वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कोणताहि सजीव मरण पावला म्हणजे त्याचे शरीर कुजू लागते, सडू लागते. मानवी अचेतन शरीरावर, रुढी आणि परंपरांनुसार, अत्यंत आदराने, भावनाविवशतेने, जगातील सर्व धर्मात, त्यांच्या धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार केले जातात. खोलवर विचार केल्यास लक्षात येअील की, या रुढी आणि परंपरा, मूलतः, विज्ञानाधिष्ठीत आहेत.
March 3, 2011
१९७३-७४ मध्ये त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमधील क्वीन्सलँडविरुद्धच्या सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये ९ विकेट्स काढल्या. त्यावेळी क्वीन्सलँडचा कप्तान ग्रेग चॅपल हा होता.
August 23, 2021
आपल्या आजूबाजूला खूप घटना घडत असतात, चांगल्या, वाईट. आपला थेट संबंध नसला तरी घटना आपल्याला काही शिकवत असतात, फक्त गरज असते ती आपण “जागे” असायची. आपण खरेच “जागे” अथवा “जागृत” असतो का ?
किंवा बघून तरी “जागे” होतो का ? कोणी तरी “जागे” करावे लागते, संत देखील आपल्याला “जागे” करायचा प्रयत्न करीत असतात.
सदगुरुंचा अनुग्रह होणे हि खऱ्या अर्थाने आलेली “जाग” होय. ते साधना सांगतात पण शिष्याने साधना मात्र स्वतःच करायची असते. प्रत्येक जीवाच्या कल्याणाची तळमळ सदगुरुना असते, पण अनुग्रह सगळ्यांना होत नाही. असे का ?
सदगुरू कोणावर अनुग्रह करतात, तर ज्याला इच्छा असते त्यावर. ज्याला आपण “आजारी” आहोत आणि आपल्याला औषधाची गरज आहे हे कळते तो स्वतःहून “डॉक्टरकडे” जातो, “डॉक्टर” स्वतःहून त्याच्या कडे येतो का ?
किंवा “डॉक्टर” जरी “आजारी” माणसाकडे आला आणि त्याची औषध घ्यायची तयारी नसेल तर? म्हणूनच जो जागा होतो, शरणागत होतो, ज्याची तळमळ वाढते त्यालाच सदगुरुंचा “अनुग्रह” लाभतो.
अनुग्रह हा व्हायला लागतो दिला जात नाही. जेव्हा शिष्य अत्यंत नम्रपणे, कृतज्ञतापूर्वक सदगुरूंकडून लाभणारे हे दान ग्रहण करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने “कृपा”, “अनुग्रह” हे पाप्त होऊ शकते. आणि त्याचा “आनंद” जीवनात दिसून येतो. अनुग्रह हा शब्दातून, स्पर्शातून, कृपादृष्टीने होऊ शकतो.
हे दान एवढे मोठे आहे त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. त्याची उतराई त्यांची कितीही जन्म सेवा केली तरीही होऊ शकत नाही. कृपेचा “आनंद” काय असतो हे अनुभवल्या शिवाय कळत नाही. ज्याने हा “आनंद” मिळवला आहे तो भाग्यवान, त्याचे जिवन सफल झाले.
सदगुरू हे दिसायला जरी एक देहरुपी असले तरी ते देहातीत असतात, ”गुरु” हे तत्व आहे कोणी व्यक्ती नाही. आपल्याला देहा पलीकडे जाऊन त्या तत्वापर्यंत पोहोचायचे आहे आणि तिथे जाण्यासाठीचा मार्ग, किंवा त्याला आपल्याशी जोडणारा पूल म्हणजे “सदगुरू” आहेत.
अर्थात पूल असला तरी चालायचे आपल्याला आहे. महाभारत युद्धात सुद्धा “कृष्ण” हा सारथी होता, त्याला एकट्याला कौरवांचा नाश करणे शक्य होते पण त्याने अर्जुनाला सांगितले लढायचे तूच आहेस, मी तुझे सारथ्य करतो, म्हणजेच दिशा दाखवितो.
अर्थात सदगुरुनी सांगितलेली साधना त्यांच्या चरणाशी राहून करीत राहणे हे केले तर ते सारथ्य करायला तयार असतातच, नव्हे ते सारथ्य करतातच आणि इष्ट स्थळापर्यंत नेतात.
।। श्री गुरुदेव दत्त ।।
June 14, 2017
डॉ. मंजू बन्सल या आण्विक बायोफिजिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्या बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या आण्विक बायोफिजिक्स युनिटमध्ये सैद्धांतिक बायोफिजिक्स ग्रुपमध्ये प्राध्यापक होत्या . त्या बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल इन्फॉर्मेटिक्स अँड अप्लाइड बायोटेक्नॉलॉजीच्या संस्थापक संचालक आहेत.
August 15, 2025
या सगळ्यात आपल्या भावना आणि विचार एकमेकांशी संभाषण साधून व्यक्त करण्याचे वरदान मानवाला लाभले आहे. पूर्वीच्या काळापासून आपण संदेशवहनासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करीत आलो आहोत या मागे एकच उद्दिष्ट की, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणे तसेच आपले विचार मांडणे. अगदी पूर्वीच्या काळी जलद गतीने संदेश पाठवण्यासाठी तार यंत्रणा अस्तित्वात होती. तसेच पोस्टमनद्वारे येणाऱ्या आपल्या मित्रांच्या-नातेवाईकांच्या पत्राची अनामिक ओढ होती.
December 24, 2023
घट्ट स्लॅक आणि टाईट कुर्ता घातलेली, चालती-फिरती आधुनिक जिवंत ‘शिल्पं’, त्या प्राचिन दगडी शिल्पांचीच आठवण करून देतात. अश्या समाजमान्य कपड्यांत, हाफ आणि क्वार्टर पॅन्टीत किंवा बिकीनीत काढलेले फोटो बिनधास्त फेसबुकवर शेअर केले जातात, त्यात कुणाला वावगं, अशिष्ट, अश्लील असं काहीच वाटत नाही. फेसबुकलाही वाटत नाही.
July 21, 2017
देहिनः अस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा |
तथा देहांतर प्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति ||२:१३||
देहिन:: देहधारि आत्म्याला, अस्मिन् :: यात, देहे :: शरीरामध्ये, कौमारम् :: बालपण, यौवनं :: तारुण्य, जरा :: म्हातारपण, देहान्तर :: देहाचे स्थित्यंतर, धीर: :: धैयवान पुरूष, न मुह्यति :: मोहित होत नाही.
येथे धैर्यवान माणूस म्हणजे, विवेकी, ज्ञानी माणूस असा घ्यावयाचा आहे.
श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचं विवेचन :: ज्या प्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात, बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसर्या देहात प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धैर्यवान माणूस गोंधळून जात नाही. थोडक्यात म्हणजे, जन्मानंतर बालपण, नंतर तरूणपण, नंतर म्हातारपण अशा तीनही अवस्थात तोच आत्मा राहतो. मृत्यूनंतर तो दुसर्या शरीरात प्रवेश करून नवीन शरीर धारण करतो.
श्रीस्वामी रामसुखदासजी यांचं विवेचन : ‘शरीर धारण करणार्याच्या शरीरामध्ये’ असं म्हणण्यानं सिध्द होतं की शरीर वेगळं आहे आणि शरीरी (शरीर धारण करणारा...आत्मा, जीव, जीवात्मा) वेगळा आहे. शरीरी द्रष्टा आहे आणि शरीर दृष्य आहे. म्हणून बाल्यावस्था, तारुण्य आणि म्हातारपण हे शरीराला आहे, शरीरीला (आत्म्याला) नाही. शरीराच्या अवस्थातील बदलाविषयी कुणी शोक करीत नाही तर मग शरीराच्या मृत्यूनंतर, आत्मा अेका शरीरातून दुसर्या शरीरात जातो त्यासाठी शोक का करावा? ज्ञानी व्यक्तीला सत् आणि असत् याचं पूर्ण ज्ञान असल्यामुळे, आत्म्याच्या स्थानांतराच्या विषयानं तो मोहित होत नाही किंवा त्याला कोणताही संदेह रहात नाही.
श्रीसंत ज्ञानेश्वरांनी दिलेला ओवीबध्द अर्थ : आइके शरीर तरी एक । परी वयसाभेदे (वयपरत्वे) अनेक ।। हे प्रत्यक्षचि देख । प्रमाण तू ।। एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यी ते भ्रंशे ।। परी देहचि हा न नाशे । एकेकासवे ।। तैसी चैतन्याच्या ठायी । इये शरीरांतरे होती जाती पाही ।। ऐसे जाणे तया नाही । व्यामोहदु:ख ।।
लोकमान्य टिळकांनी, गीता रहस्यात केलेलं भाष्य :: देह धारण करणार्यास, या देहात ज्याप्रमाणे बालपण, तरूणपण आणि म्हातारपण (प्राप्त होतं) त्या प्रमाणेच (पुढे) दुसरा देह प्राप्त होत असतो. (म्हणून) या बाबतीत ज्ञानी पुरूष मोह पावत नाहीत.
आचार्य विनोबा भावे, गीताअीत सांगतात :: या देही बाल्य तारुण्य जरा वा लाभते जशी । तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे ।।
विज्ञानीय दृष्टीकोनातून अन्वयार्थ :: विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार केल्यास असं अनुमान निघतं की, सजीवाच्या तीन नव्हे तर चार अवस्था आहेत.
१. गर्भावस्था २. बाल्यावस्था ३. तारुण्यावस्था आणि ४. वृध्दावस्था
आनुवंशिक तत्व म्हणजे सृजनशील तत्व (जेनेटिक मटेरियल) असल्याशिवाय सजीवांचं शरीर निर्माण होअू शकत नाही. सजीवाच्या जिवंत पेशीत असलेल्या केंद्रकात हे आनुवंशिक तत्व असतं. या अनुवंशिक तत्वाचा संच, गर्भधारणा झाल्यापासून मरेपर्यंत तोच असतो. हाच आत्मा.
गर्भधारणा होते, तीच वेळ अपत्याची जन्मवेळ असते. जन्मापासून मरेपर्यंत, सजीवाच्या अब्जअब्जावधी पेशी मरतात आणि तितक्याच निर्माणही होतात. गर्भावस्थेत आणि बाल्यावस्थेत, मरणार्या पेशींच्या संख्ये पेक्षा निर्माण होणार्या पेशींची संख्या जास्त असते. म्हणून शरीराची वाढ झालेली असते. तारुण्यावस्थेत, ही संख्या सारखीच असते म्हणून शरीराची वाढ स्थिर असते तर वृध्दावस्थेत, मरणार्या पेशींची संख्या, निर्माण होणार्या पेशींच्या संख्येपेक्षा जास्त होअू लागते म्हणून शरीर थकतं. ही संख्या खूपच वाढली तर शरीराचे अवयव काम करीनासे होतात आणि शरीर अचेतन होतं..मरतं.
पूर्वी असा समज होता की, गर्भ, आअीच्या शरीराबाहेर आला आणि नाळ कापली गेली म्हणजे अपत्याचा जन्म झाला. म्हणून गीतेच्या या श्लोकात गर्भावस्थेला स्थान दिलं गेलं नाही. पण आअीच्या गर्भाशयात असतांना देखील, त्याचं नाळेद्वारा, आअीनं घेतलेल्या आहारामुळे, त्याचं पोषण होत असतं याची पुरेपूर कल्पना आपल्या पूर्वज विचारवंतांना होती
शुक्राणू (पित्याकडील आनुवंशिक तत्वाचा अर्धा संच २३ गुणसूत्रं) आणि बीजांडात (मातेकडील आनुवंशिक तत्वाचा अर्धा संच २३ गुणसूत्रं) अशारितीने पित्याच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यातील तसेच मातेच्याही पूर्वजांच्या अनेक पिढ्यातील आनुवंशिक तत्व असते. गर्भधारणा झालेल्या गर्भपिंडाच्या आनुवंशिक तत्वात, ४६ गुणसूत्रं, आणि सुमारे ३० हजार जनुकं (पूर्ण संच) असतात आणि तेच,
सजीवांचे आनुवंशिक गुणावगुण पुढच्या पिढीत संक्रमित करतात. मूळ गर्भपेशीचं विभाजन होअून दोन पेशी होतात नंतर दोनाच्या चार, चाराच्या आठ अशा रीतीनं वाढ होअून ३८ आठवड्यात, पूर्ण वाढ झालेलं. सर्व अवयवं आणि इंद्रियं असलेलं मानवाचं बालक जन्माला येतं. त्याची वाढ होत असतांना कुमारावस्था असते,
अपत्य प्रजननक्षम झालं म्हणजे तारुण्यावस्था प्राप्त होते, शरीराची प्रजननक्षमता नाहीशी झाली म्हणजे वृद्धावस्था आली असं मानलं जातं. ही माहिती, शास्त्रज्ञांच्या संशोधनातून, निर्विवादपणं सिध्द झालेली आहे. विज्ञानाची पुस्तकं आणि संगणकीय महाजालावर ती अुपलब्ध आहे, अवश्य वाचावी.
1. गर्भावस्था : म्हणजे लौकिकार्थाने जन्म होण्यापूर्वीची अवस्था. गर्भधारणा होते त्याच क्षणी, शुक्राणू आणि बीजांडाच्या स्वरूपात, गर्भपिंडात आनुवंशिक तत्व म्हणजे चैतन्य...आत्मा आलेला असतो. या अवस्थेत मेंदूत, पंचेन्द्रियांची केन्द्रं तयार झालेली असली तरी त्यात कोणतीही माहिती साठविलेली नसते. पाट्या कोर्याच असतात. स्मृतीकेन्द्रात कोणतीच स्मृती साठविलेली नसल्यामुळे या अवस्थेतला काळ आपल्याला मुळीच आठवत नाही. म्हणूनच कदाचित या अवस्थेची दखल, या श्लोकात घेतली नसावी. तरी तो ’मी’ च होतो याची जाणीव असते. या अवस्थेत, गर्भाचं पोषण, दुसर्या शरीरानं, म्हणजे मातेच्या शरीरानं घेतलेल्या अन्नावर होत असते. तोंड असलं तरी त्यातून अन्न घेतलं न जाता ते नाळेतूनच घेतलं जाअून पोषण होतं. आअी हा वृक्ष, गर्भ हे फळ आणि बेंबी हा देठ अशी स्थिती असते.
या अवस्थेत, आअीवडिलाकडे (जनक पिढी) असलेले आनुवंशिक तत्व अपत्य पिढीत संक्रमित झालेलं असतं. हाच, आअीवडिलात असलेल्या आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म.
2. बाल्यावस्था : गर्भाशयाबाहेर नाळेशिवाय जगण्याची अवस्था. निसर्गातून मिळणारा आहार घेअून शरीराची वाढ होत असते. ही प्रजननक्षमतेपूर्वीची अवस्था आहे. या अवस्थेत जननेन्द्रियं विकसित झालेली नसल्यामुळे, निसर्गाचा मूळ हेतू...प्रजनन…सृजन साध्य होअू शकत नाही.
3. तारुण्यावस्था : म्हणजे प्रजननक्षम असतांनाची अवस्था. ही अवस्था, नैसर्गिक दृष्ट्या अतिशय महत्वाची आहे. कारण या अवस्थेत, पुरूषात शुक्राणू आणि स्त्रीत बीजांडं तयार झालेली असतात. म्हणजेच, आनुवंशिक तत्व, जनक पिढीकडून अपत्यपिढीत संक्रमित होण्याचा निसर्गाचा हेतू साध्य होण्यासारखा असतो.. अपत्य प्रजननक्षम झाले म्हणजे विवाह होतो आणि पुढची पिढी जन्म घेते. प्रजननक्षमता असेपर्यंत त्या जोडप्याला मुलं होत राहतात. अशा रीतीनं दोन जिवंत शरीरातील आनुवंशिक तत्व तिसर्या जिवंत शरीरात प्रवेश करतं. ही क्रिया जिवंतपणीच होते, मेल्यानंतर नाही.
4. वृध्दावस्था : म्हणजे प्रजननक्षमता नाहीशी झालेली अवस्था.
सजीवाचं शरीर अचेतन झालं म्हणजे ... त्याचा मृत्यू झाला म्हणजे, त्यात असलेल्या आनुवंशिक तत्वासकट सगळं शरीर पर्यावरणात विलीन होतं. त्यातलं काहीही दुसर्या कोणत्याही शरीरात प्रवेश करीत नाही की जन्म घेत नाही. वैज्ञानिकांना हे सत्य चांगले माहित असल्यामुळे ते गोंधळून जात नाहीत.
सजीवाच्या या चारही अवस्थात, आनुवंशिक तत्वाचा तोच संच कायम असतो…. तोच या श्लोकात सांगितलेला....आत्मा.
-- गजानन वामनाचार्य
शनिवारचा सत्संग :: ५
शनिवार २४ डिसेंबर २०१६
सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व
आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत
विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद् गीता : अध्याय २ : श्लोक १३
December 24, 2016
कुणाच्या अंगावर कुणाचे ओझे
पोटामधील अवयव अत्यंत दाटीवाटीनी रहात असतात. जरा सुद्धा हलायला जागा नसते. एकाचा आधार दुसऱ्याला अश्या अवस्थेत, गाडी हलेल तशी हलत डुलत असतात.
लोकलमधे तीन सीटच्या बाकड्यावर बसलो असताना, चौथा येऊन म्हणतो, "थोडा आगे..." तेव्हा आपल्याला काय वाटते. बरं बसला तो बसला, परत पेंगायला लागतो, पेंगतो तो पेंगतो, आणि वर घोरायला लागतो, त्याच्या घरच्या जागरणाला आमचाच खांदा मिळतो. सहिष्णुता सहिष्णुता किती दाखवायची, त्याला पण काही हद्द असतेच ना !
खिडकीपर्यंत समोर पाय हलवायला जागा नाही एवढी चार माणसे उभी, बाजुला लेकुरवाळी बसलेली, मधल्या पॅसेजमधून दोन स्टेशन आधीपासूनच उतरणारी माणसे बॅगा पोटाला आवळून अगदी सज्ज असतातच. त्यात आपुल्याऽऽ खांद्यावर, कुणाचे हे ओझे कुऽणाऽचे ओऽऽझे.
एखादे वेळी त्यांच्या मांडीला गुदगुल्या करून, त्झुऽत्ऽझुत करून, त्याला उत्तिष्ठ जाग्रत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जातो. नंतर मात्र आपलेच स्थान सोडून, त्याचा भक्कम पाठींबा काढून घेण्याशिवाय पर्यायच नसतो.
अगदी तस्सं होत असेल या अवयवांचं !
त्यात वरून येणारा गॅसचा आणि अतिरिक्त चरबीचा दाब सहन करत करत आपले काम करीत रहायचे ? जरा कल्पना करून बघा. त्या यकृताच्या किडनीच्या स्वादुपिंडाच्या जागी स्वतःला बसवून बघून. हे अवयव थोडे दिवस, थोडे महिने बघून घेतात, काम करत रहातात आणि एक दिवस अचानक संपावर जातात. आतून घोषणा देत रहातात,
"आमच्या मागण्या मान्य करा, आमच्यावरील अतिरिक्त दाब काढून घ्या, आमच्या अंगावरचे ओझे दूर करा."
सुरवाती सुरवातीला सहन करतात, नंतर मात्र
आपले लक्ष वेधून घेण्यासाठी वेदना निर्माण करणे हे प्रमुख शस्त्र बाहेर काढतात. आता मात्र आपल्याला लक्ष देणे भागच पडते. काही अवयवांचे तोंड तर एवढे आवळून घेतले जाते, की ओय् म्हणायला, आणि वेदना सांगायला सुद्धा चान्स नाही. त्या मुठीहून लहान आकाराचे स्वादुपिंड बिच्चारे चिरडून जाते. त्यातील इन्शुलीन बाहेर पडायला जागा तर हवी. वेदना पण सांगता येत नाहीत.
यकृताची तीच अवस्था, किडनी म्हणते, त्या मूत्राशयापासून भरत येऊन, ते दोन्ही युरेटर भरलेत, आता माझ्यापर्यंत परत बॅक वाॅटर येऊन भिडलंय, इतका वेग धारण होतंय, मी करू तरी काय ? फुगलेल्या किडनीचा दाब कुशी बरगड्यांवर, पोटातल्या आमाचा दाब अग्न्याशयावर, मलाशयाचा दाब गर्भाशयावर, बीजांडावर, किती सहन करायचं ना ?
या अवयवांचा एकमेकांना असलेला आधार हा आता त्रास वाटू लागतो. आणि पाठिंबा काढून घेण्याशिवाय पर्यायच रहात नाही. बंड करायचे तरी मुश्किल, बोललोच तर शिस्तभंगाची कारवाई, सुरवातीला प्रदेशाध्यक्षावर टीका करून पहायची, मुलुख मैदान तोफेने तोंड दाबून बुक्यांचा मार किती दिवस सहन करायचा ?
यालाच एक दिवस भुकंपाचे नाव मिळते. पण हा भुकंप कधीही अचानक होत नाही, छोटे मोठे धक्के देऊनही, वारंवार सांगूनही जर योग्य प्रकारे लक्ष दिले गेले नाही, तर करायचे तरी काय ??
.... या अवयवांनी म्हणतोय मी. !
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
03.04.2017
April 3, 2017
स्वरानंदचा उद्देश हा भारतीय अभिजात आणि ललित संगीताची अभिरुची जनात वाढविणे, त्याचा प्रसार करणे राहिला आहे.
November 7, 2021
“श्रीकामाक्षीसुप्रभातम्” या संस्कृत स्तोत्राचा श्री धनंजय बोरकर यांनी केलेला मराठी अनुवाद – भाग २
May 29, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti