(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वर्ड प्रॉब्लेम्स – एक दुर्लक्षित प्रकार

    गणित शिकण्या-समजण्यामधे “वर्ड प्रॉब्लेमस्” किंवा वर्णनात्मक कथन / वृत्तांत पद्धतीने मांडलेले गणिती प्रश्न हे एक महत्त्वाचा प्रकार आहे. दैनंदिन जीवन आणि शिक्षणाची सांगड घालण्यास मदत करतो. जीवनातल्या बऱ्याच प्रश्नांकडे बघण्याचा आणि ते सोडवण्याचा तर्कशुद्ध मार्ग शिकवतो. (माझ्या पाहण्यात आलेल्या परीक्षां प्रश्नपत्रिका मधे असे प्रश्न अभावानेच दिसले.)

      May 16, 2021


  • शेतकर्‍यांना ‘येलो जर्नालिझम’ची डागणी

    सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर 'येलो जर्नालिझम'च्या माध्यमातून डागण्या ठेवल्या जात आहेत, शेतीचा अभ्यास न करता काहीजण, वड्याचं तेल वांग्याला, वांग्याचं वड्याला लावून लिहितायत, शेतकरी आणि शेती पुढील हे नवं संकट म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

    ज्या वृत्तपत्रांनी आणीबाणीच्या काळातही कुणासमोर झुकण्याची भूमिका घेतलेली नाही, अशा वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे लिहलं जातंय. हा हट्टहास का केला जात आहे? हा प्रश्न उपस्थित होतोय.

    एखादी परिकथा लिहल्यासारखं, परिस्थितीचं वास्तव समजून न घेता शेतकऱ्यांच्या विरोधात लिहिलं जातंय, यापूर्वी जे लिहिलं... त्याचा उघड विरोध सोशल मीडियावर दिसून आला, मात्र यावर माफी मागण्याचं धाडस दाखवण्यात आलेलं नाही, मग दिलगिरी सारखा गोड-गोड शब्द वापरण्याचंही धाडस आता उरलेलं दिसत नाही.

    या उलट आता आपणच लिहलेलं कसं बरोबर होतं, हे घोडं दामटवण्यासाठी आता शेतकरी कसा 'गाडीवान' आहे, तो रोख पैशांनी मर्सिडीज बेन्झ खरेदी करतोय, असा शब्दांचा खेळ करून लिहलं जातंय, यात कुणालाही वाटेल शेतकरी धनवान आहे, त्याला कर्जाची गरजचं नाहीय. सबघोडे बाराटके असं सूत्र शेतकऱ्यांना लावून चालणार नाही.

    पुणे जिल्ह्यातील तसेच गुडगावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी एसईझेडमध्ये गेल्या, त्यांना त्याबदल्यात मिळालेल्या पैशातून त्यांनी महागड्या गाड्या खरेदी केल्या. मात्र त्यानंतर त्यातील बहुतेक देशोधडीला लागले, यावर लिहण्याचं धाडस काहींनी तेव्हा का दाखवलं नाही.

    जो माणूस फक्त शेतीवर जगतोय, तो शेतकरी, ज्याची आवक फक्त शेतीतून असेल, आणि त्याने रोख पैशातून मर्सिडीज बेन्झ, पजेरो सारख्या ५०-५० लाखाच्या गाड्या खरेदी केल्या असतील, अशा व्यक्तींचं उदाहरण हे नाव, गावासह छापावं, मी देखिल त्यांच्या भेटीला जाईन आणि त्याची शेतीची यशोगाधा जाणून घेईन, तो करतोय तशीच शेती करण्याचा प्रयत्न करेन, मलाही आवडेल माझ्या बापाला जुनाट सायकलीवरून, सुसज्ज मर्सिडीज गाडीत फिरवायला.

    मात्र ज्यांचा उद्योग-व्यवसाय असेल, आणि शेती नावाला असेल, तरीही तो स्वत:ला शेतकरी म्हणवून घेत असेल, आणि तुम्ही त्याच्याकडे शेतकरी या नजरेनं पाहत असाल, तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, त्यावरून ते माप सर्वच शेतकऱ्यांना लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही.

    खरं तर ज्या न्यूज पेपरमध्ये शेतकरी विरोधात सूर आवळले जात आहेत, अशा न्यूज पेपरचा कागद एखाद्या जत्रेत, किंवा बाजारात भजी बांधून खातांना शेतकऱ्याच्या हाती लागेल, आणि तो हे लिहलेलं वाचेल याची शाश्वती नाही, कारण या न्यूज पेपरचा अवाका त्या शेतकऱ्यांपर्यंत नाही.

    मात्र अशा प्रकारच्या लिखाणावरून शेतीविषयी धोरणं ठरवतांना, एखाद्या सरकारचा संभ्रम होऊ शकतो हे नक्की, कारण सर्वच राज्यकर्त्यांनी अशा न्यूज पेपर्सची मतं महत्वाची मानली आहेत, कदाचित यापूर्वी त्या दर्जाचा विचार करणारी, लिहिणारी मंडळी अशा न्यूज पेपर्सना लाभली असावी.

    मध्यंतरी बळीराजाची बोगस बोंब या अग्रलेखाचा प्रखर विरोध झाला, कारण शेतकऱ्याला एवढ्या जखमा आहेत, त्यात मेलेल्याला वरून मार दिल्यासारखा हा प्रकार आहे, त्यावर तो बळीराजा काय बोलणार, कदाचित यावर मानव अधिकार आयोगाकडे गाऱ्हाणी मांडल्यावर आयोग तरी बोलू शकतो.

    एक खोटं लपवण्यासाठी हजार वेळेस खोटं बोलावं लागतं, त्याचा प्रत्यय इथे येतोय, आणि एकाने बोललेलं खोटं अनेकांच्या तोंडून नकळत वदवून सत्य ठरवण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. हिंदीत एक म्हण आहे, 'अधजल घगरी छलकत जाएं', घागरीत पाणी नसेल, तर ते पाणी सारखं उचंबळत असतं, सध्या शेतीविषयी ग्रासरूटला जाऊन शहानिशा न करता, त्यावर वाट्टेल ते लिहण्याचा प्रकार यासारखाच असावा.

    शेतकरी नेते शरद जोशी यांना देखिल ग्रास रूटची खूप मोठी जाण होती, याची आठवण यावरून पुन्हा-पुन्हा होतेय. कारण शरद जोशी यांनी बागायतदार आणि जिरायती असा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही, त्यांनी नेहमीच अशा घटकांना पुढारी म्हणून संबोधलं आहे. पुढारी हे नेहमीच बोटावर मोजण्यासारखे असतात, पुढारी आणि शेतकरी यांचा उल्लेख वेगवेगळा झाला, तर यापूर्वी झालेला गोंधळ थांबू शकतो, मात्र येलो जर्नालिझम करणारी मंडळी शेतकऱ्यांना उठसूठ डागण्या ठेवतेय.

      December 21, 2014


  • श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ६

    नमन्मौलिमंदारमालाभिषिक्तम् |
    नमस्यामि शंभो पदांभोरुहं ते
    भवांभोधिपोतं भवानी विभाव्यम् ‖ ६ ‖

    स्मरणा नंतरची अवस्था असते वंदन. भगवान श्री शंकरांच्या चरणकमलांना प्रेमभराने वंदन करण्यासाठी सिद्ध भगवान जगद्गुरु आचार्यश्री त्या भगवान श्री विश्वनाथांच्या चरणकमलांचे माहात्म्य सांगताना म्हणतात,
    स्वसेवासमायात- सेवा करण्यासाठी स्वतः एकत्रित आलेल्या,
    देवासुरेंद्रा- देवता तथा सुरेंद्र म्हणजे देवराज इंद्र.
    नमन्मौलि- त्यांनी नमन् म्हणजे झुकविलेल्या मौली म्हणजे मस्तकांवर,
    मंदारमाला- धारण केलेल्या मंदार म्हणजे स्वर्गात असणाऱ्या नंदनवनातील कल्पवृक्षाच्या फुलांच्या माळांनी,
    अभिषिक्तम् - ज्याच्यावर अभिषेक केला जातो असे.
    कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या वंदनासाठी आलेल्या देवतांच्या मस्तकावर असणाऱ्या पुष्पमालांनी त्या चरणांवर पुष्पाभिषेक होतो. ही कल्पना किती सुंदर आहे?
    वास्तविक या देवता सगळ्यांसाठी वंदनीय. मात्र भगवान विश्वनाथ या देवतांसाठी देखील वंदनीय. म्हणून तर देवांचे देव महादेव.
    नमस्यामि - मी नमस्कार करतो.
    शंभो ते - हे भगवान शंकरा आपल्या,
    पदांभोरुहं- चरण कमलांना.
    कशी आहेत हे भगवान श्री शंकराची चरणकमले? तर आचार्य श्री पुढे म्हणतात,
    भवांभोधिपोतं - भव म्हणजे संसार. अंभोधी म्हणजे सागर. तर पोत म्हणजे नौका. अर्थात या संसाररुपी सागरातून तारुन नेणारी नौका असणाऱ्या, संसार मुक्तीचा मार्ग असणाऱ्या,
    भवानी विभाव्यम् - भवानी म्हणजे आई जगदंबा पार्वतीने चरणसेवा रुपी सत्कार केलेल्या, त्या श्री चरणांची मी वंदना करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      June 15, 2020


  • लोकशाही जिवंत आहे का?

    गेल्या सात दशकापासून लोकशाहीचा हा प्रयोग अव्याहतपणे सुरू असतांना राजकीय पक्षांनी तदवतच ज्यांच्यावर घटनेच्या मूल्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे, त्यांनी घटनेशी खरंच इमान राखले आहे का? यावर स्वतःला लोकशाहीवादी म्हणविणाऱ्या प्रत्येकाने आत्मचिंतन करण्याची वेळ आज आली आहे.

      November 25, 2019


  • सक्रिय एन्सेलॅडस

    सक्रिय एन्सेलॅडस

    शनी या ग्रहाचे आजपर्यंत जवळपास दीडशे चंद्र शोधले गेले आहेत. या दीडशे चंद्रांपैकी एन्सेलॅडस हा चंद्र आकाराने सहाव्या क्रमाकांचा ठरतो. सुमारे ३३ तासांत शनीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करणारा, पाचशे किलोमीटर व्यासाचा हा चंद्र विल्यम हर्शलनं १७८९ साली शोधला.

      January 19, 2024


  • श्री वेंकटेशाची आरती – चित्रफित..

    श्री वेंकटेशाची आरती – चित्रफित..

    डॉ. दिलीप कुलकर्णी यांनी लिहिलेली ही वेंकटेशाची आरती सादर केली आहे गायिका सौ रेखा कुलकर्णी यांनी….

      June 23, 2021


  • शालिवाहन शक संवताची सूरवात

    हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो.

      March 3, 2022


  • आट्यापेक्षा मैदा अधिक लवचिक का?

    तेव्हा मैदा आट्यापेक्षा अधिक लवचिक का असतो या प्रश्नाच्या निमित्ताने दोन गोष्टी लक्षात घेऊया. पहिली म्हणजे आटा म्हणजे अख्या गव्हाचं पीठ! म्हणजे आटा तयार करतांना गव्हाच्या गुलाबी सालासकट त्याचं पीठ केलं जातं. मैदा करतांना गव्हाच्या आतल्या दाण्याचं पीठ करतात.

      May 14, 2023


  • आहारातील बदल भाग ८ – शाकाहारी भाग तीन

    काळ बदलला. तश्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलत गेल्या. नियमाला अपवाद असलेल्यांची संख्या पण वाढू लागली.

    जंगली कुत्रे फक्त मांसाहारी होते, पण कुत्र्यांना माणसाने पाळण्यास सुरवात केली आणि कुत्रा भाकरी पोळी दूध भात खाऊ लागला. मांजर पण तसेच. लहानपणापासून आयते अन्न खायची सवय लावल्याने ते हा आहार निमूटपणे घेतात, एवढेच ! याऊलट पाळलेली शेळी किंवा गाय कितीही ऊपाशी ठेवली तरी मांसाहारी पदार्थांकडे ढुंकूनही पाहत नाही. आणि सर्कशीतल्या पाळलेल्या वाघ सिंहाला कितीही उपाशी ठेवा, ते गवताला तोंडही लावणार नाहीत.

    जे फक्त शाकाहारी होते ते पाणघोडेदेखील मांसाहार करू लागले आहेत म्हणे. कदाचित त्यांचे नैसर्गिक अधिवासातील अन्न संपल्यामुळे काही माकडेसुद्धा मांसाहारी बनू लागली आहेत.

    पण शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीमधेच निसर्गदत्त मूलभूत फरक असतो असे लक्षात येते.

    शाकाहारी प्राणी स्वभावतः शांत असतात. त्यांच्या जवळ जावे, अंगावरून हात फिरवावा, असे वाटते. अगदीच माजावर आलेला बैल किंवा हत्ती सोडला तर इतर प्राण्यांची भीती वाटत नाही.

    जन्म घेतल्यावर लगेचच या शाकाहारी मंडळीचे डोळे उघडलेले असतात. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे अकरा दिवसांची वाट पहावी लागत नाही. गाईचे पाडस असो, किंवा हरणाचे, जन्मल्यानंतर लगेच अकरा सेकंदात डोळे ऊघडून या नव्या जगाकडे बघू लागतात.

    कुतुहल असते, नव्या दुनियेचे आणि भीती देखील पुनः मृत्युची. आधीचा मृत्यु आठवत असतो. जन्म आणि मृत्यु च्या या फेऱ्यातून मुक्त होण्याची धडपड अव्याहतपणे चालू असते. आधीच्या जन्मातला, जगण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक संस्कार, इथे लक्षात ठेवला जातो. आचरणात आणला जातो. मग तो शाकाहारी असो वा मांसाहारी !

    मातेच्या स्तनात पय निर्माण "तो" करतो. आणि त्या पयापर्यंत कसे पोचायचे हे सुद्धा तोच शिकवतो. नुसते पोचणेच नाही तर स्तनापर्यत पोचल्यावर दूध कसे आचूषण करायचे आणि कसे गिळायचे, हे आई शिकवत नाही. ते जन्माआधीपासूनच शिकलेले असते. दूध कसे आणि कुठुन मिळवायचे, हा आधीच्या जन्मी झालेला संस्कार या जन्मातदेखील लक्षात राहील्यामुळे पोट कसे आणि कुठुन भरायचे याची आठवण ठेवलेली असते.

    जगण्यासाठी, भूक भागवण्यासाठी खायचे प्यायचे असते, ही आठवण जर त्याने ठेवलीच नसती तर काय झाले असते ?
    जगणेच संपले असते.

    जगणे आहे म्हणजे निदान गिळले तर पाहिजे ही भावना जन्मापासूनच जागृत असते, ती अगदी मृत्युपर्यंत.....
    पुढच्या जन्मात लक्षात ठेवण्यासाठी !
    अनंताच्या प्रवासातील, अनंत आठवणींचा ठेवा फक्त आपल्यासाठी !!

    "HE" is simply great !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    29.09.2016

      September 29, 2016


  • दिसण्यावर जाऊ नका असण्यावर जा

    ओठाकडे लक्ष द्यायला मला अभ्यासातून ना वेळ मिळाला न मिळणार आहे मला आयआयटी करायचे आहे, त्यांना जे वाटते ते त्यांनी लिहिले मला त्यांच्या बोलण्याची काहीच वाटत नाही ते तितके महत्त्वाचे नाही सुद्धा. 55 लाख विद्यार्थ्यांमधून यु.पी.बोर्डातून प्रथम येणारी प्राची निगम वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली. अस्तित्वाचा स्विकार करतांना वैगुण्यावर व वैगुण्यासह सत्वता:वर प्रेम करता आलं की लोकांना अस्तित्वाच्या चांगल्या अंगाची दखल घ्यावीच लागते. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरिक सौंदर्य शेवटी मनुष्याला घडवतं.

      June 3, 2026