वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
लेह-लडाख, ज्याला Land of High Passes म्हणून ओळखलं जातं, हा भारताच्या उत्तरेतील अप्रतिम प्रदेश आहे. आयुष्यात एकदा तरी इथे जावं, अशी इच्छा अनेकांना असते.
September 19, 2025
संसारात अन् परमार्थात आपल्याला काही साध्य करायचे असेल तर सर्वप्रथम आपल्या मनाची एकाग्रता साधणे अतिशय आवश्यक आहे.मन स्थिर नसेल तर आपल्या अभ्यासाचा किंवा साधनेचा काही उपयोग होत नाही. भक्तगणांची ही अडचण ओळखून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूनांच चित्त स्थिर करण्यासाठी ह्या स्तोत्रातून साकडे घातले आहे.
April 30, 2020
भगवान शंकरांच्या पंचतुंड स्वरूपाला जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराज वंदन करीत आहेत.
August 14, 2020
आज प्रत्येकजण स्वप्नांच्या मागेे धावतोय. स्वप्नं, इच्छा, अपेक्षा इ. ची न संपणारी यादी..! आपण इतकं धावतो, इतकं धावतो की आजूबाजूला पहातचं नाही. स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसागणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी मनातून कधीही पुसल्या जात नाहीत (कडू असो की गोड). एक स्वप्न पूर्ण झालं की, दुसर्या स्वप्नांच्या मागे आपण धावत सुटतो. यालाच म्हणतात का आयुष्य..?
August 18, 2019
चांगल्या असो की...
वाईट असो..
घडणाऱ्या गोष्टी घडत असतात ...!!
लहान मुले मोठी होतांना...
पडत पडत घडत असतात...!!
डोक्याला जास्त
ताण करून घ्यायचा नाही...
आणि
सारखा सारखा बी.पी.
वाढवुन घ्यायचा नाही ...!!
मुलं अभ्यास करत नाहीत
आपण समजून सांगावं.......!!
घरातलं काम करत नाहीत
त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं......!!
भविष्यात त्याचं कसं होईल...?
याची जास्त काळजी
करायची नाही....!!
सारखा सारखा आपण आपला
बी.पी. वाढवून घ्यायचा नाही....!!
तुम्हाला वाटतं पोरींन ....
स्वयंपाकात लक्ष घालावं
भाजी नाहीतर नाही ....
पिठलं तरी हालवावं ....!!
लाडक्या चिरंजीवाने
मोबाईलशी कमी खेळावं .....
आल्या गेल्या पाहुण्यांशी
दोन शब्द तरी बोलावं ...!!
पोरगं मात्र अजिबात
थोबाड वर करत नाही...
तरी सुद्धा आपण आपली
शुगर लेव्हल मुळीच वाढू
द्यायची नाही...!!
ऑफिस असो घर असो
कुणीच कुणाचं ऐकत नसतं...
ज्याला जसं वाटेल तसं
प्रत्येकजण वागत असतो...!!
आपण मात्र उगीचच
फुकटचे सल्ले देत असतो
समोरच्या माणसावर त्याचा काहीच
परिणाम होत नसतो.
छातीवर हात ठेऊन सांगा
तुम्ही काळजी केली म्हणून
कोणते कोणते प्रश्न सुटले..?
नाहीतरी तुमची मुलं तुम्हाला
विचारणारच आहे...
तुम्ही आमच्यासाठी काय केले ?
सरते शेवटी कोणतीच गोष्ट
मनाला लावून घ्यायची नाही
बी.पी. आणि शुगर सुद्धा
अजिबात वाढू द्यायची नाही
मरण यायच्या आधी मात्र थोडं
स्वतःसाठी जगून जायचे ...
सगळ्या सोबत असूनही
थोडं बाजूला होऊन जायचे...!!
आपलं कोणी ऐकत नसतं
त्यावेळी जास्त बोलू नये ...
त्यांचं ते बघून घेतील
जास्त ओझ ं उचलू नये ....!!
बी.पी. आणि शुगर सुद्धा
Tension मुळे होत असतात...
गोळ्या, औषधं घेतले की
बिचारे गुपचप बसत असतात....!!
काहींच्या बाबतीत ती
वडिलोपार्जित प्रॉपर्टी असते...
रजिस्ट्री नाही केली तरी
तिकडून इकडे येत असते....!!
चालत जावं , फिरत जावं ..
डॉक्टर सांगतील ते ऐकत जावं...!!
योग, प्राणायाम करत करत
आनंदाने लढत राहावं...!!
आपल्या हार्टच्या ECG ला
आपण बिघडू द्यायचं नाही...
" बी.पी." आणि " शुगर " ला
जास्त वाढू द्यायचं नाही ......!!!
-- डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ज्ञ
9820584716
May 16, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ मार्चला सिंगापूर दौऱ्यात या देशातील वरिष्ठ नेत्यांशी परस्पर मैत्री संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. सिंगापूरचे संस्थापक व पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी येथे दाखल झालेल्या मोदींनी इस्रायल, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांच्या नेत्यांचीही भेट घेऊन परस्पर सहकार्याबाबत चर्चा केली.
April 6, 2015
प्रत्यक्ष रणभूमीवर महिलांना लढाईसाठी तैनात केलेले नाही. कारण असंख्य जवान हे खेड्यापाड्यातील असल्याने ते महिला कमांडरचे आदेश पाळतीलच याची खात्री देता येत नाही, असे मत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी न्यूज 18 वाहिनीला दिलेल्या मुलाखतींमध्ये व्यक्त केले.
December 28, 2018

October 24, 2015
ज्या गोष्टीमुळे आपला भारत देश जगाला भुरळ घालत असेल तर ती बाब म्हणजे लोकशाही. या लोकशाहीला बळकट करणारी प्रणाली म्हणजे मतदान. प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारीच्या पूर्व संध्येला राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.
January 25, 2022
कन्फ्युज्ड माइण्डसेटमध्ये माणसं आपल्याला कोणतं बक्षीस लागलं बुवा, हे बघायला आणि चकटफू डिनर चाखायला सपत्नीक जातातही. आणि तिथेच फसतात. तिथे गेल्यावर तुमच्या बायकोच्या हातात येतो एखादा लेमनसेट. किंमत साधारण शंभर-सव्वाशे रुपये. हॉटेलचा पंचतारांकित भपका, बुफे जेवण याचा नाही म्हटलं तरी काही परिणाम तुमच्यावर होतोच. तुमच्या डोळ्यांमधले चंचल ससे मग एक डुलकी काढतात आणि आसपासची मार्केटिंग करणारी कासवं आपलं डोकं वर काढतात. एखादी तरुणी मधाळ आवाजात एखाद्या प्लॅण्टेशनची, रिसॉर्ट किंवा मोटेलची किंवा टाइम शेअरिंगची योजना तुमच्या गळी उतरवू लागते. तिला तुम्ही पटकन नाहीही म्हणू शकत नाही. किंवा नाही म्हणायला तुम्ही मध्यमवर्गीय सबबीने पटकन सांगता की मी आता चेकबुक आणलेलं नाही. इथेच तुम्ही अडकता. ती लगेच म्हणते ‘हरकत नाही, तुम्ही आता फॉर्म भरा. मी माझा एक माणूस तुमच्यासोबत घरी पाठवते. तुम्ही त्याच्यासोबत डाऊनपेमेण्टचा चेक द्या.’ एका लेमनसेट आणि बेचव जेवणाच्या बदल्यात तुम्ही लाख-सव्वालाखाच्या व्यवहारात अडकलेला असता.
August 9, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti