वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
इकॉनॉमिक इंजिन’ म्हणून सागरी किनारपट्टीचा वापर होतोय. भारताला लाभलेल्या किनारपट्टीवरील बंदरांचे आधुनिकीकरण (मॉडर्नायझेशन ऑफ पोर्टस) करून तेथे ‘इंडस्ट्रीअल क्लस्टर्स’ सागरमाला प्रकल्पांतर्गत तयार करण्यात येणार आहेत. ग्लोबल शिपिंगच्या दृष्टीने बंदरांच्या विकासाद्वारे एक कोटी रोजगार उपलब्ध होणार आहेत. जलवाहतुकीद्वारे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात दोन ते तीन टक्क्यांनी वाढ होईल.रेल्वेने वाहतुकीचा खर्च सव्वा रुपया, रस्त्याद्वारे एक रुपया, तर जलवाहतुकीद्वारे पंचवीस पैसे एवढा फरक आहे. पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही जलवाहतूक उपयुक्त आहे.
November 26, 2018
ऑगस्टच्या मध्यरात्री ठीक बाराच्या ठोक्याला लाल किल्ल्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक उतरवून भारतीय तिरंगा फडकविण्यात आला. वास्तविक आपण सूर्यपूजक, प्रकाशाचे उपासक, उत्तररात्रीचा प्रहर कोणत्याही शुभ कार्याला आपण वर्ज्य समजतो. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्याचा जयघोष आपण उगवत्या सूर्याच्या साक्षीने करायला हवा होता.
December 28, 2008
श्री. शेखर आगासकर यांनी श्री. गिरीश टिळक यांचा चीनबद्दल लिहिलेला लेख , ‘मराठी सृष्टी’वर upload केला आहे. लेख उत्तमच आहे. टिळक यांनी लिहिलेले मुद्दे बरोबरच आहेत. पण आणखीही कांहीं गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील.
July 13, 2017
रायपूरला असताना माझ्या सहकाऱ्यांसमवेत “अमरकंटक ” येथील नर्मदेचा उगम मी पाहिला आहे पण मला व्यक्तिशः नर्मदा परिक्रमा करावी असे वाटत नाही. बसने नाही आणि कोणाबरोबरही नाही. एकट्याने बघू, कधी जमलीच तर ! तोवर हे पुस्तक आहेच की नर्मदास्नानाची अनुभूती देणारे !
January 26, 2023
नवीन वर्ष, पहिला दिवस!
नवीन वर्ष म्हटलं की, मला अलिबाबाच्या गुहेत प्रवेश केल्यासारखं वाटतं. ३६५ रांजण भरलेले आहेत. कशात काय आहे, हे माहीत नाही. एकेक दिवसाचा रांजण उघडून पहायचा आणि आनंद उपभोगायचा. कधी अचानक सरदार येईल म्हणून संकटाची खबरदारीही घ्यायची...
न कळत्या वयाची पाच, कळत्या वयाची वीस व अनुभवाची पस्तीस वर्षे जमेस धरुन साठी पूर्ण केलेला मी २०२१ ला सामोरा जात आहे. काॅम्प्युटर प्रमाणेच प्रत्येक माणसामध्ये एक हार्ड डिस्क असते. जन्मतः पूर्ण कोरी असणारी ही डिस्क जसजशी त्याला समज येऊ लागते, तसतशी ती भरत जाते. पहिल्यांदा घरातील माणसं, नातेवाईक एवढाच डाटा त्यावर असतो. शाळेत जाऊ लागल्यावर मित्र, शिक्षक, अभ्यास, खेळ याने डाटा वाढत जातो.
काॅलेज जीवनात अभ्यास व मैत्रीचे दोन पार्टीशन तयार होतात. त्याचा तोल सांभाळता आला तरच शिक्षण पूर्ण होते. मैत्रीला अघिक महत्त्व दिल्यास सेमिस्टरच्या वाऱ्या सुरु होतात.
काॅलेजनंतर व्यवसाय की, नोकरी? त्यानुसार जीवनातील पस्तीस चाळीस वर्षे नऊ ते पाच किंवा सोळा अठरा तास काम करुन चरितार्थ चालवावा लागतो.
या सर्व पायऱ्या पार करुन मी इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. साहजिकच माझी हार्ड डिस्क गेल्या चाळीस वर्षातील असंख्य अनुभवांनी पूर्ण भरलेली आहे...
आवड चित्रकलेची असताना मी काॅमर्स केलं. त्या काळात भेटलेल्या मित्रांनीच मला नवीन कमर्शियल कामं दिली. नाटक, चित्रपटांची कामं करीत असताना नामवंत कलाकार, दिग्दर्शक, निर्माते संपर्कात आले.
फोटोग्राफीची आवड होतीच, ती चित्रपटांचे स्थिरचित्रणाचे काम करताना उपयोगी पडली. जेव्हा चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ भेटत होते तेव्हा वाटायचं, यांना एकत्र आणून चित्रपट निर्मिती करता येईल. मात्र प्रत्यक्षात ते अवघड होतं. आता तर तसा विचारही करु शकत नाही. वीस वर्षांपूर्वीपर्यंत सारं काही ठीक चाललं होतं. नंतर आधुनिक तंत्रज्ञानाने जगच पालटून गेलंय.
लोकसंख्या अमाप वाढली. रुपयाची किंमत कमी झाली. कामांचं प्रमाण कमी झालं. हे क्षेत्र निवडल्याबद्दल कधी कधी पश्र्चातापही होऊ लागला. जाहिरातींची माध्यमं बदलली. पेपरवरील जाहिराती कमी झाल्या. पोस्टर्सचा जमाना जाऊन फ्लेक्सचा जमाना आला. हाताच्या कारागिरीला उतरती कळा लागली. इंटरनेटवरील 'गुगल' मुळे हवा तो संदर्भ क्षणार्धात मिळू लागला. एखाद्या विषयाचे तयार संदर्भ कष्टाविना, पैसे खर्च न करता मिळू लागले. गेली अनेक वर्षे महत्त्वाची असलेली चित्रकारांची पायरीच संपुष्टात आली. त्याच्याशिवाय जुजबी काम पूर्ण होऊ लागली.
परप्रांतातून येणारे कामगार झोप वगळता सोळा तास काम करु लागले, परिणामी कमर्शियल कामं स्वस्त झाली. झेराॅक्स, प्रिंटींग प्रेस ही ठराविक परप्रांतियांची मक्तेदारी झाली.
साहजिकच आज भरपूर अनुभव असून देखील कामांचे प्रमाण कमी आहे. गेले वर्ष तर कोरोनाने खाऊन गिळून टाकले. आता या नवीन वर्षात पुन्हा सुरळीत जीवन सुरु व्हावं एवढीच माफक अपेक्षा आहे.
मनोरंजनाचे क्षेत्र पुन्हा सुरु होईल, नाटकांचे प्रयोग, चित्रपटांची थिएटर्स सुरु होतील. त्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची रोजीरोटी चालू होईल अशी या नव्या वर्षांत अपेक्षा करुया.
माझा मोहन थत्ते नावाचा एक मित्र आहे. तो 'कॅलिग्राफी मास्टर' आहे. चित्रकलेबरोबरच तो कविताही छान लिहितो. त्याच्या नावाखाली एक ओळ असते... 'थोडा कवी, थोडा चित्रकार!'
त्याच्या प्रमाणेच मला अलीकडे लिहिण्याची आवड निर्माण झाली. कोरोनाच्या लाॅकडाऊन काळात अनेक विषयांवर लिहित राहिलो. अनेक वाचकांना ते आपलसं वाटून आवडूही लागलं... आता मोहनप्रमाणे मी देखील माझ्या नावाखाली लिहिण्याचा विचार करतो आहे.....'थोडा चित्रकार, बराचसा लेखक...'
चालेल ना?
- सुरेश नावडकर १-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४
May 25, 2023
एका मोठ्या एकत्र कुटुंब पद्धतीने राहत असलेल्या घरात रघु (राजेश खन्ना) नोकर म्हणून येतो आणि त्या घरातील सगळा माहौलच बदलून टाकतो. हसतखेळत काही कौटुंबिक समस्या सोडवतो. संपूर्ण चित्रपटभर राजेश खन्नाची छान बकबक आहे. अमिताभ बच्चनच्या निवेदनाने या चित्रपटाची सुरुवात होते. तपन सिन्हा दिग्दर्शित ‘Galpo Holeo Satti’ (१९६६) या बंगाली चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे.
July 7, 2021
इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी ज्ञानविज्ञानयोग नावाचा सातवा अध्याय.
July 12, 2022
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे सव्वीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आई तेच सांगतेय, जे आयुर्वेदातील ग्रंथकार सांगत आहेत फक्त काळाचा आणि त्यामुळे शब्दांचा फरक पडलाय एवढंच.
संसार टिकायला हवा असेल, तर उठसूठ माहेरचं कौतुक सासरी सांगू नये. माझ्या माहेरी अस्सं होतं, तस्सं होतं. इथपर्यंत ठीक आहे. पण हे सर्व तुमच्याकडे नाहीच आहे, असं सासरला डिवचून सांगण्याची काही आवश्यकता नाही. इथे वाद वाढत जातात. ताण वाढतात. त्याचा परिणाम रोगावस्था.
मनावरचा प्रत्येक ताण हा त्याच क्षणाला स्नायुपर्यंत पोचत असतो. आणि तिथेच राहतो, जोपर्यंत तो मनातून जात नाही. असे असंख्य ताण मनावर साठलेले असतात, याचा ताण स्नायुंना सहन होत नाही. मग एखादा स्नायु आखडला जातो. किंवा ताणला असेल तर त्याच अवस्थेत राहतो. मग वेदना निर्माण होते. ही वेदना मनातून, ताणातून निर्माण झालेली असल्याने नुसत्या वेदनाशामक गोळ्या खाऊन, या मनातील वेदना कशा कमी होतील ?
अनेक रुग्ण वेदना हे लक्षण घेऊन जेव्हा वैद्यांकडे जातात, तेव्हा त्या वेदना शरीरातील कारणामुळे निर्माण झालेल्या आहेत की मानसिक कारणामुळे, हे शोधून काढावे लागते. नुसत्या व्हिटामिनच्या गोळ्या खाऊन या वेदना कधीच कमी होत नाहीत. त्यासाठी वेदनेच्या मुळापर्यंत जाऊन पोचणे आवश्यक आहे.
समोरची व्यक्ती दुखावली जाणार नाही, एवढी सावधानता बोलताना बाळगली तर अनेक वेदना निर्माण होण्यापूर्वीच आपण थांबवू शकतो.
माहेरचे अति कौतुक जसे मुलीने करू नये, असे आईला वाटते, तसेच मुलाच्या आईने पण आपल्या मुलाला हे सुनावले पाहिजे की, सांगे वडीलांची किर्ती, तो एक मुर्ख. आपण आपल्याच घराण्याचे कौतुक उगाळण्याची काही आवश्यकता नसते. जो काही पुरुषार्थ दाखवायचा आहे, तो स्वकर्तृत्वावरच दाखवावा म्हणावं. बापजाद्यांच्या किंवा पिढीजात पुण्याईमुळे जे काही मिळाले आहे, त्याची टिमकी वाजवायची काही गरज नाही.
छत्रपती संभाजी राजेंना समर्थ रामदास स्वामींनी केलेला उपदेश इथे लक्षात घेण्यासारखा आहे. शिवरायांच्या पश्चात शंभूराजे अस्वस्थ होते, त्या अस्वस्थपणामुळे काही निर्णय चुकीचे घेतले जात आहेत, असे जेव्हा समर्थांच्या कानी गेले, तेव्हा एक खरमरीत पत्र समर्थांनी, वडीलकीच्या नात्याने शंभूरायांना लिहिले.
"पाणवठी तुंब निघेना" अशी सुंदर उदाहरणे देऊन शेवट "तरीच म्हणावे पुरुष" इथपर्यंत केलेली कानउघाडणी प्रत्येक पुरुषाने अभ्यासली पाहिजे. संसार स्वतःचा असो वा जगाचा, आत्मभान जागृत ठेवले गेले पाहिजे.अन्यथा विनाश अटळ आहे.
ही समिक्षा, हा विवेक सतत जागृत हवा. म्हणजे देहाचे असो, वा देशाचे आरोग्य चांगले राहातेच. प्रत्येकाचे वैचारिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून केलेला उत्सव हा सगळ्यांनाच कल्याणकारी असतो.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१५.०८.२०१७
August 15, 2017
“महागाई, मंदी आणि बेरोजगारीचा भस्मासुर उसळणार का…? ‘नोटाबंदी’ आणि ‘जीएसटीचा’ निर्णय घाईघाईत घेतल्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकासदर आणखी खालावू शकतो, अशी भीती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली होती.जीएसटी घाईघाईत लागू करण्यात आल्याने आता त्याचे विपरित परिणाम दिसायला लागले आहेत.
October 20, 2017
भारतीय संगीताच्या तालावर Perfection चा एक नमुना
September 3, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti