वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ह्याचा वृक्ष असतो ज्याची साल पांढरी धुसर असते.पाने बारीक व मेंदीच्या पानांसारखी असतात.फुले लहान व पांढरी असतात.फळाची साल कडक व रंग भुरकट पांढरा असतो.आतील गर पिवळा काळसर असतो व ह्यात भरपूर बिया असतात.
ह्याचे कच्चे फळ उष्ण आंबट,तुरट व वातपित्तकर व कफनाशक असते.
ह्याचे पिकलेले फळ गोड,आंबट,तुरट,थंड व त्रिदोष शामक असते.
आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया:
१)पिकलेल्या फळाचा मगज साखर घालून खाल्ल्यास वाढलेले पित्त कमी होते.
२)अन्न सेवनाची इच्छा नसल्यास २ चमचे कवठाचा गर हा सुंठ मिरी व पिंपळी चुर्ण एकत्रित पणे १/२ चमचा,१ चमचा मध,१ चमचा साखर घालून खावा.
३)कोरडा खोकला येत असल्यास कवठाचा गर जुना गुळ घालून खावा.
४)पोटात भुक असणे पण तोंडास रूची नसणे ह्यात कवठाची गुळ घातलेली चटणी १-३ चमचे खावे व लगेच जेवावे.
५)उचकी वारंवार लागत असल्यास कवठाचा कोळ व गुळ हे चाटण चाटून खावा.
६)थुकीतून रक्त पडणे आवळकाठी चुर्ण १ चमचा,१ चमचा कवठाचा गर ,१चमचा मध हे मिश्रण घेतल्यास उत्तम लाभ मिळतो.
कवठाचे फळ अतिमात्रेत खाल्ल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 18, 2016
आई व बाळाची काळजी घेणारी सुईण हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. स्त्री गरोदर असल्यापासून तर ती प्रसुत झाल्यावर स्त्री व बाळाची सुखरूपपणे नि:स्वार्थीपणे काळजी घेणारी सुईण असते.
May 5, 2022
शब्दांमध्ये इतकी व्यापकता, समर्थता सामावलेली असते की, ज्याप्रमाणे चिंतामणी मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो, अगदी त्याचप्रमाणे शब्दांमध्येही माणसाच्या मनातल्या सगळ्या इच्छा पुर्या करण्याचं सामर्थ्य असतं.
January 22, 2022
लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 3
लॅबच्या रिपोर्टच्या मागील बाजूला एक वाक्य अजून छापलेले असते.
Individual laboratory investigations are never conclusive, but should be used along with other relevant clinical examinations to achieve final dignosis.
त्याचा भावार्थ असा की, आम्ही दिलेले हे तपासणीचे रिपोर्ट हे कदापि अंतिम निदान असत नाही. रुग्ण जी लक्षणे सांगत असतो, त्यातील लक्षणाबरोबर हा रिपोर्ट अभ्यासून पहावा. आणि त्यानंतरच अंतिम निदान करावे.
याचा दुसरा सरळ अर्थ असा होतो, जिवंत रुग्ण जी लक्षणे सांगतोय ती, निर्जीव यंत्र सांगत असलेल्या रिपोर्टपेक्षा, जास्त महत्वाची असतात. कोणत्याही यंत्रावर पूर्णपणे विसंबून राहू नका. अहो साधा वजन काटाच घ्या ना, चार वजन काट्यावरचे आपलेच वजन वेगवेगळे येते. रेल्वे स्टेशनवरच्या चकाकत्या मशीनमधले वजन वेगळे, बस स्टॅन्ड वरचे वेगळे, रेल्वेच्या ब्रीजवरील एक रूपयातले वजन वेगळे, दवाखान्यातले वेगळे, जीम मधल्या काट्यावरचे वेगळे. असे का होते ? प्रत्येक मशीनमधले हे तांत्रिक दोष असतात. कुणाची स्प्रिंग जुनी असते तर कुणाचा सेल संपत आलेला असतो, कुणाचा बॅलन्स गेलेला असतो, तर कुणाचा पाया पक्का नसतो.
पण वजन करणाऱ्याचं काय ? त्याचं वजन तर बदलत रहातं ना !
यंत्र जेवढं मोठं तेवढी त्यातली गुंतागुंत जास्त.
बरं हे कोण सांगतंय तर, ज्या लॅबमधे आपण तपासणीसाठी जातो, त्या लॅबला असलेली कायदेशीर बंधने सांगत आहेत. जर चुकुन कोणी या दिलेल्या रिपोर्टविरोधात कोर्टात तक्रार वगैरे करायला जाणार असेल तर, त्याचाही काही उपयोग होणार नाही. कारण 'कंडीशन ऑफ रिपोर्टींग'मध्ये आणखी एक वाक्य लिहिलेले असते.
"This medical dignostic report is not valid for medico legal purposes."
आहे ना गंमत ?
आश्चर्य वाटण्यासारखे आणखी एक विधान त्यावर लिहिलेले आढळते...
It is presumed that....
हे गृहीत धरले आहे, (काय? )
The test performed on the specimen belongs to the patients name or identified.
की, हा रिपोर्ट त्याचा आहे, ज्याचे नाव त्या सॅपलच्या बाटलीवर लिहिलेले आहे, ( म्हणजे त्याचेच असावे, असे वाटते. ) नक्की सांगता येणार नाही, की ते रिपोर्ट त्याचेच असतील.
दिलेल्या रिपोर्टमधे एवढी संदिग्धता का ? एवढासुद्धा विश्वास ठेवायचा नाही का ?
मग विश्वास नेमका कोणत्या यंत्रावर ठेवावा ?
समर्थ म्हणतात,
"या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही"
हे यंत्र ज्याने निर्माण केले, तो परमात्मा
आणि ज्याच्याकडे शरीर, मन इंद्रियांसह, सांभाळायला दिले, तो अंतस्थ आत्मा, यांच्यावरच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.02.2017
February 17, 2017
विंदा नेहमी म्हणत असत काही कविता ह्या मृत झाल्या पाहिजेत , मरणे आवश्यक असते नवीन काळात त्या कालबाह्य होणे आवश्यक असते परंतु दुर्देवाने काही घटना काही गोष्टी नष्ट होतं नाही .
September 2, 2021

जुडिथ क्लॅट आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयोगांनुसार हा सोळा तासांचा कालावधी, जीवाणूंकडून होणाऱ्या प्राणवायूच्या निर्मितीच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरला होता. दिवसाचा कालावधी सोळा तासांपर्यंत पोचल्यानंतर, जीवाणूंकडून होणारी प्राणवायूची निर्मिती वाढून वातावरणातल्या प्राणवायूचं प्रमाण वाढू लागलं.
December 19, 2021
भारतीय प्राचीन परंपरेत देवदेवतांना अत्यन्त महत्व असून भारतीय पारंपारिक संस्कृती ही श्रद्धा, भक्ती, प्रेरित आहे. भारतभूमी ही देवांची,
September 11, 2021


पंच्याहत्तर वर्षांपूर्वी बालपणी या तिघांची गट्टी जमली तेव्हा मुंबईचं महानगर झालेलं नव्हतं. समुद्राकाठच्या शांत, रम्य नगरीमध्ये बाळाराम आणि माधवराव हुतूतू, आट्यापाट्या, लगोर््या खेळत मोठे होत होते. त्यातच १९२३ मध्ये त्यांना कलकत्त्याहून मातृवियोगाचं दु:ख घेऊन आलेला प्यारेलाल भेटला आणि त्यांच्यातलाच झाला. सुरुवातीला ते त्याला ‘बंगालीबाबू? म्हणायचे. हा बंगालीबाबू लवकरच मराठी शिकला आणि इथल्या समाजजीवनाशी एकरूप झाला. गणपती, होळी साजरी करू लागला.
January 5, 2001
सारांश सांगायचा तर या क्षणाला भारत-चीन व्यापार बंद केला तर त्याचा सर्वात मोठा फटका भारताला बसेल.
October 21, 2016
यू ट्यूब वर राज्य सभा चॅनेलवरील “विरासत “हा एस डी वर (बर्मनदा ) बनविलेला कार्यक्रम बघत होतो. एकदम एस डी -आर डी ही पिता -पुत्रांची जोडी आठवली. कार्यक्षेत्र एक पण स्पर्धा नाही, कारण दोघांची संगीतावर स्वतंत्र नाममुद्रा ! प्रत्येकाचे गाणे ओळखू येते. नातं रक्ताचं असलं तरी रचना परक्या !
April 12, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti