वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
स्वामी प्रतिवादी भयंकरम् अण्णा रचित `श्री वेंकटेश प्रपत्ती’ आणि त्याचा मराठी अनुवाद…
June 23, 2020

पूर्ण वाढ झालेल्या टी-रेक्सची उंची सुमारे चार मीटर आणि लांबी बारा मीटर असल्याचं, तसंच त्याचं वजन सुमारे सात टन असल्याचं, टी-रेक्सच्या अवशेषांवरून माहीत झालं होतं. त्याचबरोबर हाडांतील वर्तुळांवरून टी-रेक्सचं सरासरी वय सुमारे अठ्ठावीस वर्षं असल्याचं दिसून आलं होतं. याशिवाय टी-रेक्सच्या वाढीच्या वेगावरून त्याच्या शरीरातील अन्नाच्या चयापचयाचा वेगही पूर्वीच काढला गेला होता.
February 10, 2022
सोनी रामाधीन याची गोलंदाजी सरळ स्टॅम्पवर पडत असे आणि त्या फसव्या चेंडूमुळे फलंदाज बीट होत असे. रामधींन कसा चेंडू स्पिन करतो यांचे इंग्लंडमधील सिनियर खेळाडूंना नीट आकलन होत नसे. रामाधीन हे उकृष्ट ‘ फिंगर स्पिनर ‘ होते
August 9, 2021
वटवृक्ष हा पवित्र महावृक्ष आहे. भगवान शिवाचे हे निवासस्थान मानले असून मानवी संसाराप्रमाणेच वटवृक्षाचा विस्तार सदोदित होत असतो. त्याचा पारंब्या पुन्हा पुन्हा मूळ धरताता आणि आपले अस्तित्व कायम ठेवतात म्हणून वटवृक्षाला संसारातील सौभाग्याचे पावित्र्याचे प्रतीक मानतात.
November 5, 2021
पालकहो...
मुलांवर निट लक्ष ठेवा व वेळेपुर्वीच जागृत व्हा..
आजकाळची पिढी जरा लवकरच हुशार व्हायच पाहतीय... सांगण्याच्या खटाटोप अशासाठी की...
मी ज्या ज्या वेळेस कामानिमित्त घराबाहेर किंवा वेगवेगळ्या शहरात... गावात असतो.. त्या वेळी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालत नाही... म्हणजे पहा ना... प्रत्येक गोष्टींच वेळापत्रक ठरलेल असत.. भले ठिकाणे वेगवेगळी असु शकतील.. अॉफीस.. कार्यालय... नौकरी... शाळा... टुशन... अस काही...
पण यातील काही ठिकाणे वगळता... यातील शाळा व टुशन यांच्या वेळा बहुदा सर्वंच ठिकाणी एकसारख्याच असतात...
पण मंडळींनौ..., या दरम्यान शाळेतील वा टुशनमधील विद्यार्थी खरच नेमक्या ठिकाणी असतात का हो....?
कदाचित् .... या बद्दल अनेकजण वा नेहमीप्रमाणे (आंधळेप्रेम) आमचा आमच्या मुलामुलीवर भरपुर वा अतोनात विश्वास आहे... अस मनातल्या मनात म्हणाले सुध्दा असतील... छान..हरकत नाही...
पण मी अशा वेळेतही काही शाळेय मुलामुलींना अशा काही ठिकाणी पाहत असतो की... जेथे सामान्य पणे येणाऱ्या वा जाणाऱ्या जनतेची... लोकांची... नजरच जाऊ शकत नाही... कारण आपण कोणाच्याही नजरेत येऊ नये अशीच भिती या मुलामुलींच्या चेहऱ्यावर असतेच...
मग ही शाळेच्या पोशाखात, शाळेच्या वेळामध्ये... शाळेत शिकायच सोडुन बाहेर नेमकी का...? कशासाठी...? कोणासोबत...? कशाला...? बाहेर फिरत असतात हेच नेमक कळत नाही... कदाचित् लहान व अपरिपक्व वयामध्ये यांना बहुदा मजा वाटत असेलही... अशावेळी ह्यांची पालकांना व शिक्षकांना वेळप्रसंगी ठामपणे खोट बोलण्याची हिम्मतच वाढत असते.. पण या खोटेपणाचा दुरगामी परिणाम यांना माहीतच नसतो...
अशावेळी मोठमोठ्या कॉफी शॉप्स... महागड्या हॉटेलमध्ये.... साध्या टॉकीझ मध्ये... मोठ्या मॉल मध्ये... गजबजलेल्या रस्त्याच्या पासुन निर्जन ठिकाणी... मंदिराच्या कोपऱ्यात.... बागेत एकदच गर्दीपासुन लांब... बसस्टॉपवर.... अशा अनेक ठिकठिकाणी ही शाळेय मुलमुली शाळेय गणवेशात वेगळ्याच विश्वात हरवलेली असतात....
मंडळींनौ .... मी अस म्हणत नाही...की तुमचेच पाल्य असेल...? पण फक्त कळकळीची नम्र विनंती की... तुम्हीपण जागृत रहा.... कारण या लहान कोवळ्या वयामध्ये यांना आयुष्याची फारसी जाणीव नसते हो... याच वयामध्ये थोडीफार एक्साईटमेंट करायला जातात... व काही समाजकंटक अशावेळी नेमका याच अजाणतेचा जाणीवपुर्वक गैरफायदा घेतातच... मग काही विद्यार्थ्यां वाममार्गाला लागताल. (तबांकु... मावा... सिगारेट... नशा...) अशापैकी काहीही... हिरोप्रमाणे वागण हेच यांना माहीती असत... व मुली ..कोणीतरी आपल्याला गिफ्ट देतय.. महागड्या हॉटेलमध्ये जेवण वा स्नँक्स खाऊ घालतायत... आलिशान गाड्यातुन सफर करवतात... आपल्या सौंदर्यांयाची मनभरुन तारीफ करातायत... बारिक.. सारिक.... गोष्टींच .. हसण्याच... बोलण्याच... चालण्याच... लाजण्याच... बेधडक स्वभावाच.... आवाजाच... कौतुक करत असत म्हणुनही ह्या कोवळ्या वयात मुली साहजिकच हरळुनच जातात... मग नेमका हाच गैरफायदा समाजकंटकही घेतात...
पण आपला पाल्य शाळेतच गेलाय... या गोडगैरसमजुतीत असतात.. पण ही टेक्नोसेव्ही पिढी कदाचित् जरा लवकरच पुढे जायच्या घाईत आहेत... या नादात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात व्हायरस घुसु नये... याची काळजी प्रत्येक पालकांनी घ्यायलाच हवीच तेही ॲन्टीव्हायरस होऊन... हीच विनंती....
आपला हितचिंतक
--विवेक जोशी
March 7, 2016
आय आय टी पवई ही संस्था तंत्रज्ञान शिक्षण आणि संशोधन ह्या बाबतीत जगामध्ये पथदर्शी म्हणून ओळखली जाते. येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱ्या अत्यंत प्रतिभाशाली पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांमुळे ह्या संस्थेकडे देशातील उत्तम विध्यार्थी आकर्षित होतात. संस्थेतील संशोधन व क्रमिक अभ्यासक्रम हा दर्जेदार प्राध्यापकांकडून केला जातो. ह्या पैकी बरेच प्राध्यापक हे जागतिक स्तरावर नावाजलेले आहेत.
March 10, 2022
यदापारमच्छायमस्थानमद्भि-
र्जनैर्वा विहीनं गमिष्यामि मार्गम् |
तदा तं निरुंधंकृतांतस्य मार्गं
महादेव मह्यं मनोज्ञं प्रयच्छ ‖ २६ ‖
यमलोकात गेल्यावर प्राप्त होणाऱ्या यातना देहाचा विचार आल्यानंतर स्वाभाविकच आचार्यश्री त्या यमलोकाचा प्रवासाचा विचार आपल्या समोर मांडतात.
किती कष्टदायक आहे हा मार्ग? आचार्य श्री म्हणतात,
यदा - ज्यावेळी, त्या यमराजाचे दूत माझे प्राण हरण करून नेतील,
अपारम् - प्रचंड लांब असणाऱ्या, त्यामुळे चालून-चालून कष्ट देणाऱ्या,
अच्छायम् - मार्गात सावली देणारे वृक्ष इत्यादी नसल्याने छाया विरहित. उन्हाच्या त्रासाने अधिकच क्लेशदायी होणाऱ्या,
अस्थानम् - मध्यंतरी विश्राम करण्यासाठी कोणतेच आराम स्थान नसलेल्या,
अद्भिर्जनैर्वा विहीनं - पाणी किंवा माणसांनी विहीन असणाऱ्या, अर्थात शारीरिक तृप्तता मिळावी यासाठी आवश्यक असणारे जल किंवा मानसिक शांती मिळावी यासाठी आवश्यक असणारे जन यापैकी कोणतेही साधन नसणाऱ्या,
गमिष्यामि मार्गम् - मार्गाने मी जेव्हा जाईल.
तदा - त्यावेळी
तं निरुंधं
कृतांतस्य मार्गं - त्या कृतांत म्हणजे यमराजाच्या मार्गाला बाजूला सारून,
महादेव - हे भगवान महादेवा !
मह्यं मनोज्ञं प्रयच्छ - मला मनोहारी असा, आपल्या परम वैभवशाली आणि आनंददायी कैलास लोकाचा मार्ग प्रदान करावा.
शास्त्रात एका बाजूला वर वर्णन केल्याप्रमाणे कोणतेही सुख साधन नसलेले, उलट सर्व दुःखदायक गोष्टी असणारे यम नगरीचे वर्णन आहे. तर दुसरीकडे सकल सौख्यदायक कैलासाचे वर्णन. आचार्य यमलोकाचा मार्ग सोडून त्या मार्गावर नेण्याची प्रार्थना करीत आहेत.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
July 5, 2020
पंजाब मध्ये प्रमुख आहार घटक असलेले हे धान्य कधी आपण कोकण गोवा प्रांतीय मंडळींनी आपलेसे केले हे आपले आपल्यालाच
समझले नाही.
तरी आता आपल्या प्रदेशामध्ये देखील बरीच मंडळी वेगवेगळ्या स्वरूपात ह्याचे सेवन करताना पण पहातो.जसेरवा,सांजा,पिठ,खीर,पुरी, चपाती,पराठा,लाडू इ.
म्हणूनच ह्या गव्हाचे गुण धर्म आपण ह्या सदरात पाहुया.
गहू चवीला गोड,थंड,पचायला जड,स्निग्ध,सारक,वात पित्त नाशक,कफकर,बलकारक,वजन वाढविणारे,मोडलेले हाड सांधायला मदत करणारे असतात.
आता ह्याच गव्हापासून निर्मित वेगवेगळे पदार्थ व त्यांचे गुणधर्म आपण पाहुया:
१) गव्हाचा मंड:
उष्ण,मल बांधून ठेवणारा,गोड,पित्तनाशक आहे.
२) रोटगे:
गोड,बल्य,कफकर,वातपित्तनाशक,सारक,वजनवाढविणारे,वातानुलोमक,धातुवर्धक,रुचिकर असतात.
३) रोटगे (शेणीच्या थाळीत आग करून धुर नाहीसा झाल्यावर त्यात घालून भाजलेले रोटगे):
पौष्टीक,धातुवर्धक,पचायला हल्के,भुक वाढविणारे,कफनाशक,बल्य.
४) भाकरी:(तव्यावर भाजून मग निखाऱ्यावर भाजलेली):
पचायला जड,बलकर,रुचिकर,पौष्टीक,
धातुवर्धक,कफकर,वातनाशक.
५) सांजापोळी:
पचायला जड,शुक्रवर्धक,कफकर,वातपित्तनाशक
बल्य,वजन वाढविणारी.
६) घारगे:
पचायला जड,वृष्य,बलकारक,रुचिकर,पुष्टीकर,कफकर,वातपित्तनाशक.
७) घिवर:
पचायला जड,धातुवर्धक,हृदयाला बल देणारे,धातुवर्धक,वात पित्तनाशक,कफकर.
८) लाडू:
गोड,थंड,स्निग्ध,पचायला जड,वात पित्तनाशक,कफकर,शुक्रधातु वाढविणारे,बलकारक.
९) शीरा:
गोड,पचायला जड,कफकर,वात पित्त नाशक,बल्य,वजन वाढविणारे,श्रम हारक.
१०) गव्हाची खीर:
पचायला जड,कफकर,वजनवाढविंणारी, वातपित्तनाशक,वृष्य,धातुवर्धक,शुक्रवर्धक, हृदयाला हितकर आहे.
गव्हाचे पदार्थ खायचा अतिरेक केल्यास कफाचे विकार,स्थौल्य येऊ शकते.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
February 8, 2017
आज सकाळी नाभिकाकडे (Hair Cutting Saloon) डोक्यावरचे ओझे कमी करण्यासाठी गेलो होतो. नेहेमीचा नाभिक, नेहेमीचे माझे वाढणारे केस आणि नेहेमीचा मी ! पण आज त्याच्याकडे (बहुधा)नवा कारागीर (हा त्यांचा आवडता शब्द असतो) असावा. उत्साहाच्या भरात बागडत,मला इंप्रेस करण्यासाठी असावे कदाचित, तो हातातील कैचीइतकाच जिभेनेही कार्य करीत होता.
July 26, 2022
हेच ज्यांचे आनन ते गजानन. आनन म्हणजे तो़ड अर्थात ओळख. म्हणजे निर्गुण निराकार अनादि-अनंत परब्रम्ह हीच ज्यांची ओळख आहे त्यांना गजानन असे म्हणतात. “गजमस्तक” चा हाच अर्थ असतो.
September 3, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti