(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वनसंवर्धन दिन

    आज दिनांक २३ जुलै. आज वनसंवर्धन दिन साजरा केला जातो. मंडळी नावातच हा दिन का साजरा केला जातो ह्याचा एक अंदाज आपल्याला येतो. आपण नेहमी ऐकतो की निसर्ग आपला मित्र आहे. खरोखरच हे वाक्य अगदी सत्य आहे. अगदी जगद्गुरू संत तुकोबारायांनीही त्यांच्या अभंगात वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे असे सांगितलं आहे.

      July 23, 2020


  • बाटलीतले पाणी

    बाटलीतले पाणी विकत घेउन पिणे ही एक फॅशन झालेय का? हा प्रकार गेल्या काही वर्षातच फोफावला आहे. खरं आहे की बाटलीतलं पाणी शुद्ध असतं, त्याने पोटाचे विकार-बिकार होत नाहीत वगैरे वगैरे. पण त्यासाठी विकत घेतलेल्या बाटलीतलंच पाणी प्यायला हवं असं कुठे आहे? घरातूनही पाणी बाटलीत भरुन घेउन जाता येतंच की? पण त्याने स्टेटस खाली येतं असं मंडळींचं म्हणणं असतं. १ रुपयाचं पाणी १५-२० रुपयाला घेतलं की स्टेटस वाढतं म्हणे !

    आता काही मजेदार गोष्टी बघूया.

    आपण एखाद्या मोठ्या नावाजलेल्या हॉटेलमध्ये जातो. टेबलावर स्थिरस्थावर होत नाही तोच वेटर आपल्याला विचारतो... “साहेब, पाणी बिसलरीचं की साधं?” (तो मराठीत विचारत नाही हा भाग वेगळा)

    आपण आजुबाजूला नजर टाकतो. आपल्याबरोबरच्या माणसांना उगाचच विचारल्यासारखं करतो आणि त्याला ऑर्डर देतो... “बिसलरी”.

    आपल्याला हे माहित असतं का, की ग्रेड १ च्या सगळ्या हॉटेल्समध्ये वॉटर प्युरिफायर बसवणं हे कायद्याने बंधनकारक आहे. मग जर त्या हॉटेलमध्ये वॉटर प्युरिफायर बसवला असेल तर मुळातच त्या वेटरने आपल्याला बिसलरी हवंय का असं विचारायलाच नको. पण तो त्या हॉटेलवाल्याच्या व्यवसायाचा भाग झाला.

    वेटरने विचारलेला एक साधा प्रश्न.... आणि त्याच्या उत्तराने आपण फटकन पंधरा-वीस रुपयांचा चुराडा करतो. स्टेटससाठी !

    बरं आता तो वेटर आपल्यासाठी पाण्याची बाटली घेउन येतो. ती बहुतेकवेळा बिसलरीची नसते. कुठल्यातरी भलत्याच ब्रॅन्डची असते. आपण मात्र काहीही न बोलता ती निमूटपणे उघडतो आणि त्यातलं पाणी समोरच्या ग्लासात भरुन प्यायला सुरुवात करतो. इथे आपल्या त्या बाटलीतल्या शुद्ध पाण्याचे बारा वाजलेले असतात कारण तो ग्लास कुठच्या पाण्यात धुतलाय हे आपण लक्षातच घेत नाही !

    काही विशिष्ट हॉटेल्समध्ये पाणी दिलं जात नाही. तिकडे पाण्याची बाटलीच विकत घ्यायला लावतात. मॅकडोनल्ड हे त्यातलंच एक. काही वर्षापूर्वी माझं तिकडे त्यावरुन भांडण झालं. खाद्यपदार्थ विकणार्‍या कोणत्याही हॉटेलमध्ये गिर्‍हाईकाला पाणी मोफत द्यायला पाहिजे असा नियम आहे. तो नियम दाखवून पाणी न दिल्याबद्दल तक्रार करीन असे सांगितल्यावर निमूटपणे मला ग्लासमधून पाणी दिलं गेलं. किती जण या मार्गाचा अवलंब करतात?

    काही गोष्टींना एखाद्या ब्रॅंडच्या नावाने ओळखलं जातं. आपण झेरॉक्स काढतो. खरंतर ती फोटोकॉपी काढली जाते आणि त्यासाठी पहिलं मशीन आलं ते झेरॉक्स कंपनीचं म्हणून फोटोकॉपी म्हणजे झेरॉक्स असं समीकरण झालं. मी पूर्वी एकदा उत्तर प्रदेशातल्या मधल्या एका गावातल्या एका दुकानात उभा होतो. एका ग्राहकाने “लालवाला कोलगेट देना” असं त्या दुकानदाराला सांगितलं आणि दुकानदारानेही शांतपणे “क्लोज-अप”ची लाल टूथपेस्ट कार्ढून दिली.

    “बिसलरीचं पाणी” याचं पण तसंच आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही सीलबंद पाण्याच्या बाटलीला बिसलरी म्हटलं जातं. सिलबंद पाण्याचा हा हजारो कोटींचा धंदा आहे. तो असा सहजासहजी बंद होणार नाही. कारण त्या धंद्यावर आज एक इकॉनॉमी चालते. १ रुपयाचं पाणी २० रुपयांना विकल्यामुळे आज काही कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात सातत्याने वाढ होते.

    या बाटलीबंद पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांवरही एक समांतर अर्थव्यवस्था (parallel economy) चालते हे माहित आहे? सर्वसाधारणपणे ७० टक्के ग्राहक रिकाम्या बाटल्या तशाच टाकून देतात. या बाटल्या जमा करुन पुन्हा भरुन आपल्यालाच विकणं हा एक प्रचंड मोठा धंदा सुरु आहे. साधारणपणे रेल्वे स्टेशन, बस स्टॉप अशा ठिकाणी अशा रिसायकल केलेल्या बाटल्यांमधलं, कुठेही भरलेलं पाणी आपल्याला विकलं जातं.

    आता आणखी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे बघू. या बाटलीबंद पाण्याला एक एक्सपायरी डेट असते. मात्र ती बाटलीवर अशा प्रकारे आणि अशा ठिकाणी छापलेली असते की सहजपणे आपल्याला ती दिसतच नाही आणि शोधत बसायला एकतर आपल्याला वेळ नसतो किंवा ती डेट शोधत बसणं हे आपल्या तथाकथित स्टेटसच्या आड येतं. आपण म्हणाल की पाण्याला कसली आलेय एक्सपायरी डेट. पण लक्षात घ्या पाण्याला एक्सपायरी डेट नसली तरी पाणी प्लास्टिकच्या बाटलीत किती दिवस साठवून ठेवायचं त्याला असते.

    इतर कोणत्या देशात पिण्याचं बाटलीबंद पाणी वापरलं जातं हे तपासायला पाहिजे. कदाचित हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच देश निघतील आणि त्यातही “मेरा भारत महान”चं स्थान सर्वात वरचं असेल.

    -- निनाद प्रधान

      March 25, 2016


  • चंदू चॅम्पियन/मुरलीकांत पेटकर

    चंदू चॅम्पियन या नावाने मुरलीधर पेटकर यांचा बायोपिक तरुणांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, फक्त त्यांनी तो पाहायला हवा.कर्तुत्वाला आशेची झालंर असली की कुठल्या कुठे झेप घेता येते. व्यंगालाही स्वप्नं असतात. स्वप्नांना फुलवतां आलं की आयुष्य सुंदरच आहे.

      June 12, 2025


  • देखभाल आणि आपत्कालीन यंत्रसामग्री

    रेल्वेसेवा व्यवस्थित सुरू राहण्यासाठी तिची देखभाल ही अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यासाठी विशेष प्रकारची यंत्रे वापरावी लागतात. तसेच, अपघातासारख्या संकटकालीन परिस्थितीतसुद्धा विशेष प्रकारच्या सामग्रीचा वापर करावा लागतो. देखभालीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीची ही ओळख…

      February 25, 2024


  • निरंजन – भाग ५१ – गुरुतत्व!

    माता सरस्वतीची, आपल्या कुलदेवतेची मनापासून ध्यानधारणा करणाऱ्या एका सुखी दाम्पत्याच्या घरी पुत्रसुख नव्हते. सुखाचा संसार हा सुरूच होता. आणि एके दिवशी मातेच्या ध्यान-आशीर्वादामुळे पती-पत्नी कैलासनाथ आणि उमा यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. साक्षात देवीचा प्रसाद म्हणुन या कन्येचे खूप लाडामध्ये संगोपन झाले. तिचे नामकरण झाले. नाव ठेवले शिवानी…

      May 28, 2021


  • OK – वय वर्षे १७५

    OK – वय वर्षे १७५

    हा शब्द तुम्ही स्वतः अनेक वेळा उच्चारला असाल आणि असंख्य वेळा इतरेजनांकडून ऐकलेला असाल . कुणी तो OK असा वापरतात तर कुणी Okay असा . या शब्दाला मुद्रित अवस्थेत अवतीर्ण होण्यास आज १७५ वर्षे उलटली आहेत अमेरिकेत प्रकाशित होणाऱ्या ‘ द बोस्टन मॉर्निंग पोस्ट ‘ या दैनिकात OK हा शब्द सर्वप्रथम प्रसिद्ध झाला .

      July 27, 2024


  • श्री शिवापराध क्षमापणस्तोत्रम् – ११

    हृद्यं वेदांतवेद्यं हृदयसरसिजे दीप्तमुद्यत्प्रकाशम् !
    सत्यं शांतस्वरूपं सकलमुनिमन:पद्मषण्डैकवेद्यम् !!
    जाग्रत्स्वप्नेसुषुप्तौ त्रिगुणविरहितं शङ्करं न स्मरामि !
    क्षन्तव्यो मेऽपराध: शिव शिव शिव भो श्री महादेव शंभो !! ११!!

    या स्तोत्राच्या अनेक आवृत्तीमध्ये प्रस्तुत श्लोक उपलब्ध नाही. मात्र कांची कामकोटि पीठाद्वारे प्रकाशित स्तोत्रावली मध्ये समाविष्ट असलेला हा अत्यंत सुंदर श्लोक.
    जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    हृद्यं - अत्यंत मनोहारी असणाऱ्या,
    वेदांतवेद्यं - वेदांत सारखा उपनिषदांमध्ये प्रतिपादित तत्वज्ञानाच्या द्वारे ज्यांची जाणीव होते असे,
    हृदयसरसिजे दीप्तमुद्यत्प्रकाशम् - ज्यांच्या कृपा स्वरूपात हृदय कमला मध्ये भक्तीची दिव्य ज्योत प्रज्वलित होते असे,
    सत्यं - भूत, भविष्य वर्तमान या तीनही काळांच्या अतीत असणारे, परम सत्य,
    शांतस्वरूपं- काहीच मिळवायचे नसल्याने परमशांत असणारे, सकलमुनिमन:पद्मषण्डैकवेद्यम् - सगळ्या ऋषीमुनींच्या हृदय कमलरुपी समर्पणानेच जाळता येणारे,
    जाग्रत्स्वप्नेसुषुप्तौ- जागृती, स्वप्न व सुषुप्ति म्हणजे गाढ निद्रा या माझ्या तीनही अवस्थांमध्ये,
    त्रिगुणविरहितं - तीनही गुणांनी रहित असणाऱ्या,
    शङ्करं न स्मरामि - भगवान शंकरांचे मी कधीही स्मरण केले नाही.
    येथे आचार्यश्री सांगत आहेत की जीव हा तीन अवस्थांमध्ये सारखा तीन गुणांनी युक्त आहे. तर भगवान त्रिगुणातीत आहे. तीन गुणांमुळे प्राप्त होणाऱ्या सकल समस्यांच्या निराकरणासाठी स्थान एकच त्रिगुणातीत भगवान शंकरांची चरणकमले.
    पण जीव त्यांचे स्मरण करीत नाही.
    क्षन्तव्यो मेऽपराध: शिव शिव शिव भो श्री महादेव शंभो - हे भगवान महादेव शंभो शंकरा माझ्या या अपराधा करित मला क्षमा करा.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      July 30, 2020


  • ऐतिहासिक अमृतांजन पूल आजच्या दिवशी पाडला

    ऐतिहासिक अमृतांजन पूल आजच्या दिवशी पाडला

    इंग्रजांनी मुंबई-पुण्यात पाय रोवल्यावर १८३० मध्ये बोरघाटातून खोपोली आणि खंडाळा यांना जोडणारा रस्ता काढला.‌ त्यावेळी स्थानिक धनगर शिंगरोबाच्या मदतीने नागफणी समोरच्या पर्वतरांगेतून खिंड काढण्यात आली. एकावेळी जेमतेम एक वाहन जाऊ शकेल, एवढी अरुंद अशी ही खिंड होती. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची केंद्रे जोडणाऱ्या या रस्त्याने १८३०पासून वाहतूक सुरू झाली, तेव्हा इंग्रजांनी या खिंडीत एक कोनशिला बसवली.

      April 5, 2022


  • जगावेगळी

    त्यांचं वेड जगावेगळंच ,
    अनाकलनीय आहे सगळंच.
    विचार वेगळा वेगळंच जगणं,
    कृतीत प्रत्यक्ष, न पोकळ बोलणं.

      September 8, 2022


  • मनाने कोकणवासी झालो

    मी मूळ सोलापूरचा. सोलापूरजवळ नळदुर्ग म्हणून गाव आहे, उस्मानाबाद जिल्ह्यात तिथे माझा जन्म! कोकणामध्ये माझा पहिला प्रवास झाला तो गोव्यावरून परत येताना मित्रांसमवेत आणि ती पहिली ओळख माझी कोकणची! त्यानंतर हेदवीला आमचा एक प्रयोग होता नाटकाचा, त्या निमित्त कोकणात उतरून असा पहिला प्रवास झाला. हळूहळू कोकणाशी संपर्क वाढला.

      March 3, 2023