(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी राजभाषा दिवस – संकल्प

    कविवर्य  कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतात. हा दिवस होऊ लागला त्याला आता बरीच वर्षे झाली. आपण वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून जगाला हे सांगतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे, भाषा दिवस साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील ज्या गोष्टी आहेत.

      February 27, 2024


  • समाजसेवा आणि भुतदया

    थंडी खूपच पडली होती. संध्याकाळच्या वेळेस तर बाहेर पडणे शक्यच नव्हते. घरांतील बाहेरची कामे सकाळीच उरकून टाकण्याची आता सवयच झाली होती. गेले दोन महिने थंडीने कहरच केला होता. भाजी आणण्यासाठी सुद्धा उन्हाच्या वेळेत जाणे भाग पडत होते. एकतर अशा कडाक्याच्या थंडीत उन्हात चालायला मजा येते. दुपारच्या वेळेस तर रहदारीही कमी असते. त्यामुळे जरा आजूबाजूला नजर ही टाकता येते.

      December 26, 2025


  • बॉम्बे टू गोवा चित्रपट

    एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो.

      March 3, 2025


  • जागतिक टपाल दिन

    भारतीय टपाल सेवा ही भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स ॲन्ड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालविली जाते. देशभर पसरलेल्या एक लाख ५५ हजार ३३३ टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे होय.

      October 9, 2021


  • द्वादशलिंग स्तोत्रम् – २

    द्वादश ज्योतिर्लिंगातील दुसरे स्थान म्हणजे श्रीशैल पर्वतावर असणारे श्री मल्लिकार्जुन क्षेत्र. या स्थानाला दक्षिण कैलास असे देखील म्हणतात.

      September 5, 2020


  • आज लक्ष्मीपूजन

    दिवाळीतील आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते, असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.

    या दिवशी सर्व अभ्यंगस्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

    प्राचीन काळी या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तीमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखवला आहे. यावरून असे दिसते की, प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निऋती या नावांनीही ओळखतात.. निवृत्ती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे, असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आíथक व्यवहारातील सचोटी व नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्य मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      October 30, 2016


  • पुण्ण्याची गणना करू नका ! 

    सकाळी पंधरा मिनिटात पूजा करून टाकतात आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का?

      April 28, 2020


  • आधुनिक हृदयशल्यचिकित्सा: एक प्रवास

    आधुनिक हृदयशल्यचिकित्सा: एक प्रवास

    आज जरी आपल्याला यातील बऱ्याच शस्त्रक्रिया अगदी सोप्या ‘रुटीन’ वाटत असल्या तरी शंभर काय अगदी पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती फारच निराळी होती. हृदय-प्रत्यारोपण ही सगळ्यात वरची पायरी होती पण तेथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याआधी बरेच प्रयत्न झाले. खरेतर १८९६ मध्येच पहिली हृदय-शस्त्रक्रिया करण्यात आली.

      March 12, 2018


  • आत्मपूजा उपनिषद : ४ – ५ : उन्मनी भाव हेच जल आणि मनरहितता हाच अर्घ्य!

    प्रथम मन म्हणजे काय ते पाहू. मेंदूत सतत चालू असलेला; डोळ्यासमोरच्या निराकार पडद्यावर दिसणारा आणि कानात अविरत ऐकू येणारा दृकश्राव्य चलतपट म्हणजे मन. हा चलतपट डोळ्यासमोर असलेल्या सर्व गोष्टींना आच्छादित करून असतो आणि कानांना आजूबाजूला चाललेलं स्पष्ट ऐकू देत नाही. हा चलतपट अहोरात्र चालू असतो आणि सिनेगृहातल्या दाराचे पडदे बंद झाल्यावर जसा चित्रपट स्पष्ट दिसायला लागतो तसा रात्री आपल्याला दृग्गोचर होतो; त्याला आपण स्वप्न म्हणतो.

      January 7, 2020


  • सोशल मिडीयावरुन आयएसआयएसचा प्रसार

    जगभरात सर्व स्तरांमध्ये ट्विटर हे लोकप्रिय माध्यम बनले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी, हॉलीवुड-बॉलीवुड कलावंत किंवा नरेंद्र मोदींपासून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांपर्यंत अनेक नेते ट्विटरची मदत घेतात.

      December 25, 2014