष्ट्रदिनी करायला काय हरकत आहे? फेसबुकवर लिहिताना शक्यतो मराठीतच लिहायचे असाही संकल्प करायला काय हरकत आहे?

      April 30, 2011


  • सूर्यनमस्कार : व्यस्त व्यक्तींसाठी व्यायाम प्रकार

    १२ मिनिटात २८८ योगासने.

    सुर्यनमस्काराच्या एका फेरीत १२ योगासने होतात. दोन सूर्यनमस्कारांचा संच म्हणजे एक संपूर्ण सूर्यनमस्कार. पहिल्या फेरीत शरीराची उजवी बाजू ताणणे आणि दुसऱ्या फेरी मध्ये डाव्या बाजूला ताण देणे. म्हणजेच १२ ते १५ मिनिटामध्ये एका सूर्यनमस्काराच्या दोन संचामध्ये १२-१२ योगासनांचे १२ सूर्यनमस्कार, म्हणजेच २८८ योगासने.

    सूर्यनमस्कार : कॅलरीज (उष्मांक) घटण्याचा हिशोब.

    एका सुर्यनमस्काराच्या फेरीमध्ये सर्वसामान्य व्यक्तींच्या १३.९० कॅलरीज जळतात. हळू-हळू १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प करा.संकल्पापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही सडपातळ, सुडौल झालेले असाल.

    ३० मिनीटांच्या व्यायामानंतरची कॅलरी मधील घट

    ३० मिनिटांच्या विविध व्यायाम प्रकारामध्ये कॅलरीज घटण्याचा तुलनात्मक अभ्यास:

    वेट लिफ्टिंग= १९९ कॅलरीज , टेनिस= २३२ कॅलरीज, बास्केट बॉल= २६५ कॅलरीज,

    बीच व्हॉली बॉल= २६५ कॅलरीज, फुट बॉल=२९८ कॅलरीज, जलद सायकलिंग = ३३१ कॅलरीज,
    रॉक क्लाईबींग = ३६४ कॅलरीज, धावणे= ४१४ कॅलरीज, सूर्यनमस्कार= ४१७ कॅलरीज.

    वेळ अपुरा आहे? या कमी वेळेत तंदुरुस्त कसे रहावे- जाणून घ्यायचे आहे..?
    ‘सूर्यनमस्काराच्या दुनियेमध्ये आपले हार्दीक स्वागत.’
    कामात अति व्यस्त असणाऱ्या व्यक्तींसाठी, ज्यांची तक्रार असते की, ‘ योगासने करण्यासाठी तेवढा वेळ नसतो,’ अशांसाठी सूर्यनमस्कार अतिउत्तम आहेत. सकाळी- सकाळी जलद गतीने कमीत कमीत बारा सूर्यनमस्कार केल्याने हृदयाला बळकटी प्राप्त होते, तर संथ गतीने केल्याने स्नायू बळकट बनून मन शांत स्थिर होते. शरीर लवचिक बनल्याचा आनंद मिळतो.

    इतर व्यायाम प्रकारापेक्षा सूर्यनमस्कार, सुरवातीचे शरीर सैल करणारे व्यायाम आणि योगासने यांच्यामधील दुवा बनू शकतात. म्हणून सकाळी-सकाळी शरीर सैलावणारे व्यायाम प्रकार झाल्यावर काही सूर्य नमस्कार केल्यामुळे शरीर लवचिक होऊन नंतरची योगासने करण्यासाठी शरीर तयार होते.

    सूर्यनमस्कार तुमच्या साठी लाभदायक का आहे?

    सुर्यनमस्काराचे फक्त वरील लाभच नाहीत तर आणखी बरेच लाभ होतात शरीराच्या सर्व अवयवांना हृदय, यकृत, पचनसंस्था, छाती, अगदी पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत या सूर्यनमस्कारा मध्ये असणाऱ्या योगासनांचा उत्तम परिणाम होतो. रक्त शुद्ध होऊन रक्ताभिसरण सुधारल्याने पोट, आतडी आणि मज्जासंस्थाचे कार्य सुधारते. सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावामुळे वात, पित्त आणि कफ, ज्यांच्यावर आपले आरोग्य अवलंबून आहे, त्यांच्यात समतोल प्राप्त होण्यास मदत होते.सुर्य नमस्काराचे इतर लाभ

    सूर्यनमस्कार: योगाद्वारे सूर्याप्रति कृतज्ञता

    ‘या ग्रहावरील समस्त जीव सृष्टीचे अस्तित्व सूर्यामुळेच आहे’ हा शाळकरी धडा लक्षात आहे ना? या सोनेरी, तळपत्या ताऱ्याची आपल्या जीवनातील अपरिहार्य भूमिका आपण जाणतो - ज्याच्यामुळे अंधकार दूर होऊन जीवन फुलू लागते. यामुळे आत्ता आपले कर्तव्य आहे - या ताऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे. सूर्यनमस्कार आपल्याला ती संधी प्राप्त करून देतात. सूर्य नमस्काराच्या माध्यमातून संपूर्ण शरीराला व्यायाम देताना, त्या जीवन स्त्रोताचा ‘सूर्याचा’ आपण सन्मान करू शकतो.

    सूर्यनमस्कार करण्यासाठी उतावळे आहात नां. सूर्य नमस्कार कसे करावेत यावरील सध्या सरळ आणि सोप्या सूचनांचे पालन करा. आपल्या योगा चटई घ्या, प्रसन्न चेहऱ्याने सुर्यनमस्कारातील एकेक योगासनांचा आनंद घ्या. सूर्यनमस्कार आणखी पवित्र आणि आशिर्वचन बनण्यासाठी सुर्याप्रतीची कृतज्ञता त्यामध्ये अनुभवा. ही निरोगी शरीर आणि स्वस्थ मन प्राप्त करण्याची पहिली पायरी आहे.

    सुषमा मोहिते

    आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन

      March 4, 2017