वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हिमोग्लोबिन वाढणारे बहुतेक पदार्थ उष्ण आहेत. त्यामुळे खजूर खायचा असेल तर तो तुपासह खायला हवा. बीट, पालक, मेथी याने लोह वाढते. पण शरीराने ते स्वीकारायला हवे. लोह व हिमोग्लोबिन यांचे सात्म्य करणे तेवढेसे सोपे नाही. सततच्या धावपळीमुळे शरीर जर गरम असेल तर अन्नातील हिमोग्लोबिन कमी ओढून घेते. म्हणून शरीरातील, विशेषतः मेंदूतील उष्णता अजिबात वाढता कामा नये. आपण अलीकडे तेलकट, मसाल्याचे तिखट पदार्थही भरपूर खातो, त्यानेही पोटातील उष्णता वाढते. प्रत्येक वस्तूला आपण फोडणी देतो, पोह्यांवर लिंबू पिळतो हे त्यातील धातूंचे शरीरात शोषण व्हावे म्हणून; पण आपण लिंबू पिळण्याऐवजी पोह्यावर दही घालून खातो. त्यामुळे त्याचा शरीराला काही फायदाच मिळत नाही; नुकसान मात्र होऊ शकते. म्हणून शरीरातील उष्णता न वाढवता हिमोग्लोबिन वाढवणारे शांतीरोझसारखे औषध आहारात रोज ठेवावे. पाळी नियमित राहावी यासाठी वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे. शतावरी कल्प, च्यवनप्राशही आहारात असू द्यावे. केवळ आहाराने हिमोग्लोबिन वाढत नाही.
October 23, 2016
मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘ ऊठ लेका, जागा हो, तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा. आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे, त्यांना म्हणावे, हे आमचे सर्वसामान्यांचे अपेक्षापत्र आहे. ते वाचण्याची कृपा करावी. तत्पूर्वी तूही ते नजरेखालून घालावेस, हे बरे. म्हणजे वादविवाद नामक प्रेमळ संवादासाठी तुला तयारी करता येईल.’
November 15, 2023
दी चित्रपटांतील सुमधुर संगीतातून ठसा उमटविलेल्या शंकर-जयकिशन या संगीतकार जोडगोळीतील शंकर यांचा पियानो पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात ठेवला आहे. जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात तयार करण्यात आलेला हा पियानो सुमारे ९० वर्षांपूर्वीचा आहे. स्कीडमायर कंपनीच्या या अप्राइट पियानोमध्ये साडेसात सप्तकातील ८८ पट्ट्या आहेत. संगीतकार नौशाद हे स्वत: उत्तम पियानोवादक असल्यामुळे त्यांनी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या अनेक गाण्यांत पियानोचा वापर केला आहे. ‘अनमोल घडी’ या चित्रपटात ‘जवाँ है मुहब्बत हसीं है जमाना..’ या नूरजहाँने गायलेल्या गाण्यात पियानोचे दर्शन घडते.
March 29, 2022
“विच्छा माझी पुरी करा” या नाटकाने ही विचारसरणी बदलण्याचं फार मोठं कार्य करत लोकनाट्य शहरी पांढरपेशी समाजापर्यंत पोहोचवले.कुठलीही कला जितकी आत्यंतिक लोकल असते, तितकेच तिला ग्लोबल अपील असते कारण ती जनसामान्यांच्या संवेदनांशी नाते सांगते. हीच गोष्ट पुन:पुन्हा कराव्याश्या वाटण्या-या “विच्छा माझी पुरी करा”या नाटकाने सिद्ध केली आहे.
December 21, 2021

September 25, 2015

पृथ्वीवरच्या वृक्षांचं स्वरूप उक्रांतीद्वारे सतत बदलत आलं आहे. आज आपल्या अवतीभोवती अनेक जाती-प्रजातींचे मोठमोठे वृक्ष आढळतात. मात्र एकेकाळी पृथ्वीवर फक्त शेवाळासारख्या किंवा नेच्यांसारख्या दिसणाऱ्या, छोट्या अपुष्प वनस्पती अस्तित्वात होत्या. या वनस्पतींना वृक्षासारखं स्वरूप सुमारे अडतीस कोटी वर्षांपूर्वी प्राप्त झालं. या वृक्षांचं स्वरूप आजच्या वृक्षांपेक्षा खूपच वेगळं होतं.
February 16, 2024
रोग कसा होतो हे कळलं की, रोग घालवणं सोपं होतं. द्राक्षांच्या उदाहरणातील सर्दी होण्याच्या कारणांचा विचार केला तर,
1. तिच्याबरोबर बाजारात जाणे. 2. माझे लक्ष त्या हातगाडीवाल्याच्या द्राक्षांकडे जाणे. 3. ती द्राक्षे खायचा मोह होणे. 4 द्राक्षे खाऊन सर्दी होते, हे पूर्वी अनुभवले असताना देखील, ती उचलणे, 5. खिशात सुटे पैसे ठेवणे. 6. मनाला न विचारता खरेदीची कृती करणे, 7. घरी आणल्यानंतर विचार करायला पुरेसा वेळ असून सुद्धा ती खाणे. ही सर्दी होण्याची मुख्य कारणे आहेत.
कारण नंबर एक आणि दोन हे पूर्वजन्मानुसार किंवा कर्मफलानुसार तिथे जाणे हे अगोदरपासूनच ठरलेले असणे. याला आध्यात्मिक दोष हे कारण असते.
कारण नंबर तीन आणि चार द्राक्षे खायचा मोह होणे, ती स्वतःच्या मनाने खरेदी करणे हे मानस हेतु झाले आणि पाच ते सात ही कारणे, म्हणजे द्राक्षे खरेदी करून आणल्यानंतर ती कृतीतून खाणे हा प्रत्यक्ष हेतु म्हणजे शारिरीक कारण घडले.
यातील एक कारण जरी कमी ताकदीचे असले असते तर संप्राप्ती पूर्ण झाली नसती. आणि सर्दी झालीच नसती.
एखादा रोग होण्यामागे प्रत्येक वेळी शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक कारण असते. ते समजले की तसा उपाय करता येतो. म्हणजे रोग आध्यात्मिक स्तरावर असेल उपाय आध्यात्मिक, कारण मानसिक असेल तर मनापर्यंत पोचता यायला हवे आणि शरीराशी संबंधित व्याधी असेल तेव्हा औषध प्रत्यक्षात द्यावे लागते.
हे प्रमेहाच्या बाबतीतही तसेच लागू होते.
प्रमेह हा मुख्य रोग. त्याचे कफ पित्त वात या क्रमानुसार प्रत्येकी दहा, सहा आणि चार असे प्रकार. त्यातील वाताच्या चार प्रकारापैकी एक मधुमेह आहे. ज्याची भीतीयुक्त ओळख आज सगळ्यांनाच आहे. हा रोग होण्याची कारणे आयुर्वेदानुसार काय आहेत, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.
काही गोष्टींची कारणमीमांसा प्रत्यक्षात करता येते, काही गोष्टी तर्काने जाणून घ्यायच्या असतात, तर काही अनुभूतीच्या स्तरावर. मग प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. आणि दुःख होत नाही....
नाहीतर....
आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.01.2017
January 26, 2017
या लेखाद्वारे, मुलींसाठीच्या खास अशा एका संधीची ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या संधीचा आपण लाभ घेतलात तर जवळ जवळ शून्य खर्चात आपली मुलगी डिप्लोमा इंजिनिअर बनू शकते आणि नुसते डिप्लोमाचे प्रमाणपत्रच नाही तर कोर्स संपल्यावर तिच्याकडे एका वर्षांचा इंडस्ट्री मधील कामाचा अनुभव देखील असेल ज्याच्या जोरावर तिला नोकरी मिळविण्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत!
August 17, 2020
अतिरेक्यांच्या कारवायांमुळेच तर आपल्याला आपल्या संयमाची कसोटी पाहता येते, आपल्या अंत:करणाची विशालता, आपल्या हृदयात वास करीत असलेली क्षमाशीलता अशा हल्ल्यांमुळेच तर जगासमोर येते. समोर युद्धाला उभे ठाकले ते सगळे माझे आप्तेष्ट आहेत, कुणी भाऊ आहे, कुणी काका आहे, कुणी मामा आहे, मी त्यांच्यावर शस्त्र कसे चालवू म्हणून शस्त्र टाकून खाली बसलेल्या अर्जुनाला कान धरून उभे करीत ते इथे उभे आहेत ते तुझे शत्रू म्हणून आणि शत्रूचा नि:पात करणे हाच क्षत्रिय धर्म आहे, तू तुझ्या धर्माचे पालन कर, बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको, असे सांगणारा श्रीकृष्ण याच भारत देशात होऊन गेला, हे सांगण्याचीही लाज वाटावी इतका आमचा राष्ट्राभिमान काळवंडला आहे.
November 5, 2012
मधूमेहाच्या रुग्णांसाठी काही उपयुक्त सूचना..
July 24, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti