वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
२१ सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन म्हणून ओळखला जातो. साजरा केला जातो असे म्हणणे चुकीचे ठरेल कारण आनंद देणारे क्षण किंवा विषय साजरे केले जातात. अल्झेमर्स मध्ये खूप यातना दडल्या आहेत. अल्झेमर्स डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झेमर्स दिसीज बद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या.
January 11, 2010
भगवान श्रीविष्णुंच्या चरणकमलांचे अलौकिकत्व वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, भगवान श्रीविष्णु जगत पालक असल्याने त्यांना देव आणि दैत्य दोन्ही आपले आहेत. कोणत्याही एका समूहावर ते कधीच अन्याय होऊ देत नाहीत.
December 16, 2020
आपण लहानपणी ‘येरे येरे पावसा.. तुला देतो पैसा, पैसा ‘झाला खोटा .. पाऊस आला मोठा’ हे गाणे ऐकले होते.आता अनेकदा पैसा खोटा असल्याचा अनुभव येतो.विशेष करून ५०० व १००० या चलनाच्या नोटा तर अनेकदा खोट्या निघू शकतात.
October 22, 2023
१९७४ च्या जानेवारीत अभिषेकी बुवा शिवाजी पार्कची जागा सोडून लोणावळ्याला गेल्यामुळे गाण्याच्या शिक्षणात खंड पडला होता. एकदोनदा मी तिथे गेलो. परंतु मनासारखं शिकणं होईना. तेव्हा त्यांच्याच परवानगीने मी नंतर पं. गोविंदराव अग्नि यांच्याकडे गाणं शिकायला सुरुवात केली. त्यांच्याकडे साधना पालांडे (वैशाली थिएटरचे मालक बी. पालांडे यांची पत्नी) या गाणं शिकण्यासाठी येत होत्या. श्रीमती कान्होपात्राबाई, रजनी जोशी याही येत असत.
July 14, 2026
अमृता खंडेराव यांचं हे कथासंग्रह म्हणजे विदर्भाच्या मातीतून उगम पावलेलं, चुलीवर शिजवलेलं आणि बोलीभाषेच्या फोडणीने झणझणीत झालेलं साहित्यिक जेवण आहे. हे पुस्तक वाचताना वाटतं, आपण एखाद्या खेड्यातल्या अंगणात बसलो आहोत, समोर चुलीवर भाकरी भाजतेय, आणि आजूबाजूच्या बायका आपापल्या कहाण्या सांगतायत—कधी हसवणाऱ्या, कधी डोळ्यांत पाणी आणणाऱ्या, पण नेहमीच मनात घर करणाऱ्या.
July 16, 2026
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात संसद सर्वोच्च स्थानी आहे. संसदेचे पावित्र्य राखण्याचे काम खासदारांनी करणे अपेक्षित असते. आजवर अनेक संसदपटूंनी अभ्यासपूर्ण भाषणांनी जनतेचे आणि देशासमोरील महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले आहेत.
April 28, 2024
आरशांचा उल्लेख रामायण-महाभारतातही आढळतो. ग्रीक, रोमन, आपली सिंधु संस्कृती यांच्या भरभराटीच्या कालखंडातही आरशांचा उपयोग होत असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. संथ जलाशयाच्या पाण्यात डोकावून पाहताना आपणच आपल्याकडे पाहत असल्याचं दिसल्यापासून ही जादू आपल्या घरच्या घरीच हस्तगत करण्याचे प्रयत्न सुरू झाले.
June 24, 2011
भगवंताच्या नाभीचे अति दिव्य स्वरूप वर्णन केल्यानंतर त्यातून उत्पन्न झालेल्या या अनंत कोटी ब्रह्मांडाची प्रथम निर्मिती असणाऱ्या, निर्मितीचे कार्य करणाऱ्या ब्रह्मदेवांचे ही उत्पत्ती स्थान असणाऱ्या कमळाचे सकल ब्रम्हांड व्यापी वर्णन आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात करीत आहेत.
December 27, 2020
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 14, 2018
एकदा काँक्रीटचे बांधकाम पुरे होऊन काही वर्षे उलटली की त्याच्या तपासणीची गरज पडते, कारण १) कोणत्याही शहरी विभागात काँक्रीटचे कोणतेही बांधकाम १५ वर्षे उलटली की महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे त्याची तपासणी करणे बंधनकारक असते. २) अशी तपासणी तज्ज्ञांकडून करवून घेऊन ती सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र प्रथम १५ वर्षांनी आणि नंतर 15 कुतूहल दर पाच वर्षांनी महानगरपालिकेला देणे बंधनकारक आहे.
January 15, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti