वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
एका देवळात एका रिसायकल होणार्या तेल, फुलं, नारळ वगैरेची आर्थिक उलाढाल बघाल तर थक्क व्हाल. एका शनिवारी एका देवळात किमान १०० लिटर तेल वापरलं गेलं आणि रिसायकल झालं तर देशभरात किती लिटर तेल वाया जात असावं? आणि त्यावर किती जण “माया” कमवत असावेत? हीच गोष्ट दूध, फुलं यांचीसुद्धा !!
November 29, 2017
जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी नवीन करण्याची धडपड असते. आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्नही तेवढेच करतात. पण प्रत्येक व्यक्तीला अपेक्षित यश मिळणार असे नसते तर कधीकधी अपयशाला ही सामोरे जावे लागते, पण त्या अपयशाला खचून न जाता जिद्द चिकाटीने आपल्या यशाची नौका पैलतीरी नेली पाहीजे.
July 8, 2019
चंद्रशेखर यांना संगीताची खूप आवड असून के. एल . सैगल हा त्यांचा आवडता गायक आहे. ते म्हणतात सैगल यांच्या आवाजातून मला स्फूर्ती मिळाली. बी. एस. चंद्रशेखर यांना भारत सरकारने पदमभूषण अवॉर्ड दिले , अर्जुन अवॉर्ड दिले तर विझडेन क्रिकेटीअर्स ऑफ १९७२ चा सन्मान त्यांना मिळाला. तर भारतीय क्रिकेट क्रिकेटीअर १९७२ ह्या किताबाने ते मध्ये सन्मानित झाले.
July 18, 2021
महाराष्ट्र सीमावासियांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहीला असता तर सीमाप्रश्न कधीच सुटला असता. परंतु तसे कधी झालेच नाही. त्यामुळे इथल्या मराठी माणसाच्या मनात एकाकीपणाची भावना निर्माण झाली आहे. परंतु त्यांनी आपली जिद्द, संघर्ष कधी सोडलाच नाही. गेली 65 वर्षे तो लढतो आहे. स्वातंत्र्यलढ्यानंतर इतका दीर्घकाळ लोकशाही मार्गाने सुरू असलेला दुसरा लढा इतिहासात नाही. येथील मराठी माणसावरील अत्याचार अन् अन्यायाने सीमापार केली. ‘आम्ही लोकशाहीत आहोत की हुकूमशाहीत’ असेच कोडे मराठी माणसाला पडले आहे.
July 4, 2021
१ फेब्रुवारी २०१८ रोजी आपल्या संसदेला २०१८-१९ सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प माननीय अर्थमंत्री श्री .अरुण जेटली यांनी सादर केला. त्यादिवशी अर्थसंकल्पीय भाषण झाल्यावर लगेचच एका वाहीनीवर बोलताना मीअस म्हणले होते की ...." ये अलग हैं . सही हैं या गलत है ये अभी कहना उचित नही होगा . ऐसी जल्दबाजी करने के बजाय वो टिप्पणी सोच -विचार , पाठ - पढाइ करके करे तो उचित होगा " ...
१ फेब्रुवारी २०१८ पासून विविध ठिकाणी केलेल्या माझ्या अर्थसंकल्पीय विश्लेषणात मी त्याचा उहापोह करण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला .( २०१८ हे माझे अर्थसंकल्पीय विष्लेषनाचे सलग ३१ वे वर्ष . मराठी - हिंदी -इंग्लीश अशा तिन्ही भाषांतून यावर्षी केलेल्या एकूण ३१ भाषणांस एकंदरीतच १३००० हून जास्त श्रोत्यांची उपस्थिती होती . ....अर्थात एकूण सात चीत्रवाहीन्या आणि रेडियो वर केलेल्या कार्यक्रमाच्या श्रोत्यांची संख्याधरलेली नाही .)
अनेकांनी केलेल्या सूचनेनुसार त्यातील काही भाग इथे आता शब्दबद्ध करत आहे .
१ फेब्रुवारी २०१८ रोजी आपल्या संसदेत सादर झालेला हा अर्थसंकल्प म्हणजे मोदी सरकारचा हा पाचवा अर्थसंकल्प . अनेकांच्या मते मोदी सरकारच्या या कालखंडातला हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प . Demonitisationनंतरचा हा दुसरा अर्थसंकल्प . रेल्वे अर्थसंकल्पाचा सर्वसाधारण अर्थसंकल्पात समावेश असणारा हा दुसरा अर्थसंकल्प .१ फेब्रुवारी रोजी सादर होणारा हा दुसरा अर्थसंकल्प . रेरा कायदा आणि वस्तू - सेवा कर ( GST )यांची अंमलबजावणी झाल्यानंतरचा हा पहिला अर्थसंकल्प .हिंदी आणि इंग्लीश अशा दोन्ही भाषांचा लक्षणीय प्रमाणात उपयोग केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणाचा हा पहिला अर्थसंकल्प . थोडे उभे राहून आणि बरचसं बसूनअशा अर्थसंकल्पीय भाषणाची जेटली परंपरा सुरू ठेवणारा असाही हा अर्थसंकल्प .
हे अर्थसंकल्पीय भाषण ऐकत असताना राहून राहून माझ्या मनात एक विचार येत होता . तो असा की १ फेब्रुवारीला सादर होणारा हा दुसरा अर्थसंकल्प . त्यामुळे आगामी अर्थसंकल्पाकदून अपेक्षा हा विषय आपल्यादेशात या दोन वर्षात १०- १२जानेवारी पासून रंगायला लागतो . हिंदु वर्षाप्रमाने मकर - संक्रांत १४ जानेवारीला येते . पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री श्री .अरुण जेटली या दोघांचेही या ना त्या अर्थाने राजकीय माहेरअसणाऱ्या गुजराथ मधे मकर - संक्रांतीला पतंग उडवण्याची पद्धत आहे . तिथे काही आपल्या महाराष्ट्रासारखी संक्रांतीला " तिळगूळ घ्या , गोड बोला " म्हणण्याची पद्धत नाही .त्यामुळे रथसप्तमी नंतर आलेल्या याअर्थसंकल्पात आपल्या अपेक्षांचे किती पतंग उडाले आणि किती कापले गेले ? ( आता माननीय अर्थमंत्री श्री .अरुण जेटली हे राज्यसभेची निवडणूक गुजरात ऐवजी उत्तर प्रदेश मधून लढवणार असल्याचे जाहीर झाले आहे .हा अर्थसंकल्प संमत झाल्यानंतर आपल्या देशाला नवीन अर्थमंत्री मिळण्याचे तर हे संकेत नाहीत ना ? किँवा एकंदरीतच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल ? )
अस वाटण्याचे कारणही जरा गन्मतीचे आहे . ते गंमत म्हणूनच घ्या ही नम्र विनंती ....अर्थसंकल्पीय भाषणाच्या आठव्या परिच्छेदात आपल्या देशाची व्यवसाय - सुलभता या निकषावर ( Ease of Doing Business ) जागतिक क्रमवारीत चांगलीच सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले आहे . ती वस्तुस्थिती आहेच . त्याने प्रेरित होऊन असेल कदाचित ; पण अर्थसंकल्पीय भाषणाच्या त्याच आठव्या परिच्छेदात ( आपल्यामराठीत पराग्राफ हो ) अस सांगण्यात आले आहे की देशाच्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुलभता आणण्यास मोदी सरकार कटिबद्ध आहे . त्याबाबतही कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही . फक्त झाले आहे ते इतकेचकी अर्थसंकल्पीय भाषणाच्या त्या आठव्या परिच्छेदात " Ease of Living " अस म्हणण्याऐवजी " Ease of Leaving " अस लिहिले गेले आहे . ( म्हणून तर कदाचित अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर निरव मोदीनेत्याचे प्रत्यंतर दिले .) आता हे अनवधानाने झाले असणार हे उघडच आहे . पण .....? ?
एकीकडे जागतिक अर्थसंस्थानी भारतीय अर्थव्यवस्थेचे केलेले कौतुक आणि त्याचवेळी देशांतर्गत सामाजिक - राजकीय असंतोष अनुभवत असताना अस व्हायला नको होते इतकेच .
याबाबत विचार करत असताना शायर मुनीर यांची एक रचना राहून राहून आठवते . ते म्हणतात ....
" बेखयाली मे युंही
बस एक इरादा कर लिया
अपने दिल के शौक को
हद से ज्यादा कर लिया
जानते थे दोनो
हम इसको निभा नही सकते
उसने वादा कर लिया
मैंने भी वादा कर लिया " .
अर्थातच हे केवळ या अर्थसंकल्पापुरेसे मर्यादित आहे असेही नाही . तसंच अर्थसंकल्प -अर्थव्यवस्था - सरकार - नागरिक यातले नेमके कोण कोणाला हे म्हणणार हाही प्रश्न आहे किंवा प्रश्नच आहे ! ! ! त्यातहीअलीकडच्या काळात संवेदनशीलता इतकी तीव्र झाली आहे की हा प्रश्न कोणीच कोणालाही विचारण्यातही अर्थ नाही .
केंद्रीय अर्थमंत्री श्री . अरुण जेटली यांचा आणि पर्यायाने मोदी सरकारचा हा पाचवा अर्थसंकल्प आहे . तांत्रिकद्रुष्ट्या आणि आजमितीला तरी विद्यमान सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे . आणि म्हणूनच कदाचितत्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात मोदी सरकार सत्तारूढ होतांना आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था Fragile 5 स्वरूपाची होती असे सांगत केली असावी .मोदी सरकारच्या कारभारामुळे अशा अर्थव्यवस्थेचे रूपांतरFantastic 5 मधे झाले आहे असा त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाचा सूर आहे . आणि ते समजण्याजोगे आहे .याबाबत हा Fabulous 5 किंवा Fearful 5 ( नरेंद्र मोदी - अमित शहा - अरुण जेटली - Demonitisation - GST )च्या प्रभावाखालचा अर्थसंकल्प आहे अशी काहीजणांची मल्लीनाथी आहे .अर्थमंत्र्यांपेक्शा पंतप्रधानांचा वाटणारा असा हा अर्थसंकल्प आहे असेही काहीना वाटते . अर्थसंकल्पीय भाषण करतानाअर्थमंत्री काहीवेळा अडखळले ; पण पंतप्रधानांनी मात्र जोरदार , जोमदार आणि सविस्तर प्रतिक्रीया दिली हा मुद्दा त्यासाठी पुढे केला जात आहे .
या अर्थसंकल्पाचा आणि एकंदरीतच मोदीकारण किंवा Modinomics चा विचार करत असताना मला प्रकर्षाने असे वाटते की मोदीकारण आणि IPL Auction यांत एकाबाबतीत साम्य आहे . पाहा ना ...यंदाच्या IPL auction मधे सुप्रसिद्ध उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला यांचा मुलगा आयुर्मान बिर्ला याचा क्रिकेट खेळाडू म्हणून २० लाख रूपयात लिलाव झाला . तोही दुसऱ्या दिवशी आणि त्याच्या Base Priceलाच . त्याच IPL Cricket Players Auction मधे काश्मीरमधल्या एका राजकीय नेत्याच्या सुरक्षा - रक्षकाचा साडे सहा कोटी रुपयांना तर जयदेव उनाडकटचा तब्बल साडे अकरा कोटिना लिलाव झाला . आता जयदेव उनाडकट हा काहीआपल्या देशाच्या कसोटी संघात आणि एकदिवसीय सामन्यात खेळणाऱ्या संघाचा नियमित खेळाडू नाही . अगदी T-20 ताही नियमित नसतो . पण IPL च्या गेल्या मोसमात सगळ्यात जास्त विकेट त्यांनी घेतल्याआहेत आणि हा लिलाव होण्याआधीच्या आपल्या देशाच्या T-20 मालिकेचा तो Man of the Series आहे . यातून सिद्ध होणारी गोष्ट म्हणजे कौटुम्बिक पार्श्वभूमी , भौगोलिक क्षेत्र असे काही निकष नसून प्रत्यक्षकामगिरी ( Performance अशा अर्थाने ) हा लिलावाचा निकष होता . अगदी असेच स्वरूप या अर्थसंकल्पाचे आणि एकंदरीत मोदीकारनाचे आहे . या उदाहरणातील तीन खेळाडू म्हणजे क्रुषी - उद्योग - सेवा ही तीन क्षेत्रेआहेत हे लक्षात घेतले म्हणजे यातला एक अनोखा आक्रुतिबंध ( Pattern अशा अर्थाने ) सामोरा येतो .
विशेषतः या अर्थसंकल्पाचे आणि एकंदरीतच मोदीकारनाचे जाणवणारे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सांख्यिकी तत्वावर आधारीत ( Data Based ) असे हे निर्णय आहेत . ते एखाद्याला सामाजिक - राजकीय -"आर्थिक -कौटुम्बिक - व्यावसायिक निकषांवर पटतील किँवा न पटतील ही गोष्ट वेगळी ! पण हे निर्णय या धर्तीवर आहेत . हेच बघा ना ...आधी Demonitisation आणि नंतर GST यामुळे आपल्या सर्वांचेच उत्पन आणि खर्च, मालाचे उत्पादन आणि वितरण या सगळ्याचीच रीतसर आणि वेळच्या वेळी नोंद होऊ लागली आहे . पटायला - पचायला - रुचायला -"आणि रुजायला जरी अवघड असली तरी गेल्या वर्ष - दीड वर्षातील आकडेवारीवरूनहे उघड झाले आहे की आपली पेट्रोल - डिझेल - सोने - दारू आणि राहण्यासाठी ची घरे या वस्तूंची मागणी त्यांच्या विक्रीच्या किंमतिवर अवलंबुन नाही . मग या वस्तूंना अर्थसंकल्पात झुकते माप कसे मिळणार ? यावस्तू अजूनही वस्तू - सेवा कराच्या जाळ्यात आलेल्या नसतात हा काही योगायोग नसतो .
या अर्थसंकल्पाचे आणि सर्वसाधारण मोदीकारनाचे मला वाटणारे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे हा संभ्रमात टाकणारा अर्थसंकल्प आहे . मी संभ्रमात पडलेल्यांचा म्हणलेले नाही .गेल्या चार -साडेचार वर्षात अनेकवेळापंतप्रधानांनी जाहीरपणे सांगितले आहे की शरद पवार साहेबांचे बोट धरून ते राजकारणात आले . त्यामुळे असेल कदाचित पण मोदीकारण आणि हा अर्थसंकल्प काहीवेळा कात्रजचा घाट वाटतो .यांपैकी पहिले उदाहरणम्हणजे तसा कुठेही स्पष्ट उल्लेख नसला तरी आपल्या देशाच्या क्रुषि क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देता येईल अशा पातळीवर आणण्याचे प्रयत्न सरकारी धोरणात दिसतात . पण तरीही आजही क्रुषि क्षेत्राला , निदान श्रीमंतशेतकऱ्यांना आयकराच्या जाळ्यात आणण्याचा साधा उल्लेख सुद्धा नाही . नोकरदार माणसाच्या तोंडाला पाने पुसली जात असूनडुड्धा त्यांच्याचवर नवनवीन अधिभार ( सरचार्ज ) लावले ( आणि लादले ) जात असतानाही, किमान तोंडदेखले तरी - निदान येणाऱ्या काही वर्षात तरी क्रुषि क्षेत्र आणि करआकारणी असा विषय रडार वरही येत नाही हा गुजरात विधानसभा निवडणूक निकालांचा परिणाम म्हणायचा की सरळसरळ राजकीयइच्छाशक्तीचा अभाव ? असंच अजून एक उदाहरण म्हणजे लघु आणि मध्यम उद्योगांना अत्यावश्यक अशा सवलती देण्याचे धोरण अपेक्षित आणि स्वागतार्ह्य च आहे . पण मग ते करत असताना त्यांना सरळ Minimum Alternate Tax लावला असता तर जास्त सोयीचे ठरले असते का ? या मालिकेतील अजून एक उदाहरण म्हणजे राष्ट्रपती -उपराष्ट्रपती - खासदार - आमदार यांना दर पाच वर्षानी महागाईच्या दराशी सांगड घालणारीवेतनवाढ या अर्थसंकल्पात सुचवण्यात आली आहे . ते करत असताना या मंडळीना आयकराच्या जाळ्यात आणले असते तर ? वैयक्तिक आयकरात गंमतदार Standard Deduction , अजूनही आर्थिक वर्षात बदलहोण्याची न झालेली घोषणा , शेतकऱ्यांना तत्वतः मान्य केलेले किमान हमीभाव असे काही पैलू पाहिले की " .....गेले आणि ब्रम्हचर्य ही गेले " अस जरी अगदी नाही वाटल तरी " असून अडचण आणि नसून खोळंबा "अस झालय की काय अशी पुसटशी शंका येऊ लागते .
एकंदरीतच मोदीकारनाचे आणि विशेषतः या अर्थसंकल्पाचे मला वाटणारे चौथे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या देशाच्या बदलत्या स्वरूपाची यथायोग्य नोंद आणि त्याला चालना देणारी धोरण . त्यातले नेमके कोण परिणाम आहेआणि कोण कारण आहे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे . याच उत्क्रुष्ट उदाहरण म्हणजे सेवा क्षेत्राबाबतचा मोदी सरकारचा द्रुष्तिकोन . आजमितीस आपल्या राष्ट्रीय ढोबळ ऊत्पनाच्या ५५ टक्के वाटा सेवा क्षेत्राचा (सर्विस सेक्टर ) आहे . त्यात कार्यरत असणाऱ्यांचा वयोगट तिशीच्या आसपास आहे . या मंडळींचा स्वभाव - कार्यशैली - व्रुत्ती यांचा पूरेपूर विचार हे सरकार करते . २०१४ साली मोदी सरकार सत्तारूढ होतांना जसे अनेकवर्षानी एका पक्षाचे पूर्ण बहुमत असणारे सरकार आले तसेच या निवडणुकीत मतदानाच्या प्रमाणात सुमारे अडीच टक्क्यांनी वाढ झाली होती . ही वाढ बहुतांश या वयोगटातील होती . हे राजकीय रूण तर मोदी सरकार फेडतआहेच , पण त्याचबरोबर देशाच्या अर्थव्यवस्थेत एक महत्वपूर्ण बदल होत आहे . या बदलात देशाच्या अर्थकारणाची सूत्रे तरुणाई कडे हस्तांतरीत होत आहेत . यात दुखावले गेलेले मध्यमवयीन टीकाकार असतात हा काहीयोगायोग असूच शकत नाही .
या अर्थसंकल्पाचे आणि मोदी अर्थकारणाचे पाचवे वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या क्षेत्रातील जुने आणि नवे यांची सांगड घालण्याचा प्रयत्न आणि या दोन्ही गोष्टी नागरिकांसमोर मांडण्याची एक अनोखी पद्धत . याद्रुष्तिने याअर्थसंकल्पातील दोन गोष्टींचा उल्लेख करता येईल ....थेट विदेशी गुंतवणूक आणि क्रुषि उत्पादनाचे प्रमाण या त्या दोन गोष्टी .
सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षात आपल्या देशात झालेल्या थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण आजपर्यंतच्या इतिहासातले सर्वोच्च पातळीवर आहे ही अभिमानास्पद गोष्ट सांगत असतांनाच आपल्या देशाने इतर देशांतकेलेल्या अशा स्वरूपाच्या गुंतवणुकीचे प्रमाणही यंदा सर्वाधिक आहे हेही सांगितले जाते . अवकाश - संशोधनापासून ते क्रुषि - संशोधनापर्यंत आणि औद्योगिक उत्पाडनापासून ते सेवा -"प्राधान्यापर्यंत त्याचा आवाकापाहिला की या मुद्द्याचा अंदाज येतो . आणि या आर्थिक साधनांचा उपयोग होत आपल्या देशांतर्गत बाजाराचे भाव आणि स्वरूप याच वेगळे चित्र डोळ्यांसमोर येते .
असाच काहीसा प्रकार क्रुषि -उत्पादनाबाबतही . सध्या सुरू असलेल्या वर्षात अन्न - धान्याचे उत्पादन २७५ दशलक्ष मेट्रिक टन होत असताना त्याच काळात फळ -फूल - भाज्या यांच उत्पादन ३०० दशलक्ष मेट्रिक टनझाले . महागाईच्या दरात फळ आणि भाज्या यांचा वाटा जास्त आहे . त्यांचा अस्तित्व - काल ( SHELF - LIFE ) ही कमी आहे . आणि राष्ट्रीय ढोबळ उत्पन्नात ५४ टक्के वाटा असणाऱ्या तरुणाईचा कल तिकडेचजास्त आहे . हे लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात CLUSTER -"BASED Economy चा पुरस्कार करणाऱ्या Operations Green चा उल्लेख येतो .
कोणतीही महत्वाची घोषणा अर्थसंकल्पात न येता ती अर्थसंकल्पाबाहेर येते आणि त्यामुळे ती घोषणा अर्थमंत्री न करता पंतप्रधान स्वतः करतात ही मोदीकारनाची आजपर्यंतची परंपरा हाही अर्थसंकल्प चालवेल अशीच चिन्हेआहेत . अर्थात प्रत्येक अर्थसंकल्पात काहीतरी बिग -बंग असलेच पाहिजे असे नाहीच . आणि त्यातही सेवाप्रधान अर्थव्यवस्थेत निर्णयासाठी पुढच्या अर्थसंकल्पापर्यंत थांबणे परवडणारे ही नसते . त्यामुळे तशाघोषणेसाठी थांबू ....जो जे वांछील तो ते लाहो ....
या अर्थसंकल्पाचे अजून एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यातल्या सगळ्या महत्वाच्या योजना या केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारांच्याही अखत्यारीत येणाऱ्या क्षेत्रातील आहेत . क्रुषि , शिक्षण , आरोग्य ही त्याचीचउदाहरणे आहेत . GST च्या अंमलबजावणी नंतर सरकारी अर्थकारणात राज्य सरकारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे . अशावेळी केंद्र सरकार अशाच योजना आणेल की ज्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्यसरकारांवरही टाकता येईल .
या अर्थसंकल्पातील काही योजनांबाबत पुरेशी तरतूद नाही अशी टीका होत आहे .पण त्याबाबत राज्य सरकारे त्यांच्या त्यांच्या राज्यांच्या अर्थसंकल्पातही किती तरतूद करतात हे महत्वाचे आहे . जास्तीत जास्त राज्यांतआपल्या पक्षाचे सरकार असावे असे मोदी -अमित शहाना वाटन्यामागे हेही एक कारण असू शकते .
Bank Recapitalisation Bonds बाबत पुरेशी तरतूद नाही असे म्हणले जाते . पण मला याबाबत राहून राहून असे वाटते की हे bonds सरकार टप्प्या -"-टप्प्याने काढेल .तसेच हे bonds रिझर्व्ह बँक Eligible securities म्हणून जाहीर करून परस्पर निधी उभारणी करेल .("याबाबत स्वतंत्र सविस्तर लेख लवकरच .).
तसेच Long Term Capital Gains Tax एकतर मागे तरी घेतला जाईल किँवा त्याच्या सध्याच्या प्रस्तावीत स्वरूपात तरी फार मोठे बदल , सवलतीच्या स्वरूपात , केले जातील असा माझा अंदाज आहे .
चन्द्रशेखर टिळक
११ मार्च २०१८
March 22, 2018
संदर्भ - वाग्भट तृष्णा चिकित्सा अध्याय
तहान हा जेव्हा रोग होतो, तेव्हा हा रोग कमी होण्यासाठी औषधे घ्यावी लागतात. ही तहान पण तीन प्रकारची लागते. वाताची, पित्ताची, आणि कफाची. त्यातील सूक्ष्म फरक वैद्यांच्या लक्षात येतो. यासाठी वैद्यांच्या अनुभवाचा आणि ग्रंथोक्त ज्ञानाचा फायदा घ्यावा. पण सर्वसाधारणपणे पाणी पिऊनदेखील जर तहान शमली नाही तर काय करावे, ते उपाय पाहूया.
जांभळाची किंवा आंब्याची कोवळी पाने चघळून खाल्ली असता, अति तहान कमी होते.
सर्व प्रकारची तहान कमी होण्यासाठी पावसाचे वरच्यावर धरलेले पाणी मध घालून प्यावे अथवा मातीचे ढेकूळ किंवा कौल किंवा वाळू तापवून पाण्यात विझवून ते पाणी गाळून साखर घालून प्यावे किंवा दर्भ नावाचे गवत पाण्यात टाकून ते पाणी प्यावे.
लाह्यांचे पीठ करून साखर आणि मध घालून खीर करून प्यावी.
साळीच्या लाहयांची कण्हेरी करून प्यावी.
थंड पाण्याने स्नान करून, थंड गुणाच्या औषधांनी शिजवलेल्या दुधाबरोबर मध साखर घालून जेवावे.
किंचीत आंबट आणि मीठ घालून मुगडाळीचे तुपाची फोडणी देऊन केलेले कढण जेवणात ठेवावे.
दुधापासून दही ताक लोणी बनवून काढलेल्या तुपाचे सहा थेंब नित्य नियमाने दोन्ही नाकपुड्यात घालावे.
याबरोबरच मनाची प्रसन्नता राखावी. नदी, तलाव, डोह अशा शांत थंड जागी जावे. किंवा त्याचे कल्पनाचित्र तयार करून त्यात रमावे.
जेणेकरून तहान शमली जाईल. असे काही शारीरिक आणि मानसिक उपाय करावे. पण उगाचच पाणी पिऊ नये.
काही ठिकाणी युक्ती वापरून लेपन चिकित्सा करता येते. जायफळ, वेखंड, हळद अशा उष्ण औषधींचा लेप थंड पाण्यातून केला असता, दोषांचे पाचन होऊन तृषा कमी होते. किंवा काही वेळा उसाचा रस मध वेखंड अशा औषधी पिऊन उलटी करून टाकल्याने देखील तहान कमी होते.
पाणी सुद्धा पचावे लागते, ते पचण्यासाठी त्यात औषधी घालून पाणी प्यावे. कोणत्याही संस्काराशिवाय पाणी पिणे हे मधुमेह, रक्तदाबवृद्धी सारख्या आजाराचे कारण ठरू शकते.
आयुर्वेदाचे माहेरघर केरळमधे हाॅटेलमधले पाणी देखील मुस्ता, चंदन, सुंठ घालून उकळवून दिले जाते. केरळमधे आयुर्वेद दैनंदिन जीवनात पाण्यातदेखील कसा मुरवलाय, हे हाॅटेलच्या या उदाहरणावरून लक्षात घ्यावे.
नैसर्गिकरित्या लागलेली तहान साध्या पाण्याने कमी होते. पण साध्या पाण्याने तहान कमी झाली नाही तर असे औषधी पाणी प्यावे. सर्वसाधारणपणे मधुमेहात अशी तहान लागते. ही तहान कमी होण्यासाठी साध्या पाण्याऐवजी औषधी पाणी प्यावे. म्हणजे पाण्यापासून वाढणारा क्लेद, म्हणजे चिकटपणा कमी होऊन तहान कमी होते आणि साखरदेखील नियंत्रणात रहाते.
म्हणजेच लागलेली तहान, काही वेळा औषधांनी पण कमी करावी लागते, प्रत्येक वेळी ही तहान फक्त पाण्यानेच भागते, असा गैरसमज नसावा.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
15.12.2016
December 15, 2016
धन्य होण्याचे आणि कृतकृत्य होण्याचे, गुरू ऋण अंशतः फेडण्याचे योग आयुष्यात अपवादानेच येतात. असे योग माझ्याही आयुष्यात आले. ज्यांनी माझ्या वाङ्मयीन कारकिर्दीला आशीर्वाद दिला , त्या स्वामी स्वरूपानंद महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी सेवा मंडळाकडून विचारणा झाली होती .
March 25, 2026

'मैत्री पेक्षा थोडं जास्त'...असं जुनं, हळवं नातं ... पुन्हा एकदा आयुष्यात येणं ..तेही वयाच्या एका विशिष्ठ टप्प्यावर..आणि त्यामुळे वर्तमानातलं जगणं समृद्ध आणि सुखकर होत जाणं...असं हे 'मैत्रीपेक्षा थोडं जास्त' असलेलं खास नातं दाखवणारा चित्रपट 'सहेला रे' ....
प्लॅनेट मराठी वर १ ऑक्टोबर पासून मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट स्ट्रीम होतोय...
मृणाल कुलकर्णी, सुमीत राघवन आणि सुबोध भावे म्हटल्यावर जी सहजता अभिप्रेत आहे ती अर्थातच चित्रपटात दिसते. त्यामुळे अभिनय हा माझ्या परीक्षणासाठीचा विषय नाही. मुळात परीक्षण म्हणून मला लिहायचं नाही.
'विवाहित स्त्री चा मित्र, किंवा विवाहित पुरुषाची मैत्रीण' हे एक हळवं नातं आहे, त्याला कुठेही विवाहबाह्य संबंधाची दुर्गंधी नाही हे लक्षात घेऊन चित्रपट मांडलेला आहे..
विवाहित आयुष्य , हे घरामधे व कुटुंबामधे गुंतून राहिल्याने कालांतराने बंदिस्त, सीमित, थोडक्यात, फारसं happening राहत नाही. मग ते स्त्रीचं असो अथवा पुरुषाचं. मतभेद किंवा काही गंभीर समस्या असतीलच असं नाही पण बऱ्याच अंशी पती पत्नी एकमेकांना गृहीत धरू लागलेले असतात.
तेव्हाच यातून बाहेर काढण्याकरता , ध्यानी मनी नसताना एखादा मित्र किंवा मैत्रीण आयुष्यात अनपेक्षितपणे येतात आणि हे मळभ आपोआप दूर होतं ते त्याच्याशी मनमोकळेपणे बोलल्याने आणि त्याच्या सहवासाने.
शमा वर भरभरून प्रेम करणारा निरंजन असाच तिला शोधत अमेरिकेवरून येतो आणि राहून गेलेला मनातलं सगळं तिला सांगतो. शमा सुद्धा तिच्या मनाच्या कोपऱ्यात बंदिस्त करून ठेवलेल्या सगळ्या भावना त्याच्यापाशी व्यक्त करते. एकमेकांवरचं एकेकाळी व्यक्त न होऊ शकलेलं प्रेम व्यक्त करतात. शमा मध्ये असेल्या ताकदीची निरंजन तिला जाणीव करून देतो, तू मला माझ्या आयुष्यात कायम हवा आहेस 'मित्रापेक्षा थोडा जास्त' म्हणून , हे शमा सुद्धा निरंजन ला सांगते. आणि विणलं जातं ते एक सुंदर नातं..एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मित्र मैत्रिणीचं .
अवघ्या तीन-चार दिवसांच्या काळात घडणारी ही कथा, योग्य व्यक्ती आणि त्याने आपल्या आयुष्यात योग्य क्षणी येणं याची गंमत सांगते. शमा मध्ये झालेल्या आत्मविश्वासपूर्ण बदलाचं स्वागत जेव्हा विक्रम, तिचा नवरा करतो तेव्हा शमाची ताकद, एक स्त्री व एक पत्नी म्हणून अजून वाढते. इथे चित्रपट टिपिकल केलेला नाही याचा आनंद होतो. निरंजन हा माझा जुना मित्र हे सुद्धा ती मोकळेपणाने विक्रम ला सांगते.
स्त्री ने स्वावलंबी, स्वतःच्या पायावर उभं राहायचं ठरवलं असताना सुद्धा तिचा नवरा आज तिचा मित्र हे तिची ताकद बनू शकतात हा मोठा विचार चित्रपटातून अगदी सहज पोहोचवला जातो.
या सगळ्या कथानकाला उत्तम साथ देतात ती चित्रपटाची निसर्गरम्य दृश्य, उत्तम संवाद आणि डॉ .सलील कुलकर्णी यांचं संगीत.
मृणाल कुलकर्णी यांचं गड किल्ल्यांवरचं प्रेम जाणवतं ते त्यांच्या गरुडमाची वचारच्या सहज वावरामुळे. चित्रपटात त्यांनी त्याची अगदी उत्तम सांगड घातली आहे.
निरंजन आणि शमाच्या एकमेकांविषयीच्या प्रेमाचा उलगडा होतो तो गरुडमाची च्या एका उंच टोकावर. आजूबाजूला हिरवळ, पावसाळी वातावरण, ढग ..असं असताना दिली गेलेली प्रेमाची कबुली..हे दृश्य फारच परिणामकारक ठरलं आहे.
निरंजन आणि शमाची ट्रेक ची आवड, त्यातून बाहेर येणाऱ्या जुन्या आठवणी, आणि आठवणींबरोबर पुन्हा पुन्हा हळवे होणारे हे मित्र मैत्रीण आपल्याला आपल्याही एखाद्या खास मित्र किंवा मैत्रिणीची आठवण करून देतात.
स्त्री च्या आयुष्यात असा एक मित्र का हवा आणि पुरुषाला सुद्धा अशी एक मैत्रीण का असावी , याचं उत्तर शोधणारा हा सुंदर चित्रपट आहे.
मर्यादांची पूर्ण जाणीव ठेवून, 'माझं तुझ्यावर प्रेम आहे' असं एकमेकांना बिनधास्त सांगू शकणारे मित्र मैत्रीण..त्यांची उलगडत जाणारी गोष्ट म्हणजे... सहेला रे..
-- गौरी सचिन पावगी
Image source : google
October 8, 2022
तक्षशिला विद्यापीठाला सर्वप्रकारचे वित्तीय सहाय्य समाजाकडून केले जात असे. कारण गुरु, विद्यार्थ्यांची भोजन व वास्तव्याची सोय करीत असत. कुठल्याही विद्यार्थ्याला शुल्क भरायची सक्ती नसे.
June 27, 2023
दोन रेल्वे रुळांमधील अंतर सारखे राहण्यासाठी स्लिपर्सचा वापर केला जातो. सर्वात प्रथम लाकडी स्लिपर वापरले गेले. डॉग स्पाईक नावाच्या मोठ्या खिळ्यांनी त्यावर रूळ बसविले जायचे. या स्लिपरचे आयुष्य दहा ते १५ वर्षांचे असते. हळूहळू लाकडी स्लिपरऐवजी स्टील स्लिपर अथवा कास्ट आयर्न स्लिपरचाही वापर सुरू झाला.
जसजशी रेल्वे प्रणालीमध्ये सुधारणा होत गेली तसतसे या गोष्टींचेही आधुनिकीकरण करण्याची जरूर भासू लागली. कारण या स्लिपर्स अतिवेगाने जाणाऱ्या गाडयांसाठी कमकुवत ठरु लागल्या. त्यामुळे भारतीय रेल्वे बोर्डाने तज्ज्ञांची एक समिती नेमली. त्यांनी कॉंक्रिटचे स्लिपर्स वापरण्यासंबंधी सूचना केली. लाकडी स्लिपरऐवजी काँक्रिटचे स्लिपर वापरण्याने जंगलतोड वाचणार होती आणि ट्रकचे आधुनिकीकरण पुढे नेता आले असते.
अशा तऱ्हेने १९६४-६५ च्या सुमारास हे स्लिपर्स प्रायोजिक तत्वावर वापरणे सुरू झाले. काँक्रिट स्लिपर्सचे आयुष्य ५० वर्षांचे असते. त्यामुळे खर्चात बचत झाली.
काँक्रिटच्या स्लिपर्समध्येही दोन प्रकार होते. एका प्रकारात दोन ब्लॉक होते. ते एका लोखंडी पट्टीने जोडावे लागायचे. तर दुसरा सलग ब्लॉक लाकडी स्लिपरप्रमाणे असे. नंतर त्यात सुधारणा करुन प्रीस्ट्रेस्ड काँक्रिटच्या स्लिपर्स बनवल्या गेल्या. काँक्रिटच्या स्लिपर्स अधिक ताकदवान असून वजनाने हलक्या असतात.
१९८०-९० मध्ये सुप्रीम कोर्टाने लाकडी स्लिपर्स वापण्यावर बंदी आणली. त्यामुळे आता भारतीय रेल्वेमध्ये सर्वत्र नव्या स्लिपर्स काँक्रिटच्याच वापराव्या असा दंडक आहे.
आता हळूहळू मुख्य मार्ग, मग दुय्यम मार्ग अशा तऱ्हेने लाकडी, लोखंडी व स्टील स्लिपर्स काँक्रिटच्या स्लिपर्सने बदलले जात आहेत.
कोकण रेल्वे ही पहिल्यापासून १५० किलोमीटर वेगाने गाडया जातील अशा हिशेबाने त्यातील सर्व यंत्रणा तयार केली असल्याने तेथे पहिल्यापासूनच काँक्रिटचे स्लिपर्स वापरले गेले आहेत.
आता भारतात मालाच्या वाहतुकीसाठी दिल्ली-कोलकता आणि मुंबई-दिल्ली असे दोन स्वतंत्र मार्ग बनविले जात आहेत. त्यांच्यासाठी आणखी शक्तिशाली आणि प्रभावी स्लिपर्स लागणार असून तसे ते बनविले जातील.
लाकडी स्लिपरऐवजी सिमेंटचे स्लिपर घाालणे केव्हा सुरू झाले ?
April 5, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti