(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री मीनाक्षीस्तोत्रम् – १

    श्रीविद्यॆ शिववामभागनिलयॆ श्रीराजराजार्चितॆ
    श्रीनाथादिगुरुस्वरूपविभवॆ चिन्तामणीपीठिकॆ ।
    श्रीवाणीगिरिजानुताङ्घ्रिकमलॆ श्रीशांभवि श्रीशिवॆ
    मध्याह्नॆ मलयध्वजाधिपसुतॆ मां पाहि मीनाम्बिकॆ ॥ १ ॥

    भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी मीनाक्षी पंचरत्नम् सोबतच मीनाक्षी स्तोत्रम् या नावाची ही एक नितांत सुंदर रचना साकारली आहे.
    यात आई मीनाक्षीचे वैभव वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात,

    श्रीविद्यॆ- शाक्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या श्रीविद्या स्वरुपिणी. शिववामभागनिलयॆ- भगवान शंकरांच्या डाव्या भागात अर्थात येथे असणाऱ्या हृदयात निवास करणारी. श्रीराजराजार्चितॆ- सामान्य जीवावर सत्ता गाजवतो त्याला राजा म्हणतात. अनेक राजांवर सत्ता गाजवतो तो राजराज. अशा अनेक सम्राटांनी अर्चना केलेली.

    श्रीनाथादिगुरुस्वरूपविभवॆ- भारतीय संस्कृतीत वैभवशाली उपासना मार्ग विद्यमान आहे त्यापैकी एक श्रेष्ठ मार्ग आहे नाथपंथ. हे सर्व नाथ आई जगदंबे ला आपली गुरु मानतात. तिचे हे गुरुस्वरूपच तिचे दिव्य वैभव आहे. चिन्तामणीपीठिकॆ - चिंतामणी रत्नाच्या आसनावर विराजमान असणारी.

    श्रीवाणीगिरिजानुताङ्घ्रिकमलॆ - श्री म्हणजे देवी लक्ष्मी, वाणी म्हणजे देवी सरस्वती आणि गिरीजा म्हणजे देवी पार्वती, या त्रिगुणात्मिका तीन देवता जिच्या चरण कमलाला वंदन करतात अशी.

    श्रीशांभवी- भगवान शंकरांची सहधर्मचारिणी.

    श्रीशिवॆ- अत्यंत पवित्र, शुद्ध.

    मलयध्वजाधिपसुतॆ- दक्षिणे मध्ये असणाऱ्या पांड्य राजवंशातील मलयध्वज राजा ने आपली पत्‍नी कांचनमाला हिच्यासोबत भगवान शंकराची तपश्चर्या केल्यावर त्यांच्या आशीर्वादाने कन्या रुपात प्रकट झालेल्या,

    मध्याह्नॆ मां पाहि मीनाम्बिकॆ- हे मीनाम्बिके या मध्याह्न काळात माझे रक्षण कर.मध्याह्न समयी अर्थात दुपारी सूर्य मस्तकावर असणे हा सर्वाधिक तापदायक काळ. अशा या तापातून माझे रक्षण कर.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 25, 2020


  • मूळनावात बदल नको !

    उच्चशिक्षीत लोक फक्त स्वतः पुरता हा विषय मिटवून मोकळे होतात आणि समाजातील खालच्या वर्गात या अशा प्रथा तश्याच सुरू राहतात. आपल्या देशातील एक वर्ग पुरोगामी होतोय आणि एक वर्ग सनातनी होत चाललाय. एक वर्ग संस्कृती मानायला तयार नाही आणि एक वर्ग संस्कृती सोडायला तयार नाही. या दोन्ही वर्गाना आनंदी ठेवण्याच महान कार्य सध्याच्या टी.व्ही. वरील मालिका करीत आहेत. 

      January 7, 2014


  • श्री गणपतिस्तोत्रम् – भाग ४

    विरञ्चिविष्णुवन्दितं विरूपलोचनस्तुतं!
    गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया !!
    निरंतरं सुरासुरै: सपुत्रवामलोचनै:!
    महामखेष्टकर्मसु स्मृतं भजामि तुन्दिलम् !!४!!

    गाणपत्य संप्रदायाने आग्रहाने प्रतिपादित केलेल्या, भगवान गणेशांच्या सर्वपूज्य, सर्वादिपूज्य, परब्रह्म स्वरूपाला जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज नेमक्या शब्दात व्यक्त करीत आहेत.
    आपल्या डोक्यातील श्री गणेशांच्या शिवपुत्र, पार्वतीनंदन या भूमिकेला फाटा देणारा हा श्लोक. मग काय आहे श्रीगणेशांचे नेमके स्वरूप?
    विरञ्चिविष्णुवन्दित- विरंची अर्थात भगवान ब्रह्मदेव. विष्णु,भगवान श्रीहरी. यांनी वंदन केलेले ते विरञ्चिविष्णुवन्दित.
    विरूपलोचनस्तुत- भगवान शंकरांना त्रिनेत्रधारी म्हणतात. हा तिसरा डोळा हे त्यांचे विशेष रूप आहे. त्यामुळे त्यांना विरूपलोचन असे म्हणतात. ते भगवान शंकर ज्यांची स्तुती करतात ते श्री गणेश
    विरूपलोचनस्तुत होत.
    गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया - भगवान श्रीगणेशांकडे पाहण्याची दृष्टीच आमूलाग्र बदलून टाकणारी ही ओळ. भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, गिरीश अर्थात भगवान शंकर. त्यांना दर्शनाची इच्छा झाल्यामुळे देवी पार्वतीने ज्यांना प्रगट केले आहे असे आहेत श्री गणेश.ते शिवपुत्र नाहीत. केवळ पार्वतीनंदन नाहीत. त्या दोघांनाही वंदनीय आहेत‌. त्यांना दर्शनाची इच्छा होते त्यावेळी प्रार्थना करून ते ज्यांना प्रगट करतात ते मोरया आहेत, "गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया ". निरंतर अर्थात सातत्यपूर्णरीत्या, नेहमी.
    सुरासुर अर्थात देव आणि दैत्य देखील.
    सपुत्रवामलोचनै:- सपुत्र अर्थात मुलाबाळांसह, वामलोचना अर्थात स्त्री.पत्नी.
    महामखेष्टकर्मसु- मख म्हणजे यज्ञ. महामख अर्थात सर्व महत्वाची कार्ये.सर्व कार्ये यज्ञस्वरूप असावीत हा भाव. इष्टकर्म अर्थात अपेक्षित गोष्टींच्या प्राप्तीसाठी केलेले कर्म.
    सगळ्यांचा एकत्रित अर्थ करता, देव आणि दैत्य देखील आपल्या अपेक्षित कामाला पूर्ण करण्यासाठी यज्ञ करताना, आरंभी विघ्न विनाशासाठी ज्यांचे स्मरण करतात असे.
    तुंदिल- धष्टपुष्ट, गुबगुबीत. अशी देहयष्टी असणाऱ्या त्या भगवान गणेशांचे मी स्मरण करतो.

      January 10, 2020


  • नवरात्री विशेष

    वातावरण, व्यक्ती.. ह्यांचा प्रभावापासून मुक्त असलेली आत्मा दुसऱ्याला positive energy देऊ शकते. विचारांचे परिवर्तन सर्व गोष्टीना परिवर्तन करते. लक्ष्मीदेवीचे हात वरदानी, धन देताना दाखवतात म्हणजेच जी आत्मा भरपूर व शक्तिशाली आहे तीच निस्वार्थ राहून देऊ शकते.

      September 29, 2022


  • तीर्थ निर्माल्य औषध

    मी गेले वीस वर्षे पुण्यात व पुण्याजवळ मिळणार्‍या 190 फुलांच्या औषधी उपयोगावर माझ्या पध्दतीने संशोधन केले व करत आहे. ह्या संशोधनातून मला असे लक्षात आले की खास देवाना वाहण्याची जी फुले आहेत ती सर्व सामान्य व पिरीआॅडिकली येणार्या आजारांवर उपयोगी आहेत. त्याची माहिती पुढे देत आहे.

    झेंडू--कफयुक्त खोकल्यावर उत्तम. सर्दी पडसे, डोळ्याचा नंबर वाढणे,मोती बिंदू, काच बिंदू वर उपयोगी.

    गुलछडी--बध्दकोष्टता, कोलायटीस, कोरडा खोकला, अंगाला सूज, पायाला सूज, किडनी फेल, क्रिएटेनिन वाढणे, ब्लड यूरिया वाढणे इत्यादी वर उपयोगी.

    शेवंती-- अॅसिडीटी, पोटातील जळजळ, संडासला खडा होणे, लघवीला आग होणे, कोरडा खोकला, लिव्हरला सूज इत्यादीवर उपयोगी.

    बिजली--पाळीला पोटात दुखणे, प्रोस्टेट वाढणे, पित्त वाढणे इत्यादीवर उपयोगी.

    जास्वंद--कंपवात, मॅनेंन्जायटीस,लिव्हरला सूज, बध्दकोष्टता,कोलायटीस इत्यादीवर उपयोगी.

    पारिजातक--तोंड येणे, सर्दीपडसे, डोळ्याचा नंबर वाढणे, डोळे लाल होणे, पाळीला पोटात दुखणे, मोनोपाॅजचा त्रास, अंगावर काळे डाग, इसब,चट्टे गाठी उठणे, संडासला साफ न होणे, इत्यादीवर उपयोगी.

    गलांडी-- घशासाठी उत्तम.

    सोनचाफा--पाळी लांबणे, पाळीला गठ्ठे पडणे, गुडघे दुखी, आमवात, हाडाचा क्षय, स्वरयंत्र, थायराॅईड, लघवीली आग होणे इत्यादीवर उपयोगी.

    दुर्वा-- गर्भाशय, ओव्हरीज, प्रोस्टेट याच्या उष्णतेवर काम करतात, टाच दूखीवर उपयोगी.

    बेल-- बेलामुळे शरीरातील हीट कमी होते हा मूळव्याध, बी पी, मधुमेहा साठी उपयोगी आहे.

    फुलाचा औषधी उपयोग करण्यासाठी फुल पाण्यात काही तास भिजवून ते पाणी प्यावे लागते.

    देवावर फुले वाहतो ती दूसरे दिवशी तशीच असतात. तो पर्यंत त्यातील औषधी अंश काही प्रमाणात देवाचे मुर्तीला चिकटतो व पूजा करताना तो अंश पाण्यात उतरतो आणि ते पाणी तीर्थ म्हणून वापरले जाते. त्यात औषधी गुणधर्म असल्यामुळे पूर्वजानी त्याला पवित्र ठरवून हे तीर्थ पिण्याची प्रथा पाडली व समाजाचे आरोग्य सहज राखण्याचा प्रयत्न केला.

    आम्ही आधुनिक शिक्षणामुळे तीर्थ पीत नाही टाकाऊ, अस्वच्छ ठरवतो. आणि स्वत:चाच तोटा करून घेतो.

    -- अरविंद जोशी, पुणे
    BSc

      June 3, 2017


  • माझी ‘दर्या’दिली : सुएझ कालवा व्हाया सोमालिया

    सिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होतं. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि रुंदी सुद्धा खूपच जास्त होती. एवढ्या मोठ्या जहाजाच्या इंजिन, इतर मशिनरी तसेच पंपिंग सिस्टीम वर यापूर्वी कामाचा अनुभव नव्हता.

      October 19, 2019


  • श्री आनंद लहरी – भाग १

    जगज्जननी माॅ त्रिपुरसुंदरी आदिशक्तीचे स्तवन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य महाराज ज्या अपूर्व आनंदाचा अनुभव घेत आहेत त्या आधारे त्यांनी या स्तोत्राचे आनंदलहरी असेच नामकरण केले आहे.

      February 5, 2020


  • मिरॅकल ऑफ सेंच्युरी

    मुंबईच्या फोर्ट भागातील एस्प्लनेड मॅन्शन या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील वॉटसन हॉटेलमधे ऑगस्ते व लुई या ल्युनिअर बंधूंनी पॅरिस मध्ये त्यांच्या या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत उत्कृष्टता सिद्ध केल्यानंतर भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.

      July 7, 2021


  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – १

    आई जगदंबेचे अत्यंत दिव्य स्वरूप म्हणजे श्री अन्नपूर्णा. भगवान महाकाल विश्वनाथ आपल्या क्षुधाशांतीसाठी आई जगदंबे च्या समोर भिक्षेकरी रूपात उभे राहतात. ती काशीपूर निवासिनी त्यांना भिक्षा देते. भगवान जगद्गुरु आदी शंकराचार्य महाराज या स्तोत्रात त्या अन्नपूर्णेचे स्तवन करीत आहेत.

      February 27, 2020


  • जीवन कसे जगावे

    मी पाठीशी आहे, हे जो स्मरतो तो सामना करतो आणि ज्यास माझा तणावात विसर पडतो, तो सहन करतो

      December 21, 2017