(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निर्णय क्षमता

    माणसाच्या अनेक क्षमतांपैकी निर्णय क्षमता खूप महत्त्वाची आहे.कोणतेही कार्य निर्णय घेतल्याविना आरंभ देखील होत नाही.बरीच कार्य फक्त निर्णय घेण्याअभावी थांबलेले असतात, निर्णय न घेणे ही चालढकल तर त्यास विलंब करणे मतिमंदत्व आहे.तीक्ष्ण बुद्धी असेल तर निर्णय तातडीने होतात.

      January 4, 2024


  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सत्तावन्न

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 13-पुष्प पहिले

    तिलक लावल्यावर पुष्प देऊन स्वागत केले जाते. जसे व्यासपीठावरील पाहुण्यांचे, तसेच देवाचे पण !
    यथा लाभोद्भव, कालोद्भव, सुगंधीत पुष्पं समर्पयामी । असं सांगून फुलं वाहिली जातात. "माझ्या शक्तीनुसार, ऋतुनुसार, जी काही शक्य होती ती सुगंधित फुले आणून, ती मी तुला वाहातो आहे, ती तू मान्य करून घे. आणि याच्या सुवासाने नेहेमी प्रसन्न रहा."

    हे कोणाला उद्देशून सांगायचं? ज्याने ही सुंदर सृष्टी निर्माण केली त्याला ? की, सृष्टीमधे फुलं निर्माण करणाऱ्याला ? की फुलांमधे सुगंध घालणाऱ्याला ? की एवढी किमया जो करू शकतो त्याला ? या सगळ्या उपचाराची आणि चार दोन फुलांची त्याला आवश्यकता असेल ? नक्कीच नाही. ही विनंती, प्रार्थना या सौंदर्याचा उपभोग घेणाऱ्यांसाठी आहे.

    तुझेच तुजला अर्पण, हा भाव ठेवून हा पुष्पालंकार देवाला वहायचा.

    विविधता म्हणजे काय हे ते या फुलांकडून समजून घ्यावे. त्यांचे रंग, सुवास, उमलण्याच्या वेळा, टिकून रहाण्याचे सामर्थ्य, पुनः नवनिर्मितीसाठी माता होऊन, फळात रूपांतरीत व्हायचं, सारंच अद्भुत !

    हे सारं "तो" कोणासाठी करतोय ?
    फक्त मानवासाठी करीत असेल तर जिथे मानव नाही, अशा ठिकाणी देखील फुले बहरत असतातच की ! पशु पक्ष्यांसाठी ? त्यांच्यासाठी पण नाही. कारण त्यांना तशी सौंदर्यदृष्टी नाही. काहीजण त्यातील फक्त मध घेतात, काहीजण पायाखाली तुडवून जातात.अत्यंत स्वार्थी आणि अरसिक !
    मग ही अलौकिक पुष्प निर्मिती कोणासाठी ?

    त्याच्या स्वतःसाठी !
    त्याच्या स्वतःच्या आनंदासाठी !
    कोणी पाहो अथवा न पाहो....
    तिथे कुणी येवो वा न येवो.....
    देवाच्या चरणावर जावो अथवा सरणावर..
    झाडावरच झुरायचे की कुठेतरी दूर जात लहरायचे....
    औषधे टिकवण्यासाठी आंबवून घ्यायचे की गजऱ्यात जावून बसायचे....
    गंधाने ओथंबून जायचे की गंध दिला नाही म्हणून अबोलीच रहायचे ....
    प्रेमिकेसाठी पलंगावर पहुडायचे की गणिकेसाठी मनगटात जायचे....
    काट्यावर उमलायचे की पाण्यावर डुलायचे...
    उन्हात तापत गुलकंद होऊन घ्यायचे,
    की
    पाण्यात पडून पाणी सुगंधीत करायचे...
    फुल होऊन फुलांकडे पहायचे....
    आणि
    प्रत्येक क्षणाला त्याला स्मरायचे !

    या साऱ्यावर फक्त त्याचाच अधिकार आहे. स्वतःला आनंद व्हावा, असं प्रत्येकालाच वाटतं, कारण प्रत्येकामधेच तो भरून राहिला आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    06.06.2017

      June 6, 2017


  • नोटा बंदीचे धोरण आणि चलन बदल

    नोटाबंदीचा सर्वात मोठा परिणाम लघु उद्योगांवर झाला, नोटबंदीपूर्वी बहुतांशी उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होत होते. नोटाबंदीच्या काळात या उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होणे बंद झाले, रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे उद्योग ठप्प झाले. परंतु पुढील काळात परिस्थिती सुधारली.

      December 29, 2022


  • आज नवरात्रीचा रंग पिवळा (पिवळ्या रंगाची हळद)

    आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीला आयुर्वेदामध्ये ” हरिद्रा ” म्हणतात. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

      October 7, 2021


  • हात दाखवून अवलक्षण?

    यंदाच्या यवतमाळात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नामवंत कवयित्री अरुणा ढेरे यांची बिनविरोध  निवड झाल्यामुळे मराठी संमेलनाला लागलेला वादाचा शाप यावेळी पुसला जाणार, असे वाटत असतानाच उद्घाटकांच्या निमंत्रणावरून संमेलनाच्या सहा दिवस आधी निर्माण झालेल्या वादाने सगळ्या उत्साहावर पाणी फिरवले आहे.

      January 10, 2019


  • बहुगुणी आपटा

    आपट्याचे झाड सर्वांना ऐकून, वाचून माहिती असते, पण फार थोड्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले असते.

    दसऱ्याला सोनं म्हणून आपट्यांची पानं वाटायची असतात, याचे ज्ञान सगळ्यांना असते; पण क्वचितच कोणी खऱ्या आपट्याची पाने वाटत असतील! याचे कारण कांचनाच्या विविध जातींशी असलेले त्यांचे साम्य. बिचाऱ्या कांचनाच्या झाडांचे बेसुमार खच्चीकरण, पर्यावरणाची हानी, कचरा समस्या आणि चुकीच्या आणि कालबाह्य समजुतीवर आधारलेली ही घातक प्रथा कमी होत चालली आहे, ती पूर्णपणे बंद होण्याची आवश्‍यकता आहे. संस्कृतमध्ये "वनराज' म्हणून गौरविला गेलेला हा वृक्ष शततारका नक्षत्राचा आणि कुंभ राशीचा आराध्यवृक्ष मानला गेलाय. दसऱ्याला त्याची रोपे वाटावीत, लागवड करावी, फार तर पूजाही करावी.

    आपट्याचे अश्‍मंतक हे नाव दोन अर्थांनी महत्त्वाचे आहे. अश्‍मंतक म्हणजे दगडाचा, खडकाचा नाश करणारा. त्याची मुळे जमिनीत खोलवर जातात. खडकाच्या फटीत शिरून वाढतात, कालांतराने फटी मोठ्या होऊन खडक दुभंगतात, अक्षरशः फुटतात! त्यामुळे खडकाळ, मुरमाड, उघड्या, बोडक्‍या टेकड्यांवर आणि माळांवर वनीकरणासाठी हे एक आदर्श झाड आहे. अश्‍मंतक याचा दुसरा अर्थ "मूतखडा (किडनी स्टोन) होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा, मूत्रावाटे बाहेर काढण्यास मदत करणारा होय.' धन्वन्तरी निघण्टूमध्ये आणखी औषधी उपयोग असे दिले आहेत.

    अश्‍मनंतकः कषायस्तु हिमः पित्तकफापहः।
    मधुरः शीतसंग्राही दाहतृष्णाप्रमेहजित्‌ ।।

    पित्त आणि कफदोषांवर गुणकारी; दाह, तृष्णा आणि प्रमेह यांवर विजय मिळवणारा! साल, पाने, शेंगा आणि बिया औषधात वापरतात.

    उपयुक्त आणि टिकाऊ
    आपट्याचे लाकूड मजबूत आणि टिकाऊ असते. पण झाडे लहान आणि वेडीवाकडी वाढणारी असल्यामुळे त्याचा उपयोग फक्त शेतीची अवजारे, हत्यारांचे दांडे इ. तयार करण्यासाठी होतो. उष्मांक मूल्य (कॅलॅरिक व्हॅल्यू) भरपूर असल्यामुळे सरपण, इंधन म्हणून ते फारच चांगले असते. त्याच्या राखेमध्ये लोह, चुना, पोटॅश, मॅग्नेशियम, गंधक, सोडियम व स्फुरद इत्यादींची संयुगे असतात. (कृषी ज्ञानकोश खंड 2 रा) त्यामुळे ती खत म्हणून वापरण्यास चांगली असते. जनावरांना, विशेषतः शेळ्यांना याचा पाला पौष्टिक चारा म्हणून उपयोगी पडतो. तंतुमय सालीपासून मजबूत व टिकाऊ दारे बनवतात. पानांचा उपयोग तेंदुपत्तीप्रमाणे बिड्या तयार करण्यासाठीही करतात. गावाच्या सीमेवर आणि शेताच्या बांधावर ही झाडे लावावीत, असे जुन्या ग्रंथात सांगितले आहे. झाडे खूप वर्षे जगणारी, तोडली तरी पुन्हा फुटणारी, मुळे खोल जाणारी असल्यामुळे हद्दी निश्‍चित राहतात. छोटेखानी झाडांमुळे पिकांना सावलीचा त्रास तर होत नाहीच, उलट जमिनीचा कस वाढविण्यास त्यांचा उपयोग होतो. आपट्याच्या मुळांवर नत्रस्थिरीकरण करण्याच्या करम्याच्या गाठी असतात.

    संस्कृतमध्ये आपट्याला कितीतरी नावं आहेत - वनराज, चन्द्रक, आम्लपत्रक, युग्मपत्र, मालुकापर्ण, कुद्दाली इत्यादी. इतर काही भाषांतली नाव अशी ः हिंदी - अष्टा, कचनाल, घिला, झिंझोरी; गुजराती - असुंद्रो ः बंगाली - बनराज, बनराजी; कन्नड - औप्टा, बन्ने, आरेपत्री; तमीळ - अराईवत्ता, आरेका; तेलगू - आरी, आरे. वनस्पतीशास्त्रीय नाव आहे बाउहिनिया रेसिमोसा. बाऊहिनिया हे प्रजातीनाम बाउहिन नावाच्या दोन वनस्पतीशास्त्रज्ञ बंधूच्या स्मरणार्थ दिलं असून कांचनाच्या सर्व जातींचा समावेश त्यात केला जातो. रेसिमोसा म्हणजे विशिष्ट प्रकारचा फुलांचा तुरा येणारे झाड. त्यात फुले देठाकडून टोकाकडे उमलत जाणारी असतात. बहावा, चिंच, गुलमोहर यांच्या कुळातला हा वृक्ष आहे (फॅमिली सिसालपिनेसी).

    उन्हाळ्यात फुलणारा आपट्याचा वृक्ष 2 ते 5 मीटर उंच वाढतो, कित्येक वेळा झुडूपवजा आणि वेडावाकडा वाढलेला दिसतो. तो पानझडी असली तरी जास्त पावसाच्या प्रदेशात पानगळ अल्पकाळासाठी होते. बुंधा 5 ते 25 सें.मी.व्यासाच असून साल काळसर तपकिरी रंगाची, खडबडीत, भेगाळलेली दिसते. कात्रज घाटातल्या एका वृक्षाच्या खोडावर मोठे अणकुचीदार काटे पाहायला मिळाले. फांद्यांचे शेंडे बहुधा खाली वाकलेले (ड्रूपिंग) असतात. खोडा- फांद्यांची आंतरसाल गडद गुलाबी दिसते. पाने एकांतरित, साधी, दुभागलेली, लांबीपेक्षा रुंदीला जास्त (2 - 5 ु 3 - 6 सें.मी.), चामट (कोरियारियस) वरच्या बाजूला गुळगुळीत हिरवीगार तर खालच्या बाजूने फिक्कट आणि लवयुक्त असतात. तळापासून निघालेल्या 7 ते 9 शिरा स्पष्ट, उठावदार दिसतात.

    फुलण्याचा हंगाम उन्हाळ्यात (मार्च - जून) असून फुलोरे (मांजिऱ्या, रेसीम्स) डहाळ्यांच्या अग्रभागी आणि पानांच्या देठाजवळही येतात. फुले लहान (1 ते 1.5 सें. मी.) हिरवट - पिवळसर - पांढरी, पाच निमुळत्या पाकळ्यांची असतात. कळ्या लांबट, टोकदार दिसतात. पुकेसर 10 असून ते सुटे, सूक्ष्म आणि केसाळ असतात. पावसाळ्यात वीतभर लांबीच्या चपट्या, वाकड्या, हिरव्या शेंगा झाडावर दिसू लागतात, त्या कित्येक महिने झाडावर राहून पुढच्या उन्हाळ्यात पिकून काळ्या होतात. प्रत्येक शेंगेत 12 ते 20 काळ्या, चपट्या लंबगोल बिया असतात. बिया सहजपणे रुजून रोपे तयार होतात.

    आपट्याची झाडे भारतात सर्वत्र, अगदी आसेतूहिमाचल पाहायला मिळतात. जंगलात वाढतात आणि लावलीही जातात. पुणे जिल्ह्याच्या मावळ भागात (पर्जन्यमान 1000 ते 2000 मि. मी.) विपुल प्रमाणात झाडं आहेत. बाजी पासलकर जलाशयाच्या काठावरील "इको- व्हिलेज'मध्ये कितीतरी छान वाढलेली झाडे पाहायला मिळतात, तर मध्य प्रदेशातील राजस्थान सीमेवरील राजगढ जिल्ह्यातील निमवाळवंटी प्रदेशातही (पर्जन्यमान 250 ते 500 मिमी) ती मोठ्या संख्येने आढळतात. रोपवाटिकामधून रोपे मिळू शकतात. कोणत्याही हवामानात, कसल्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकतात. जमिनीची धूप थांबवण्यासाठी ही झाडे मुद्दाम लावली जातात. त्याच्या मुळांना फुटवे (रूट सकर्स) येतात, त्यांच्या रूपाने शाकीय पुनरुत्पादन घडून येते. अत्यंत उपयोगी, बहुगुणी अशा या वृक्षकाची लागवड वनशेती आणि ऊर्जालागवडीसाठी (एकसुरी लागवड टाळून) सर्वत्र आवर्जून करावी. उद्यानात, छोट्या परसबागेत, रस्ता दुभाजकांमध्ये, शेताच्या कुंपणावर आणि बांधावर, कॅनालच्या बाजूने लावण्यासाठी अश्‍मंतक हा एक उत्तम "वनराज' आहे.

    -- प्रा. श्री. द. महाजन

      March 3, 2017


  • श्री भ्रमरांबाष्टकम् – ८

    कर्पूरागरुकुङ्कुमाङ्कितकुचां कर्पूरवर्णस्थितांकृष्टोत्कृष्टसुकृष्ट कर्मदहनां कामेश्वरीं कामिनीम् ।
    कामाक्षीं करुणारसार्द्रहृदयां कल्पान्तरस्थायिनीं
    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये ॥ ८॥

    कर्पूर- कापूर

    आगरु- काळे चंदन

    कुङ्कुम- कुंकू

    अङ्कितकुचां- यांनी वक्षस्थल व्याप्त असलेली. या सगळ्यांची उटी आई जगदंबेने शरीराला लावली आहे. कर्पूरवर्णस्थितां- कापरा प्रमाणे शुभ्र पांढऱ्या रंगाची.

    कृष्टोत्कृष्ट- कृष्ट म्हणजे निम्न तर उत्कृष्ट म्हणजे अप्रतिम.

    सुकृष्ट- सुयोग्यरीत्या केलेले,

    कर्मदहनां - कर्माला जाळून टाकणारी.
    कर्माची रचना एखाद्या बीजाप्रमाणे असते. बीज ज्या प्रकारचे असते वृक्ष त्या प्रकारचा निर्माण होतो. तसे कर्म जसे असते तसे फळ प्राप्त होते. मात्र जर हे बी भाजले आणि नंतर पेरले तर ते उगवत नाही. त्याप्रमाणे एकदा आई जगदंबेची कृपा प्राप्त झाली की मग कोणत्याही कर्माचे फळ अर्थात बंध लागत नाहीत.

    कामेश्वरीं - सर्व कामना अर्थात इच्छांची अधिष्ठात्री.

    कामिनीम् - भक्तांच्या, साधकांच्या सकल कामना पूर्ण करणारी.

    कामाक्षीं- काम म्हणजे इच्छा. अक्षी म्हणजे निवास. सकल कामनांचे निवास अर्थात मूळ स्थान. करुणारसार्द्रहृदयां- कारुण्य रसाने जिचे हृदय भरलेले आहे अशी. कल्पान्तरस्थायिनीं-
    भगवान श्री ब्रह्मदेवांच्या दिवसाच्या शेवटी या संपूर्ण विश्वाचा जो लय होतो तो पर्यंतच्या काळाला कल्प म्हणतात. त्यावेळी सर्वकाही नष्ट होते. मात्र त्यावेळी सुद्धा नष्ट होणारी आदिशक्ती कल्पान्तरस्थायिनी संबोधिली जाते.

    श्रीशैलस्थलवासिनीं भगवतीं श्रीमातरं भावये - श्रीशैल पर्वतावर निवास करणाऱ्या आई जगदंबेचे मी भजन करतो.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

      April 10, 2020


  • पुन्हां एकदा : १० मे १८५७

    आणि, म्हणूनच, आपण सर्वांनी, तें, १८५७ चें, स्वातंत्र्ययुद्ध लढणार्‍या आपल्या known-unknown पूर्वजांचें आदरानें, कृतज्ञतापूर्वक स्मरण करायला हवें. तें आपलें कर्तव्यच आहे.

      May 11, 2018


  • गोवा मुक्ती दिन

    १९ डिसेंबर १९६१ रोजी गोव्यात तिरंगा फडकला आणि गोवा मुक्त झाला. दीव आणि दमन आधीच मुक्त झाले होते. या तिघांना मिळून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाला. नंतर १९६७ साली सार्वमताने गोवा घटक राज्य म्हणून घोषित झाले. गोवा, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशात १९६३ साली निवडणूक झाली.

      February 26, 2019


  • किचन क्लिनीक – खजुर

    किचन क्लिनीक – खजुर

    आसमान से टपके खजुर में अटके हि म्हण सर्वांनाच माहित असणार.तर हा खजुर आपल्या सर्वांचाच आवडता पण ह्याचे खरे राष्ट्रीयत्व अरब देश आहे बरं का.म्हणजेच काय तर हा परदशी पाहुणा आपल्या देशात आला आणी आपलाच बनून गेला.

    अत्यंत रूचकर फळ आपण सुक्यामेव्यात पण ह्याचा चांगलाच फडशा पाडतो नाही का.अत्यंत पौष्टिक देखील आहे हा.खजुराची चटणी अगदी कशावर ही छान लागते,खजुर बर्फि,खजुर घातलेली शेवयांची खीर,किंवा पक्वान्नांमध्येच कशाला नुसता देखील हा सुरेख लागतो.

    ह्याचा सुपारीच्या झाडा सारखे दिसणारे झाड असते.ते बरेच उंच असते आणी त्याला हे खजुर लागतात. खजुर चवीला गोड असतात,थंड असतात व हे शरीरातील वात व पित्त दोष कमी करतात.

    चला आता ह्याचे घरगुती उपाय पाहूयात:

    १)संडासला साफ होत नसल्यास २-३ खजुर रात्री पाण्यात भिजत घालावेत व सकाळी ते पाण्यात कुचकरून ते पाणी प्यावे.

    २)जुनी जखम बरी होत नसेल कर त्यावर खजुराचे पोटीस बांधावे व खजुर तुपासह खावा.मात्र हि जखम मधुमेहामुळे झाली नसावी.

    ३)४ खजुर+ १ चमचा शिंगाडा पीठ तुपावर परतावे व खाऊन त्यावर दुध प्यावे.ह्याने रक्त कणांची वाढ होते.

    ४)लहान मुलांना दात येत असताना होणाऱ्या जुलाबात मधासह खारीक उगाळून द्यावी.

    ५)डोके दुखत असल्यास खारकेचे बी उगाळून कपाळास लावावे.

    ६)घामोळ्यांवर खजुराचे बी उगाळून लावावे.

    ७)खजुराचे बी कुटून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे व ते पाणी पिण्यासाठी वापरावे ह्याने अंगातील उष्णता कमी होते व वारंवार लागणारी तहान देखील.

    ८)खजुराच्या बिचा लेप उगाळून तो पापण्यांवर लावल्याने डोळे लाल होणे,डोळ्यांची आग होणे कमी होते.

    खजुर अतिखाल्ल्यास भुक मंदावणे,अजीर्ण व जुलाब होतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      December 21, 2016