(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आत्मपूजा उपनिषद : २ : कर्मशून्य चित्त हेच आवाहन !

    सर्व कर्म निराकारणं ही चित्तदशा प्राप्त होण्यासाठी  सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनानं कृत्य करण्याची सवय या क्षणापासनं सोडायला हवी. मनानं कोणतंही कृत्य असंभव आहे; खरं तर मनानं काम करणंच व्यर्थ आहे. जे काही काम होतं ते शरीरानं होतं आणि मनाशी त्याचा मेळ असतो;  केवळ मनानं काम हा निव्वळ कालापव्यय आहे.

      December 30, 2019


  • देवपूजेतील साधन – निरांजन

    निर म्हणजे नाही व अंजन म्हणजे मळ किंवा काजळी. निरांजनातील तुपाच्या ज्योतीवर काजळी किंवा धूर दिसत नाही. म्हणूनच त्याला निरंजन म्हणतात.

    निरंजन याचा अर्थ ओवाळणे असाही आहे. देवाच्या पूजेची सांगता आरतीने होते. या आरतीमध्ये प्रज्वलित निरंजनाने देवाला ओवाळणे हा एक प्रमुख उपचार आहे.

    निरंजनाने देवाला ओवाळतात तेव्हा त्यात तुपात भिजवलेली वात असते तर स्त्री पुरुषाला ओवाळताना तेल वात असते तिला कुरवंडी असे म्हणतात. हा प्रकार म्हणजे औक्षण होय. औक्षण म्हणजे उत्तम क्षणांनी आयुष्याची वाढ व्हावी असा आशीर्वाद यात अभिप्रत असतो.

    सर्वसाधारणपणे निरंजनाला पाच पाळी असतात यात प्रामुख्याने कापसाच्या वातीने प्रज्वलित झालेल्या पंचारतीच्या निरंजनातील पाच ज्योती म्हणजे मानवी शरीरातील प्राण, अपान, व्यान, उदान, समान या पंचप्राणाची प्रतीके आहेत. देवाची आरती म्हणजे गायनातून केलेली देवाची स्तुती असल्यामुळे देवाची आपल्यावर कृपा होते.

      January 30, 2016


  • नाविन्य शोधणं म्हणजेच ‘जगणं’

    वाढत्या वयाबरोबर जीवनातील अनेक झंझाटांत आपण इतके गुरफटून जातो की नविनाचा शोध घ्यायला आणि रोजच्या झालेल्या गोष्टीतलं नावीन्य जाणवून घयायला आपल्या डोळ्यांना आणि कानांना फुरसदच नसते..

      November 27, 2016


  • निद्रानाशाच्या समस्येवरील घरगुती उपाय

    तणावपूर्ण वातावरण, अपेक्षांचे ओझे, घरच्यांकडून उपेक्षा व धावपळीचे जग यामुळे आज एका नवीन समस्येला जगाला तोंड द्यावे लागत आहे. ती म्हणजे निद्रानाश (झोप न येणे). मग यासाठी झोपेच्या गोळ्या घेण्याची वेळ येते. त्यातूनच पुढे डिप्रेशन येते. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या आजाराने आज ग्रस्त केले आहे.

    या आजाराची साधारण कारणे व सहज घरी करण्याजोगे उपाय

    कारणे - तणावपूर्ण वातावरणात जगणे, काम करणे. उत्तेजक पदार्थांचे सेवन करणे- उदा. कॉफी, बीअर, सिगारेट, उत्तेजक दृश्य बघणे, विचार करणे. आयुर्वेदानुसार मलबद्धता हेही एक मुख्य कारण आहे. ४) उपाशी झोपणे, पोटाच्या आजाराच्या समस्या रात्री जास्त प्रमाणात पाणी पिणे, त्यामुळे लघवीसाठी वारंवार उठावे लागणे. मनाला उत्तेजना देणारे कार्य करणे. उदा. रात्री झोपताना टीव्ही बघणे. ७) अपेक्षांचे अति ओझे असणे, त्यामुळे सतत विचार करणे. पिझ्झा, बर्गर, वडापाव, चायनीजसारखे कुपोषण करणारे पदार्थ खाणे. प्रेमभंग, करिअर समस्या, असमाधानी जीवन. वाढत्या अभ्यासाचे क्षेत्र. या वा इतर कारणांनी निद्रानाश होऊ शकतो. झोप व्यवस्थित न झाल्यास त्याचा परिणाम शरीरावर होतो. यातूनच ब्लडप्रेशर वाढणे, पोटाच्या समस्या, मानसिक विकार इत्यादी समस्यांनी आपण ग्रस्त होतो. यासाठी साधारण उपाय.

    नियमित व्यायाम केल्याने शरीराचे रक्ताभिसरण व्यवस्थित राहते व त्यामुळे झोप येते.

    योगा, प्राणायाम व देवाची प्रार्थना केल्यास मन शांत होते व व्यवस्थित झोप येते.

    रात्रीचे जेवण हलके घ्यावे व जास्त पाणी पिऊ नये.

    रात्री झोपताना मनाला आवडेल असे संगीत ऐकावे. दीर्घ श्वसन केल्यास मनाचा अति चंचलपणा कमी होतो.

    अति तिखट, मसालेदार, मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे.

    झोपण्याच्या बेडचा उपयोग केवळ झोपण्यासाठीच करावा. यावर लॅपटॉप बघणे, मोबाईल खेळणे इत्यादी उपद्व्याप करू नयेत. जेणेकरून शरीराला एक सवय पडेल की बेड केवळ झोपण्यासाठीच आहे. प्राणीदेखील झोपण्यासाठीच रोज एकाच जागेचा उपयोग करतात.

    झोपण्याच्या व जागण्याच्या वेळा निश्चित असाव्यात; जेणेकरून शरीराचे लळेश्रेलरश्र लश्रेलज्ञ सेट राहील.

    चिंता दूर सारून प्रसन्न, आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.

    झोपण्याचा बिछाना व्यवस्थित अंधारमय खोलीत असावा.

    नियमित मसाज केल्याने झोप व्यवस्थित येते. किमान झोपण्यापूर्वी चेह-याची, डोक्याची तेलाने हळुवार मालिश केल्यास झोप येते.

    वरील उपाययोजना करूनही निद्रानाश न गेल्यास आयुर्वेदिक पंचकर्मात सांगितलेली शिरोधारा करावी. याने औषधी न घेता कोणत्याही दुष्परिणामांविना मन व डोके शांत होऊन झोप येते. तणाव दूर होतो. ही अतिशय उपयुक्त प्रक्रिया आहे. आयुर्वेदात काही औषधी योजनाही सांगितलेली आहे. जसे. अश्वगंधा, ब्राह्मी, सर्पगंधा, जटामांसी. या औषधीचे वैशिष्ट्य म्हणजे याची सवय लागत नाही. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वरील उपाय करून निद्रा -झोप घ्यावी. स्वस्थ, प्रसन्न जीवन जगावे. असे केल्याने आपला व परिवाराचा तणाव दूर होईल. शिरोधाराही घ्या. ही अमृततुल्य उपाययोजना आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 5, 2017


  • आहाररहस्य १

    जसा देश जसा वेश तसे खावे… जशी प्रकृती जशी पचनशक्ती तसे पचवावे…

      August 12, 2016


  • जागतिक सरडा दिवस

    अरे किती रंग बदलशील? एखादा सरडा पण तुझ्यापेक्षा कमी रंग बदलत असेल , असं बोलून आपण सरड्याला बदनाम करतो. वास्तविक पाहता सरडा आपला रंग वेगवेगळ्या कारणांसाठी बदलतो. त्याला अनेक नैसर्गिक व विज्ञानातील कारणं आहेत.

      August 14, 2020


  • निरंजन – गाभार्‍यातले ध्यानस्थ चिंतन

    आपल्या नेहमीच्या जीवन प्रवासात अश्या बर्‍याचश्या घट्ना घड्तात ज्यामुळे आपले विचार निर्माण होतात तर बहुतेकदा आपले विचार अति होऊन एका ठरविक पातळीचे उल्लंघन होते आणि त्या विचारांमधुन स्थिती निर्माण होते. अश्या विचारांवर चर्चा, चर्चेतुन विषय, विषयांचा अभ्यास, अभ्यासातुन ग्रहण आणि जे ग्रहण केले ते ज्ञान म्हणजे “निरंजन”!

      September 28, 2019


  • श्री भ्रमरांबाष्टकम् – २

    कस्तूरीतिलकाञ्चितेन्दुविलसत्प्रोद्भासिफालस्थलींकर्पूरद्रवमिश्रचूर्णखदिरामोदोल्ल सद्वीटिकाम्।
    लोलापाङ्गतरङ्गितैरधिकृपासारैर्नतानन्दिनीं
    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये।।२।।

    आई ललितांबेच्या मुख कमलाचे सौंदर्य वर्णन करताना पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,

    कस्तूरीतिलकाञ्चित- कस्तुरी मिश्रित तिलकाद्वारे विलोभनीय असणारे.

    सोळा शृंगारात शेवटचा शृंगार आहे तिलक धारण. त्या तिलका मधील सर्वश्रेष्ठ तिलक कस्तुरीचा. त्याचे वर्णन, अर्थात परिपूर्ण शृंगार केलेली.

    इन्दुविलसत्- इंदू म्हणजे चंद्राप्रमाणे, विलसत् म्हणजे सुंदर दिसणारे. मुखकमल.

    प्रोद्भासि- चमकदार असणारी

    फालस्थलीं- भांग पाडलेली जागा. केसांमध्ये भांग पाडतांना जेथे ते दोन भागात विभागल्या जातात त्या स्थानाला फालस्थली म्हणतात.

    कर्पूरद्रव म्हणजे कापूर.मिश्रचूर्ण त्याचे चूर्ण ज्या मध्ये मिसळले आहे असे.

    विडा अर्थात पान तयार करताना त्यामध्ये भीमसेनी कापराचे चूर्ण घातले जाते. त्याचा येथे संदर्भ आहे.

    खदिर- म्हणजे खैर. त्या झाडापासून काथ निर्माण करतात. येथे विड्याचा संबंध असल्याने खैर शब्दात काथ अपेक्षित आहे.

    आमोदोल्लसद्- त्याचा सुगंध दरवळणारे,

    विटिकाम्- पान, विडा.

    आई जगदंबेच्या अत्यंत आवडत्या नैवेद्या मध्ये विडा सम्मिलित आहे. यांनी आईचे मुख, लालबुंद, रसपूर्ण आणि सुगंधी झाले आहे.

    लोलापाङ्ग- हलणाऱ्या डोळ्याच्या कडा,

    तरङ्गितै:- त्यांचा तरंगांनी

    अधिकृपासारै:- वर्षाव करीत असणाऱ्या कृपेच्या द्वारे.

    नतानन्दिनीं - विनम्र असणाऱ्यांना आनंद देणारी. अर्थात भक्तांना परिपूर्ण आनंद प्रदान करणारी.

    श्रीशैलस्थलवासिनीं- श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या, भगवतीं श्रीमातरं- देवी श्री भ्रमराम्बेला भावये- मी ध्यातो. मी अखंड तिचे ध्यान करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 4, 2020


  • राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन

    पंधरा एकरांवर असलेल्या या गार्डनमध्ये तुम्हाला असंख्य भारतीय व परदेशी फुले पाहायला मिळतील. मुघल गार्डन आज पासून, म्हणजेच ५ फेब्रुवारीपासून ६ मार्चपर्यंत सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

      February 5, 2022


  • गाढवेंचे झाले तारळेकर

    कवी यशवंत अुर्फ पेण्ढरकर ‘पुणे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन’ या संस्थेत नोकरीला होते. त्या संस्थेत ‘गाढवे’ या आडनावाचे अेक शिक्षक होते. विद्यार्थी त्या आडनावाची खूप चेष्टा करायचे म्हणून पेण्ढरकरांच्या मदतीनं त्या शिक्षकानं ‘गाढवे’ हे आडनाव बदलून ‘तारळेकर’ असं आडनाव धारण केलं. कारण ‘तारळे’ या गावचा तो मूळ रहिवासी होता.

      June 11, 2016