(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • याला जीवन ऐसे नाव भाग ३८

    पाण्याची प्रशंसता भाग तीन

    जेणाच्या सुरवातीला पाणी पिऊ नये. कृशता येते.
    जेवणानंतर लगेचच पिऊ नये. स्थूलत्व वाढते.
    जेवताना पाणी पिणे हे सर्वथा योग्य आहे. त्याने प्रकृती साम्यावस्थेत राहाते. सातही धातुंचे पोषण उत्तम रितीने होते.

    कसे ? आम्ही तर आजपर्यंत ऐकले आहे, जेवताना पाणी पिऊ नये, भूक मरते म्हणे. सगळंच चुकीचं चाललेलं आहे. पाश्चात्य संस्कृतीची झापडं लावल्यामुळे विचारांची किती भेसळ झाली आहे पाहा.

    नारळ वाटण्यापूर्वी पाणी घातले तरी रस येत नाही. आणि नंतर पाणी घातले तरी रस नीट निघत नाही. नारळ वाटता वाटता जर त्यात पाणी घातले तरच रस चांगला निघतो ना ! हे वाटप पाट्या वरवंट्यावर असू देत किंवा मिक्सरमधे !

    असेच व्यवहारात देखील दिसते.
    जेवता जेवता अन्नामधे लाळ चांगली मिसळली तर पचनही चांगले होते. तोंडात लाळ नीट निर्माण होण्यासाठी घोटभर पाणी घोळवले की उत्तम काम होते.

    पण नियम पाळायचे तर नीट ओळखून पाळावेत. जेवताना पाणी प्यायचे ते सुद्धा गरजेनुसार थोडे थोडे लागेल तसे प्यावे. उगाच नियम करून अमुकच लीटर पाणी हवे, असं अजिबात नको.

    मग आमची जेवतानाची पाणी पिण्याची परंपरा मोडली कधी आणि कोणी कशी ?
    हे शोधून काढणे जरा कठीण आहे. पण जे बदल झालेत, ते याच डोळ्यादेखत झालेत, हे नक्की आहे.

    जेवताना पाणी पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे चवीचवीनं जेवता येतं. तिखट खाऊन झालं की नंतर गोड पदार्थ खायचा असेल तर दोन्ही चवींच्यामधे, चव नसलेलं पाणी घेतलं की दोन्ही चवीतला फरक नीट कळतो. नाहीतर प्रत्येक चव नीट कळत नाही. एक गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेचच दुसरं गोड खाल्लं तर, दुसऱ्या गोड पदार्थाची चव कमी गोड लागते, हे पण व्यवहारात आपण बघतोच. मधे पाणी प्यायले तर नंतरच्या पदार्थाची चव आणि लज्जत आणखीनच वाढते.

    जे काही पाणी प्यायचे आहे ते जेवतानाच प्यावे. पाणी पिताना सावकाश प्यावे. लाळ मिसळून प्यावे. तहान लागली तर जरूर प्यावे. पण मुद्दाम जेवणापूर्वी , जेवणानंतर लगेच पिणे, नियम करून पिणे चुक आहे, हे लक्षात ठेवावे.

    पाणी पिण्याचा किंवा माझ्या उत्तम प्रकृतीसाठी कोणताही बदल मी आजपासून करेन, असा संकल्प केला तर तो उत्साह दोन तीन दिवस टिकतो, नंतर पहिला विरोध होतो, तो आपल्याच घरातून ! स्वयंपाकघरातून फक्त एक सूचना येते, आणि आपले प्रामाणिक संकल्प कुठल्याकुठे उडून जातात. बदल आपल्यात हवा असेल आपल्यालाच बदलायला हवे ना !

    तीळगुळ घ्या आणि 'तुम्ही' गोडगोड बोला, असा उपदेश आज सगळेच करतील. जे बदलायचे ते तुम्ही. 'मी' बदलणार नाही, असंच ठरवून तीळगुळ दिला की नंतर आपण शब्दात अडकायला आणि दुसऱ्याने शब्दात पकडायला नको.
    जर मनापासून बदलायचं असेल तर असं म्हणा,
    "तीळगुळ घ्या, 'मी' गोड बोलेन." असं वचन देतोय मी ! कारण बदल मला माझ्यात करायला हवाय.

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    14.01.2017

      January 18, 2017


  • बाळक्रीडा अभंग क्र.३५

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

      September 15, 2018


  • साउथ आफ्रिका – भाग ५

    कालपर्यंत, मी व्हाईट लोकांच्या एका विशिष्ट राहणीबद्दल लिहिले. वास्तविक सगळे गोरे काही श्रीमंत नसतात. मी तर किती तरी गोरे लोक, रस्त्यावर भीक मांगताना पहिले आहेत. एक गोष्ट मात्र विशेषत्वाने लिहायची व ती म्हणजे, त्यांच्या रक्तातच गुण आहे की त्यांचे वेगळे रसायन आहे, ते कळणे अवघड आहे, पण एकूणच बहुतेक सर्व गोरे फार अभिमानी आणि गर्व राखणारे असतात.

      August 27, 2018


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ४

    इथे वापरलेला सम शब्द हा सर्वधर्मसमभाव यामधल्या सम पेक्षा थोडा वेगळा आहे. समभाव हवाच, पण नको त्या ठिकाणी नको. इतर जण जर सम भावाने पाहात असतील, कृती करत असतील तर समभाव आपणही जरूर दाखवावा. नको त्या ठिकाणी समभाव दाखवत गेलो तर अबू चे रूपांतर बाबूत होते आणि नंतर हे डोक्यावर चढून बसतात.

      July 30, 2017


  • बारा ज्योतिर्लिंगे – श्री भीमाशंकर

    बारा ज्योतिर्लिंगे – श्री भीमाशंकर

    शिवलीलामृत, स्तोत्ररत्नकार, गुरुचरित्र यासारख्या ग्रंथातून या ज्योतिर्लिंगाचा महिमा वर्णिलेला आहे. इतकेच नव्हे तर श्री ज्ञानेश्वर, श्री समर्थ रामदास, श्रीधर स्वामी व संत नामदेवांनीही या शिवतिर्थाचा उल्लेख केला आहे. 

      August 13, 2013


  • टायटॅनिक बुडाले

    टायटॅनिकची बांधणी करण्यासाठी तीन वर्षे लागली होती. अधिकृत आकडेवारी नुसार त्या दिवशी टायटॅनिक वर २,२२५ लोक प्रवास करत होते. त्यात १३१७ हे प्रवासी होते तर ९०८ लोक जहाजाचे कर्मचारी होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एवढ्या लोकांपैकी फक्त ७१३ जणांचे जीव वाचवण्यात यश मिळाले. टायटॅनिकवरून वाचलेली शेवटची जिवंत व्यक्ती होती मिलविना डीन नावाच्या बाई. टायटॅनिक बुडाले तेव्हा त्यांचे वय फक्त २महिन्याचे होते.

      April 15, 2022


  • मौज टांग्याची

    अनेक वयस्कर लोकांच्या लहानपणच्या आठवणीत टांगा नक्कीच असणार. आॅटो रिक्षा सुरु होण्याआधी गावातल्या गावात, बाहेरगावाहून ट्रेनने प्रवास करून आल्यावर स्टेशनपासून, बसस्टँडपासून घरी जाण्याचा तोच एक मार्ग ,पर्याय होता. आणि लहानपणी तर टांग्यात बसणे म्हणजे एक मोठा आनंदाचा क्षण असे. त्यात चढणं तितकं सोपं नसायचं..थोडं जिकिरीचंच असायचं , अगदी लहान असताना बाबा, काका उचलूनच ठेवायचे…पुढे स्वतः चढणं सुरु केलं ..केवढा आनंद असायचा तो.

      October 24, 2023


  • जागतिक पेंग्विन दिन

    टार्क्टिका खंडात आढळणारा आणि उडता न येणारा एक पक्षी. स्फेनिसिडी कुलातील पक्ष्यांना ‘पेंग्विन’ म्हटले जाते. या कुलात त्याच्या १७ जाती असून मुख्यत: अंटार्क्टिका, अर्जेंटिना, चिली, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी तो आढळतो. सागराचे उबदार पाणी त्यांना मानवत नसल्यामुळे ते उत्तर गोलार्धात पोहून जात नाहीत. एंपरर पेंग्विन हा आकाराने सर्वांत मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ॲप्टेनोडायटिस फॉर्स्टेरी आहे. त्याची उंची सु. १२० सेंमी. व वजन सु. ४५ किग्रॅ. असते. लिटल पेंग्विनाचे शास्त्रीय नाव युडिप्टुला मायनर आहे. त्याची उंची सु. ३० सेंमी. व वजन सु. १•५ किग्रॅ. असते. अन्य जातींच्या पेंग्विनांची उंची ४५–९० सेंमी. व वजन २•३–६•८ किग्रॅ. असते. पेंग्विनाची एक जाती गालॅपागस पेंग्विन ही विषुववृत्तावर आढळते.

      April 25, 2022


  • उच्च रक्तदाब आणि औषधे (भाग १)

    उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन हा एक जीवनसाथी आजार आहे. भारतात आज १० कोटींहून जास्त लोकांना उच्च रक्तदाब आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे अधिकाधिक लोक, विशेषतः तरुण वर्गही, याचे रुग्ण बनत आहेत. हा आजार सायलेण्ट किलर आहे, म्हणजेच फारसा गाजावाजा न करता तो आपले बस्तान बसवितो व दीर्घकाळपर्यंत रुग्णाला आपल्याला उच्च रक्तदाब आहे हे ध्यानातही येत नाही.

      May 17, 2023


  • भ्रष्टाचार मुळां पासून काढायचा ?……खरें तर “गुप्त स्वहित” प्रथम ओळखलें पाहिजे.

    भारतीय विद्वानांचा विचार असा आहे कि जर सर्व नियम शिथिल केले पारदर्शकता ठेवली आणि ती लोकां पर्यंत पोहचली, तसेंच शिक्षेची योग्य अंमलबजावणी ह्या गोष्टी केल्या तर भ्रष्टाचार थांबविणे शक्य होईल.

      November 15, 2010