वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
इथिलीन ऑक्साइड व हायड्रोजन साइनाइड यांपासून अॅक्रिलोनायट्रिल बनते. त्यात स्टायरिन मिसळून स्टायनि अॅक्रिलोनायट्रिल बनवता येते. हे मिश्र प्लास्टिक पिवळसर असते. हे पूर्णपणे पारदर्शक असते.
October 27, 2023
रविवार 26 ऑक्टोबर 1975 च्या महाराष्ट्र टाअीम्समध्ये माझा ‘हार्दिक लयसंयोजक’ “CARDIAC PACEMAKER” हा लेख प्रसिद्ध झाला. आशयप्रधान परिभाषेचा पाठपुरावा करताना आता असं लक्षात आलं की ‘लय संयोजक’ हा शब्द बरोबर होता पण ‘हार्दिक’ हा शब्द तितकासा चपखल नाही. Hearty या शब्दासाठी मराठीत हार्दिक हा शब्द आपण वापरतो. शुभप्रसंगी अुत्सवव्यक्तीचं आपण हार्दिक अभिनंदन करतो. म्हणजे मनापासूनचं, हृदयापासूनचं असा भावनिक अर्थ हार्दिक या शब्दाला आहे.
January 6, 2021
प्रत्येक व्यक्ती म्हणजे गुणसूत्रांचा समुच्यय. व्यक्तीमध्ये काही चांगले गुण असतात काही दुर्गुण ही असतात.जे चांगले आहे ते घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच प्रेरणा घेणं. व्यंग, अपंगत्व वैगुण्य याकडे दुर्लक्ष करून चांगल्या बाबीकडेच लक्ष द्यावं. चागले जीन्स आपल्याला यशस्वी करतात कारण ते अनुवंशिकतेची देणगी असते. अनेक जीन्स वाईट प्रवृत्तीचे असतात , त्याचा आपण त्याग करायला हवा. काय गोंजारायचं आणि काय झिडकारायचं याचा निर्णय सदसदविवेक बुद्धीने घेतला तर ती व्यक्ती यशस्वी होते.
July 1, 2026
एलसीडी टीव्हीमध्ये जसा लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेचा वापर केला जातो त्याचप्रमाणे प्लाझ्मा टीव्हीत प्लाइमा सेल्सचा वापर केला जातो. हे प्लाझ्मा सेल्स म्हणजे फ्लुरोसंट लॅपवर आधारित चेंबर्स असतात. आपले सीएफएल बल्ब ज्या तंत्रज्ञानावर चालतात त्याच पद्धतीने हे प्लाझ्मा सेल कार्यान्वित केले जातात.
September 28, 2023
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान शंकरांच्या एका आगळ्यावेगळ्या काहीशा गमतीदार लीलेचे वर्णन करीत आहेत.
August 29, 2020
देवभूमी असणाऱ्या उत्तराखंड मधून आलेल्या या राष्ट्ररक्षकाची महती , या देशाच्या मातीतील प्रत्येक कणाला का नव्हती , हेच कोडे उलगडत नाही , आणि म्हणून वाटत राहते की, या मातीला जाग तरी केव्हा येणार ?
May 19, 2025
श्री गंगामाई तूं माते । पावन करिसी सर्वाते ।।
धुवूनी काढसी पापाते । तुझ्या स्पर्शाने ।। १।।
जया होई गंगास्नान । जाईल तो उध्दरुन ।
गंगादेवी पतीत पावन । किर्ति असे तुझी ।।२।।
कहानी ऐका गंगेची । पृथ्वीवरी अवतरण्याची ।।
पराकाष्ठा केली प्रयत्नाची । भगीरथाने ।।३।।
समुद्राचे झाले मंथन । अमृत निघाले त्यांतून ।।
विष्णु कुंभ हाती घेऊन ब्रम्हास दिले ।।४।।
जेव्हां राक्षस मातले । कुंभ घेण्या येवूं लागले ।।
ब्रह्मास कठिण वाटले । त्या क्षणी ।।५।।
विष्णूंनी केला उपदेश । पार्वती बहिण गंगेस ।।
आणूनी तिजला स्वर्गास । अमृत शिंपावे ।।६।।
गंगा होईल आमृतमय । कुंभाची मग भिती न रहाय ।।
पावन करित ती जाय । स्वर्गातील सर्वाते ।।७।।
आमृतमय गंगा झाली । स्वग्रातुन वाहु लागली ।
सर्व देवता संतुष्ट झाली । तिच्या आगमनाने ।।८।।
सुर्यवंशी राजा भगिरथ । करु लागला तप अविरत ।
सामर्थ्य चालले वाढत । तयाचे ।।९।।
तपाची शक्ती महान । तयापुढे नमती सर्वजण ।।
परमेश्वरही देती मान । तपवस्वी पुढे ।।१०।।
तपाच्या लहरी ऊठती । स्वर्गात त्या जाऊं लागती ।।
गंगेच्या चरणीं आदळती । एका मागुनी एक ।।११।।
तप शक्तीच्या लहरी । गंगेस बैचैन करी ।।
धावत गेली श्री हरी । तयासी पुसण्या ।।१२।।
भगीरथाचे तप कठिण । शक्ती त्याची होत महान ।।
सर्वासाठी ते आव्हान । इच्छा सत्वरी पूरवावी ।।१३।।
प्रसन्न झाली गंगादेवी । भगीरथासी दर्शन देई ।।
तुजवर मी प्रसन्न होई । माग वर म्हणाली ।।१४।।
हे माझें गंगाआई । पृथ्वीवरी तूं येई ।।
पातकासी दिलासा देई । ह्या भूमीवर ।।१५।।
भगीरथाची पाहता भक्ती । येण्यासाठी मान्य करिती ।।
सोडून देई स्वर्गाती । पृथ्वीवरी येण्या ।।१६।।
नारद आले स्वर्गातूनी । भगीरथा आशीर्वाद देऊनी ।।
गंगेस रोकती तत्क्षणी । पृथ्वीवरी उडी घेण्या ।।१७।।
हास्य वदन करुनी । दोघांना सागंती समजावूनी ।।
परिणाम उडी घेण्यानी । गंगामाईच्या ।।१८।।
प्रंचड प्रवाह गंगेला । सहन न होई पृथ्वीला ।।
दुभंगुनी जाई पाताळाला । महान शक्ती मुळें ।।१९।।
उपाय एक तयावरी । जर शिव झेलील शिरावरी ।।
नंतर उतरसी पृथ्वीवरी । भार हलका होईल ।।२०।।
प्रसन्न करावे शिवासी । वर मागावा त्यासी ।।
मदत करावी गंगेसी । पृथ्वीवरी येण्याते ।।२१।।
भगीरथ प्रयत्न महान । तपश्चर्या केली कठिण ।।
शिवासी केले प्रसन्न । वर मागुनी घेती ।।२२।।
गंगेची महान शक्ती । पृथ्वी माते न पेलती ।।
घ्यावे तू शिरावरती । उडी घेत समयी।।२३।।
गंगेने उडी घेतली । गंगेने शिरावर झेली ।।
गंगा जटेत सामावली । शिवशक्ति मुळें ।।२४।।
उतरुन प्रथम शिव जटेंत । प्रवाह केला खंडित ।।
नंतर पृथ्वीवरी उतरुनी । वाहु लागली गंगा ।।२५।।
एक द्रूश्य आगळे । गंगेने पृथ्वी प्रदाप्रिले ।।
जमुनी देव सगळे । सोहळा बघती ।।२६।।
स्वर्गातील अमृत । गंगेच्या रुपात ।।
पृथ्वी वरुन वहात । जावू लागले ।।२७।।
पृथ्वीवरील पातक धुतले । तिला पावन केले ।।
पाप नाशिननी संबोधिले । गंगामाईसी ।।२८।।
डॉ.भगवान नागापूरकर
१०- ३०१०८३
( दशहरा म्हणजे दहापापे हरण करणारी. हे गंगानदीचे नांव आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमी पर्यंत गंगेचे पूजन, अर्चन, गंगास्तूति वाचन, गंगा स्तोत्र पठण, गंगा स्नान, जलपान, गंगावतरणाच्या इतिहासाचे वाचन या पैकी शक्य असेल ते करुन दशहरा उत्सव साजरा करावा )
January 10, 2018
संपूर्ण जगात सर्व गुण संपन्न,सर्व श्रेष्ठ पुरुष श्रीरामचंद्र होऊन गेलेतं. रामांनी आपल्या सद्विचार, सद्वर्तन, सदाचार, सद्- व्यवहाराने पूज्य स्थान प्राप्त केले आहे. राम उत्तम पुत्र, उत्तम बंधू, उत्तम मित्र, उत्तम राजा, उत्तम पति, मातृभक्त, पितृभक्त, कर्तव्यकठोर, सत्यप्रतिज्ञ पुरुष होते. एक बाणी, एक वाणी, एकवचनी, एक पत्नी व्रताचे रामांनी आजीवन पालन केले. आदिकवी वाल्मिकींनी राम जसा थोर, आदर्श आहे लिहिले तसाच तो एक मानवही आहे.
February 25, 2024
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या काळास गाणपत्य संप्रदायात बुद्धी नवरात्र असे संबोधले जाते.
भगवान गणेशांच्या दोन्ही हाताला असणाऱ्या देवीं पैकी श्री गणेशांचा उजव्या हाताला असणाऱ्या देवीला भगवती बुद्धी असे म्हणतात.
September 29, 2019
मना वासना चूकवी येरझारा | मना कामना सांडि रे दव्यदारा |
मना यातना थोर हे गर्भवासीं | मना सज्जना भेटवी राघवासी ||21||
मना सज्जना हीत माझे करावे | रघूनायका दृढ चित्ती धरावे |
महाराज तो स्वामि वायूसुताचा | जना उध्दरी नाथ लोकत्रयाचा ||22||
न बोले मना राघवेंवीण कांही | जनी वाउगे बोलता सूख नाही |
घडीने घडी काळ आयुष्य नेतो | देहांती तुला कोण सोडू पाहतो ||23||
रघूनायकावीण वाया शिणावे | जनासारिखे व्यर्थ का वोसणावे |
सदासर्वदा नाम वाचे वसो दे | अहंता मनीं पापिणी ते नसो दे ||24||
मना वीट मानू नको बोलण्याचा | पुढे मागुता राम जोडेल कैंचा |
सुखाची घडी लोटता सुख आहे | पुढे सर्व जाईल कांही न राहे ||25||
देहेरक्षणाकारणे यत्न केला | परी शेवटी काळ घेवोनि गेला |
करी रे मना भक्ती या राघवाची | फ्ेाढे अंतरी सोडि चिंता भवाची ||26||
भवाच्या भये काय भीतोस लंडी | धरी रे मना धीर धाकासि सांडी |
रघूनायकासारिखा स्वामि शीरी | नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ||27||
दिनानाथ हा राम कोदंडधारी | पुढे देखता काळ पोटी थरारी |
मना वाक्य नेमस्त हे सत्य मानी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||28||
पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे | बळे भक्तरीपूशिरी कांबि वाजे |
पुरी वाहिली सर्व जेणे विमानी | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||29||
समर्थाचिया सेवका वक्र पाहे | असा सर्व भूमंडळी कोण आहे |
जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही | नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ||30||
- श्री रामदासस्वामी लिखित मनाचे श्लोक (क्रमशः)
December 26, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti