वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
ज्यांना आपला पुरुषी अहंकार कुरवाळत बसायची सवय असते; त्यांच्याकडे पश्चात्ताप करण्यावाचून फार काही शिल्लक राहत नाही हे सत्य कायम लक्षात ठेवावे.
October 31, 2016
गुग्गुळ ही भारतातील एक औषधी आहे. धार्मिक कार्यक्रमात हिचा उपयोग धुपावर टाकण्यासाठी करतात. ही जंतुघ्न आहे. गुग्गूळ हा बर्सेरेसी कुलातील मध्यम उंचीचा एक पानझडी वृक्ष आहे. त्याचे शास्त्रीय नाव कॉमिफोरा मुकुल आहे. शुष्क वातावरण आणि खडकाळ जमिनीवर हा वृक्ष वाढतो. भारतात मुख्यत्वे उत्तर भारतातील राज्यांमध्ये तो आढळतो. गुजरात आणि राजस्थानमध्ये बेसुमार तोडीमुळे तो दुर्मिळ झाला असल्याने या वृक्षाचा समावेश नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींच्या यादीत करण्यात आला आहे.
April 28, 2024
भगवान श्रीविष्णुंच्या चरणकमलांचे अलौकिकत्व वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, भगवान श्रीविष्णु जगत पालक असल्याने त्यांना देव आणि दैत्य दोन्ही आपले आहेत. कोणत्याही एका समूहावर ते कधीच अन्याय होऊ देत नाहीत.
December 16, 2020
दादरा, नगर हवेली, वापी या भागात मी फिरलो आहे. चर्चगेट पासून ते वापी पर्यंत महाराष्ट्र गिळला गेला आहे. उंबरगाव महाराष्ट्रात सामील करण्याचा लढा संपला.... इतिहास जमा झाला.
बेळगाव, कारवार, निपाणीचे लोक महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्राच्या दरवाजावर अनेक वर्षे टक्कर देत आहेत. त्यांचा कपाळमोक्ष झाला. कानडी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खावून त्यांची हाडे पीचली आहेत पण अजूनही ते लढत आहेत. भविष्य अंधक्कारमय झाले आहे.
मुंबई कोणत्या जोरावर म्हणायची मराठी माणसाची ? कर्जत-कसा-याला गेलेला मराठी माणूस मुंबईत ये जा करतोय म्हणून कुठेतरी मराठी शब्द कानावर पडत आहेत. सर्व ठेकेदार, कंत्राटदार अमराठी, स्थानीय लोकाधिकार समिती सुस्त आहे.
विदर्भात महाराष्ट्र अस्मिता कधीच संपलीय. नाही नाही म्हणता विदर्भ चाललाच आहे हातातून ....
आम्ही मात्र बाजीराव मस्तानीचा नाच पाहत फुशारक्या मारतोय. एकेकाळी मराठी माणसाच्या तलवारीच्या धाकानी हिंदुस्थान ढवळून निघाला होता ना ........ त्याच इतिहासात रमलोय !!!
बोला जय भवानी जय शिवाजी ......!!!!
आवाज फाटे पर्यंत घोषणा द्या !!! तेव्हडेच समाधान ......
-- चिंतामणी कारखानीस
April 6, 2016
आजच्या प्रगत इंजिनिअरिंगला सुद्धा तोंडात बोट घालायला लावेल असा हा ‘भुलभुलैय्या’ लखनौच्या बडया इमामबाडयात आहे. नवाब आसफउद्दौलाने याच वास्तूत… सुरक्षिततेच्या दृष्टीने हा भुलभुलैय्या बांधला. यातल्या वास्तू-बांधकामशास्त्रातल्या योजना बघितल्या तर विश्वास बसत नाही. त्यातही इथे त्याने ध्वनीशास्त्रातल्या प्रतिध्वनीच्या उपयोगाची कमाल केली. अगदी आपल्या श्वासाचा देखील आवाज ऐकू येईल, इतकी जबरदस्त.
October 17, 2019
बसू नये देहाला थायराॅईड व हृदयविकारा चा धक्का म्हणुन मैत्रिणींनो मंगळसूत्र व बाजूबंद घालण्याचा विचार करा पक्का
मणक्याच्या आजारापासून रहायचे असेल जर लांब, तर मग घाला ना कंबरपट्टा, वाचवायला तुमच्या पाठिचा खांब !!
सायनस हा आजार आहे नाकाच्या हाडाचा म्हणून पूर्वजांनी सल्ला दिलाय नथीच्या वापराचा
कोकीळा गातांना लागते वसंत ऋतूची चाहूल, उष्णतेचा दाह कमी करते पैजण घातलेले पाऊल.
बांगड्या घातल्याने वाढते हाताच्या सौंदर्याची शान ,त्याच बांगड्यांमुळे होते गर्भाशय सुरक्षित असल्या ची जाण.
शारीरिक व मानसीक बदल.हा आहे एक भाग, म्हणून जोडवि बीरोदी घालुन सूहासिनी सारखी बाई तू वाग !!
शरीरातील रक्तप्रवाहासाठी टोचतात लहानपणीच कान ,
भारतीय संस्कृतीने दिला आहे, स्त्रियांना " कानातले " घालायचा मान.
December 13, 2016
मास्को येथील संग्रहालयामध्ये असलेले छत्रपति शिवाजी महाराज यांचे हे मूळ छायाचित्र आहे असे म्हणतात, त्यांना समोर बसवून हे काढले आहे व त्यावर त्यांचे हस्ताक्षर पण आहे.
September 30, 2009
दिवसेंदिवस पर्जन्याचे प्रमाण कमी होत आहे तसेच भूगर्भीय जलसाठ्याचे प्रमाणही कमी होत आहे. अशा स्थितीत शेती हा व्यवसाय जुगार बनत चालला आहे. कमी पाण्यावरही उत्पादन देणारे पिक म्हणजे शेवगा होय . कमी पाणी तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे हे पिक शेतकऱ्यांना वरदान ठरू शकते.
October 28, 2015
२६ जुलै रोजी कारगिल युद्धाला १७ वर्षे पूर्ण झाली. अजूनही या युद्धाची वीरगाथा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये तितकीच जिवंत आहे. कारगिल युद्धाचा प्रसार वर्तमानपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवर फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला. या युद्धावर अनेक पुस्तकेही प्रकाशित झालेली आहेत. कारगिल, लेह हा भाग समुद्रसपाटीपासून १३ हजार ते १८ हजार फुट उंचीवर आहे.
August 6, 2016
“आज आसपास पाहता असे आढळून येते की बहुतांश लोक कुठल्याना कुठल्या तणावामुळे त्रस्त आहेत. या सततच्या तणावामुळे नाना प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींचा प्रादुर्भाव वाढत आहे. अर्थात प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय शोधीत असतो. काही वेळा हे उपाय व्यवहार्य वाटत नाहीत म्हणून सोडून दिले जातात. मी सुद्धा या अनुभवातून गेलो आहे. बरीच वर्षे असा त्रास मी पण सहन केला.
माझ्या सुदैवाने काही चांगली ज्ञानी माणसे मला भेटली. काही चांगले साहित्य वाचनात आले. मग मी “परिपूर्ण आणि तणावमुक्त जीवनासाठी” काय करावे लागेल याचा शोध सुरु केला. मी निश्चय केला की असाच मार्ग शोधायचा की नवीन तणाव न निर्माण होता, जो पूर्णपणे व्यवहार्य असेल. जो माझ्यासारख्या सर्व सामान्य गृहस्थाश्रमी माणसाला सहजपणे आचरणात आणता येईल. जो मला हळूहळू का होईना बऱ्यापैकी “परिपूर्ण, तणावमुक्त आणि आनंदी जीवनाकडे” घेउन जाईल.
January 31, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti