वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्यासाठी दोन सूत्र सांगितले -पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे.
विकल्परहितसंकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला माहित पाहिजे. जर आपल्यालाच लक्ष्य माहित नसेलतर आपण कुठेच पोहचू शकत नाही. डॉक्टर, इंजिनीअर किंवा अकाऊंटेंट- काहीही बनायचे असेल तर अभ्यास हि वेगळा करावा लागतो. योगी बनण्यासाठी योग साधना करावी लागेल तर गाणे शिकण्यासाठी योग्य गुरूच्या मार्गदर्शनात रियाज करावा लागेल. अर्थात जीवनात लक्ष्य निर्धारित करणे गरजेचे. पोहणे न शिकतातच नदीत उडी मारणार्यांपैकी काहीच भाग्यशाली लोक असतात जे नदीत वाहणाऱ्या ओंडक्याच्या मदतीने दुसर्या किनार्यावर पोहचतात बाकींच्या नशिबी नदीत बुडणेच.
अखंड पुरुषार्थ: एकदालक्ष्य निश्चित केल्यावर त्याच्या प्राप्तीसाठी निरंतर प्रयास कारणे गरजेचे. एक दिवस १० तास अभ्यास करणारा आणि ५ दिवस झोपणार्या विद्यार्थीला चांगले मार्क्स मिळणे अशक्यच. त्या पेक्षा दररोज नियमित २ तास अभ्यास करणार्याला चांगले मार्क्स मिळण्याचीशक्यता जास्त. तसेच दुकानदार असो वा चाकर, दररोज नियमितपणे कार्य करणे गरजेचे असतेच. आपले उद्दिष्ट साधण्यासाठी निरंतर कार्य करणे म्हणजेच तपस्या होय. या साठी आपल्याला ३ गोष्टींची गरज आहे - स्वस्थ शरीर, ज्ञान आणि अनासक्त कर्म.
स्वस्थ शरीर: निरंतर कर्म करण्यासाठी स्वस्थ निरोगी शरीराची आवश्यकता असते. शरीर जर रोगग्रस्त किंवा दुर्बल असेल तर इच्छा असूनही आपण निरंतर कार्य करू शकत नाही. आता माझेच उदाहरण या घटकेला दिल्लीत थंडी आहे, कमरेचे जुने दुखणे पुन्हा वर आल्यामुळे इच्छा असूनही काम्पुटर वर टंकन करणे शक्य होत नव्हते. साहजिकच आहे शरीर दुर्बल आणि रोगी असेल तर आपण निरंतर कार्य करू शकणार नाही आणि आपले उद्दिष्ट हि साध्य करू शकणार नाही. मनात निराशा घर करेल. मन हि रोगी रोगी बनेल. म्हणूनच म्हंटलेले आहे. 'शरीर माध्यम धर्मं खलु साधनम'. कुठलेही कार्य, मग जप-तप, योग, अभ्यास, नौकरी-धंधा आणि शेती. शरीर निरोगी असणे गरजेचे. त्या साठी निरंतर योग आणि व्यायाम आवश्यक आहे.
ज्ञान: लक्ष्य प्राप्ती साठी लक्ष्यावर पोहचण्यासाठी लागणारे ज्ञान हि आवश्यक असते. डॉक्टर बनण्यासाठी वैद्यकीय प्रशिक्षण घ्यावे लागते. त्या शिवाय आपण डॉक्टर बनू शकणार नाही. तसेच एखाद्या उंच पर्वतावर चढायचे असेल तर पर्वतावर चढण्याचे प्रशिक्षण व त्या साठी लागणारे सर्व उपकरण, या सर्वांची गरज असते. त्या शिवाय आपण पर्वतावरचढू शकत नाही. व्यापार करायचा असेल तर त्या धंद्याची इत्यंभूत माहिती असणे गरजेचे, अन्यथा व्यापारात नुकसान हे होणारच.
अनासक्तकर्म: आपल्या उद्दिष्ट प्राप्ती साठी आपण अखंड पुरुषार्थ केला तरी हि कित्येकदा आपल्या हातात नसणाऱ्या घटनांमुळे कार्य सिद्ध होत नाही. आपले केलेले कर्म वाया जाते, त्यातून निराशेची भावना मनात घर करते. उदा: एका विद्यार्थ्याने मेडिकलच्या परीक्षेसाठी उत्तम अभ्यास केला, परीक्षेत हि सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य रीतीने दिली. पण कुठल्या तरी परीक्षा केंद्रात पेपर फुटला. परीक्षारद्द झाली. कुठलीही चुकी नसतानाही त्या विद्यार्थाची मेहनत फुकट केली. प्राकृतिक प्रकोप- पूर, वादळ, भूकंप, अग्नी या शिवाय चोरी, डकैती, अस्थिर राजकीय परिस्थिती इत्यादींचा परिणाम हि आपल्या कर्मांवर होतोच. कर्मावर आसक्ती असेल तर निराशा मनात घर करणे साहजिकच. या शिवाय कधी-कधी असे हि होते, थोडी बहुत सफलता मिळताच, आपल्या कर्माचे आणि पुरुषार्थाचे फळ मिळाले, असे समजून आपण पुरुषार्थ करणे सोडून देतो. आपल्या कर्माच्या आसक्तीत गाफील राहिल्यामुळे काही काळानंतर बदलत्या परिस्थितीचा फटका त्यांना बसतो. स्वर्गीय धीरूभाई अंबानी जर एक कारखाना लाऊन चैनीत बसले असते तर आज एवढा मोठा रिलायन्स समूह दिसला नसता. बाबा रामदेव हि एक योगपीठ टाकून स्वस्थ बसले नाही. त्यांनी फूडपार्क, ग्रामोद्योग, आयुर्वेद अनुसंधान आणि प्राकृतिक शेतीच्या संवर्धनाचे कार्य हि हातात घेतले. या शिवाय भविष्यात मोठ्या प्रमाणावर आचार्यकुलम उघडण्याची हि योजना आहे. अर्थातच एक लक्ष्य पूर्ण होताच, दुसरे लक्ष्य निर्धारित करणे व त्या साठी अखंड पुरुषार्थ करणाराच आपले उद्दिष्ट गाठण्यात सफल होतो. काळ आणि परिस्थिती निरंतर बदलत असते त्यामुळे पुरुषार्थ हि निरंतर करावाच लागतो. लाभ-हानी, जय-पराजय याचा विचार न करता जो माणूस अखंड पुरुषार्थ करत राहतो, तो आपल्या उद्दिष्टात निश्चित सफल होतो.
सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
-- विवेक पटाईत
January 2, 2016
कोणत्याही सांघिक खेळातच काय पण रोजचे काम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी व ते करताना येणार्या सर्व प्रकारच्या अडीअडचणींना तोंड देण्यासाठी संघ भावना अत्यंत आवश्यक आहे. आपल्याकडे सर्व प्रकारच्या संस्थांमधे संघभावना अभावानेच आढळते. संघ भावना निर्माण न होण्यात कोणत्या गोष्टी अडसर ठरतात हे जाणून घेतले पाहिजे.
October 11, 2018
भगवान श्री गणेश यांचे वैभव सांगणाऱ्या या श्री गणेशपंचरत्न स्तोत्राच्या शेवटी भगवान जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य महाराज हा फलश्रुती स्वरूप श्लोक रचित आहेत.
January 6, 2020
या तपासामध्ये अल्ट्रासाऊंड (ध्वनीलहरी) यांचा वापर मुख्यत्वे पोटातील व स्त्रियांच्या गर्भाशय व गर्भामध्ये होणार्या रोगामध्ये होतो व ध्वनिलहरी, क्ष किरणांपेक्षा खूपच सौम्य असल्याने यांचा त्रास गर्भाला अजिबात होत नाही.
October 23, 2010
१ जानेवारी २००२ या दिवशी युरो या चलनानं त्या-त्या देशाच्या मूळ चलनाची जागा घेतली. म्हणजेच जर्मनीत १० मार्कची नोट घेऊन आता कुणी बाजारात गेलं तर त्या चलनाला काही अर्थ उरला नव्हता. फक्त युरोमध्येच सगळे व्यवहार होणार असं आता ठरलं होतं. यामुळे आता १२ देशांमधल्या साधारण ३० कोटी जनतेला फक्त युरो हे एकच चलन वापरायचं होतं.
January 5, 2019
मानवी जीवनावर बरेच दुरगामी परिणाम करण्याच सामर्थ्य अनेक वनस्पतींनी दाखवून दिलं आहे. भविष्यात वनस्पती खूप महत्वाच्या ठरवणार आहेत हे त्यांच्या सर्वंकष गुणांमुळे दिसून येत आहे. माणसापुरता विचार केला तर अन्न, वस्त्र निवारा, प्राणवायू/ऑक्सिजन या गरजा तर वनस्पतींमुळे पुऱ्या होतातच पण औषधं, पेयं, रंगद्रव्य, अन्नाला चव आणणारे पदार्थ आणि चविपरीची विविधता असणारी फळं, फुलं वनस्पती पासूनच मिळत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बारश्यापासून ते इतर सर्व खाण्याचे पदार्थ बनविण्यासाठी/वापरासाठी पदोपदी वनस्पतीजन्य पदार्थ आपण वापरीत असतो. आज आपल्याला अश्याच एका नवीन वनस्पतीची माहिती बघ्याची आहे.
February 4, 2013
मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे. याची चर्चा आपण मागच्या आठवड्यात केली. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म …… ही साखळी अशीच चालू होती म्हणूनच माझा जन्म होअू शकला.
मी आणि माझ्या बायकोनं, आमच्या अपत्यांना जन्म दिला. त्या अनुषंगानं केलेली ही कविता वाचा आणि त्यावर मनन करा.
माझ्या शुक्राणूत होतं
माझ्या आअीबाबांच्या अनेक
पूर्वपिढ्यातून संक्रमित
झालेलं आनुवंशिक तत्व,
माझ्या बायकोच्या
पक्व बीजांडात होतं
तिच्या आअीबाबांच्या अनेक
पूर्वपिढ्यांतून संक्रमित झालेलं आनुवंशिक तत्व.
आमच्या अपत्याचा जन्म
हा आमचा निर्णय होता
या पृथ्वीवर जन्म घेण्याशिवाय
अपत्याला दुसरा पर्यायच नव्हता
माझा शुक्राणू … बायकोचं पक्व बीजांड …
आमच्या अपत्याचा जन्म ….
आमच्यातील आनुवंशिक तत्वाचा
पुनर्जन्म.
सजीवांच्या ….
जनक-जननींच्या
अनेक पूर्वपिढ्यातून
संक्रमित झालेलं
आनुवंशिक तत्वंच
अपत्यरुपानं अनेक
पुनर्जन्म घेत असतं
आनुवंशिक तत्व हाच
सजीवांचा आत्मा आहे.
तोच अपत्यरुपानं पुढच्या पिढीत
जन्म घेत असतो
आनुवंशिक तत्व
दोन जिवंत शरीरातून
तिसर्या जिवंत शरीरात
प्रवेश करतं ….
अेका मेलेल्या शरीरातून
दुसर्या जिवंत शरीरात नाही.
वासांसि जीर्णानि …. ।।गीता :: 2 :: 22।।
हा श्लोक
आत्म्याच्या आनुवंशिक सिध्दाताला
मान्य नाही
सजीव मेला की संपला
त्याचा या पृथ्वीवरील जन्म हा
पहिलाच आणि शेवटचाच असतो.
प्रेताची प्रत्येक पेशी
सडते विघटन पावते आणि
अणूरेणूंच्या स्वरूपात
पर्यावरणात विलीन होते.
जन्ममृत्यूचं हे चक्र नसून
जन्म-पुनर्जन्माची ही साखळी आहे.
हे ध्यानी घे, मनुजा…मानवा…
हे ध्यानी घे.
सजीव, वयात आला … म्हणजे जननक्षम झाला …. म्हणजे तो पुढच्या पिढीला जन्माला घालतो. पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला जन्माला घालते, पुढच्याच्या पुढची पिढी, पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्याच्या पुढची पिढी ….. ही साखळी, जोपर्यंत या पृथ्वीवर, सजीवांच्या अस्तित्वाला पोषक अशी परिस्थिती आहे तो पर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत दोन जिवंत शरीरातून अेक चेतना, तिसर्या जिवंत शरीरात संक्रमित होत राहणार आहे हे ही विज्ञानीय सत्य आहे.
-- गजानन वामनाचार्य
शनिवारचा सत्संग - ३
शनिवार १० डिसेंबर २०१६
सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व
आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत
December 10, 2016
या अनंत कोटी ब्रह्मांडांच्या निर्मिती स्थिती आणि लयाचे कारण असणाऱ्या परब्रह्म परमात्मा स्वरूप भगवान श्रीविष्णूंच्या त्या सकल संचालक स्वरूपाचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…
October 20, 2020
एक भुकेलेला मुलगा काहीतरी खायला दे असे म्हणत आईकडे जातो. खरेतर कोणत्याही मातेसाठी लेकराच्या भुकेपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नसते. ते नसायलाही नको असे समाज समजतो.
June 4, 2006
माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी....तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेअून मी हे लेख लिहिले आहेत.
जेव्हा मानव भोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, निसर्गातील घटना घडण्यामागं प्रचंड शक्ती आणि कमालीची सुसूत्रता आहे. मानवाचा मेंदू विचार करू लागला तसा, केलेल्या निरीक्षणांचे, त्याच्या मेंदूच्या कुवतीनुसार आणि आधी घेतलेल्या अनुभवांच्या बळावर, स्पष्टीकरणेही देअू लागला.
पहिला विचार कोणता आला असेल तर तो हा की, हा निसर्ग कुणीतरी शक्तिमान व्यक्तीनं निर्माण केला असावा आणि त्याचं नियंत्रणही तोच अतिशय हुशारीनं करीत आहे. ....ती व्यक्ती म्हणजेच अीश्वर ही संकल्पना रूढ झाली आणि हजारो वर्षांपासून आजही मानवाचं श्रद्धा आणि पूजास्थान आहे. ही श्रद्धाच त्याला जीवनभर तारते आहे, मार्ग दाखविते आहे.
दुसरा महत्वाचा विचार म्हणजे सजीवांच्या शरीरात कोणतीतरी दिव्य चेतना असली पाहिजे. जोपर्यंत त्याच्या शरीरात ही चेतना जागृत असते, कार्यक्षम असते तोपर्यंत तो सजीव त्याचे सर्व व्यवहार … म्हणजे आहार .. अन्न मिळविणं, त्यासाठी भटकंती, संघर्ष, आक्रमण किंवा प्रतिकार करणं, प्रजोत्पादन करणं वगैरे सुरळीतपणं करता येतात. जेव्हा ही चेतना त्या सजीवाच्या शरीरातून निघून जाते तेव्हा तो सजीव अचेतन होतो, मरतो. याच चेतनेला त्यानं नाव दिलं … आत्मा.
अीश्वर आणि आत्मा या दोन संकल्पना, मानवाचा मेंदू विचार करू लागला तेव्हापासून रूढ झाल्या आहेत. पुढे अनेक धर्म स्थापन झाले आणि त्या सर्व धर्मात अीश्वर आणि आत्मा या संकल्पना अग्रभागी राहिल्या.
सोमवार 26 जून 2000 रोजी, अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन आणि अिंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी संयुक्तपणे, मानवाच्या जनुकीय नकाशाचं काम पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. जनुकीय नकाशाचं काम, डॉ. जे. क्रेग व्हेंटर यांनी, खाजगीरित्या पूर्ण केलं. सरकारी यंत्रणेत हे काम 1986 साली, कॅलिफोर्निया विद्यापीठात सुरु होतं आणि ते अेप्रिल 2003 मध्ये पूर्ण झालं.
ही बातमी वाचून माझ्या मेंदूत आनुवंशिक तत्व, सजीवांचा जन्म आणि सजीवांची शरीरं यासंबंधी, तसंच झाडांच्या बिया आणि अंकुरित झाडं या संबंधी विचार घोळू लागले.
या विचारांचा गोषवारा मी लिहिलेल्या पुढील चार लेखात आला आहे. हे लेख, मराठी विज्ञान परिषद पत्रिका, (सप्टेंबर 2000), शिक्षण संक्रमण पुणे, (ऑक्टोबर 2000), मराठी विज्ञान परिषद पत्रिका, (दिवाळी, नोव्हेंबर 2000), किर्लोस्कर (डिसेंबर 2000) प्रसिध्द झाले. नंतर मुंबअी तरूण भारत, (25 जानेवारी 2002), मुंबअी तरूण भारत, (1 फेब्रुवारी 2002), अमृत (मार्च 2002), अमृत (जुलै 2002), असे चार, जास्त माहिती असलेले माझे लेख प्रसिध्द झाले. त्यानंतर मात्र हा विषय थोडा मागे पडला. तरी पण मेंदूत विचार चालूच होते.
त्यानंतर नोव्हेंबर 2008 ते मे 2009 या काळात, मी अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यातील ओरलॅन्डो शहरी माझ्या मोठ्या मुलीच्या घरी वास्तव्यास होतो. त्याच सुमारास, अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्यूस्टन शहरातून श्री. दिवाकर कारखानीस,www.sawali.org हे संकेतस्थळ चालवीत होते. त्यावर मी दोन अध्यात्मिक निबंध लिहीले. अेक "अध्यात्म आधी की विज्ञान आधी अवतरले?" आणि दुसरा "अीश्वराची संकल्पना".
ओरलॅन्डो शहरात काही भारतीय व्यक्ती, रोज संध्याकाळी 7 वाजेपासून 8 वाजेपर्यंत अेका रेडियो स्टेशनवर, भारतीयांसाठी, माहितीपर, वैचारिक आणि करमणूकप्रधान कार्यक्रम सादर करीत असत. त्यातील अेक संचालिका, शोभना डॅनियल, माझ्या मुलीची (सौ. पालवी जहागिरदार) मैत्रिण होती. शोभनाजवळ, माझी मुलगी, माझ्या अध्यात्मिक लिखाणाबद्दल बोलली. तिला माझे लेखही वाचायला दिले. ते शोभनाला अितके आवडले की तिनं नजिकच्या मंगळवारी, रेडियोवर माझा कार्यक्रम ठेवला. तो अितका रंगला की नंतरचे तीन मंगळवार असे अेकूण चार कार्यक्रम झाले.
चौथा कार्यक्रम चार प्रतिनिधींच्या स्वरूपात झाला. सामान्य माणूस म्हणून स्वत: शोभना, विज्ञानीय दृष्टीकोनातून अध्यात्माकडे पाहणारा मी, ओरलँडो, फ्लॉरिडा येथील, हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका येथे, हिंदूधर्म आणि अितर धार्मिक ग्रंथांवर संशोधन करणारे आणि तेथे अध्यापन करणारे, मूळचे न्यू यॉर्क विद्यापीठातील संगणक अभियंता डॉ. अभिनव द्विवेदी आणि अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या तरूण पिढीला अध्यात्माबद्दल काय वाटतं याचा प्रतिनिधी म्हणून 16 वर्षांचा अतीश पटेल या चार व्यक्तीत चर्चा झाली. यातील शोभना आणि मी, रेडियो स्टेशनात, अभिनव द्विवेदी, ओरलॅन्डो शहरापासून 150 मैलावरील टांपा शहरात तर अतीश पटेल त्याच्या घरी होता.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने...विज्ञानीय अीश्वर (Science God), आत्मा, आत्म्याचं शरीरातील स्थान, पुनर्जन्म, मागील जन्मातील बरीवाअीट कर्मे आणि त्यांचा वर्तमान जन्मावरील परीणाम, पाप, पुण्य, मोक्ष, जन्ममृत्यूचे फेरे, स्वर्ग, नरक, यम आणि त्याचा मृत्यूफास, जपजाप्य, पोथ्या/मंत्र पठण वगैरे अनेक अध्यात्मिक विषयांवर चर्चा झाली. "आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत" आणि भगवत् गीतेतील काही श्लोकांचा विज्ञानीय अन्वयार्थ लावणं या अुपक्रमाचे बीज
तेथेच रुजलं.
या विश्वात, अमूर्त असं काहीही नसतं, सगळे घटक मूर्त स्वरूपातच असले पाहिजेत. अीश्वर आणि आत्मा हे ही अपवाद नाहीत. त्यापैकी आत्म्याचं मूर्तस्वरूप म्हणजे सजीवांच्या शरीरात असलेलं आनुवंशिक तत्व ... जेनेटिक मटेरिअल.
हाच माझा आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत.
गजानन वामनाचार्य, मुंबअी.
शनिवारचा सत्संग - 1
शनिवार 26 नोव्हेंबर 2016
पूर्वप्रसिध्दी : आपले जग, किर्लोस्करवाडी -
27 फेब्रुवारी 2012
November 26, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti