वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
केवढं मोठं ज्ञान तो साधा टॅक्सीवाला मला देऊन गेला होता. हॉर्न माणसांसाठी नसून जनावरांसाठी असतो, हे हॉर्नच गाडीला असण्यामागचं कारण असेल याचा विचारच मी कधी केला नव्हता.
December 3, 2016
कदंबवनशालया कुचभरोल्लसन्मालया,
कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया |
मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया ,
कयापि घननीलया कवचिता वयं लीलया ॥३||
श्रीविद्या, श्रीकामेश्वरी, श्रीराजराजेश्वरी अशा विविध नावांनी शास्त्र जिची आराधना करते अशा आई जगदंबा त्रिपुरसुंदरी चे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
कदंबवनशालया- कदंब वृक्षाच्या फांद्यांनी निर्माण केलेल्या घरात निवास करणारी.
कदंब वृक्ष हा शाश्वताचे, चिरंतनाचे प्रतीक. त्यामुळे आईच्या चिरंतनत्वांचा विचार मांडण्यासाठी आचार्यश्री कदंबवनचारिणीं, कदंबवनवासिनीं, कदंबवनशालया अशा शब्दात वारंवार आई आणि कदंब वृक्षाचा सहसंबंध अधोरेखित करीत आहेत. कुचभरोल्लसन्मालया-हृदय मंडलावर मोत्यांच्या विविध माला धारण केल्याने सुंदर दिसणारी.
कुचोपमितशैलया- पर्वताकार विशाल स्तनमंडल असणारी. गुरुकृपालसद्वेलया- गुरुकृपारूपी तरंगांनी संपन्न.
गुरुकृपेने परमात्मा प्राप्त होतो. परमात्म्याचे स्वरूप आहे आनंद. जसे जल संग्रहावरील तरंग जलाचेच असतात तसे आनंद सागरातील तरंगही आनंदाचेच असतात.
तरंग हे स्थिर असणाऱ्या जलाचे चंचल स्वरूप आहे.
तशा स्वरूपात जी मूलतः निश्चल निर्विकार असूनही चैतन्य स्वरूपात विश्व संचालन करणारी. या आनंद स्वरूपामुळे गुरुकृपा.
मदारुणकपोलया- मधु प्राशनाने कपोल म्हणजे गालावरचा प्रदेश लालबुंद झालेली. मधुरगीतवाचालया - मधुर गीत गुणगुणत असणारी.
कयापि घननीलया कवचिता वयं लीलया - घनश्याम असणाऱ्या कोणत्या देवीच्या लीलेमुळे आम्ही कवच असल्याप्रमाणे सुरक्षित आहोत?
अर्थातच आई जगदंबा त्रिपुरसुंदरीचीच ही कृपा आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
June 4, 2020
एका वाचकांनी सुचविल्यामुळे हे लिहितेय.कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा.
स्वतःच्या काळजी बद्दल तर बोलूच परंतु हे नक्की करा.
सुदैवाने आज या क्षणाला घरात गारव्यात सावलीत बसून उन्हाचे बाहेर पडू नये असे डोस देणे विरोधाभास वाटतोय कारण, मला तुम्हाला कदाचित शक्य होईल बाहेर उन्हात जाणे टाळणे. परंतु जे लोक उन्हातच काम करतात उदा.बिल्डिंग मधील वॉचमन, साफसफाई कामगार, रस्त्यावरील दुरुस्ती कामगार,रस्त्याच्या कडेला बसलेला चांभार, भर उन्हात नारळ पाणी घेऊन फिरणारा,या घरातून दूर दुसऱ्या घरात कामाला जाणारी घरकाम मावशी,कुरिअर बॉय,इत्यादी त्यांचे काय?
आपले काही सुती कपडे, scarf ,गॉगल, छत्री सढळ हाताने त्यांना द्यायला लाजू नका. सरबत,पाणी पुणेरी पणाने विचारू नका.न विचारता आग्रहानं त्यांना अवश्य द्या.
ज्या लोंकाच्या हाताखाली हे कामगार काम करतात त्यांच्या कामाच्या वेळांची थोडी फेरफार त्यांच्या मालकांनी करणे गरजेचे आहे.
पक्ष्यांसाठी भरपूर पाणी ठेवा.
आता वैयत्तिक काळजी बघू.
१.उन्हाशी खूप काळ संपर्क टाळा. टाळणे अशक्य असेल तर, डोकं,डोळे, याना उन्हापासून वाचवा.सफेद सुती,सैल वस्त्रे घाला.
२.बंद AC , कूलर , खोलीतून अचानक उन्हात बाहेर जाऊ नका. विशेषतः कार मध्ये खूप वेळ थंडगार वातावरणातून एकदम बाहेर पडल्यास शरीर अचानक झालेल्या तापमानातील बदलाला सहन करू शकत नाही. चक्कर येणे, डोके दुखणे, मळमळ, खूप क्वचित चक्कर येऊन पडणे, मूत्रप्रवूत्तीस त्रास होणे, इतपत त्रास होऊ शकतो.
३.हातापायावर,डोळ्यावर गार पाण्याचे हबके मधून मधून मारावे.
४. अर्थातच पाणी आणि पातळ पदार्थ अथवा पेये प्यावीत. कोल्ड्रिंक म्हणजे पेप्सी,कोक इत्यादी अजिबात पिऊ नये कारण त्याने शरीराची जलीय अंशाची गरज अजिबात भागत नाही उलट अपायच होतात.
५. ताक,जलजिरा, कॊकम सरबत, कैरीचे पन्हे,नारळाचे पाणी, नीरा,ताजे संत्रा मोसंबी रस प्यावा.
६. मसालेदार ,तिखट, गरम, तेलकट पदार्थ ,शिळे, रस्त्यावरील उघडे, पदार्थ खाणे टाळावे.
६. भरपूर फळे खावी.
७.शारीरिक अति व्यायाम अथवा काम ह्या उन्हात धोकादायक होऊ शकते. मध्ये मध्ये सावलीत आराम आणि शरीरातील जलीय अंशाची हानी भरून काढणारी वर सांगितलेली पेये प्यावीत.
८. भूक अर्थातच कमी होते त्यामुळे पचायला हलके आणि साधे जेवण असावे,
९. उष्णतेचा त्रास होतोय असे वाटल्यावर साळीच्या लाह्यांचे पाणी ,वाळा भिजवून पाणी, नारळ पाणी, उंबर जल,मनुकांचे सरबत, असे घ्यावे आणि अर्थातच आधी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
१०. खूपच लहान बाळ आणि खूप वयस्कर व्यक्ती यांचे मूत्र प्रवृत्तीचे प्रमाणावर लक्ष ठेवावे.लघवीला कमी होतेय असे वाटले तर शरीरात पाणी कमी असल्याचे ते पहिले लक्षण होय. तेंव्हा दुर्लक्ष करू नये.
११. शरीराची स्वछता हि आवश्यक आहे. अथवा घामोळ्या आणि इतर त्वचेच्या तक्रारी होतात.
१२. शरीरातील पित्त रक्त असंतुलनाने होणाऱ्या डोळे येणे, डोळ्याला होणाऱ्या पुळ्या, नागीण या व्याधींवर घरगुती उपचार न करता वैद्यकीय सल्ला घ्यावा.
१३. उन्हाच्या काहिलीने हैराण होऊन खाल्ले गेलेले बर्फ गोळा, icecream ,सोडा हे घशाची निश्चित वाट लावतात तेंव्हा भर उन्हात खाणे टाळा.तसेच ते तापमानाच्या दृष्टीने विरुद्ध अन्न होय.तेंव्हा निश्चित टाळा.
आपल्याच प्रतापांनी आपल्यावर चिडलेली धरती माय आणि तिचा लाडका सूर्य लवकरच शांत होवो !
वैद्य रुपाली पानसे,९६२३४४८७९८
drrupalipanse.wordpress.com
(कृपया पोस्ट लेखिकेच्या नावासकट पोस्ट अथवा शेअर करावी.तुमच्या या कृतीने लेखनासाठी काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल.धन्यवाद )
April 2, 2017
पर्यावरण या विषयात ‘पर्यावरणप्रेमी’ ही पदवी मिळवण्या करता पदवैच्छुक जमले होते. आचार्यांनी सगळ्या पदवैच्छुकांना बोलावले व सुरुवात केली. “माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, परीक्षेत एकच प्रश्न असणार आहे. पण आधी तुम्हाला एक गृहपाठ देत आहे. तुम्ही त्याचा नीट अभ्यास करून मग परीक्षे करता यायचे आहे.
October 20, 2019
मैदानावरील फलंदाजाला चुकीचा संदेश मिळाल्याने विश्वचषकाबाहेर पडलेली दक्षिण आफ्रिका आणि क्रिकेटपटूंवर थेट हल्ला झाल्याची इतिहासातील एकमेव घटना
March 3, 2011
आज १५ सप्टेंबर…! आजच्या दिवशी १९५९ साली भारतात दुरदर्शन ची सेवा सुरु झाली. दुरदर्शनचे पहिले संचालक होते प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे…! पु.लं.नीच “दुरदर्शन” हे नाव सुचवले आणि नंतर ते सर्वमान्य झाले….!
September 15, 2017
अक्रोडाचे स्वरूप जर आपण पाहिले तर अगदी मानवी कवटी व मेंदूशी साधर्म्य असणारे वाटते.
अक्रोडाचा वापर खायला,तेल काढायला तसेच
अक्रोडाचा वापर स्क्रब म्हणून देखील केला जातो.
अक्रोड चवीला गोड,उष्ण,स्निग्ध,पचायला जड असून वातदोष कमी करणारे व कफपित्त वाढविणारे आहे.हे शुक्रधातू वाढवितात,,वजन वाढायलामदतकरतात.पौष्टीक,बलकारक,
हृदयाला हितकर असतात.
अक्रोड खाल्ल्याने मेंदूची ग्रहण शक्ती वाढते व बुद्धि चांगली होते म्हणूनच लहान मुलांना अक्रोड खायला द्यावा.
अक्रोड अतिप्रमाणात खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
January 10, 2017
श्रीकृष्ण जन्मकथा सांगतो
ऐका विनवितो
श्री विष्णु अवतार घेतो
ह्या सृष्टीवर ||१||
दुष्टांचा होई अनाचार
पृथ्वीते होई पापभार
त्यांचा करण्या संहार
परमेश्र्वर अवतरती ||२||
कंस राजा दुष्ट
स्वतःस समजे श्रेष्ठ
प्रजेला देई कष्ट
स्वार्थापोटी ||३||
छळ करु लागला जनांचा
लुटमार अत्याचार छंद त्याचा
खूनही करी साधूसंतांचा
दुष्टपणे ||४||
कंसाची देवकी बहीण
चित्त तिचे परमेश्र्वरी विलीन
सात्विक होते तिचे मन
परमेश्र्वराठायीं ||५||
देवकीचे लग्न ठरले
वसुदेवाला तिनें वरले
सर्व कार्य पार पडले
कंस राजा घरी ||६||
देवकी वसुदेवासंगे बैसली
भोयांनी डोली उचलली
वरात घरी जाण्या निघाली
कंस भावा घरुन ||७||
कंस राजा चाले संगे
वरातीच्या मागोमगे
निरोप देण्या तिजलागें
वसुदेव देवकीसी ||८||
वरात येता गांव वेशीला
एक चमत्कार घडला
आकाशवाणी झाली त्या वेळेला
चकीत होती सर्वजण ||९||
कंस राजा तूं मातला
नष्ट कराया तुजला
विष्णू अवतरती पृथ्विला
देवकीचे पोटी ||१०||
देवकी वसुदेवाचे आठवे बाळ
कंसाचा तो कर्दनकाळ
योग्य येता वेळ
ठार करील कंसाला ||११||
देवकी पुत्र शत्रु माझा
दचकून गेला कंस राजा
विस्मयचकीत झाली प्रजा
आकाशवाणी ऐकूनी ||१२||
कंसाने विचार केला
देवकीपुत्र जन्मता मारण्याला
बंदीस्त केले त्याना
ठार करण्या बाळ तयांचे ||१३||
एका मागुनी एक मारीले
सात पुत्राना ठार केले
पापाचे तेंव्हा घडे भरले
कंसाचे ||१४||
आठव्या वेळी देवकीस
गर्भ राहता नऊ मास
आगळाच होत असे भास
चमत्कार घडला ||१५||
पृथ्वी पावली समाधान
सृष्टी गेली बहरुन
प्रफूल्ल झाले वातावरण
स्वागत करण्या प्रभूचे ||१६||
पूर्वीचे सर्व बदलले
दुःखी मन पालटले
रोम रोम ते आनंदले
चिंता न उरली देवकीस ||१७||
प्रभू आगमनाची तयारी
सर्व देव मिळूनी करती
देवकीस सांभाळी
आपली शक्ती देवूनीया ||१८||
सुर्य उधळी प्रकाश
वरुण जल शिंपी सावकाश
वायु लहरी फिरती आकाशी
देवकीसाठी ||१९||
बागेत पसरला सुगंध
वातावरण होई धुंद
देवकीचा आनंद
द्विगुणीत झाला ||२०||
देवकीचे सारे चित्त
प्रभुचरणी जात
झाली ती निश्चिंत
भार ईश्वरी सोडूनी ||२१||
श्रावणमासे कृष्णपक्षे आष्टमीला
मध्यरात्रीचे सुमाराला
देवकीचे बाळ आले जन्माला
ईश्वर अवतार घेई ||२२||
सर्व वातावरण शांत
बाळ करी आकांत
परी सर्व होते निद्रिस्त
कारागृहाचे द्वारपाल ||२३||
थकून देवकी झोपली
बाळ तिचे पदराखालीं
वसुदेवासी चिंता लागली
बाळाची ||२४||
झाला एक चमत्कार
साखळदंड तुटूनी उघडले दार
विजेमुळे मार्ग दिसे सत्वर
वसुदेवाला ||२५||
त्वरीत उठूनी बाळ उचलले
तयासी टोपलीत ठेवले
डोईवर ठेवूनी चालले
वासुदेव ||२६||
वसुदेव चालला
नागराज पाठी आला
फणा काढूनी वाचवी बाळाला
पावसापासून ||२७||
वसुदेव यमुनाकाठी
दुथडी वहात होती
निश्चयी पाण्यांत शिरती
बाळ घेऊन ||२८||
पाण्यांत टाकता पाय
यमुना ही दर्शना धाव
ईश्वरचरणीं स्पर्श होय
पावण होणेसी ||२९||
पाण्याची पातळी वाढली
चरणस्पर्श होता दुभंगली
वाट करुनी दिली
वसुदेवाला ||३०||
पैलतिरी गांव गोकूळ
नंद गवळ्यातील श्रेष्ठ सकळ
पत्नी यशोदे झाले बाळ
त्याच रात्रीं ||३१||
कन्या होती आदिमाया
ईश्वर सुरक्षे जन्म घ्याया
ईच्छित त्याचे कार्य कराया
आली उदरी यशोदेच्या ||३२||
घर नंदाचे उघडे
यशेदा निद्रिस्त पडे
लक्ष्य नव्हते कन्येकडे
घरातील लोकांचे ||३३||
बाळ ठेवले यशोदेपासी
उचलून घेतले कन्येसी
पांघरुन घालूनी बाळासी
वसुदेव परतला ||३४||
मुलीस घेऊन आला
ठेवी देवकीच्या कुशीला
कोण जाणील ह्या लिला
प्रभूविणा ||३५||
बंद झाले द्वार पूर्ववत
मुलीने केला रडूनी आकांत
द्वारपाल जागविले त्वरित
ते खबर देई कंसाला ||३६||
कंस आला धाऊन
सर्व लष्कर घेऊन
बाळ मारावे म्हणून
आपल्या शत्रुते ||३७||
कन्या बघूनी चकीत झाला
कां फसवितोस मजला
शिव्या देत असे प्रभुला
मुलीचे रुप बघूनी ||३८||
मुलीस घेतले बळजवरीं
आपटण्या दगडावरी
हात नेता आपले शिरीं
कन्या हातून निसटली ||३९||
चमत्कार घडला त्या समयीं
कन्या आकाशी जाई
अचानक अकाशवाणी होई
त्यावेळी ||४०||
आठवे बाळ नंदा घरी
ईश्वर रुप अवतारी
येतां वेळ ठार करी
कंसा तुला ||४१||
आकाशवाणी ऐकोनी
घडला चमत्कार बघून
कंसा ते कापरे भरुनी
राजगृही परतला ||४२||
कंस प्रयत्न जाय निष्फळ
विधी लिखीत असे अटळ
कोण रोकती काळ
प्रभूविणा ||४३||
इकडे यशोदे देखिले
बाळ गोजिरे वाटले
आनंदमय गांव झाले
बाळाचे आगमनें ||४४||
नांव श्रीकृष्ण ठेविले
नंदाघरी वाढले
गोपाळांत खेळले
आनंदरुप ||४५||
यशोदाघरी देवकीचे बाळ
ठार केले कंसा येता वेळ
मारले नंतर दुष्ट सकळ
श्रीकृष्णाने ||४६||
श्रीकृष्णाचा अवतार
दुर्बलांना तो आधार
करसी दुःखाचा निवार
प्राणीमात्रासाठी ||४७||
जन्माष्ठमीचा उत्सव
ओतून त्यांत दुर्बलांना तो आधार
करसी दुःखाचा निवार
प्राणीमात्रासाठी ||४७||
जन्माष्ठमीचा उत्सव
ओतून त्यांत भक्तीभाव
साजरा करिती सर्व
प्रेमभरे ||४८||
श्रीकृष्ण सांगे गीता
युद्धभूमीवर असता
कौरव पांडव युद्धा सज्ज होतां
अर्जूनासी ||४९||
भगवत् गीता महान
ग्रंथ म्हणून मान
जीवनाचे तत्वज्ञान
तयामध्यें ||५०||
श्रीकृष्णभक्तांनी
वाचावी ही कहाणी
भक्तिरुपें होऊनी
रोज एकदां ||५१||
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
७- १००८८३
January 6, 2018
लहानपणी मी समुद्र मंथनाची पौराणिक कथा वाचली होती. या कथे मध्ये जेव्हा समुद्रातून अमृताची प्राप्ती होते तेव्हा राक्षसांना अमृत प्राप्ती होऊ नये म्हणून भगवान विष्णू मोहिनीचे रूप धारण करून अमृत वाटप करण्याचे ठरवतात. हे वाटप करत असताना मोहिनी रुपात भगवान विष्णू प्रत्यक्षात देवांना खरे अमृत तर राक्षसांना अमृताच्या नावाने फक्त जल देत असतात.
January 15, 2024
भगवंताच्या नितांत रमणीय अशा प्रकारच्या दंतपंक्तीचे वैभव वर्णन केल्यानंतर त्या मुखकमलातून प्रकटणाऱ्या दिव्य वाणी चा विचार आचार्य श्री या श्लोकात करीत आहेत.
January 9, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti