(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अणुऊर्जेची निर्मिती कशी होते?

    अणुऊर्जेची निर्मिती ही कोळशासारखं एखादं रासायनिक इंधन जाळून केलेल्या ऊर्जानिर्मितीपेक्षा वेगळी असते.

      July 29, 2023


  • आरवाईन ते फ्रीमाँट : एक प्रवास

    सर्वसामान्य भारतीयांना असते तसे अमेरिकेचे आकर्षण मलाही होते. पण आजवरचा सारा प्रवास विमानाने झालेला होता. आंतरराष्ट्रीय प्रवास करणारी विमाने सर्वसाधारणपणे जमिनीपासून तेहतीस ते छत्तीस हजार फूट उंचीवरून जात असतात. त्यामुळे ‘टेकऑफ’ किंवा ‘लँडिंग’ करताना काही मिनिटे खालचा, आजुबाजूचा निसर्ग आणि परिसर काय तो आपल्याला दिसतो. डोमेस्टिक ओअर लाईनने अमेरिकेतील दोन शहरांमध्ये प्रवास केला तर हे विमान जमिनीपासून बारा ते सोळा हजार फूट उंचीवरून जाते.

      December 30, 2023


  • बुलेट ट्रेन्सचा जागतिक आढावा

    सन १८९९ मध्ये जर्मनीत पहिली हाय स्पीड ट्रेन अर्थात अतिवेगवान ट्रेन सुरू झाली. तेव्हा तिचा वेग ताशी ७२ कि.मी. होता. पुढे १९०३ सालापर्यंत हा वेग ताशी २०६ कि.मी. इतका झाला होता.

    १९५७ साली जपानमध्ये ताशी १४५ कि.मी. वेगाची पहिली गाडी सुरू झाली. १९६४ ऑलिंपिकचे औचित्य साधून टोकियो ते ओसाका ही पहिली बुलेट ट्रेन ताशी २१० कि.मी. वेगानं धावू लागली.

    फ्रान्समध्ये ताशी ५४० कि.मी. इतका प्रचंड वेग घेणारी जगातील प्रथम क्रमाकांची वेगवान गाडी धावली, पण ती फक्त तंत्रज्ञान तपासण्याकरता वापरली गेली. २००७ पासून फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, या देशांना जोडणाऱ्या अतिजलद गाड्या (२५० ते २७० कि.मी. ताशी) २०० गावांपर्यंत पोहोचल्या आहेत.

    स्पेनमध्ये ताशी ३१० कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाड्यांचं जाळं ३१०० कि.मी. इतकं आहे. जपानमध्ये २३८८ कि.मी., तर तैवान मध्ये ३४५ कि.मी. लांबीचं जाळं आहे.

    जगात आज पहिला क्रमांक चीनचा असून १०,००० कि.मी. लांबीच्या रेल्वे जाळ्यावर ताशी २५० ते ४३० कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाड्या धावत असतात.

    -डॉ. अविनाश वैद्य

      November 20, 2022


  • संगीतोपचार

    २० व्या शतकातील प्रख्यात भारतीय शास्त्रज्ञ व संगीताचे गाढे अभ्यासक, जगदीशचंद्र बोस यांनी सजीवांचा संगीताला मिळणारा प्रतिसाद सप्रमाण सिद्ध केला व त्यापूर्वीच्या वैदिक काळातील अभिजात संगीताच्या मन व शरीर यांच्यावरील संगीतोपचाराचे महत्त्वच अधोरेखित केले. यातूनच संगीतोपचार ही, मूळ औषध व उपचार पद्धतीला पूरक अशी उपचार पद्धती म्हणून विकसित झाली आहे.

      March 24, 2019


  • जीवनाचे तत्वज्ञान-महाभारत

    महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते; आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं.

    ‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ..?
    मी जे पाहत होतो ते खरंच घडलंय का ..?'
    याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं.

    त्याने चहूदिशांना पहिले, 'खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसाचा खच पडला होता ? फक्त अठरा दिवसांत भरतखंडातील 80 टक्के पुरुष वंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते?'

    “ यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही,” एक वृद्ध कंपित आवाज ऐकू आला. संजयाने वळून पाहिले तो धुळीच्या लोटातून भगव्या कपड्या तील एक वृद्ध योगी प्रकट झाला!

    "मला माहित आहे, तू इथे का आला आहेस, परंतु हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल!"
    वृद्ध योगी गूढपणे म्हणाला,

    "काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ?"
    संजयाने तात्काळ विचारता झाला. त्याच्या लक्षात आले कि तो एका महान, ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे.

    " महाभारत ही एक अतिभव्य, अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे."
    वृद्ध योग्याच्या उद्गारांनी संजय अधिक प्रश्न विचारायला प्रवृत्त झाला.
    "महाराज, आपण मला सांगू शकाल का काय आहे हे तत्वज्ञान?"
    "नक्कीच, ऐक तर,"
    वृद्ध योग्याने सांगायला सुरुवात केली.

    "पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये, 'नयन जे पाहतात, नाक ज्याने वास येतो, जीभ जी चव घेते, कान जे ऐकतात व त्वचा जी स्पर्श जाणते. आणि आता सांग बरं कौरव म्हणजे काय?" वृद्ध योग्याने डोळे किलकिले करत विचारले.

    संजयाने मानेने नकार दर्शवला.
    "कौरव हे शेकडो विकार व दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात, पण तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकता, कसा माहित आहे?"

    संजयाने पुन्हा नकारार्थी मान हलवली.
    "तेंव्हाच जेंव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात!"

    वृद्ध योग्याच्या डोळे लकाकले आणि संजय या रूपकाने अवाक झाला!
    "भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही तर हा आहे तुमचा आतील आवाज, तुमचा आत्मा, तुमचा मार्गदर्शक आणि जर तुम्ही स्वतःला त्याचा हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचे कारण नाही."

    संजय बावचळून गेला पण त्याने लगेच प्रतिप्रश्न केला, "महाराज, जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे कौरवांच्या बाजूने का बरं लढत होते?"

    वृद्ध योग्याने दुःखी स्वरात सांगितले,
    " याचा अर्थ हाच की जसे तुमचे वय वाढते तसा तुमचा वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
    तुमच्यापेक्षा वडील माणसं, जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात ती परिपूर्ण असतीलच असे नाही, ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात. आणि एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की ती तुमच्या हिताची आहेत का नाहीत.? आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावे लागणार आहे!
    मोठं होण्यातला हा सर्वात कठीण व अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे."

    संजय पूर्णत: लीन झाला, ज्ञानाच्या या पैलूने, पण लगेच हळुवार स्वरात विचारता झाला, "मग कर्णाबद्दल काय?"

    "वा!"
    वृद्ध योगी उद्गारला, "वा! अप्रतिम प्रश्न, शेवटी राखून ठेवलास तर!"

    "कर्ण आहे तुमच्या पंचेद्रियांचाच बांधव, तो आहे आसक्ती, तो तुमचाच एक भाग आहे पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह. त्याला कळत असतं की आपण चुकतोय, परंतु सबबी सांगत रहातो सर्वकाळ विकारांची सोबत करण्यासाठी..!'

    संजयनं सहमतीदर्शक स्मितहास्य करत नजर खाली झुकवली, डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता.

    पुन्हा एकदा वाऱ्याची वावटळ उठली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्याने वर पहिले तर तो वृद्ध योगी अंतर्धान पावला होता, जीवनाचे तत्वज्ञान थोडक्या शब्दांत मांडून..!

      August 6, 2017


  • कोकणची माती आणि तिचे संरक्षण

    कोकणची माती आणि तिचे संरक्षण

    कोकणच्या मातीमध्ये रुजणारे हे सर्व वृक्ष या भागाला समृध्दी तर देतीलच पण वृक्षांच्या उत्पादनावर आधारित शेकडो कुटिर उद्योग कोकण भूमीला स्वयंसिद्धतेकडे स्वावलंबनाच्या महाद्वारामधून घेऊन जाऊ शकतात. कोकणच्या मातीचे संरक्षण करावयाचे असेल तर या भूभागाचा विकास तेथील निसर्गाला बरोबर घेऊनच करावयास हवा.

      January 10, 2022


  • तुम्ही कॉफी पीता का?

    एक बातमी – ‘गेली कित्येक वर्ष डॉक्टर सांगत आले आहेत की कॉफी शरीराला घातक असते. पण आता नवीन संशोधनानुसार कॉफी शरीरावर सकारात्मक परिणाम घडवू शकते असे लक्षात आले आहे.’

      July 15, 2019


  • मुंबईची श्री महालक्ष्मी..!!

    मुंबईची महालक्ष्मी. प्रमाणभाषेत तिला ‘महालक्ष्मी’ म्हणत असले तरी, बोलीभाषेत मात्र ती ‘महालक्षुमी’. मी या लेखात तिचा उल्लेख तसाच करणार आहे. मी मालवणी असल्याने मला ‘आई’पेक्षा ‘आवस’ हा शब्द अधिक जवळचा वाटतो, तसंच महालक्षुमी हे तिचं नांव मला अधिक भावतं.

      October 31, 2018


  • “रग्बी” रुजतोय

    रग्बी हा खेळ पाश्चात्य देशांमध्ये खेळला जातो. या खेळात शक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. हा खेळ हळूहळू भारतातही रुजत असून राज्य आणि देशपातळीवरील विविध स्पर्धांमधून गुणी खेळाडू पुढे येत आहेत. अनेक बाबतीत अमेरिकन फुटबॉलशी साधर्म्य राखणार्‍या या खेळासाठी शक्ती, कौशल्ये आणि चापल्य यांचा त्रिवेणी संगम आवश्यक असतो. आदित्य पागे या उदयोन्मुख रग्बी खेळाडूकडून समोर आलेली माहिती.

      December 21, 2010


  • तुमच्याही मुलांना लठ्ठपणाची समस्या सतावतेय?

    लहान मुले हे नेहमीच मोठ्यांना फॉलो करतात आणि त्यामुळेच लहान मुलांमध्येही लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. आई-वडिलांची व्यस्त जीवनशैली, मुलांची खाण्यापिण्याची निवड, जंक फूड आणि तासंतास मोबाईलचा वापर ही सध्या लहान मुलांचा लठ्ठपणा वाढण्यामागची महत्वाची कारणं आहेत. म्हणून आज मी ह्या सगळ्यावर कशाप्रकारे मात करता येईल ह्यासंबंधी काही टिप्स येथे देणार आहे.

      March 23, 2019