वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सन १९८२ मधली घटना… तुर्कस्तानच्या दक्षिण भागात, उलुबुरून म्हणून ओळखला जाणारा, भूमध्य सागरात शिरलेला एक लांबट भूभाग आहे. सागरी स्पंजाचा शोध घेताना एका पाणबुड्याला, या उलुबुरूनच्या किनाऱ्यापासून सुमारे साठ मीटर अंतरावर, समुद्राच्या तळाशी पडलेलं एक जुनं जहाज दिसलं.
January 10, 2023
भूकंपरोधक इमारत म्हणजे भूकंपाच्या धक्क्याते ज्या इमारतीचे कमीतकमी नुकसान होईल ती. भूकंप केव्हा, कधी, कुठे होईल याचे भाकीत करणे कठीण आहे. एखाद्या इमारतीला भूकंपाच्या धक्क्याला सामोरे जावेच लागेल, असे नाही. भूकंपामुळे इमारतीवर अतिरिक्त आडवा (लॅटरल) भार पडतो आणि ती हलते, किंवा धक्का सहन न होऊन पडते. त्यामुळे भूकंपाचा विचार न करता बांधलेली इमारत त्वरित कोसळू शकते.
January 27, 2023
मुळात आयुष्य म्हणजे जगणं असतं का? आता हा फार जटील, गुंतागुंतीचा प्रश्न असला तरी हे जीवन जटील नाहीच. मग का आपण व्यवस्थेच्या बाजारात हे जगणंच हरवून बसतो? का आयुष्यभर इतरांशी तुलना करत… त्यांचं वैभव, त्यांची प्रतिष्ठा बघत स्वत:ला ठेंगणं करून घेतो..?
August 22, 2019
काहीसे गुंतागुंतीचे कथानक असलेल्या या चित्रपटाची तितकीची गुंतागुंतीची पण प्रभावी पटकथा मॅक्लिननेच लिहिली आहे. या संपूर्ण चित्रपटाला पार्श्वभूमी आहे. बर्फाच्छादित आल्प्सपर्वताची. जर्मनीचा बवेरिया प्रांत व ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर आल्प्समध्ये खूप उंचावर असलेल्या श्लॉक अटलर या एका किल्ल्यात यातले बहुतांश कथानक आकार घेते.
December 4, 2021
दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग ही एक खास परंपरा आहे जी भारतातील शेअर बाजारांमध्ये दिवाळीच्या शुभ प्रसंगी आयोजित केली जाते. हा एक शुभ मुहूर्त मानला जातो, ज्यामध्ये ट्रेडर्स आणि गुंतवणूकदार लक्ष्मीपूजनाच्या साक्षीने ट्रेडिंग करतात. या मुहूर्ताला शेअर बाजार काही काळासाठी उघडतो, ज्यामध्ये लोक आपापल्या गुंतवणूकीला नवीन सुरुवात करतात आणि चांगले लाभ मिळविण्याची आशा करतात.
November 3, 2024
चित् म्हणजे चैतन्य, ज्ञान आणि आनंद यांची जणू लतिका म्हणजे वेल. भक्तांना या गोष्टी पुरविणारी. अशी माझी आई जगदंबा आहे.
February 10, 2020
आधी लोक घराच्या दारावर एक माणूस ठेवायचे.
कारण कुणी कुत्रं घरात घुसू नये.
आजकाल घराच्या दारावर कुत्रं उभं ठेवतात.
कारण
कुणी माणूस घरात येऊ नये.
---------------------------------------
पुवीॅ माणूस जेवण घरी
करीत होता. आणि शौचालय बाहेर होत.
आता जेवण बाहेर करतो
आणि शौचालय घरात आहे.
_________
पुवीॅ लग्नात घरच्या स्रिया जेवण बनवायच्या.
आणि नाचणार्या बाहेरून यायच्या.
आता जेवण बनवणाऱ्या बाहेरून येतात.
आणि घरातल्या स्रिया नाचतात.
_________
पुवीॅ माणूस सायकल चालवायचा तो गरीब समजला जायचा.
आता माणूस कारने जिममध्ये जातो.
.... सायकल चालवण्यासाठी.
July 26, 2017
या महिन्याचे पौर्णिमेच्या आजूबाजूला श्रवण नक्षत्र येत असल्याने या महिन्याला श्रावण असे म्हणतात. या महिन्यापासून वर्षाऋतू सुरू होतो. या महिन्यात दररोज कोणते ना कोणते व्रत सांगितले आहे. त्यामुळे या महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. हा महिना चातुर्मासांत येत असल्याने सध्या अनेक लोक संपूर्ण चार महिने नियम पाळणे शक्य होत नसल्याने या महिन्यापुरते तरी नियम पाळतांना आढळतात. उत्तर भारतात या महिन्यांत झुलन यात्रा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, नंदोत्सव वगैरे प्रमुख उत्सव मानतात. तेथे पौर्णिमेचे दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात - हा उत्सव एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत साजरा करतात.
श्रीकृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा करतात. नंदाला पुत्र झाला या समजुतीने हा उत्सव केला जातो. हा महिना निसर्गदृष्ट्या सुद्धा आल्हाददायक असतो. सर्वत्र हिरवेगार वातावरण असते. अनेक फुलांना बहर आलेला असतो व सुवासाने संपूर्ण वातावरण प्रसन्न झालेले असते. श्रावणमासी हर्ष मानसी... ही कविता सर्वांना ' माहीतच आहे. हे सर्व पाहायला, अनुभवायला घेण्यास शहरात न राहता खेडेगावांत, रानात जाणे आवश्यक आहे. हल्ली हे शहरातील लोकांना पहाण्यास मिळत नसल्याने वर्षा सहलींचे आयोजन केले जाते.
-- विद्याधर करंदीकर
August 3, 2016
“आपले दुबईला जाणारे विमान निघण्यासाठी तयार आहे. कृपया, दुबईला जाणाऱ्या प्रवाशांनी द्वार क्रमांक ४ मधून विमानाकडे प्रस्थान करावे.” हरविलेल्या मनःस्थितीत चिरायूने आपली बॅग उचलली, तिकीट हातात घेतले आणि रांगेत सामील झाला. विमानतळाच्या उबदार वातावरणातून बाहेर पडल्यावर तेथील थंड हवेने त्याला पुन्हा एकदा तो अनुभवत असलेल्या सत्याची आठवण करून दिली. विमानाजवळ आल्यावर त्याने स्वतःला पटविले की ‘हेच तर मला पाहिजे होते. इथल्या सर्व समस्यांपासून, निराशेपासून दूर कुठेतरी. स्वच्छ हवा आणि निळे आकाश असलेल्या ठिकाणी. मनातील सर्व दुःख आणि हताशपणा, सर्व आठवणी विसरून जाण्यासाठी.’
August 26, 2026
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 34
नैवेद्यम् समर्पयामी-भाग आठ
नैवेद्य दाखवताना देवाला घास भरवायचे. त्याचा मंत्र आहे, "नैवेद्यम् समर्पयामी." असे म्हणून घास भरवायचे. थोडं थांबून देवाला पाणी प्यायला द्यायचे. त्याचा एक मंत्र असा आहे. "नैवेद्यम् मध्येपानीयं समर्पयामी ! " असे म्हणून देवाला थोडे भरवून झाल्यावर मधेच, ताम्हनामधे एक पळी पाणी सोडावे. आणि पुनः देवाला सहा घास भरवायचे.
हे झाले कर्मकांड.
यात देहासाठी काय आहे ?
हे सर्व जेवायचे कसे पाणी कसे प्यावे याचे शुद्ध आयुर्वेदीय नियम आहेत. जे जे देवासाठी ते ते देहासाठी.
आयुर्वेद मतानुसार पाणी जेवताना मधेमधेच प्यावे म्हणजे प्रकृती सम रहाते. जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने बारीक व्हायला होते,
आणि जेवणानंतर पाणी प्यायल्याने जाड व्हायला होते. अर्थात आपण कसे पाणी प्यावे, हे आपल्या प्रकृतीवर अवलंबून आहे. म्हणजेच वैद्य सल्ला महत्त्वाचा ! उगाच आपले आपल्यावर प्रयोग करू नयेत.
पण सर्वसाधारणपणे पाणी जेवताना मधे मधेच प्यावे, हा नियम आहे हे लक्षात ठेवावे. यासाठी हा नियम देवपूजेमध्ये देखील समाविष्ट केला गेलाय. "मध्ये पानीयं समर्पयामी....."
पाणी कोणी किती कसे आणि का प्यावे, याविषयी सविस्तर टीपा मागील वर्षीच येऊन गेल्या आहेत. पुनरूक्ती दोष टाळतो. फक्त एक उदाहरण सांगतो, नारळाचे दूध किंवा नारळाचा रस काढायचा असेल तर, नारळ वाटतानाच त्यामध्ये पाणी घालावे लागते. अन्यथा रस चांगला निघत नाही.
स्लॅब घालताना वाळू, सिमेंट, खडी, मिक्सरमध्ये एकत्र फिरवतानाच त्यात पुरेसे पाणी मिसळले जाते. अन्यथा लोखंडाच्या फ्रेममध्ये हे मिश्रण योग्य रितीने पसरलेच जाणार नाही. तसेच पाणी जेवता जेवता मधे मधे, स्वतःला आवश्यक असेल तेवढे, जरूर प्यावे. म्हणजे पुढे अन्नरस चांगला तयार होतो. कोणत्या तरी पुस्तकात वाचले म्हणून, कोणीतरी सांगितले म्हणून, डायेटीशियन बोलली म्हणून, टीव्ही वर दाखवले म्हणून, अथवा कोणीतरी पाश्चात्य बुद्धीचा डाॅक्टर सांगतो म्हणून आपण आपल्या भारतीय भोजन परंपरा अजिबात बदलू नयेत. पारंपारिक आहार तसाच घ्यावा. आहाराचे जे अगदी साधे सोपे नियम आहेत, ते उगाच क्लीष्ट करून, शरीरामधे ताण वाढवणारे, चुकीचे नियम, चुकीच्या समर्थनासह करून, सोपे साधे जीवन कठीण करून, रोग वाढवून घेणे आहे.
त्यामुळे पाणी फक्त जेवतानाच प्यावे. तहान नसताना, अन्य वेळी अजिबात नको. अन्य वेळी जे पाणी प्यायचे ते फक्त तळहाताच्या मधे राहील एवढे पळीभरच प्यायचे असते, हा नियम देखील देवपूजेतील आचमनातून आपण शिकलो आहोत.
"मग बाकी सर्वजण पाणी जास्ती प्या" असं का सांगतात? ते त्यांनाच माहिती !!! आपल्याला तहान लागली की, स्वतःला तहान असेल तेवढे पाणी, आपणच ठरवून प्यायचे असते. एवढे लक्षात ठेवावे. बाकी विषय संपला.
तर देवपूजा करणे हे सर्व जीवनावश्यक नियम समजावून सांगणे आहे. हे दररोज सांगावे लागतात. नाहीतर आपली चंचल बुद्धी भ्रष्ट व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून हे सर्व उपचार दररोजच्या पूजेमधेच समाविष्ट करून टाकले.
सततम् क्रिया अभ्यासः । एखादी क्रिया सतत केली गेली की ती अंगवळणी पडते.
आजीआजोबा, आईबाबा यांनी जे नियम ठरवले ते तसेच पाळायचे असतात. स्वतःच्या पाश्चात्य बुद्धीने त्यात बदल केला की, पुढील पिढीला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. जसे भरपूर पाणी प्या, म्हणून एका वडील पिढीने सांगितल्यामुळे आताच्या पुढील पिढीमधे पाण्यामुळे होणारे प्रमेह, रक्तदाब, संधीवात, इ.इ. रोग वाढलेले दिसतात. हे "जनुकीय" बदल नाहीत तर जीवनशैलीतील बदल आहेत, जे आपण बदलवू शकतो. ज्या चुका पूर्वजांनी केल्या त्याच चुका जर सहवास आणि साहचर्याने जर पुढील पिढी करीत राहिली तर जनुकीय बदल न होता, चुकीची जीवनशैलीजन्य रोगांची संख्या मात्र वाढतेय, हे आपण आपल्या डोळ्यासमोर पहातोय.
आपणाला हे सर्व बदलायचे आहे. रोग कमी करायचे आहेत. डायबेटीस रक्तदाब पीसीओडी थायराॅईड यावरील गोळ्या एकदा सुरू झाल्या की, त्या कायम स्वरूपात घ्याव्याच लागतात, हे धादांत खोटे गृहीतक, रोगाबद्दलच्या काही चुकीच्या कल्पना डोक्यातून काढून टाकायच्या आहेत, जीवनशैलीतील दोष काढून टाकून, निरोगी, निरामय, निर्रौषध, जीवनशैली परत स्थापन करायची आहे. यासाठीच ही माझी देवपूजा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.06.2017
June 27, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti