(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • त्वचाविकार : तीळ, मास, चामखीळ, लांछन

    दिवसेंदिवस छोटय़ा छोटय़ा त्वचाविकारांनी पछाडलेले रुग्ण मोठय़ा संख्येने; त्वचा रोग तज्ज्ञांकडे जातात. डॉक्ट रवैद्यांकडेही येतात. काळे, वेदनारहित व तिळांसारखे जे त्वचेवर डाग उठतात त्यांस ‘तिलकालक’ म्हणतात. तेच जाड व उंच असल्यास त्यांस ‘मस’ म्हणतात. मसापेक्षांहि उंच, पांढरे वा काळे असतात त्यास ‘चामखीळ’ म्हणतात. जन्मत: काळा/पांढरा व त्वचेबरोबर जो वाटोळा डाग असतो त्यास ‘लांछन’ म्हणतात.
    या सगळ्या क्षुल्लक त्वचाविकारात खाण्यापिण्याच्या बंधनांची मदत खूपच मोलाची व खर्चाच्या दृष्टीने अल्पमोलाची ठरते. मीठ, आंबट, खारट पदार्थ, लोणची, पापड, शिळे अन्न, फास्टफूड, बेकरीचे पदार्थ, मांसाहार, मिसळभाज्या, दही, रसम सांबार, इडलीडोसा, ढोकळा, सॉस, व्हिनेगार, शेव, भजी, चिवडा आदी टाळावेत. जेवण साधे फिके, शक्यतो उकडलेल्या भाज्या, ज्वारी, मूग असे असावे. असे पथ्यापथ्य पाळल्यामुळे हे क्षुद्ररोग वाढत नाहीत. लवकर आटोक्यात येतात. तीळ या विकाराची कोणी कात्री देऊ शकत नाही. तीळ आपोआप येतात, आपोआप जातात. औषधोपचाराशिवायही जातात पण ज्यांचे तीळ खूप मोठे असतात त्यांनी त्या जागेचा वर्ण सुधारण्याकरिता एलादितेल थेंबथेंब दिवसातून ४-५ वेळा लावावे. तीळांची संख्या वाढत असल्यास प्रवाळ, कामदुधा, उपळसरी सकाळ संध्याकाळ; त्रिफळाचुर्ण रात्री अशी औषधे घ्यावी. मस खूप लहान असल्यास दुर्लक्ष करावे. सर्जरस किंवा राळेचे मलम घासून लावल्याने मस बहुधा ८-१५ दिवसात बरा होतो. मस आकाराने मोठा असल्यास घोडय़ाचा केस करकचून बांधावा. मस निश्चयाने गळून पडतो. चामखीळ विकाराकरिता सर्जरस मलम लावणे हा हुकमी उपाय! चामखीळीचा आकार मोठा असल्यास आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळ अशी औषधे घ्यावी. लांछन विकारात क्षीरिवृक्षांच्या साली, कोंब दूधात वाटून लेप करावा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :-वैद्य प. य. वैद्य खडीवाले

      February 7, 2017


  • मेरा भारत महान?

    देश स्वतंत्र होऊन आज ७१ वर्ष पूर्ण झाली. सन १९४७ साली देश स्वतंत्र होताना आपण देशाची अखंडता आणि विविधतामे एकता राखण्याची शपथ घेतली असेल किंवा तसा संकल्प सोडला असेल. तसं आपण दरवर्षी ही शपथ घेतोच. आज पुन्हा ७२व्यांदा तशी शपथ घेऊन संकल्प सोडू आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून आपापल्या जाती-धर्माच्या संम्मेलनात, महासंम्मेलनात, मोर्चात, सभांत किंवा अगदी गेला बाजार ज्ञातीवर्धक मंडळाच्या वळचणीला जाऊन कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ याची हिरीरिने चर्चा करु.

      August 16, 2018


  • सीकेपी समाज काल- आज आणि उद्या

    शक्ती, युक्ती, बुद्धी आणि कणखर मनगटातील दमदार समशेरीबरोबरच या ज्ञातीच्या लेखन चातुर्याच्या अनेक बाबींबरोबरच समयसूचक योग्य व कमी लेखात खोचक, बोचक आणि भावनात्मक लिखाणशैलीचे वैशिष्ट्य म्हणजे सी. के. पी. ज्ञाती असे समीकरण इतिहास पूर्व काळापासून ऐकायला व वाचायला मिळते. परंतु आज आपला समाज नेमका कुठे आहे? राजकीय किंवा सामाजीक समीकरणात त्याचे नेमके स्थान काय?

      August 18, 2024


  • कोकण मराठी साहित्य परिषदेचा वर्धापनदिन

    कोकण मराठी साहित्य परिषदेचा वर्धापनदिन

    ठाणे जिल्हयात यापैकी ६ शाखा कार्यरत आहेत. कोमसापच्या सर्व शाखांतर्फे दरवर्षी स्थापना दिवस विविध कार्यक्रम करून साजरा केला जातो.
    कोकणातील आवाज,लेखणी महाराष्ट्रभर पोचवण्यासाठी असलेलं हे व्यासपीठ..

      March 24, 2022


  • चेहरा

    मे महिना म्हणजे सुट्टीचा आणि धमाल करण्याचा महिना. तुमच्या या धमाल आनंदात भर घालण्यासाठी आम्ही सादर करीत आहोत एक विज्ञानकथा. विज्ञान, तंत्रज्ञान, गुन्हेगारी आणि भावना यांचे आगळेच रसायन असणारी ही कथा आहे. आम्हांला खात्री आहे की, ती तुम्हांला नक्की आवडेल!

      October 25, 2023


  • चित्रपट संस्कृतीचे बदलते रूप

    चित्रपटसंस्कृती ही सातत्याने विकसित होणारी प्रक्रिया आहे. चित्रपट क्षेत्रातील बदल, त्यातील नवे प्रवाह, नवे तंत्रज्ञान, नवे व्यासपीठ या साऱ्याचा मोठा परिणाम चित्रपट संस्कृतीवर होत असतो. तो यापूर्वी होत आला आहे आणि यापुढेही होत राहील. चित्रपटसंस्कृतीतील महत्त्वाच्या बदलांचे माझ्या चित्रपटांच्या पार्श्वभूमीवर केलेले हे विचारमंथन…

      January 23, 2024


  • जागतिक साडी दिवस

    साडी हा असा पोषाख आहे जो कुठल्याही प्रसंगी परिधान केला तरी चालतो. म्हणूनच वेस्टर्न कल्चरचा कितीही प्रभाव पडला तरी स्त्रियांच्या मनातील आणि कपाटातील आपले स्थान साडीने अजूनही कायम ठेवले आहे. २१ डिसेंबर हा आता जागतिक साडी दिवस म्हणून साजरा केला जातो. 

      December 27, 2018


  • शिवपुर्वकाळ

    शिवचरित्र जाणून घ्यायचे असेल तर शिवपुर्वकालीन देशस्थिती ज्ञात असणे आवश्यक वाटते.

    शिवाजीराजांनी इतर साम्राज्यापेक्षा स्वराज्यात जनतेला वेगळं असं काय दिलं? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी शिवपूर्वकाळाचा आढावा घ्यावा लागतो. शिवपूर्वकालीन हिंदुस्थानावर नजर टाकली तर बहुतांश भागांवर इस्लामचे आधिपत्य झाले होते हे लक्षात येईल. इथले सत्ताधीश स्वतःला इस्लामचे अनुयायी म्हणवत. अशा या सत्ताधीशांविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये असंतोषाची भावना होती. या यावनी सत्तेचे स्वरूप हे प्रामुख्याने ' लष्करी ' होते. इथे आलेले इस्लामी लोक हे मूळचे अरबी , इस्लामचा संस्थापक मुहम्मद पैंगंबर इ.स.६६२ मध्ये मरण पावला. तोपर्यंत इस्लाम धर्मप्रसाराला वेगळा रंग चढला होता. मग धर्मवेडाने पेटलेल्या या अरबांनी पैंगंबरच्या मृत्युनंतर जगभर आक्रमणे करून सत्ता प्रस्थापित करण्यास सुरवात केली. या आक्रमणाची एक लाट आठव्या शतकाच्या मध्यात इराण ओलांडून भारत व चीन पर्यंत पोहोचली.

    इस्लामी दाहकतेच पहिला संबंध आला तो इ.स. ७११ मध्ये मुहम्मद बिन कासीमच्या वेळी, यावेळी सिंध प्रांताचा चा हिंदु राजा 'दाहीर' याचा पराभव झाला.या स्वारीची जी वर्णने उपलब्ध आहेत त्यावरून हजारोंच्या कत्तली करणे,गुलाम म्हणून जनतेला कैद करणे,स्त्रियांचा छळ अशा प्रकारे विध्वंस माजवला.सुदैवाने हा मुहम्मद कासीम सिंध प्रांत ओलांडून दक्षिणेकडे आला नसल्याने त्याची दाहकता भारतातील इतर भागांना पोहोचली नाही. सुदैवाने या स्वारीनंतर हिंदुस्थान सुमारे ३०० वर्ष इस्लामी आक्रमणांपासून मुक्त राहीला. पण त्यानंतर इस्लामी आक्रमणे येतच गेली त्यांचा थोडक्यात आढावा घेऊ .

    महमुद गझनवी (इ.स. ९९८-१००२) - याने भारतावर एकूण १७ स्वाऱ्या केल्या त्यात प्रचंड मानवी संहार आणि लुट , मंदिरे उध्वस्त केली,स्त्रीयांचा अमानुष छळ केला.गुजरात मधील भव्य आणि प्रसिद्ध सोमनाथ मंदिर पाडले.

    मुहम्मद घोरी (इ.स.११७५-१२०६) - नुसती लुट न करता इथेच सत्ता स्थापन करावी या उद्देशाने घोरी भारतावर आला, याने इस्लामचा पाया घालुन दिल्लीस सूलतानशाहीची स्थापना केली, यानंतर तब्बल एक लाख लोकांची हत्या करून दबदबा निर्माण केला.

    अल्लाउद्दीन खल्जी - (इ.स.१3१३-१३१६) : खल्जी घराणे भारतात आले त्यावेळी महाराष्ट्रात देवगिरीचे यादव राज्य करत होते. खल्जी वंशातल्या या अल्लाउद्दिनने विचित्र कायदे केले -हिंदुनी घोड्यावर बसू नये, हत्यार बाळगु नये, मौल्यावान पोषाख घालु नये असे कायदे केले, मूर्तीपुजेस बंदी , जिझिया कर लादून अमानुष छळ केला.

    मुहम्मद तुघलक - (इ.स.१३२५-१३५१) हा तुघलक विक्षिप्त म्हणून प्रसिद्धच होता, याने जनतेवर एवढे कर बसवले कि गरीब जनता पार धुळीस मिळाली, श्रीमंत बंड करून उठले. दुष्काळी परिस्थितीत गावच्या गाव ओसाड झाली.

    तैमुर -(इ.स.१३७२-१४०५) दिल्लीच्या लढाईत तुघ्लूकाचा पराभाव झाला आणि दिल्ली शहर तैमुरच्या हाती सापडले, उपलब्ध वर्णनानुसार सतत पाच दिवस त्याने दिल्ली रक्ताने धुवून काढली.

    बाबर -(इ.स. १५२६ -१५३०) मुघल राजवाटीची मूळ सुरवात बाबरच्या भारत स्वारी पासून झाली.यानेही जनतेचे अतोनात हाल करत काफिरांच्या(हिंदूंच्या) शिरांचे पहाडीवर मनोरे रचून विजयोत्सव केला, स्त्रियांचा छळ, तसेच मंदिरे पडून तिथे मशिदी बांधल्या.

    अकबर -बाबरची राजसत्ता पुढे कायम करत अकबरने असंख्य हिंदूंचे सक्तीचे धर्मांतर केले , पुढे चितोड हत्याकांडात जे राजपूत ठार केले , या मृत शरीरांवरून जमा केलेल्या जाणवांचे वजन तब्बल ७४ मण भरले एवढा संहार केला.अशीच भयंकर आणि दाहक कारकीर्द पुढे जहांगीर ,शाहजहान यांनी चालू ठेवली.

    शिवपूर्वकाळात सर्व शाह्यातील सुमारे ७२ सुलतानांनी सतत तीन शतके महाराष्ट्र आपल्या जुलूमांनी भरडून काढला.

    शिवपूर्वकाळात भारतात तथा महाराष्ट्रात अनेक हिंदु राजे होऊन गेले, पुढे यावनी आक्रमणात अनेकांनी कडवा प्रतिकार देखील केला.

    महाराष्ट्रात सातवाहन-वाकाटक - राष्ट्रकुट - चालुक्य - शिलाहार -कदंब या राजवंशानी राज्य केले. त्याबद्दल थोडक्यात माहिती आता पाहु -

    सातवाहन - (इ.स.पुर्व २३२ ते ~ इ.स. २१०) सातवाहनांचे वैशिष्टय असे की त्यांची सागरावर सत्ता होती. पैठण ही त्यांची पहिली राजधानी.याकाळात प्रजा आनंदी, स्त्रियांना भरपूर स्वातंत्र्य व प्रतिष्ठा होती. याच काळात शालीवाहन शक या कालगणनेचा उदय झाला.

    वाकाटक - (इ.स. २४८ ते ~इ.स. ४९३) यांनी विदर्भात सत्ता स्थापन केली.त्यांच्या काळात धर्म , विद्या , कला , स्थापत्य, शिल्प यांना महत्व होते असे दिसते.

    चालुक्य - (इ.स.५०० ते ७५०) हे घराणे मूळचे अयोध्येकडील.वाकाटकानंतर चालुक्य राजवंशाने सुमारे २५०वर्षे राज्य केले.शिल्पकलेत चालुक्य शैलीची मंदिरे , शिल्पे उत्कृष्ट समजली जातात.

    राष्ट्रकुट - (इ.स.७५० ते ९८३) चालुक्यानंतर राष्ट्रकुटांनी २०० वर्षे राज्य केले. याच काळात जगप्रसिद्ध कैलास लेणे खोदले गेले. हे यांच्या कारकिर्दीतच मुसलमान व्यापारी पश्चिम किनाऱ्यावर उतरले. राष्ट्रकुटांच्या काळातच संस्कृतीला विकृत स्वरूप येऊ लागले.सोवळे- ओवळे, देवदासी, विधवा केशवपन व सतीची चाल हळू हळू रूढ झाली. सातवाहनकाळातील महाराष्ट्राचा वैभवसूर्य राष्ट्रकुटांच्या काळात ढळू लागलेला दिसतो.

    शिलाहार - (इ.स. ८२५ ते १२६५) या राष्ट्रकुटांनंतर महाराष्ट्रावर चालुक्य, कदंब आणि शिलाहारांचे राज्य आले. कादंबांचे आरमार हा एक अभ्यासाचा विषय आहे. एकाचवेळी या सत्ता निरनिराळ्या प्रदेशांवर राज्य करीत होत्या. कोकणात शिलाहार राज्य करीत , शिलाहारांचे वैशिष्टय म्हणजे बळकट डोंगरी किल्ले बांधण्याचा पहिला घाट त्यांनी घातला

    यादव - (इ.स. ११७८ ते १३१८) देवगिरीकर यादवांनी शिलाहार व कदंब यांना जिंकून सार्वभौम सत्ता प्रस्थापित केली. यादव हे यदुवंशीय आणि राजभाषा मराठी, सुवर्ण गरुडध्वज हे यादवांचे निशाण होते. १२२८ मध्ये पुंडलीकाने पंढरपुरी श्री विठ्ठलाची स्थापना केली. पुढे रामचंद्रदेव राजाच्या कारकिर्दीत संत ज्ञानेश्वरांनी हा काळ अविस्मरणीय केला. पण हा सुखद काळ जास्त दिवस टिकला नाही. रामदेवराय राजाच्या कारकिर्दीत दिल्ली सुलतानाचा पुतण्या (आणि जावई) ' अल्लाउद्दिन खल्जी ' देवगिरीवर चालून आला. दुर्दैव हे की यावेळी रामदेवपुत्र 'शंकरदेवराय' दक्षिणेत सैन्य मोहिमेवर घेऊन गेला होता.अशा परिस्थितीत हे यावनी आक्रमण यादवांना सोसले नाही आणि यादवांचा गरुडध्वज पडला.तब्बल २०० वर्षांची उज्वल परंपरा लाभलेलं देवगिरीच वैभवशाली साम्राज्य अवघ्या १५-२० दिवसात कोसळले. यादव साम्राज्याचा अस्त झाल्यावर पुढे ३०० वर्ष इस्लामी राजवटीचा वरवंटा फिरतच राहिला.

    यापुढील प्रदीर्घ काळात.बहमनी, तुघलक, खल्जी, निजामशाही, आदिलशाही, बरिदशाही , इमादशाही, मोगल, पोर्तुगीज यांनी थैमान घातले.शिवपूर्वकालीन हिन्दुस्थानाचे इस्लामी राजवटीचे स्वरूप नुसते वरवर न्याहाळले तरी शिवपुर्वकालीन भारत कोणत्या बिकट आणि विचित्र परिस्थिती मधून जात होता आणि शिवाजीराजे जन्माला नसते आले तर काय परिस्थिती उद्भवली असती हे आता कोणालाही उमजू शकेल.
    रोहित पवार

    संदर्भ :
    शककर्ते शिवराय (खंड १) - विजयराव देशमुख
    श्री राजा शिवछत्रपती - गजानन मेहेंदळे
    मुसलमानपुर्व महाराष्ट्र - वा.कृ. भावे
    शिवकालीन महाराष्ट्र - वा.कृ. भाव

      March 19, 2017


  • आपल्या आहारातील युती आणि आघाड्या

    एका बाबतीत बदल झालेला दिसत नाही. ती बाब म्हणजे निसर्गाशी मानवाचे सातत्याने चाललेले द्वंद्व. थंडी-वारा-पाऊस असो वा त्सुनामी-वादळ – भूकंप असो, निसर्ग मानवाला चकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मानव निसर्गाला जोखण्याच्या अभ्यासात असतो… आधी – व्याधी असो, रोगराई असो वा जीवजंतू असो, मानवाच्या निरामय आरोग्यातील हे अडथळे ओलांडण्याच्या करामती मानवाने अनेक करून दाखविल्या आहेत.

      July 16, 2024


  • बाळक्रीडा अभंग क्र.३७

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      September 17, 2018