वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
म्यानमार म्हणजे पूर्वीचा ब्रह्यदेश, कधीकाळी भारतीय महाखंडाचा एक भाग असलेला हा देश आज प्रचंड असंतोषाने धुमसत आहे. गेल्या अठरा वर्षांपासून लष्करी शासकांच्या ताब्यात असलेल्या या देशात बौद्ध भिक्षुंनी प्रस्थापित लष्करी शासनाविरूद्ध बंडाचा झेंडा उभारला आहे. लष्करी दडपशाहीला तिथली जनता कंटाळली आहे.
October 1, 2007
अश्मयुगात रानोमाळ भटकणारा, शिकार करून कच्चे मांस खाऊन जगणारा माणूस शेतीचे प्राथमिक ज्ञान मिळाल्यावर स्थिर झाला. आधी त्याचे हे संघटन टोळ्यांच्या स्वरूपात होते. पुढे या संघटनेला अधिक रेखीव स्वरूप प्राप्त झाले आणि समाजाची निर्मिती झाली.
June 19, 2005
संख्येने तुलनात्मक रित्या कमी असूनही, अमेरिकेच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक जीवनावर फार मोठा प्रभाव टाकणारे म्हणजे ज्यू. तसे ज्यू अमेरिकेत १७ व्या शतकापासून होते. परंतु त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली ती १९ व्या आणि २० व्या शतकातल्या, मध्य आणि पूर्व युरोपातील वंशद्वेषी अत्याचारांमुळे. या अत्याचारांतून सुटका करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ज्यू अमेरिकेकडे धाव घेऊ लागले. आज अमेरिकेतील अनेक मोठ्या शहरांमधे ते पसरले असले तरी अमेरिकेतील एकूण ज्यू समाजापैकी सुमारे २५% ज्यू एकट्या न्यूयॉर्क शहरात एकवटले आहेत.
आपल्या बुद्धिमतेच्या आणि व्यापारी वृत्तीच्या बळावर गेल्या शतकात ज्यू लोकांनी अमेरिकेवर आपली छाप पाडली आहे. नोबेल पारितोषिक मिळवलेल्या अमेरिकन शास्त्रज्ञांपैकी तब्बल १/३ – ३७% शास्त्रज्ञ ज्यू आहेत. अनेक प्रसिद्ध डॉक्टर्स, प्राध्यापक, वकीलांबरोबरच, अमेरिकेच्या मोठमोठ्या कंपन्यांच्या बोर्डांवर देखील ७.७% डायरेक्टर्स ज्यू आहेत. हॉलिवूडमधे MGM सारख्या प्रख्यात स्टुडिओच्या मालकांपासून ते अनेक जगप्रसिद्ध दिग्दर्शक आणि सितारे-सिनेतारका ज्यू आहेत. वित्तीय क्षेत्रामधे तर ज्यूंची कर्तबगारी आणखीनच अचंबित करणारी आहे. आपल्या रिझर्व बॅंकेप्रमाणे, अमेरिकेतली मध्यवर्ती बॅंक म्हणजे फेडरल रिझर्व. ही ८ ज्यू बॅंकांची मिळून बनलेली आहे. या बॅंकेचे शेवटचे दोन चेअरमन (ऍलन ग्रीनस्पॅन आणि बेन बर्नानके) ज्यूच होते/आहेत. ११ सप्टेंबर २००१ च्या अतिरेकी हल्ल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष बुश यांनी निर्माण केलेल्या होमलॅंड सिक्युरीटी या प्रशासन व्यवस्थेचे सर्वेसर्वा देखील ज्यू आहेत. राज्यस्तरावरील कोर्टांमधे तसेच सुप्रीम कोर्टामधे, ज्यू न्यायाधिशांचं प्रमाण लक्षात येण्याएवढं मोठं आहे. अमेरिकेतील ज्यू लोकांची एकजूट मोठी लक्षणीय आहे आणि विविध क्षेत्रांमधील त्यांच्या प्रभावाचा एकत्रित विचार केला तर, ह्या तुलनेने छोट्या समूहाची ताकद समजून येते.
अमेरिकन जीवनाच्या विविध अंगांवर एवढा प्रभाव पाडणारी ही ज्यू लॉबी, आपले खरे सामर्थ्य दाखवते ते अमेरिकन राजकारणावर. तशी पारंपारिक रित्या ज्यू समाजाची एकगठ्ठा मतं डेमॉक्रॅटिक पार्टीला मिळत आलेली आहेत. परंतु डेमॉक्रॅटिक तसेच रिपब्लिकन, दोन्ही पक्षांच्या आर्थिक नाड्या, मोठ्या प्रमाणात ज्यू लॉबीच्या हातात आहेत. कोणाही राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला, ज्यू लॉबीचा रोष पत्करणे परवडण्यासारखे नसते. आज अमेरिकेच्या सिनेटमधे १०० पैकी १५ सिनेटर्स तर ४३५ यु. एस. रेप्रेझेंटेटीव्हस् पैकी ३० ज्यू आहेत. सन २००० साली ज्यो लिबरमन हे ज्यू गृहस्थ, डेमॉक्रॅटिक पक्षातर्फे उपाध्यक्षपदासाठी उभे राहीले होते. आजवर कोणीही ज्यू अमेरिकेचा उपाध्यक्ष वा अध्यक्ष झालेला नाही, परंतु एकंदर अमेरिकन अर्थकारण, समाजकारण आणि विशेषत: राजकारणावर असलेली ज्यू लॉबीची जबरदस्त पकड बघितली आणि त्याद्वारे अमेरिकेच्या अंतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय धोरणांना ते कसे वळण देऊ शकतात हे बघितले, की आश्चर्य वाटल्या शिवाय रहात नाही.
-- डॉ. संजीव चौबळ
June 7, 2016
मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील उदगीरला आयोजित करण्यात आलेली ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही कार्यशाळा सुरु होण्याआधी सभागृहातील त्या दोघींनी माझं लक्ष वेधून घेतलं. त्या मान खाली घालून बसल्या होत्या व त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह नव्हता. कार्यशाळा सुरु होण्याआधी आयोजकांनी त्यांचा परिचय करून दिला. त्या कर्नाटकातील कृषी शास्त्रज्ञ होत्या व अकरा तासांचा प्रवास करून स्व-खर्चाने तिथे आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या अत्यंत उत्साही प्रतिसादात सतत चार तास चाललेली कार्यशाळा संपल्यानंतर त्या दोघींना व्यासपीठावर पाचारण करण्यात आले. ज्वारी व कपाशीवर केलेल्या अत्यंत मौलिक संशोधनाची माहिती त्यांनी सादर केल्यानंतर काही क्षण सभागृहात शांतता पसरली आणि त्यानंतर दोघींपैकी एकीने बोलण्यास सुरवात करताच अवघं सभागृह स्तब्ध झालं. तिने केलेलं कथन तिच्याच शब्दात.
‘‘मी कर्नाटकातील एका कृषी विद्यापीठात वरिष्ठ शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहे. भारत सरकार कृषी संशोधनावर दर वर्षी कोट्यावधी रुपये खर्च करत असते, पण तरीही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी संशोधित केलेले बियाणे वापरण्याकडेच शेतकऱ्यांचा कल असतो. आपल्या देशात १२७ लाख हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड केली जाते. बहुसंख्य शेतकरी बी.टी. कपाशीची लागवड करीत असल्यामुळे बियाण्यांच्या क्षेत्रात मोन्सँटो या कंपनीने केवळ एकाधिकारच नव्हे तर अक्षरशः दादागिरी निर्माण केली आहे. दरवर्षी ४००० कोटी रुपयांचे कपाशीचे बी.टी. बियाणे आपल्या देशात विकले जाते ज्यापैकी तब्बल ७५० कोटी रुपये रॉयल्टीच्या रूपाने मोन्सँटोच्या खिशात जातात ज्याचा असह्य भार भारतातील गरीब शेतकऱ्यांच्या खिशावर पडतो. ही दुर्दैवी परिस्थिती बघून मी प्रचंड अस्वस्थ झाले व कॉटन ट्रान्सजेनिक रिसर्चच्या सहाय्याने आपल्या देशातच बी.टी. तंत्रज्ञान विकसित करण्याचा निश्चय केला. खरं तर सन २००० मध्येच अशा प्रकारच्या संशोधनाला प्रारंभ झाला होता, पण ते संशोधन हा केवळ एक देखावा होता असे २०१२ मध्ये लक्षात आले. एका अमेरिकन कंपनीच्या दबावाखाली ज्या संशोधकांनी संशोधनाचे हे नाटक करून आपल्या देशाची नाचक्की केली त्यांची पदोन्नती करून विद्यापीठाने त्यांना बक्षीस दिले.
अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर मोन्सँटोच्या जीनपेक्षाही प्रभावी व पूर्णतः स्वदेशी जीनचा मी शोध लावला. या संशोधनामुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांना देशी जातींचे बी.टी. बियाणे अत्यंत माफक दरात मिळण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. माझ्या संशोधनाचा तपशील विद्यापीठाला सादर करताच माझ्या दुर्दैवाचे दशावतार सुरु होतील याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मी जर एखाद्या प्रगत देशात असते तर ज्यासाठी मला सर्वोच्च सन्मान मिळाला असता त्याच संशोधनासाठी विद्यापीठाने माझा मोठ्या प्रमाणात छळ करण्यास सुरवात केली. कोणतेही कारण न देता माझी बदली करण्यात आली, मला पदोन्नती नाकारण्यात आली, अनेक महिने माझा पगार थांबविण्यात आला व विविध प्रकारे माझा छळ करून विद्यापीठ मला आत्महत्येपर्यंत घेऊन गेले. माझा गुन्हा एकच होता की भारतीय संशोधन मला सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचे होते पण मोन्सँटोने वरपासून खालपर्यंत सर्वांना विकत घेतल्यामुळे विद्यापीठाने मला सुखाने जगू देण्यास नकार दिला. जिथे मी अनेक वर्षे मौलिक संशोधन केले ती प्रयोगशाळाही तोडून फेकण्यात आली.
या छळवादाला कंटाळून १ ऑक्टोबर,२०१५ रोजी मी पंतप्रधानांकडे दाद मागितली तेव्हा १० मे, २०१६ रोजी मला कळविण्यात आले – ‘CASE CLOSED’ (तुमची केस बंद करण्यात आली आहे.)’’
सभागृहात स्मशानशांतता पसरली होती. व्यासपीठावर बसलेल्या संशोधक स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी अंतर्मुख होऊन स्वतःलाच प्रश्न विचारला – ''बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या देशातील सर्वांना विकत घेऊन एक दिवस या देशातील सर्व शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणार आहेत का?''
श्रीकांत पोहनकर
संपर्क :
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
May 20, 2016
आपल्या रोजच्या आहारात ब्रेकफास्ट घेणे आवश्यक आहे. प्रयोग ही असेच दाखवतात कि सकाळचा नाश्ता (ब्रेकफास्ट) न घेतल्यास लठ्ठपणा, ह्रदय रोग वाढतोय पण डायबेटिक व्यक्तीच्या आरोग्यावर ही त्याचा परिणाम होऊ शकतो असे ही दिसत आहे. त्यामुळेच ह्यावरच संशोधन होणे गरजेचे आहे. ह्या विषयावर संशोधन करण्यासाठी डॉक्टर Daniela Jakubowwicz आणि त्यांच्या सहकारयांनी "Substantial Impact of Skipping Breakfast on Type 2 diabetics" (नाश्ता न केल्यास टाईप 2 डायबेटीस असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर काय परिणाम होतो) ह्या विषयी अध्यापन केले. ह्या अध्यापनाचे निकष डायबेटिस केअर ह्या नियतकालिके मध्ये प्रसिद्ध केले आहेत. तसेच बोस्टन येथे 2015 मध्ये झालेल्या अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या परिषदेतही ह्याचे सादरीकरण केले होते.
ह्या अध्यापनासाठी टाईप2 डायबेटिस असलेल्या 22 व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यांचे सरासरी वय 56.9 वर्षे होते आणि बॉडी मास इंडेक्स 28.2 kg/m2 होता. ह्या सहभागी व्यक्तींना 2 दिवससाठी तंतोतंत जुळतील अशाच कॅलरीजचा पण समतोल आहार खाण्यास दिला. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात त्यांना - दूध, ट्यूना नावाचा मासा, पाव (ब्रेड) आणि चाॅकलेट ब्रेकफास्ट बार खाण्यास दिले. दोन्ही दिवसात फक्त एकच फरक केला होता की एक दिवस ह्या व्यक्तींना ब्रेकफास्ट खायला दिला होता आणि दुसर्या दिवशी त्यांना ब्रेकफास्ट खायला दिला नव्हता.
ह्या अध्यापनातून असे आढळले की सहभागी व्यक्ती ज्यांनी ब्रेकफास्ट घेतला नाही त्यांच्या साखरेमध्ये जास्तच वाढ झालेली आढळली. त्यांच्या दोन्ही दिवसाचं साखरेचे प्रमाण खालील प्रमाणे होते.
ह्या वरून असे निदर्शनास येते आहे की जर डायबेटीक व्यक्तींनी ब्रेकफास्ट घेतला नाही तर त्यांच्या पूर्ण दिवसाच्या साखरे वर नियंत्रण राखण्यात ते अपयशी ठरतात. जर डायबेटीक व्यक्तींनी ब्ब्रेकफास्ट न घेतल्यास जेवणात किती स्टार्च घेतला किंवा किती साखर घेतली ह्या गोष्टीचा त्यांचा साखरेच्या नियंत्रणावर काही परिणाम होत असावा असे दिसत नाही असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
ज्या वेळेस तुम्ही ब्रेकफास्ट करत नाही त्यावेळेस रात्रीचे जेवण आणि दुपारच्या जेवणात बराच मोठा कालावधी गेला असल्याने पॅनक्रीयाटीक बीटा सेल जे इनसुलीन तयार करते त्यांची स्मृती कमी होत असावी असा शास्त्रज्ञांचा कयास आहे आणि त्यामुळेच थोडा कमी आणि जरा उशीराच इनसुलीनचा प्रतिसाद मिळत असावा असे ही शास्त्रज्ञांना वाटते. ह्याचा परिणाम म्हणून दिवसभरातील साखरेवरील नियंत्रण बिघडत असावे.
साखर बिघडण्याचे दुसर कारण म्हणजे दुपारच्या जेवणा पर्यंत उपाशी राहिल्याने रक्तातील फॅटी अॅसिड चे प्रमाण वाढते त्यामुळे रक्तातील साखर कमी करण्यास इनसुलीन कुचकामी ठरते आणि त्यामुळे पण रक्तातील साखर वाढलेली राहाते.
ह्या प्रयोगावरून असंच सिद्ध होते आहे की टाईप 2 डायबेटिस असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेवरील नियंत्रण चांगले राहण्यास त्यांनी ब्रेकफास्ट न टाळता दररोज घेणे जरुरीचे आहे.
August 11, 2015
अचानक आलेला पैसा माणसाला एक तर वर काढतो किंवा होत्याचं नव्हतं करुन टाकतो. पैसे मिळणाऱ्याकडे जर विवेकबुद्धी असेल तर तो आर्थिक नियोजन करुन पैसे कारणी लावतो. अन्यथा काही दिवसांतच तो कफल्लक होऊन जातो.
May 7, 2023
स्तुवन्ति ये स्तुतिभिरमिभिरन्वहं त्रयीमयीं त्रिभुवनमातरं रमाम्।गुणाधिका गुरुतरभाग्यभागिनो भवन्ति ते बुधभाविताया:।।१८।।
स्तुतिभिरमिभि: - या स्तुतीच्याद्वारे, या स्तोत्राचा आधारे.
अन्वहं- अनु म्हणजे प्रत्येक आणि अह म्हणजे दिवस. अर्थात प्रत्येक दिवशी. नित्यनियमाने.
स्तुवन्ति ये- जे स्तुती करतात.
स्तवन नित्यनियमाने हवे. अडचण आल्यावर नाही.
त्रयीमयीं- त्रयी शब्दाचा एक अर्थ आहे तीन वेद. त्या ज्ञानाने युक्त असणारी. त्रयी शब्दाचा दुसरा अर्थ आहे, सत्व,रज आणि तम यांची साम्यावस्था. त्रयी शब्दाचा तिसरा अर्थ आहे, स्वर्ग, मृत्यु आणि पाताळ यांचा समूह.
या सगळ्यांमध्ये परिपूर्ण व्यापलेली ती त्रयीमयी.
त्रिभुवनमातरं- तीनही भुवनांची, तेथील समस्त जीवांची माता.
रमाम्- संपूर्ण विश्वाला रममान करणारी.
अशा आई महालक्ष्मीची जे भक्त या स्तोत्राच्या द्वारे स्तुती करतात.
भवन्ति ते- ते होतात.
गुणाधिका- अधिक गुणसंपन्न. अर्थात विश्वातील समस्त जीवांपेक्षा अधिक गुणशाली. गुरुतरभाग्यभागिनो - गुरु तर म्हणजे अत्यंत श्रेष्ठ. अशा भाग्याचे, भाजन अर्थात पात्र.
अर्थात त्यांना सर्वाधिक श्रेष्ठ असे भाग्य प्राप्त होते.
बुधभाविताया:- बुध अर्थात ज्ञानी लोक. भावित अर्थातच कौतुक केलेले.
अर्थात आई जगदंबा, महालक्ष्मीच्या कृपेने या स्तोत्राचे पठण कर्ते विद्वान लोकांच्या कौतुकाला पात्र ठरतात.
भिक्षा मागायला गेल्यानंतर एका दरिद्री वृद्ध स्त्रीच्या परिस्थितीने गलबलून गेलेल्या पूज्यपाद आचार्यश्रींनी आई महालक्ष्मीची प्रार्थना केल्यानंतर ते ज्या गरीब वृद्ध महिलेच्या अंगणात उभे होते. तेथे असणाऱ्या आवळ्याच्या झाडांवरून सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला. त्या स्त्रीचे दारिद्र्य कायमचे दूर झाले.
अशी कथा या स्तोत्राच्या सोबत वर्णन केली जाते.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 27, 2020
वर्षाचे दिवस, महिने व शेवटी आख्ख वर्षच कधी आलं आणि कधी सरलं हे कळलही नाही एवढा आयुष्याचा वेग वाढलाय..
December 31, 2016
मोक्षा रॉय यांना जगातील सर्वात तरुण वकील होण्याचा मान नुकताच मिळाला आहे. पुरस्कार मानवी जीवनाला चांगलं जीवन जगण्याची प्रेरणा देतात. पुस्तके वाचून अनेकांनी पुरस्कार मिळवले आहेत; पण पुस्तकांच्यापलीकडे जाऊनही त्याबद्दलही पुरस्कार मिळतात. आपलं भवताल आपल्याला घडवतं, बिघडवतं. आपल्या सभोवतालच्या गोष्टींची दखल घेतली नाही, तर आपलं अस्तित्वच धोक्यात येतं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे दरडी कोसळणे, पूर येणे या घटना वारंवार घडत आहेत, तरीही सामूहिक जनजागृती होत नाही. मनातली जागृतीच असंख्य जणांना वाचवू शकते. शिक्षणाने मनात जाणीवजागृती निर्माण व्हायला हवी. शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर करून माहिती लक्षात ठेवणं नाही. आपल्या शिक्षणामुळे आपलं व समाजाचं कल्याण कसं होईल? हा मनात विचार शिक्षणामुळे रुजायला हवा. मूल्यांची रुजवणूक पुस्तकातली मूल्यं पाठ करून होत नाही, तर त्यासंबंधीची जाणीव झाल्याने ती आपल्यात रुजतात.
June 2, 2026
प्रत्येकालाच कोटा येथे जाऊन शिकायचं आहे कारण पुढे आयुष्यात नोटा मिळवायचे आहेत. शिक्षण क्षेत्रातदेश-विदेशात आपली वेगळी ओळख बनवणार कोटा. गेल्या३० वर्षापासून माहेश्वरी क्लासेस नी स्वतःची ओळख बनवली आहे. इयत्ता आठवी पासून ते विद्यापीठीय शिक्षणापर्यंत व्यवसायिक पद्धतीने यशाची खात्री देणारं ठिकाण म्हणजे कोटा. दरवर्षी दोन लाख विद्यार्थी येथे प्रवेश घेतात.
June 18, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti