वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अगदी कसं सुरळीत चालू होतं !! आर्थिक क्षेत्रात बँका नुकताच पावसाळा संपल्यावर नद्या वाहतात तशा चालू होत्या . शेअर बाजार वाऱ्याच्या झोतांनी नारळाच्या झाडासारखा डुलत होता . मंदिरा खालोखाल पोस्ट ऑफिसांमध्ये निवृत्तांची गर्दी दिसत होती . सर्वत्र आलबेल !! पण अचानक कोरोना नावाचं वादळ आलं ते जणू तांडवनृत्य करीतच .
October 25, 2022
तक्षशिला विद्यापीठाला सर्वप्रकारचे वित्तीय सहाय्य समाजाकडून केले जात असे. कारण गुरु, विद्यार्थ्यांची भोजन व वास्तव्याची सोय करीत असत. कुठल्याही विद्यार्थ्याला शुल्क भरायची सक्ती नसे.
June 27, 2023
कोरोनाच्या अभूतपूर्व वातावरणात अभूतपूर्व असं अधिवेशन संसदेत सुरु झालंय.. त्यामुळे ते आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात आणि नुसतं सरकारी बिले पास करण्याच्या सोपस्कारात उरकल्या जाऊ नये. तर, सरकार आणि विरोधी पक्षाच्या राजकारण विरहित सामंजस्यचा एक नवा इतिहास या अधिवेशनातुन घडवला जावा यासाठी हा लेखन-प्रपंच आहे.
September 15, 2020
लोकशाहीच्या सुदृढतेचा सरळ संबंध मतदारांच्या परिपक्वतेशी असतो. कायद्याने 18 वर्षांवरील मतदार परिपक्व ठरविण्यात आले आहेत. परंतु शारीरिक परिपक्वतेचा मानसिक परिपक्वतेशी संबंध असेलच असे नाही.
March 18, 2007
ग्रामीण भागात पूर्वी व आतासुद्धा सणांना फार महत्व असते. हिंदू धर्मात पहिला सण नागपंचमी तर शेवटचा सण हा अक्षय तृतिया असतो..अक्षय तृतीया नंतर जवळ जवळ दोन अडीच महिने कोणताही सण नसतो. त्यामुळे ग्रामीण भागातील अबालवृद्ध नागपंचमी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात .
August 9, 2024
१९६३ : कालपरवा द ग्रेट इंडीयन लाफ्टर चॅलेंजमध्ये विनोद पूर्ण होण्याआधीच हसणार्या नवजोतसिंग सिद्धूचा जन्म. त्याच्या उमेदीच्या काळात सिद्धूने जगभरातील फिरकीपटूंची झोप उडविली होती.
१९७८ : भारताच्या पहिल्या कसोटी त्रिशतकवीराचा जन्म. कारकिर्दीच्या सुरुवातीसच ज्याची सचिन तेंडुलकरशी तुलना केली गेली तो वीरेंद्र सेहवाग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणातच शतक ठोकून प्रकाशात आला.
October 18, 2010

अजिंठा लेण्यांच्या आतील हा सुंदर फोटो....
-- संतोष पाटील
April 4, 2010
‘सत्यम शिवम सुंदरम’ ब्रीदवाक्य असलेला हा लोगो भारतीय दूरचित्रवाणीच्या सुवर्णकाळाचे प्रतीक असून, २०२४ मध्ये तो केशरी रंगात अद्ययावत करण्यात आला आहे. भारतीय प्रसारमाध्यमांचा इतिहास आणि कोट्यवधी भारतीयांच्या भावना ज्या एका चिन्हाशी जोडल्या गेल्या आहेत, ते चिन्ह म्हणजे दूरदर्शनचा हा गोल फिरणारा लोगो. आजच्या डिजिटल आणि शेकडो वाहिन्यांच्या युगातही या लोगोची जादू आणि त्यामागील इतिहास तितकाच रंजक आणि प्रेरणादायी आहे.
June 22, 2026
मला नेहमी वाटायचं की, आपल्याला दोन/ तीन नवीन नाटकं मिळाली. पण आपण अजून आपल्या अभिजात संगीत नाटकांत ( ‘सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘शारदा’, ‘मानापमान’ इत्यादी ) भूमिका केल्या नाहीत. त्या आपण करायला हव्यात, पण कशा? त्यावेळी रंगभूमीवर या नाटकांचे प्रयोग विविध कलाकारांच्या संचात होत होते. सर्वांची कामे बसलेलीच होती. छोटा गंधर्व, राम मराठे, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, मा. अनंत दामले, भार्गवराम आचरेकर, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम अशी सर्व मंडळी या अभिजात नाटकांतून भूमिका करत होते. त्या नाटकांचे प्रयोग संयुक्त नटसंच किंवा अशाच काहीतरी नावाने केले जात. आम्हाला तालमीशिवाय नाटकाला उभं रहाणं शक्य नव्हतं. तालीम हवी म्हटलं की काम मिळत नसे. त्यांना तयार नट हवे असत.
June 26, 2026
दरिद्रोऽस्म्यभद्रोऽस्मि भग्नोऽस्मि दूये
विषण्णोऽस्मि सन्नोऽस्मि खिन्नोऽस्मि चाहम् |
भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो
ममाधिं न वेत्सि प्रभो रक्ष मां त्वम् ‖ १६ ‖
भगवान दयासिंधू आहेतच मात्र व्यवहारात देखील ज्याप्रमाणे एखादे बालक त्याची असहाय्यता प्रगट करत नाही जोपर्यंत त्याची आई सुद्धा त्याला उचलून घेत नाही, त्याच प्रमाणे भगवान देखील सहजासहजी दया करीत नाहीत. याच भूमिकेतून आचार्य स्वतःच्या अगतिकतेला भगवान श्री शंकरांच्या समोर सांगत आहेत. ते म्हणतात,
दरिद्रोऽस्मि- मी दरिद्री आहे. आपल्या दये शिवाय माझ्याजवळ काहीही नाही.
अभद्रोऽस्मि- मी अभद्र आहे. अनेक अमंगल विचारांनी माझे मन युक्त आहे.
भग्नोऽस्मि - मी भग्न आहे. आयुष्यातील इतका सगळा चांगला काळ सत्कर्मा मध्ये न लावल्याने, हाती फार काही उरले नाही म्हणून आतून दुभंगलो आहे.
दूये- मी दु:खी आहे. हे भगवंता तू मला दिव्य मानवी जीवन दिले. पण मी ते कृतार्थ केले नाही याचे दुःख आहे.
विषण्णोऽस्मि- मी विषण्ण आहे. ही संधी गमावल्याची विषण्णता आहे.
सन्नोऽस्मि- मी सुन्न झालो आहे. काय करावे ते मला कळत नाही आहे.
खिन्नोऽस्मि चाहम् - मी खिन्न आलो आहे.
आता माझा उद्धार कसा होईल? या विचाराने माझी बुद्धी कुंठित झाली आहे.
आपल्या सगळ्यांच्या वतीने आपली अवस्था मांडतांना आचार्यश्री ही भूमिका मांडत आहेत.
अर्थात असे असले तरी,
भवान्प्राणिनामंतरात्मासि शंभो- हे भगवान हो आपण सर्व प्राण्यांचे अंतरात्मा आहात.
ममाधिं न वेत्सि- मग माझे हे अगतिकतेचे दुःख आपल्याला कसे कळणार नाही?
प्रभो रक्ष मां त्वम् - हे प्रभो! आपण माझे रक्षण करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 25, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti